QGIS/C2/Creating-a-Map/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | QGIS मध्ये Creating a Map वरील ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:07 | या ट्युटोरियलमध्ये, आपण प्रिंट कंपोझर वापरून नकाशा तयार करणे शिकू. |
00:14 | प्रिंट कंपोझरमध्ये नकाशा घटक जोडणे. |
00:18 | नकाशा एक्स्पोर्ट करणे . |
00:20 | हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी, मी वापरत आहे.उबंटू लिनक्स ओएस आवृत्ती 16.04. |
00:28 | QGIS आवृत्ती 2.18 |
00:32 | या ट्यूटोरियलचे अनुसरण करण्यासाठी तुम्ही QGIS इंटरफेसशी परिचित असले पाहिजे. |
00:39 | पूर्वआवश्यक ट्यूटोरियलसाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. |
00:44 | प्लेअरच्या खाली असलेल्या Code files लिंकमध्ये दिलेले फोल्डर डाउनलोड करा. |
00:50 | डाउनलोड केलेल्या झिप फाईलमधील सामग्री काढा आणि फोल्डरमध्ये जतन करा. |
00:57 | हे माझे Code files folder आहे. |
01:00 | फोल्डर उघडण्यासाठी डबल-क्लिक करा. |
01:03 | या फोल्डरमध्ये तुम्हाला भारत आणि जगाच्या नकाशासाठी शेप फाइल्स मिळतील. |
01:09 | indiaboundary.shp फाइल शोधा. |
01:14 | ही फाइल QGIS मध्ये उघडण्यासाठी, फाइलवर राइट-क्लिक करा. |
01:19 | कॉन्टैक्स्ट मेनू उघडतो. |
01:22 | पर्याय निवडा, Open with QGIS Desktop. |
01:27 | नकाशा थेट QGIS इंटरफेसमध्ये उघडतो. |
01:32 | तुम्हाला Open with QGIS Desktop हा पर्याय दिसत नसल्यास, प्रथम QGIS इंटरफेस उघडा. |
01:41 | येथे मी QGIS इंटरफेस उघडला आहे. |
01:45 | डाव्या टूलबारवरील अॅड वेक्टर लेयर टूलवर क्लिक करा. |
01:50 | Add Vector Layer डायलॉग बॉक्स उघडतो. |
01:54 | बॉक्समध्ये, डेटासेट टेक्स्ट बॉक्सच्या पुढे असलेल्या ब्राउझ बटणावर क्लिक करा. |
02:00 | एक डायलॉग बॉक्स उघडतो. |
02:03 | डेस्कटॉपवरील Code files फोल्डरवर नेव्हिगेट करा. |
02:07 | indiaboundary.shp फाइल निवडा.Open बटणावर क्लिक करा. |
02:15 | Add Vector Layer डायलॉग बॉक्समध्ये, open बटणावर क्लिक करा. |
02:20 | कॅनव्हासवर भारताचा सीमा नकाशा दिसतो. |
02:24 | आता भारतातील काही शहरांचे प्रतिनिधित्व करणारी शेप फाइल जोडू. |
02:30 | पुन्हा, टूलबारवरील Add Vector Layer टूलवर क्लिक करा. |
02:36 | Add Vector Layer डायलॉग बॉक्स उघडतो. |
02:40 | बॉक्समध्ये ब्राउझ बटणावर क्लिक करा. |
02:44 | एक डायलॉग बॉक्स उघडतो. |
02:47 | डेस्कटॉपवरील Code files फोल्डरवर नेव्हिगेट करा. |
02:51 | place.shp फाइल निवडा.Open बटणावर क्लिक करा. |
02:58 | Add Vector Layer डायलॉग बॉक्समध्ये, Open बटणावर क्लिक करा. |
03:03 | शहरे नकाशावर पॉइंट फीचर्स म्हणून दर्शविली आहेत. |
03:07 | या शहरांना लेबल लावूया. |
03:10 | Layers पॅनेलमधील Places लेयरवर राइट क्लिक करा. |
03:15 | कॉन्टैक्स्ट मेनूमधून, Properties पर्यायावर क्लिक करा. |
03:20 | लेअर प्रॉपर्टीज डायलॉग बॉक्समध्ये labels टॅब निवडा. |
03:25 | शीर्षस्थानी असलेल्या ड्रॉप-डाउनमध्ये, Show labels for this layer पर्याय निवडा. |
03:32 | Label with ड्रॉप-डाउनमध्ये, दिलेल्या पर्यायांमधून name निवडा. |
