STEMI-2017/C2/Introduction-to-Kallows-Device/Marathi
|
|
00:01 | नमस्कार. Kallows STEMI Kit वरील पाठात आपले स्वागत. |
00:07 | या पाठात शिकणार आहोत-
ECG लीडस्, B.P. cuff आणि SpO2 जोडणे, ECG काढणे, रक्तदाब आणि SpO2 तपासणे. |
00:22 | या पाठाच्या सरावासाठी आपल्याकडे Kallow’s STEMI Kit असावे. |
00:28 | STEMI Kit मधे
मेटल केसिंगमधील अँड्रॉईड टॅब, Mobmon डिव्हाईस 12.0, ब्लू टूथ B.P. मॉनिटर |
00:39 | ECG इलेक्ट्रोडस्
SPO2 प्रोब, वाय-फाय प्रिंटर, पॉवर स्ट्रीप यांचा समावेश होतो. |
00:48 | हे Mobmon डिव्हाईस आहे. |
00:52 | ह्याला डाव्या बाजूला चार्जिंग पोर्टसहित पॉवर बटण आहे. |
00:58 | आणि मागच्या बाजूला SpO2 आणि ECG ports पोर्टस आहेत. |
01:03 | केबलचे हे टोक Mobmon डिव्हाईसवरील ECG पोर्टला जोडा. |
01:10 | जोडणी झाल्यावर त्याच्या दोन्ही बाजूला दिलेल्या स्क्रूच्या सहाय्याने जोडणी नीट झाल्याची खात्री करा. |
01:17 | आता SpO2 प्रोबबद्दल जाणून घेऊ. |
01:21 | हा प्रोब पुढील घटकांनी बनला आहे-
Oximetry प्रोब/केबल, सेन्सर |
01:29 | आता SpO2 प्रोब कसा जोडायचा ते पाहू. |
01:34 | oximetry प्रोब/केबल Mobmon डिव्हाईसवरील SpO2 कनेक्टरला जोडा. |
01:41 | जोडणी पूर्ण झाल्यावर हे असे दिसेल. |
01:45 | रुग्णाचे बोट चित्रात दाखवल्याप्रमाणे सेन्सरच्या अगदी शेवटपर्यंत गेले असले पाहिजे. |
01:54 | सेन्सर लावण्याची जागा निवडताना तो हात किंवा पाय खालील साधनांना जोडलेला नसावा-
an arterial catheter, blood pressure cuff किंवा intravascular infusion line. |
02:09 | सामान्यतः oximetry प्रोब जोडणीच्या जागा आहेत-
प्रौढांसाठी किंवा लहान मुलांसाठी- बोट, पायाचे बोट आणि बाह्य कर्ण किंवा कानाची पाळी. |
02:23 | अर्भकांसाठी- पाऊल किंवा हाताचा तळवा आणि पायाचे मोठे बोट किंवा अंगठा. |
02:31 | कृपया याची नोंद घ्या- पुन्हा वापरण्याजोगे सेन्सर्स एकाच ठिकाणी चार तासापर्यंत वापरले जाऊ शकतात. त्वचा नीट असल्याची खात्री करण्यासाठी त्या स्थानांची नियमितपणे पाहणी करत रहा. |
02:47 | ओले किंवा खराब झालेले सेन्सर्स वापरू नका. इलेक्ट्रो सर्जरी दरम्यान किंवा इतर इलेक्ट्रिकल डिव्हाईस लावताना भाजण्याची शक्यता असते. |
03:00 | SpO2 सेन्सर्सच्या अयोग्य वापरामुळे टिशूचे नुकसान होऊ शकते किंवा भाजू शकते. |
03:08 | सेन्सरचा उपयोग करताना, त्याची जोडणी करताना, काढताना किंवा संचयन करताना ते अनावश्यकपणे पिळू नका किंवा त्यावर अतिरिक्त जोर लावू नका. |
03:20 | सेन्सर खूप घट्ट लावला असल्यास किंवा प्रकाश स्त्रोत जसे की, शस्त्रक्रियेदरम्यान वापरला जाणारा दिवा, बिलिरुबीन दिवा किंवा सूर्यप्रकाश यांमधून येणा-या खूप जास्त प्रकाशामुळे हृदयाच्या ठोक्यांचा सिग्नल नष्ट होऊ शकतो. |
03:37 | आता Blood Pressure cuff ची जोडणी करण्याबद्दल जाणून घेऊ. |
03:42 | cuff कनेक्टर ब्लूटूथ डिव्हाईस NIBP कनेक्टरला जोडा. |
03:49 | रुग्णाच्या हात/पाय यांच्या मापानुसार योग्य cuff size निवडा. सामान्यतः cuff ची रुंदी खांद्यापासून कोपरापर्यंत अंतराच्या दोन तृतीयांश असावी. |
04:04 | चित्रात दाखवल्याप्रमाणे रुग्णाच्या शक्यतो डाव्या हातावर (brachial artery वर) NIBP cuff गुंडाळा. |
04:14 | योग्य व्यवस्थापनासाठी रुग्णाच्या हातावर NIBP cuff घट्ट गुंडाळणे गरजेचे आहे. |
04:21 | ब्लूटूथ बीपी मॉनिटर सुरू करण्यासाठी Start बटण दाबा. |
04:26 | कृपया लक्षात ठेवा: साधनांचा उपयोग अयोग्य पध्दतीने केल्यास चुकीचे मोजमाप मिळू शकते. जसे की,
रुग्णाच्या हातावर cuff खूपच सैल गुंडाळणे , अयोग्य cuff size चा वापर, cuff हृदयाच्या समान पातळीवर न ठेवणे, छिद्र असलेला cuff किंवा ट्युब वापरणे रुग्णाची अति हालचाल |
04:52 | SpO2 सेन्सर आणि B.P cuff रुग्णाच्या एकाच हातावर लावू नये.
