Ruby/C2/Hello-Ruby/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search

Title of script: Hello-Ruby

Author: Manali Ranade

Keywords: Ruby


Time Narration
00:00 Hello Ruby वरील पाठात आपले स्वागत.
00:04 पाठात आपण शिकणार आहोत,
00:06 रुबी म्हणजे काय?
00:08 त्याची वैशिष्ट्ये,
00:09 RubyGems आणि रुबी वरील मदत.
00:12 त्याचे इन्स्टॉलेशन.
00:13 रुबी कोड कार्यान्वित करणे.
00:15 कॉमेंटस समाविष्ट करणे.
00:16 puts आणि print मधील फरक.
00:19 येथे उबंटु लिनक्स वर्जन 12.04 आणि Ruby 1.9.3 वापरणार आहोत.
00:27 ह्या पाठासाठी इंटरनेटची जोडणी आवश्यक आहे.
00:30 तुम्हाला लिनक्समधील टर्मिनल आणि टेक्स्ट एडिटरचे ज्ञान असावे.
00:37 रुबी म्हणजे काय ते जाणून घेऊ.
00:40 रुबी ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड, इंटरप्रिटेड स्क्रिप्टींग लँग्वेज आहे.
00:44 ही डायनॅमिक, ओपन सोर्स प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे.
00:48 ह्याचा सिंटॅक्स सुटसुटीत असून वाचायला आणि लिहायला सोपा आहे.
00:54 आता रुबीची वैशिष्ट्ये पाहू.
00:57 रुबी ही पोर्टेबल आहे.
00:59 रुबी कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टीमवर कार्यान्वित होते.
01:04 Smalltalk, BASIC किंवा Pythonप्रमाणे रुबीमधील व्हेरिएबलना डेटाटाईप नसतो.
01:11 ह्यातील मेमरी व्यवस्थापन आपोआप होत असते.
01:14 रुबी ही फ्री फॉरमॅट (free format) लॅग्वेज आहे.
01:17 प्रोग्रॅमची सुरूवात कोणत्याही ओळीत किंवा कॉलममधे करता येते.
01:21 रुबी इंटरनेट किंवा इंट्रानेट ऍप्लिकेशन्स लिहिण्यासाठी वापरली जाते.
01:26 रुबीच्या सर्वात महत्वाच्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे RubyGems.
01:31 RubyGems हे रुबी प्रोग्रॅमिंग लँग्वेजसाठीचे पॅकेज मॅनेजर आहे.
01:36 हे रुबीचे प्रोग्रॅम आणि लायब्ररीज वितरीत करण्यासाठी प्रमाणित फॉरमॅट प्रदान करते.
01:42 तुम्ही तुमचे gems बनवू आणि प्रकाशित करू शकता.
01:46 RubyGems वरील अधिक माहितीसाठी ह्या लिंकला भेट द्या.
01:51 रुबी संदर्भातील अधिक माहितीसाठी ह्या लिंकसना भेट द्या.
01:55 तुम्ही उबंटु सॉफ्टवेअर सेंटरद्वारे रुबी इन्स्टॉल करू शकता.
01:59 त्यावरील अधिक माहितीसाठी ह्या लिंकवर उपलब्ध असलेला उबंटु लिनक्स हा पाठ पहा.
02:07 रुबी इन्स्टॉल करण्याच्या इतर पध्दती ह्या स्लाईडवर दाखवल्या आहेत.
02:12 रुबी कोड 3 पध्दतीनी कार्यान्वित करता येतो.
02:16 कमांड लाईनद्वारे,
02:17 इंटरऍक्टीव्ह रुबी द्वारे,
02:19 फाईल म्हणून.
02:20 कार्यान्वित करण्याच्या सर्व पध्दती बघूया.
02:23 प्रथम Hello World कोड कमांड लाईनद्वारे कार्यान्वित करू.
02:28 टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl, Alt आणि T एकत्रितपणे दाबा.
02:33 तुमच्या स्क्रीनवर टर्मिनल विंडो उघडेल.
02:37 ही कमांड टाईप करा.
02:38 ruby space hyphen e space सिंगल कोटसमधे puts space नंतर डबल कोटसमधे Hello World आणि
02:50 एंटर दाबा.
02:53 Hello World असे आऊटपुट मिळेल.
02:56 टर्मिनलवर आऊटपुट प्रिंट करण्यासाठी "puts" कमांड वापरतात.
03:00 hyphen e' फ्लॅग एका ओळीचा कोड कार्यान्वित करण्याची परवानगी देते.
03:06 अनेक ओळींच्या कमांडस देण्यासाठी अनेक hyphen e फ्लॅग्ज वापरता येतात.
03:11 हे करून पाहू.
03:13 मागील कमांड मिळवण्यासाठी अप ऍरो की दाबा.
03:18 आणि टाईप करा space hyphen e space सिंगल कोटसमधे puts space 1+2 आणि
03:30 एंटर दाबा.
03:32 Hello World आणि '3' असे आऊटपुट मिळेल.
03:36 स्लाईडवर परत जाऊ.
03:38 इंटरऍक्टीव्ह रुबीबद्दल जाणून घेऊ.
03:42 इंटरऍक्टीव्ह रुबीद्वारे दिलेल्या कमांडसना त्वरित प्रतिसाद मिळतो.
03:48 रुबी स्टेटमेंटस दिल्यावर रिटर्न केलेल्या व्हॅल्यूज आणि आऊटपुट बघता येतो.
03:53 रुबीच्या जुन्या वर्जनसाठी irb वेगळे इन्स्टॉल करा.
03:57 आता "रुबी" कोड irb मधून कार्यान्वित करू.टर्मिनलवर जा.
04:03 टाईप करा irb आणि एंटर दाबा.
04:06 हे इंटरऍक्टीव्ह रुबी उघडेल.
04:09 टाईप करा puts space डबल कोटसमधे Hello World आणि एंटर दाबा.
04:19 Hello World असे आऊटपुट मिळेल.
04:22 आणि nil ही रिटर्न व्हॅल्यू मिळेल.
04:25 irb मधून बाहेर पडण्यासाठी exit टाईप करून एंटर दाबा.
04:31 फाईलमधूनही रुबी प्रोग्रॅम कार्यान्वित करता येतो.
