STEMI-2017/C2/STEMI-App-and-its-mandatory-fields/Marathi
From Script | Spoken-Tutorial
|
|
00:01 | नमस्कार. STEMI ऍप and its mandatory fields वरील पाठात आपले स्वागत. |
00:08 | या पाठात शिकणार आहोत - टॅब्लेटवर STEMI ऍप उघडणे. |
00:15 | STEMI होमपेज समजून घेणे. |
00:17 | STEMI ऍपवरील अनिवार्य फिल्डसमधे माहिती भरणे. |
00:23 | या पाठाच्या सरावासाठी आपल्याकडे - STEMI ऍप इन्स्टॉल केलेली अँड्रॉईड टॅब्लेट आणि चालू स्थितीतील इंटरनेट जोडणी असावी. |
00:36 | STEMI ऍप हे STEMI चा लोगो असलेल्या लाल आयताप्रमाणे दिसते. |
00:42 | STEMI ऍप सिलेक्ट करण्यापूर्वी टॅब्लेट इंटरनेटशी जोडले असल्याची खात्री करा. |
00:50 | तसे नसल्यास तुमचे इंटरनेट कनेक्शन तपासण्यासंदर्भातील पॉप-अप दाखवला जाईल. |
00:56 | डिव्हाईस इंटरनेटला जोडल्यावर STEMI ऍप सिलेक्ट करा. |
01:01 | STEMI होमपेज उघडेल. |
01:04 | लक्षात घ्या stemiAuser असे दाखवत आहे. याचे कारण A हॉस्पिटल युजर आहे. |
01:12 | जर तुम्ही इतर हॉस्पिटलचे युजर असाल उदाहरणार्थ: B हॉस्पिटल, तर हे stemiBuser असे दाखवेल. |
01:22 | त्याचप्रमाणे C हॉस्पिटल आणि D हॉस्पिटलसाठी अनुक्रमे stemiCuser किंवा stemiDuser असे दाखवले जाईल. |
01:33 | STEMI ऍप हे EMRI अँब्युलन्समधून ऍक्सेस करत असल्यास stemiEuser असे दाखवले जाईल. |
01:42 | सर्व केसेसमधे आपण STEMI होमपेजमधे असतो. आता आपण पुढे जाण्यासाठी तयार आहोत. |
01:49 | STEMI होमपेजच्या मध्यभागात 3 टॅब्ज आहेत. |
01:54 | न्यू पेशंट टॅब, पेशंटची संपूर्ण हिस्ट्री भरण्यासाठी आहे. |
01:59 | सर्च टॅब, आधी सेव्ह केलेली पेशंटची माहिती शोधून ती सिलेक्ट करण्यासाठी मदत करते. |
02:05 | ECG टॅब कमीतकमी माहिती भरून त्वरित ECG घेण्यासाठी मदत करते. |
02:12 | तसेच पेजच्या डाव्या बाजूला वर मेनू टॅबदेखील आहे. ते कसे वापरायचे याबद्दल पुढील पाठांत जाणून घेऊ. |
02:21 | आता अनिवार्य फिल्डस म्हणजे काय हे समजून घेऊ. |
02:26 | जी फिल्डस छोट्या लाल ऍस्टेरिस्क या चिन्हाने दाखवली आहेत त्यांना मँडेटरी म्हणजेच अनिवार्य फिल्डस म्हणतात. |
02:34 | या फिल्डसमधे डेटा भरणे पर्यायी नसून अनिवार्य आहे. |
02:38 | सदर पेज सेव्ह करून पुढील पेज वर जाण्यासाठी हा डेटा भरलेला असणे आवश्यक आहे. |
02:45 | प्रात्यक्षिक करण्यासाठी मी मुख्य ECG टॅब सिलेक्ट करून तो उघडत आहे. |
02:51 | मुख्य ECG टॅबखालील
पेशंट नेम, एज, जेंडर आणि ऍडमिशन ही चारही फिल्डस अनिवार्य आहेत. |
03:01 | ही लाल ऍस्टेरिस्कच्या चिन्हाने दाखवली आहेत. |
03:05 | एक पेशंट गृहीत धरून खालील माहिती भरू.
पेशंट नेम: रमेश एज: 53 जेंडर: पुरुष |
03:15 | परंतु एक फिल्ड वगळू. जसे की…ऍडमिशन. |
03:19 | पेज सेव्ह करण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी पेजच्या खालच्या भागात असलेले Take ECG बटण सिलेक्ट करा. |
03:26 | सिलेक्ट द ऍडमिशन टाईप असा पॉप-अप मेसेज लगेच आलेला दिसेल. |
03:32 | तुम्ही बघू शकता की चारपैकी एकजरी फिल्ड आपण रिकामे ठेवले तरी पेज सेव्ह होणार नाही. |
03:39 | आता ऍडमिशन या रिकाम्या फिल्डमधे डायरेक्ट अशी माहिती भरू. |
03:45 | पेज सेव्ह करण्यासाठी पेजच्या खालच्या भागात असलेले Take ECG बटण सिलेक्ट करा. |
03:51 | लगेचच “Saved Successfully” असा मेसेज पेजच्या खालच्या भागात आलेला दिसेल. |
03:57 | अशाप्रकारे आपल्याला जेव्हा लाल ऍस्टेरिस्कचे चिन्ह असलेले फिल्ड दिसेल त्यात माहिती भरणे अनिवार्य आहे. |
04:05 | थोडक्यात, |
04:08 | आपण या पाठात शिकलो-
टॅब्लेटवर STEMI ऍप उघडणे, STEMI होमपेज समजून घेणे, STEMI ऍपवरील अनिवार्य फिल्डमधे माहिती भरणे.
|
04:20 | STEMI INDIA संस्थेची निर्मिती “लाभ निरपेक्ष संस्था” म्हणून झाली आहे. तिचे उद्दिष्ट मुख्यत्वे हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना उपचार मिळण्यातील विलंब कमी करणेआणि हृदयविकाराने होणा-या मृत्यूंची संख्या घटवणे. |
04:34 | IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD,Govt. of India यांच्याकडून मिळालेले आहे. अधिक माहितीसाठी कृपया http://spoken-tutorial.org या साईटला भेट द्या. |
04:47 | हा पाठ STEMI INDIA आणि IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट यांच्या योगदानाने बनला आहे.
हे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
|