हे उपद्रवी अलार्म टाळण्यासाठी आहे. |
05:03 | काळजी घ्या की, NIBP मोजताना cuff ची ट्युब मुडपलेली किंवा दाबलेली असू नये. |
05:12 | शेवटी ECG leads कसे जोडायचे ते पाहू. |
05:18 | त्वचेची चांगल्याप्रकारे तयारी आणि इलेक्ट्रोडस् योग्य पध्दतीने स्थापित केलेले असल्यास चांगल्या प्रतीचा ECG मिळवता येऊ शकतो. |
05:27 | रुग्णाची चांगल्या प्रकारे तयारी करण्यासाठी या गोष्टी करणे आवश्यक आहे -
इलेक्ट्रोडचा भाग स्वच्छ करणे आणि छातीवरील केस काढून टाकणे |
05:37 | त्वचेचा epidermal लेयर काढून टाकण्यासाठी स्पिरीटच्या सहाय्याने हलक्या हाताने स्वच्छ करा. त्वचा फिकट लालसर होईल.
इलेक्ट्रोडचा भाग कोरडा होऊ द्या. |
05:50 | इलेक्ट्रोडच्या पृष्ठभागावर कोरडे झालेले जेल असल्यास ते काढून टाका. इलेक्ट्रोडस सपाट, स्नायू नसलेल्या आणि केस नसलेल्या भागावर लावा. |
06:01 | चांगल्या दर्जाचे म्हणजेच अतिशय प्रवाही असे ताजे जेल वापरा.
चांगला संपर्क प्रस्थापित करण्यासाठी इलेक्ट्रोडच्या पृष्ठभागावर पुरेशा प्रमाणात जेल लावा. |
06:15 | लक्षात ठेवा:
इलेक्ट्रोडस, लीडस आणि केबल्सचे उघडे भाग इतर विद्युत प्रवाह नेणा-या भागांच्या संपर्कात येणार नाहीत याची खात्री करा. |
06:27 | खराब झालेले electrode leads वापरू नका. |
06:31 | खात्री करा की, electrodes सैल बसलेले नाहीत. यामुळे कृत्रिम सिग्नल तयार होऊन हार्ट रिदम अलार्म वाजून उपद्रव निर्माण होऊ शकतो. |
06:43 | पुढील प्रकारे इलेक्ट्रोडस् लावले गेले पाहिजेत.
RA : Right intraclavicular area LA : Left intraclavicular area |
06:56 | V1 : sternum च्या उजव्या बाजूच्या कडेला चौथ्या इंटरकोस्टल स्पेसवर
V2 : sternum च्या डाव्या बाजूच्या कडेला चौथ्या इंटरकोस्टल स्पेसवर |
07:10 | V3 : V2 आणि V4 च्या मधे पाचव्या बरगडीवर
V4: डाव्या midclavicular लाईनवरील पाचवी इंटरकोस्टल स्पेस |
07:22 | V5: डावीकडील anterior axillary लाईनवरील पाचवी इंटरकोस्टल स्पेस
V6: डावीकडील midaxillary लाईनवरील पाचवी इंटरकोस्टल स्पेस
|
07:36 | RL : inguinal ligament च्या थोडा वरील Right lower abdominal quadrant
LL: inguinal ligament च्या थोडा वरील Left Lower abdominal quadrant |
07:53 | पॉवर कॉर्ड आणि रुग्णाला लावलेली केबल एकमेकांवरून जाणार नाही याची खात्री करा. |
07:59 | एका बाजूला असलेले पॉवर ऑन/ऑफचे बटण दाबून Mobmon डिव्हाईस सुरू करा. |
08:05 | लाईव्ह स्टीम पेजमधील ECG बघण्यासाठी STEMI डिव्हाईसवरील ECG टॅब निवडा. |
08:15 | थोडक्यात, |
08:16 | या पाठात आपण शिकलो -
ECG leads, BP cuff आणि SpO2 प्रोब जोडणे. ECG घेणे आणि रक्तदाब व SpO2 तपासणे |
08:31 | STEMI INDIA
संस्थेची निर्मिती “लाभ निरपेक्ष संस्था” म्हणून झाली आहे तिचे उद्दिष्ट मुख्यत्वे हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना उपचार मिळण्यातील विलंब कमी करणे आणि हृदयविकाराने होणा-या मृत्यूंची संख्या घटवणे हे आहे. |
08:45 | IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt. of India यांच्याकडून मिळालेले आहे.
अधिक माहितीसाठी कृपया http://spoken-tutorial.org या साईटला भेट द्या. |
09:00 | हा पाठ
STEMI INDIA आणि IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट यांच्या योगदानाने बनला आहे. हे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
|