04:34 कोड लिहिण्यासाठी तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता.
04:39 मी gedit टेक्स्ट एडिटर वापरत आहे. gedit टेक्स्ट एडिटरवर जाऊ.
04:45 टाईप करा puts space डबल कोटसमधे Hello World
04:54 मल्टिपल लाईन किंवा ब्लॉक कॉमेंटस कशा समाविष्ट करायच्या ते पाहू.
04:59 puts कमांडच्या आधी
05:01 टाईप करा equal to begin' आणि एंटर दाबा.
05:06 Equal to begin ने कॉमेंटची सुरूवात केली जाते.
05:10 तुम्हाला हवी ती कॉमेंट टाईप करा.
05:13 मी My first Ruby program टाईप करत आहे.
05:20 एंटर दाबा.
05:22 टाईप करा This code will print Hello world आणि एंटर दाबा.
05:30 आता टाईप करा equal to end
05:32 मल्टिपल लाईन कॉमेंटस संपवण्यासाठी equal to end चा वापर होतो.
05:37 कॉमेंटसचा उपयोग प्रोग्रॅमचे कार्य जाणून घेण्यास होतो.
05:41 डॉक्युमेंटेशनसाठी हे उपयोगी पडते.
05:45 सेव्हवर क्लिक करून फाईल सेव्ह करा.
05:50 फाईल वारंवार सेव्ह करणे हा चांगला सराव आहे.
05:53 सेव्ह ऍजचा डायलॉग बॉक्स तुमच्या स्क्रीनवर उघडेल.
05:57 तुम्हाला जिथे फाईल सेव्ह करायची आहे त्या लोकेशनवर जा.
06:01 डेस्कटॉपवर मी rubyprogram नावाने फोल्डर बनवत आहे.
06:06 फाईल या फोल्डरमधे सेव्ह करू.
06:10 नेम टेक्स्ट बॉक्समधे तुमच्या आवडीचे नाव टाईप करा.
06:14 मी hello.rb टाईप करत आहे.
06:17 रुबी फाईलला Dot rb हे एक्सटेन्शन दिले जाते.
06:21 सेव्हवर क्लिक करून फाईल सेव्ह करा. फाईल सेव्ह झाली आहे.
06:28 कोड कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जा.
06:32 प्रथम टर्मिनल क्लियर करा.
06:35 रुबी फाईल उपलब्ध असलेल्या डिरेक्टरीमधे असल्याची खात्री करा.
06:39 आपण home डिरेक्टरीत आहोत हे लक्षात घ्या. rubyprogram ह्या सबडिरेक्टरीत जाणे आवश्यक आहे.
06:47 त्यासाठी टाईप करा cd space Desktop/rubyprogram आणि एंटर दाबा.
07:00 फाईल कार्यान्वित करू. टाईप करा ruby space hello dot rb आणि एंटर दाबा.
07:10 HelloWorld हे आऊटपुट मिळेल.
07:13 आता puts आणि print स्टेटमेंटमधील फरक पाहू.
07:18 हे irb द्वारे करून पाहू.
07:22 त्यापूर्वी होम डिरेक्टरीवर जाणे आवश्यक आहे. टाईप करा "cd" आणि एंटर दाबा.
07:31 इंटरऍक्टिव्ह रुबी उघडण्यासाठी irb टाईप करून एंटर दाबा .
07:39 टाईप करा puts space डबल कोटसमधे Hello comma डबल कोटसमधे World
07:50 येथे दोन puts कमांड एकत्र जोडण्यासाठी कॉमा वापरला आहे.
07:55 एंटर दाबा.
07:57 HelloWorld हे आऊटपुट मिळेल, परंतु वेगवेगळ्या ओळींवर.
08:03 आता हेच print स्टेटमेंटद्वारे करून पाहू .
08:06 मागील कमांड परत मिळवण्यासाठी अप ऍरोची की दाबा.
08:09 puts च्या जागी print टाईप करून एंटर दाबा.
08:14 HelloWorld हे आऊटपुट मिळेल, परंतु एकाच ओळीवर.
08:19 puts कीवर्ड आऊटपुटच्या शेवटी नवी ओळ समाविष्ट करतो. print कीवर्ड तसे करत नाही.
08:27 print जेवढे प्रदान केले आहे तेच आऊटपुट देतो.
08:31 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. स्लाईडस वर जाऊ.
08:37 ह्यात आपण
08:39 रुबी बद्दल शिकलो.
08:41 रुबीचे इन्स्टॉलेशन,
08:42 रुबी कोड कार्यान्वित करणे.
08:44 =begin आणि =end वापरून मल्टिपल कॉमेंटस समाविष्ट करणे.
08:50 puts आणि print मधील फरक.
08:53 असाईनमेंट.
08:55 तुमचे नाव आणि वय प्रिंट करणारा प्रोग्रॅम लिहा.
08:58 ह्या पाठात आपण मल्टिपल लाईन कॉमेंटस वापरल्या.
09:01 तुम्ही सिंगल लाईन कॉमेंट देण्याचा प्रयत्न करा.
09:04 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
09:07 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09:10 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
09:15 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
09:17 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09:20 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09:24 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
09:30 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
09:34 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09:41 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
09:45 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
09:50 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Manali, Ranjana