Ruby/C3/Object-Oriented-Programming-Methods/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Ruby मध्ये Object Oriented Programming – Methods वरील स्पोकन ट्युटोरिअल मध्ये आपले स्वागत.
00:07 ह्या ट्युटोरिअल मध्ये आपण शिकू:
00:09 instance methods
00:11 class methods, accessor methods.
00:15 येथे आपण उबंटू व्हर्जन 12.04 वापरत आहोत.
00:19 Ruby 1.9.3
00:22 हे ट्युटोरिअल अनुसरण्यासाठी, तुमच्याकडे चालू स्थितीतील 'इंटरनेट' कनेक्शन असणे आवश्यक आहे.
00:27 तुम्हाला Linux commands, Terminal आणि Text-editor चे ज्ञान असणे आवश्यक आहे.
00:31 नसल्यास, संबंधित ट्युटोरिअलसाठी कृपया आमच्या वेबसाईट ला भेट द्या.
00:36 सुरवात करण्यापूर्वी, आठवा कि आपण पूर्वी “ttt” डिरेक्टरी बनवली होती.
00:41 डिरेक्टरी वर जाऊ.
00:44 नंतर ruby-tutorial वर.
00:47 ह्यात oop-methods आणि cd नावाची डिरेक्टरी तयार करा.
00:54 Instance methods काय आहेत?
00:56 Instance methods ते मेथड्स आहेत, जे क्लासच्या सर्व instances साठी उपलब्ध आहेत.
01:03 पूर्वी आपण एका क्लासचे objects किंवा instances कसे तयार करावे याचा अभ्यास केला होता.
01:09 Ruby tutorials च्या बेसिक लेवल मध्ये दर्शविल्यानुसार gedit मध्ये एक नवीन फाइल तयार करा.
01:14 त्याला instance_methods.rb नाव द्या.
01:19 माझ्याकडे एक instance methods अंमलबजावणीचा कार्यकारी उदाहरण आहे.
01:24 आपण ट्युटोरिअल पूर्ण समजत असताना, ट्युटोरिअल थांबून कोड टाइप करू शकता.
01:29 या उदाहरणात मी Product नामक एक क्लास परिभाषित केली आहे.
01:33 मी instance variables, "name" आणि "price" इनिशिअलाइज करण्यासाठी एक इनिशिअलाइज मेथड कॉल केले आहे.
01:41 मी "name" आणि "price" नामक instance methods देखील परिभाषित केल्या आहेत.
01:47 त्यातून प्रत्येक instance variables अनुक्रमे "name" आणि "price" रिटर्न करतो.
01:54 Instance methodsफक्त सामान्य मेथड्सप्रमाणे परिभाषित केले आहेत.
01:58 पूर्वी आपण 'Ruby ' मध्ये मेथड्स कशी तयार करायची याचा अभ्यास केला होता.
02:02 थोडक्यात, आपण पाहूया कि हे मेथड्स सर्व instances साठी कशी उपलब्ध होतील.
02:07 आता जी लॉजिक आपल्याकडे आहे त्याचा वापर करू.
02:11 इथे, मी एक Product ऑब्जेक्ट इनिशिअलाइज केले आहे आणि त्याला "product_object_1" म्हणून नाव दिले आहे.
02:18 मी त्याला name व्हॅल्यू आणि price व्हॅल्यू सह इनिशिअलाइज केले आहे.
02:24 initializer block हे instance variables "@name" आणि "@price" ला व्हॅल्यूज पास करतो.
02:31 आता हे product instance किंवा object, इन्स्टन्स मेथड्स name आणि price वापरू शकतात.
02:37 ह्या मेथड्सना कॉल करण्यावर, आपल्याला instance variables मध्ये संचित केलेली व्हॅल्युज मिळतात.
02:43 आता हा कोड कार्यान्वित करू.
02:46 टर्मिनल वर जाऊन टाईप करा: ruby instance_methods.rb आणि आउटपुट पाहण्यासाठी एंटर दाबा.
02:56 तुम्ही पाहू शकता कि तुम्ही ज्या व्हॅल्युजशी object इनिशिअलाइज केले होते, हे त्यांना प्रिंट करेल.
03:02 अर्थातच, "laptop" आणि "35,000".
03:07 पुढे, एक दुसरा instance किंवा object इनिशिअलाइज करा.
03:12 ह्या ऑब्जेक्टला product_object_2 म्हणून नाव देऊ.
03:18 या वेळी, name आणि price यासाठी व्हॅल्यूजच्या वेगळ्या सेट देऊ.
03:23 आता ह्या ऑब्जेक्ट साठी इन्स्टन्स मेथड्स "name" आणि "price" कॉल करूया.
03:35 पुढे, टर्मिनल वर परत जाऊ आणि पूर्वीप्रमाणेच कोड कार्यान्वित करू.
03:41 तुम्हाला लक्षात येईल कि हे यशस्वीरीत्या कार्यान्वित करते आणि नवीन व्हॅल्यूज प्रिंट करते.
03:48 हे सिद्ध करते कि instance methods त्या class Product च्या सर्व ऑब्जेक्ट्स साठी उपलब्ध आहेत.
03:55 तुम्ही आता स्वतःचा instance methods लिहिण्यास सक्षम असावे.
03:59 पुढे आपण पाहू कि class methods काय आहेत.
04:04 Class methods फक्त क्लास साठी उपलब्ध मेथड्स असतात.
04:09 हे methods क्लासच्या instances साठी उपलब्ध नाहीत.
04:14 तुम्ही वेगळ्या पद्धतीने class methods परिभाषित करू शकता.
04:16 आपण एक उदाहरण पाहू.
