QGIS/C4/DEM-Analysis/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 QGIS मधील DEM Analysis वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे.
00:07 या ट्युटोरियलमध्ये आपण शिकू,
00:11 SRTM डेटा वेबसाइटवरून DEM डेटा डाउनलोड करणे.
00:16 DEM ची Hillshade दाखवणे.
00:19 येथे मी वापरत आहे.Ubuntu Linux ओएस आवृत्ती 16.04
00:25 QGIS आवृत्ती 2.18 आणि कार्यरत इंटरनेट कनेक्शन.
00:33 या ट्यूटोरियलचे अनुसरण करण्यासाठी तुम्ही QGIS इंटरफेसशी परिचित असले पाहिजे.
00:39 या मालिकेतील पूर्व-आवश्यक शिकवण्या पाहण्यासाठी, कृपया या वेबसाइटला भेट द्या.
00:45 Digital Elevation Model  किंवा DEM ही रास्टर फाइल आहे.
00:50 हे प्रत्येक रास्टर सेलसाठी एलिव्हेशन डेटा दाखवते.
00:55 DEMs मोकळ्या पृथ्वीच्या भूभागाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वापरले जातात.
01:00 भूप्रदेश सहसा वनस्पती आणि मानवनिर्मित फीचरसपासून रहित असतो.
01:06 DEM चा उपयोग उंचीवर आधारित क्षेत्राची गणना आणि विश्लेषण करण्यासाठी केला जातो.
01:14 चला DEM डेटा डाउनलोड करूया.
01:17 दिलेली लिंक कोणत्याही वेब ब्राउझरमध्ये उघडा.
01:21 Shuttle radar topography mission (SRTM) data वेबसाइट उघडते.
01:27 या वेबसाइटवरून SRTM डेटा विनामूल्य डाउनलोड केला जाऊ शकतो.
01:32 Download Manager  पेजवर, एलवेशन मॉडल्स टाइल्स मध्ये व्यवस्थित केले जातात.
01:39 Tile Size आणि Format साठी दोन पर्याय उपलब्ध आहेत.
01:44 रेडिओ बटणावर क्लिक करून आपण टाइलचा आकार आणि स्वरूप निवडू शकतो.
01:50 जगाच्या नकाशावर पृष्ठ खाली स्क्रोल करा.
01:54 जगाच्या नकाशात झूम करण्यासाठी नकाशाच्या डाव्या कोपर्‍यात + चिन्ह वापरा.
02:00 Maharashtra टाइलवर क्लिक करा.
02:03 जगाच्या नकाशाच्या वरच्या-डाव्या कोपर्‍यात असलेल्या Search बटणावर क्लिक करा.
02:09 Download विंडो उघडते.
02:12 Description  हैडिंग पर्यंत खाली स्क्रोल करा.तळाशी असलेल्या Download SRTM  लिंक वर क्लिक करा.
02:20 एक डायलॉग बॉक्स उघडेल, Save File करा पर्याय निवडा. OK बटणावर क्लिक करा.
02:29 माझ्या सिस्टमवर,  Downloads  फोल्डरवर zip file डाउनलोड होते.
02:34 zip file मधील कंटेंट एक्सट्रॅक्ट करा.
02:38 राइट -क्लिक करा आणि येथे Extract Here पर्याय निवडा.
02:43 एक्सट्रॅक्ट केलेल्या फोल्डरवर डबल-क्लिक करा.हा DEM dataset आहे.
02:50 येथे आपल्याला वेगवेगळ्या फाईल एक्स्टेंशन असलेल्या अनेक फाईल्स दिसतात.
02:55 फोल्डर बंद करा.
02:57 QGIS इंटरफेस उघडा.
03:00 menu bar वरील Layer menu वर क्लिक करा.
03:04 सब-मेनूमधून, Add layer निवडा,Add Raster Layer पर्यायावर क्लिक करा.
03:11 Data source  डायलॉग बॉक्स उघडते.
03:14 SRTM वेबसाइटवरून डाउनलोड केलेल्या SRTM फोल्डरवर नेव्हिगेट करा.
03:21 फोल्डरच्या कंटेंट मधून, .tif एक्सटेंशन असलेली फाइल निवडा.Open बटणावर क्लिक करा.
03:31 कॅनव्हासवर तुम्हाला भूप्रदेशाचा DEM दिसेल.
03:36 DEM मध्ये भूप्रदेशाविषयी सर्व 3D information असते.
03:41 रास्टर इमेज वरील प्रत्येक पिक्सेल त्या स्थानावरील सरासरी उंची दर्शवतो.ही उंची मीटरमध्ये दिली आहे.
03:52 डार्क पिक्सेल कमी उंची असलेल्या क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करतात.
03:57 लाइटर पिक्सेल उच्च उंची असलेल्या क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करतात.
04:02 चला या नकाशाचे DEM विश्लेषण सुरू करूया.
04:07 मेनू बारवरील  Raster  मेनूवर क्लिक करा.
04:11 ड्रॉप डाउनमधून Analysis वर क्लिक करा.सब-मेनूमधून DEM (Terrain models) वर क्लिक करा.
04:19 DEM डायलॉग बॉक्स उघडतो.
04:22 इनपुट फाइल फील्डमध्ये डीफॉल्ट निवड म्हणून DEM layer आहे.
04:28 Output file च्या पुढील Select बटणावर क्लिक करा.
04:33 Save the results to..  डायलॉग बॉक्स उघडेल.
04:37 डायलॉग बॉक्समध्ये, फाइलला Hillshade.tif असे नाव द्या.
04:44 मी ते Desktop वर सेव्ह करेन.
04:47 Save बटणावर क्लिक करा.
04:50 Mode पर्याय म्हणून Hillshade निवडा.
04:54 येथे डीफॉल्टनुसार Hillshade आधीपासूनच निवडलेले आहे.
04:59  Load into canvas when finished चेक-बॉक्स चेक करा.
05:05 येथे डीफॉल्टनुसार ते आधीच निवडलेले आहे.
05:09 डीफॉल्ट सेटिंग्ज तशीच राहू द्या.
05:12 Ok बटणावर क्लिक करा.
05:15  Processing Completed मेसेज घेऊन एक पॉप-अप बॉक्स उघडतो.OK बटणावर क्लिक करा.
05:22 Qgis.bin डायलॉग बॉक्समधील OK बटणावर क्लिक करा.
05:27 DEM डायलॉग बॉक्सवरील Close बटणावर क्लिक करा.
05:32 Layers panel मध्ये आता नवीन लेयर, Hillshade जोडला आहे.
05:37 कॅनव्हासवर तुम्हाला Hillshade मोडमध्ये रास्टर नकाशा दिसेल.
05:42 हा नकाशा 3D प्रतिमा तयार करण्यासाठी लाइट आणि शेडो वापरून तयार केला जातो.
05:48 मॉडेल अधिक स्पष्ट करण्यासाठी, आपण आच्छादन म्हणून Hillshade वापरू.
05:54 आता आपण मूळ DEM लेयरचे symbology बदलू.
05:59 Layers पॅनेलमधील srtm लेयरवर राइट -क्लिक करा.
06:04 कॉन्टैक्स्ट मेनूमधून properties पर्याय निवडा.
06:09 Layer Properties डायलॉग बॉक्स उघडतो.
06:13 डाव्या पॅनलमधून  Style निवडा.
06:17 Band Rendering  विभागाअंतर्गत, Render type बदलून Singleband pseudocolor करा .
06:24  Load minimum/maximum values करा अंतर्गत,  minimum/maximum रेडिओ बटणावर क्लिक करा.
06:33 Interpolation  ड्रॉप-डाउनमधून  Linear निवडा.
06:37 ही येथे डीफॉल्ट निवड आहे.Color ड्रॉप-डाउन मधून Spectral निवडा.
06:44 खाली स्क्रोल कर.ड्रॉप डाउनमधून Continuous म्हणून Mode निवडा.
06:50  Classify  बटणावर क्लिक करा.
06:53 5 नवीन रंग वैल्यूज तयार केली आहेत.
06:57 रंग सर्वात कमी ते सर्वोच्च पर्यंत रास्टरच्या उंचीची वैल्यूज दर्शवतात.
07:04 तळाशी उजव्या कोपर्यात  Apply बटण आणि OK बटणावर क्लिक करा.
07:10 लेयर्स पॅनेलमध्ये, Hillshade लेयर डिसेबल करा.
07:14 Hillshade लेयर च्या समोरील चेक-बॉक्स अनचेक करा.
07:18 आता कॅनव्हासवर तुम्हाला स्पेक्ट्रल कलर नकाशा दिसेल.
07:24 लाल छायांकित भूभाग कमीत कमी उंच आहे आणि निळा सर्वात उंच आहे.
07:30  Hillshade layer एनेबल करा.
07:33 Layers Properties डायलॉग बॉक्स उघडा.
07:37 डाव्या पॅनलमधून Transparency  निवडा.
07:41 स्लायडर ड्रॅग करून  Global transparency ५०% वर सेट करा.
07:47 Apply बटण आणि OK बटणावर क्लिक करा.
07:51 नकाशा झूम करा.
07:53 कॅनव्हासवर आता आपल्याला लँडस्केपची वर्धित स्थलाकृति दिसते.
08:00 चला थोडक्यात बघू.
08:03 या ट्युटोरियलमध्ये आपण शिकलो.SRTM डेटा वेबसाइटवरून DEM डेटा डाउनलोड करणे
08:11 DEM ची Hillshade दाखवणे
08:15 येथे असाइनमेंट आहे.
08:17 रास्टर नकाशासाठी Slope मोड वापरून भूप्रदेशाची कल्पना करा.  Slope लेयरसाठी symbology बदला
08:27 इशारा: Slope म्हणून Mode निवडा आणि आच्छादन म्हणून वापरा.
08:33 तुमची पूर्ण केलेली असाइनमेंट येथे दाखवल्याप्रमाणे दिसली पाहिजे.
08:38 हा व्हिडिओ स्पोकन ट्युटोरियल प्रकल्पाचा सारांश देतो. कृपया डाउनलोड करून पहा.
08:45 आपण स्पोकन ट्युटोरियल वापरून कार्यशाळा घेतो आणि प्रमाणपत्रे देतो.कृपया आमच्याशी संपर्क साधा.
08:54 कृपया या फोरमवर तुमच्या वेळेनुसार प्रश्न पोस्ट करा
08:58 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टला NMEICT, MHRD सरकारने निधी दिला आहे.
09:06 या ट्यूटोरियलचे अनुवाद राधिका हुद्दार यांनी केले असून आवाज मैत्रेय बापट यांनी दिला आहे.सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.

Contributors and Content Editors

Radhika