03:38 | टेक्स्ट टॅबमध्ये, आपल्याकडे निवडण्यासाठी पर्याय आहेत.fonts |
03:46 | style |
03:49 | size |
03:51 | color इ. |
03:57 | Apply बटण आणि ओके बटणावर क्लिक करा. |
04:02 | कॅनव्हासवर, काही शहरानं सोबत भारताचा नकाशा आणि लॅबेल्स प्रदर्शित होते. |
04:08 | ही नकाशा फाइल छपाई किंवा प्रकाशनाच्या उद्देशाने इमेज फॉरमॅटमध्ये एक्स्पोर्ट केली जाऊ शकते. |
04:15 | QGIS मध्ये प्रिंट कंपोझर नावाचे टूल आहे. |
04:19 | हे तुम्हाला वाचण्यास सोपे असलेल्या फॉरमॅटमध्ये नकाशे तयार करण्यास अनुमती देते. |
04:24 | मेनू बारवरील प्रोजेक्ट मेनूवर क्लिक करा आणि New Print Composerनिवडा. |
04:31 | Composer title डायलॉग बॉक्स उघडतो. |
04:35 | तुम्हाला composer साठी शीर्षक एंटर करण्यास सांगितले जाईल. |
04:40 | शीर्षक म्हणून India-Map टाइप करा. |
04:44 | ओके बटणावर क्लिक करा. |
04:47 | प्रिंट कंपोझर विंडो उघडते. |
04:50 | प्रिंट कंपोझर तुम्हाला रिक्त कॅनव्हास प्रदान करतो. |
04:54 | कॅनव्हासच्या बाजूला उजवीकडे, तुम्हाला दोन पॅनेल दिसतील. |
04:59 | वरचे पॅनेल आणि खालचे पॅनेल . |
05:03 | पॅनेल सक्षम करण्यासाठी, View मेनूवर क्लिक करा. |
05:08 | मेनूमधून खाली स्क्रोल करा आणि Panels निवडा. |
05:13 | सब-मेनू पॅनेलसची सूची दाखवते.येथे काही पॅनेलस आधीच निवडलेले आहेत. |
05:21 | ते निवडण्यासाठी पॅनेल नेम वर क्लिक करा. |
05:24 | पॅनेल कॅनव्हासच्या उजव्या बाजूला दिसते. |
05:28 | सर्व प्रिंट कंपोझर टूल्स मेनूमध्ये आणि टूलबारवर आयकॉन म्हणून उपलब्ध आहेत. |
05:37 | टूलबार डावीकडे तसेच Composer विंडोच्या वरच्या बाजूला उपस्थित आहेत. |
05:45 | अधिक माहितीसाठी, कृपया या ट्यूटोरियलसह प्रदान केलेली अतिरिक्त सामग्री पहा. |
05:52 | आता आपण आपला नकाशा एकत्र करण्यास सुरुवात करूया. |
05:56 | प्रिंट कंपोझर विंडोमध्ये, टूलबारवरील Zoom full बटणावर क्लिक करा. |
06:03 | हे लेआउट त्याच्या पूर्ण मर्यादेपर्यंत प्रदर्शित करेल. |
06:07 | आता आपल्याला QGIS कॅनव्हासमध्ये दिसणारे नकाशाचे दृश्य Composer कडे आणावे लागेल. |
06:14 | टूलबारवरील Add new map टूलवर क्लिक करा. |
06:19 | composer विंडोवर कर्सर हलवा. |
06:23 | कर्सर आता plus (+) चिन्ह म्हणून पाहिले जाते. |
06:27 | हे दाखवते की Add Map बटण सक्रिय आहे. |
06:31 | Composer विंडोवर आयत काढण्यासाठी डावे-माऊस बटण क्लिक करा आणि ड्रॅग करा. |
06:37 | किनारी बाजूने समास सोडा. |
06:40 | तुम्हाला दिसेल की आयत विंडो मुख्य QGIS कॅनव्हासमधील नकाशासह रेंडर केली जाईल. |
06:48 | प्रस्तुत नकाशा संपूर्ण विंडो कव्हर करत नाही. |
06:43 | डाव्या टूलबारवर Move item content टूलवर क्लिक करा. |
06:59 | माऊसचे डावे बटण वापरून, विंडोमध्ये नकाशा हलवा आणि मध्यभागी ठेवा. |
07:05 | शीर्षकासाठी शीर्षस्थानी जागा सोडा. |
07:09 | आता आपण मुख्य नकाशावर ग्रिड आणि झेब्रा बॉर्डर ऍड करू. |
07:14 | आयटम प्रॉपर्टी पॅनेलमध्ये, ग्रिडस विभागापर्यंत खाली स्क्रोल करा. |
07:19 | विस्तारित मेनू पाहण्यासाठी ग्रिड्सच्या पुढे असलेल्या लहान काळ्या-त्रिकोणावर क्लिक करा. |
07:25 | ग्रीन प्लस (+) , Add a new grid बटणावर क्लिक करा. |
07:30 | आता ग्रिड विभागातील सर्व फीचर्स सक्षम आहेत. |
07:35 | आवश्यक असल्यास, CRS बदलण्याचा पर्याय आहे.मी तो तसाच सोडून देईन. |
07:43 | ड्रॉप-डाउन बाण वापरून X आणि Y दोन्ही दिशेमध्ये 10 अंश म्हणून Interval मूल्ये निवडा. |
07:51 | ग्रिड फ्रेम विभागापर्यंत खाली स्क्रोल करा आणि Frame style निवडा.मी झेब्रा निवडेन. |
07:59 | फ्रेमचा साईझ,थिकनेस,कलर इत्यादी बदलण्याचे पर्याय आहेत. |
08:07 | तुमच्या गरजेनुसार पर्याय निवडा. |
08:12 | खाली स्क्रोल करा आणि Draw Coordinates चेक-बॉक्स तपासा. |
08:17 | निर्देशांक सुवाच्य होईपर्यंत Distance to map frame समायोजित करा |
08:23 | लेबलस हलवण्यासाठी वरच्या किंवा खालच्या बाजूच्या बाणावर क्लिक करा. |
08:30 | Coordinate precision म्हणून 1 निवडा. |
08:34 | हे पहिल्या दशांश पर्यंतचे निर्देशांक प्रदर्शित करेल. |
08:38 | पुढे, आपण नकाशावर नॉर्थ एरो ऍड करू . |
08:43 | प्रिंट कम्पोझर नकाशाशी संबंधित इमेजच्या चांगल्या संग्रहासह येतो. |
08:49 | टूल बारवरीलAdd image icon वर क्लिक करा. |
08:54 | नकाशा कंपोझर विंडोवर कर्सर आणा. |
08:58 | तुमचे डावे माऊस बटण धरून, नकाशा कॅनव्हासच्या वरच्या उजव्या कोपर्यात एक लहान आयत क्लिक करा आणि काढा. |
09:07 | उजव्या पॅनलमधील Item Properties टॅब अंतर्गत, Search directories विभाग विस्तृत करा. |
09:14 | तुमच्या आवडीच्या नॉर्थ एरोच्या प्रतिमेवर क्लिक करून निवडा. |
09:20 | नकाशा कंपोझर विंडोमधील बॉक्समध्ये प्रतिमा दिसते. |
09:25 | नकाशा कंपोझर विंडोवर क्लिक करा. |
09:28 | तुम्हाला नकाशाच्या वरच्या उजव्या कोपर्यात नॉर्थ एरोची प्रतिमा दिसेल. |
09:34 | आता आपण नकाशावर स्केल बार जोडू. |
09:38 | टूलबारवरील Add new scalebar tool वर क्लिक करा. |
09:43 | नकाशावर क्लिक करा जिथे तुम्हाला स्केलबार दाखवायचा आहे. |
09:47 | मी तळाशी-डाव्या कोपर्यात स्केल बार जोडतो. |
09:52 | सेगमेंटस विभागा अंतर्गत उजव्या पॅनेलमध्ये, तुम्ही विभागांची संख्या आणि त्यांचा आकार समायोजित करू शकता. |
10:00 | आपण आता आपल्या नकाशासाठी शीर्षक जोडू. |
10:04 | डाव्या टूल बारमधून Add new Label टूल वर क्लिक करा. |
10:09 | नकाशा कंपोझर विंडोवर कर्सर आणा. |
10:13 | तुमचे डावे माऊस बटण धरून, नकाशाच्या शीर्ष-मध्यभागी एक बॉक्स काढा. |
10:19 | उजव्या पॅनलवर तुम्हाला लेबलसाठी Item Properties टॅब दिसेल. |
10:24 | Main Propertiesअंतर्गत, टेक्स्ट बॉक्समध्ये, Map of India टाइप करा. |
10:31 | Appearance विभागात, फॉन्ट टॅबवर क्लिक करा. |
10:36 | Select Font डायलॉग बॉक्स उघडेल, योग्य फॉन्ट, फॉन्ट style आणि Size निवडा. |
10:49 | ओके बटणावर क्लिक करा. |
10:52 | तुमच्या आवडीनुसार फॉन्टचा कलर, मर्जिन्स आणि अलायमेन्ट बदला. |
11:03 | तुम्ही बदल करणे पूर्ण केल्यानंतर, बदल पाहण्यासाठी composer विंडोमध्ये क्लिक करा. |
11:10 | निवडलेल्या फॉन्ट आणि साईझ लेबल composer विंडोमध्ये नकाशावर दिसते. |
11:17 | पुढे एक Inset map जोडूया. |
11:21 | मुख्य QGIS विंडोवर स्विच करा. |
11:24 | टूलबारवरील झूम इन बटणावर क्लिक करा. |
11:28 | नकाशावर कर्सर आणा, मुंबईच्या आसपासचा परिसर झूम करा. |
11:34 | क्षेत्र झूम करण्यासाठी मुंबईभोवती एक आयत काढा. |
11:39 | आपण आता मॅप इनसेट जोडण्यासाठी तयार आहोत. |
11:43 | प्रिंट कंपोझर विंडोवर स्विच करा. |
11:46 | टूलबारवरील Add new map टूलवर क्लिक करा. |
11:51 | कंपोझर विंडोच्या वरच्या डाव्या कोपर्यात एक आयत काढा. |
11:57 | टूल बारमधून Move item Content टूल निवडा. |
12:02 | inset map वर कर्सर ठेवा. |
12:05 | इनसेटमधील नकाशा तुमच्या प्राधान्याच्या स्थानावर हलवा. |
12:10 | तुमच्याकडे प्रिंट कंपोझर, Main map आणि इनसेट मॅपमध्ये 2 मॅप ऑब्जेक्ट असतील. |
12:17 | Item Properties पॅनेलमध्ये, फ्रेम विभागापर्यंत खाली स्क्रोल करा आणि त्यापुढील बॉक्स चेक करा. |
12:26 | inset map च्या फ्रेम बॉर्डरचा रंग आणि जाडी बदला, |
12:36 | inset map चा पार्श्वभूमी रंग बदला, जेणेकरून नकाशाच्या पार्श्वभूमीमध्ये फरक करणे सोपे होईल. |
12:45 | इतर नकाशा घटक एक्सप्लोर करा जसे की Legends, shapes, arrows इ. |
12:53 | एकदा आपण आवश्यक बदल करणे पूर्ण केल्यावर, आपण नकाशा सेव्ह किंवा एक्स्पोर्ट करू शकता. |
12:59 | मेनू बारवरील Composer मेनूवर क्लिक करा. |
13:03 | येथे आपल्याकडे Image, PDF किंवा SVG मॅप एक्स्पोर्ट करण्याचे पर्याय आहेत. |
13:12 | एका प्रतिमेच्या रूपामध्ये मॅप एक्स्पोर्ट करूया.Export as Image पर्याय निवडा. |
13:20 | डायलॉग बॉक्स उघडल्यावर रचना सेव्ह करा.योग्य फाईलचे नाव, स्थान आणि स्वरूप द्या. |
13:29 | मी PNG फॉरमॅट निवडेन.सेव्ह बटणावर क्लिक करा. |
13:35 | Image export options डायलॉग बॉक्स उघडतो. |
13:39 | योग्य रिझोल्यूशन,पेज विड्थ आणि हाईट निवडा. |
13:44 | मी पृष्ठाची रुंदी 800 पिक्सेल म्हणून सेट करेन. |
13:49 | सेव्ह बटणावर क्लिक करा. |
13:52 | इमेज फाइल म्हणून सेव्ह केलेला नकाशा येथे आहे. |
13:56 | हा नकाशा आता मुद्रित किंवा प्रकाशित केला जाऊ शकतो. |
14:01 | चला थोडक्यात बघू ,या ट्युटोरियलमध्ये आपण शिकलो, |
14:06 | प्रिंट कंपोजर वापरून नकाशे तयार करा, कंपोझरमध्ये नकाशा घटक जोडा, नकाशा एक्सपोर्ट करा. |
14:16 | असाइनमेंट, Code files लिंकमध्ये दिलेला जागतिक डेटासेट वापरून, आशिया खंडाचा नकाशा तयार करा. |
14:25 | भारताचा इनसेट नकाशा तयार करा.मॅप legend जोडा. |
14:31 | तुमची पूर्ण केलेली असाइनमेंट येथे दाखवल्याप्रमाणे दिसली पाहिजे. |
14:36 | खालील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश देतो. कृपया डाउनलोड करून पहा. |
14:44 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा आयोजित करते आणि ऑनलाइन चाचण्या उत्तीर्ण झाल्याबद्दल प्रमाणपत्र देते.अधिक तपशीलांसाठी कृपया आम्हाला लिहा. |
14:54 | कृपया या फोरमवर तुमचे कालबद्ध प्रश्न पोस्ट करा. |
14:58 | स्पोकन ट्युटोरियल प्रकल्पासाठी NMEICT, MHRD सरकारने निधी दिला आहे.या मिशनची अधिक माहिती खालील लिंकवर उपलब्ध आहे. |
15:09 | या ट्यूटोरियलचे योगदान NIT सुरथकल मधील Prajwal.M आणि IIT Bombay मधील स्नेहलता यांनी दिले आहे.बघितल्याबद्दल धन्यवाद.
|