04:18 मूलभूत 'रुबी' ट्युटोरिअल्स मध्ये दर्शविल्यानुसार gedit मध्ये एक नवीन फाइल तयार करा.
04:24 त्याला class_methods.rb नाव द्या.
04:28 माझ्याकडे class methods चा एक कार्यकारी उदाहरण आहे.
04:32 आपण ट्युटोरिअल पूर्ण समजत असताना, ट्युटोरिअल थांबून कोड टाइप करू शकता.
04:36 मी पूर्वीप्रमाणेच Product class परिभाषित केले आहे.
04:40 मी पूर्वीप्रमाणेच एक initializer देखील कॉल केले आहे.
04:44 जसे कि, या वेळी मी description नावाची अतिरिक्त argument जोडली आहे.
04:48 मी पूर्वीप्रमाणेच instance variables च्या विपरीत व्हॅल्यूजला ठेवण्यासाठी class variables देखील वापरत आहे.
04:55 हा class तुम्हाला 3 वेगवेगळ्या पद्धती दाखवेल ज्याने एखादी व्यक्ती class methods परिभाषित करू शकतील.
05:01 name साठी घोषित class method तपासा.
05:06 येथे एक class name Product वापरून परिभाषित केले आहे.
05:10 त्यानंतर, दुसरे class method घोषणा तपासा.
05:14 येथे मी '"self keyword वापरले आहे.
05:18 पुढे, तिसरा मार्ग तपासा ज्याने तुम्ही class methods परिभाषित करू शकता.
05:23 आता हे class methods कार्यान्वित करू.
05:27 आता प्रथम पूर्वीप्रमाणेच Product चा ऑब्जेक्ट इनिशिअलाइज करू.
05:32 या वेळी आम्ही description साठी देखील एक व्हॅल्यू देत आहोत.
05:37 आता येथे दाखवल्याप्रमाणे, class methods कॉल करूया.
05:42 आता कोड कार्यान्वित करून आउटपुट तपासू.
05:47 टर्मिनल वर जा आणि पूर्वीसारखेच कोड कार्यान्वित करा.
05:54 तुम्ही पाहू शकता कि हे name, price आणि description साठी व्हॅल्यूज प्रिंट करेल.
05:59 आता तुम्ही तुमचा स्वतःचा class methods लिहिण्यास सक्षम असावे.
06:03 पुढे आपण पाहू कि accessor methods कोणती आहेत.
06:07 Ruby क्लासेस मध्ये परिभाषित डेटा ऍक्सेस करण्यासाठी accessor methods वापरतो.
06:13 Accessor methods, setter methods आणि getter methods शी बनतो.
06:18 Setter methods व्हॅल्यूज सेट करतो.
06:22 Getter methods त्या व्हॅल्यूजना मिळवतो.
06:24 Ruby या मेथड्सना घोषित करण्यासाठी attr_accessor शब्द वापरतात.
06:31 आता आपण accessor methods चे उदाहरण पाहू.
06:35 मूलभूत स्तरावर Ruby tutorials मध्ये दर्शविल्याप्रमाणे gedit मध्ये एक नवीन फाईल तयार करा.
06:39 त्याला accessor_methods.rb नाव द्या.
06:43 माझ्याकडे accessor methods वापरून पाहण्यासाठी (इम्प्लिमेंट) एक कार्यरत उदाहरण आहे.
06:47 तुम्ही हे ट्यूटोरियल समजत असताना, मधेच थांबवून कोड टाईप करू शकता.
06:52 या उदाहरणात मी Product नावाचा एक क्लास परिभाषित केली आहे.
06:56 मी 'name' आणि 'price' साठी attr_accessor घोषित केला आहे.
07:01 अशा प्रकारच्या methods वापरण्यास फक्त इतकेच करण्याची आवश्यक आहे.
07:05 आता हे कार्यान्वित करू.
07:07 मी एक Product object इनिशिअलाइज केले आहे.
07:10 नंतर, मी product ऑब्जेक्टचे name आणि price सेट केले आहे.
07:14 हे शक्य आहे कारण डिफॉल्टरूपात , attr_declaration व्हॅल्युज सेट करण्यासाठी मेथड्स तयार करतो.
07:22 मग नंतर मी 'name' आणि 'price' साठी getter methods वापरून व्हॅल्युज प्रिंट करण्याचा प्रयत्न केला आहे.
07:28 ह्या getter methods देखील attr_accessor च्या घोषणेद्वारे तयार करण्यात आल्या.
07:35 आता पूर्वीप्रमाणेच कोड कार्यान्वित करू.
07:40 तुम्हाला दिसेल की ज्या व्हॅल्युज सेट केल्या होत्या हे त्यांना प्रिंट करेल.
07:44 आतापासून, तुम्ही आता स्वतःचे accessor methods लिहिण्यास सक्षम असावे.
07:50 लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे डीफॉल्टनुसार accessor methods हे instance methods. आहेत.
07:55 म्हणून हे क्लास Product च्या भिन्न instances द्वारे ऍक्सेस केले जाऊ शकते.
08:00 या ट्युटोरिअल मध्ये आपण instance methods, class methods आणि accessor methods बद्दल शिकलो.
08:06 असाइन्मेंट म्हणून: 'Temperature नावाचा क्लास परिभाषित करा.
08:10 Ruby's चा accessor method सिनटॅक्स वापरून एक instance method लिहा.
08:15 या method ने दिलेल्या Fahrenheit साठी Celsius ची गणना करावी.
08:20 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
08:23 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
08:26 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
08:30 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, : Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
08:34 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08:38 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
08:44 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
08:48 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08:55 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
09:03 आय आय टी बॉम्बेतर्फे मी रंजना ऊके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana