QGIS/C2/Creating-Dataset-Using-Google-Earth-Pro/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Creating Dataset using Google Earth Pro वरील ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत आहे.
00:07 या ट्युटोरियलमध्ये आपण शिकू
00:10 Google Earth Pro डाउनलोड आणि इंस्टॉल करणे.
00:13 नेव्हिगेट करण्यासाठी आणि डेटासेट तयार करण्यासाठी Google Earth Pro वापरणे .
00:19 Google Earth Pro वापरून Kml फॉरमॅटमध्ये  point आणि polygon फाइल तयार करणे .
00:26 QGIS मध्ये Kml फाइल उघडणे.
00:30 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी, मी वापरत आहे.उबंटू लिनक्स ओएस आवृत्ती 16.04
00:38 QGIS आवृत्ती 2.18
00:42 Google-Earth Pro आवृत्ती ७.३
00:46 Mozilla Firefox ब्राउझर आवृत्ती 54.0 आणि
00:50 कार्यरत इंटरनेट कनेक्शन
00:55 या ट्यूटोरियलचे अनुसरण करण्यासाठी तुम्ही QGIS इंटरफेसशी परिचित असले पाहिजे.
01:01 पूर्व-आवश्यक QGIS ट्यूटोरियलसाठी, कृपया या वेबसाइटला भेट द्या.
01:07 Google Earth हा एक संगणक प्रोग्राम आहे जो पृथ्वीचे 3D प्रतिनिधित्व करतो.
01:15 प्रोग्राम सुप्रिमपोज़िंग, सैटेलाइट इमेज, एरियल फ़ोटोग्राफ़ी आणि GIS डेटाद्वारे पृथ्वीचे नकाशा तयार करतो.
01:25 प्रोग्राम वापरकर्त्यांना विविध कोनातून शहरे आणि लँडस्केप पाहण्याची परवानगी देतो.
01:32 चला Google Earth Pro डाउनलोड आणि इंस्टॉल करूया.
01:37 तुमच्या सिस्टीमवर प्रोग्राम आधीच इन्स्टॉल केलेला असल्यास तुम्ही ही पायरी वगळू शकता.
01:42 Google Search पेज उघडा.
01:46 search bar मध्ये “ Download Google Earth Pro” टाइप करा आणि एंटर दाबा.
01:53 परिणामांसह एक पृष्ठ उघडेल.
01:56 पहिल्या निकालावर क्लिक करा, Earth Versions-Google Earth.
02:02 Google Earth डाउनलोड करण्यासाठी 3 पर्यायांसह पेज उघडते.
02:08 स्क्रीनच्या तळाशी उजवीकडे  Download Earth Pro on desktop बटणावर  वर क्लिक करा.
02:15 Download Google Earth Pro (Linux), प्राइवेसी पोलिसी आणि टर्म पेज उघडेल.
02:22 येथे दिलेली सर्व माहिती वाचा.
02:26 तुम्ही डाउनलोड करणार आहात ती Google Earth Pro ची आवृत्ती येथे प्रदर्शित केली आहे.
02:32 योग्य रेडिओ बटणावर क्लिक करून तुमचे डाउनलोड पॅकेज निवडा.
02:38 मी  64 bit dot deb निवडेन.
02:42 Accept & Download बटणावर क्लिक करा.
02:47 एक डायलॉग बॉक्स उघडेल, Save file  पर्याय निवडा आणि ओके बटणावर क्लिक करा.
02:54 फाइल Downloads फोल्डरवर डाउनलोड होते.
02:58 इंस्टॉलेशनसाठी, टर्मिनल उघडा.
03:02 डाइरेक्टरी ला डाउनलोडमध्ये बदला.
03:06 स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे कमांड टाइप करा.एंटर दाबा.
03:12 सूचित केल्यावर तुमचा सिस्टम पासवर्ड टाइप करा.
03:18 काही सेकंदांनंतर प्रोग्रामची स्थापना पूर्ण होते.
03:23 टर्मिनल बंद करा.
03:26 डॅशबोर्ड उघडा आणि सर्च बॉक्समध्ये Google Earth Pro टाइप करा.
03:32 Google Earth Pro आयकॉनवर क्लिक करा.हे Google Earth Pro इंटरफेस उघडेल.
03:40 Windows आणि Mac मध्ये Google Earth Pro इंस्टॉल करण्याच्या पायऱ्या Additional material मध्ये दिल्या आहेत.
03:48 Start-up Tips  पेज वाचा.
03:52 विंडो बंद करण्यासाठी क्लोज बटणावर क्लिक करा.
03:56 आता आम्ही Google Earth वापरून डेटा सेट तयार करू.
04:00 डाव्या पॅनलमध्ये,  Places टॅब अंतर्गत,Temporary Places फोल्डरवर राइट-क्लिक करा.
04:07 Add निवडा आणि नंतर सब-मेनूमधून फोल्डर निवडा.
04:12 Google Earth - New Folder डायलॉग बॉक्स उघडेल.
04:17 Name फील्डमध्ये Places in Maharashtra टाइप करा.
04:22 दोन चेक बॉक्स तपासा:
04:24 Allow this folder to be expanded आणि Show contents as options
04:31 तळाशी उजव्या कोपर्‍यात ओके बटणावर क्लिक करा.
04:35 Places in Maharashtra फोल्डर Places पॅनेलमध्ये जोडली जातात.
04:40 आता आपण या फोल्डरमध्ये पॉइंट डेटा सेट तयार करू.
04:45 स्थानावर नेव्हिगेट करण्यासाठी आम्ही Google Earth चा वापर करू.
04:50 डाव्या पॅनलमधील search box मध्ये, मुंबई टाइप करा.Search  बटणावर क्लिक करा.
05:00 Google Earth मुंबई क्षेत्र शोधण्यासाठी नकाशा झूम करेल.
05:05 मुंबईचे ठिकाण दाखवले आहे.
05:10 टूलबारवर पिवळ्या रंगाच्या पिन म्हणून दाखवले जाणाऱ्या Add placemark tool वर क्लिक करा.
05:17 Google-Earth New Placemark डायलॉग बॉक्स उघडतो.
05:22 Name फील्डमध्ये मुंबई टाइप करा.
05:26 Name फील्डच्या पुढील पिन चिन्हावर क्लिक करा.
05:31 निवडण्यासाठी पर्यायांसह आयकॉन बॉक्स उघडेल.मी लाल पिन आयकॉन निवडेन.
05:39 आयकॉन डायलॉग बॉक्समधील उजव्या कोपर्‍यात तळाशी असलेल्या ओके बटणावर क्लिक करा.
05:46 New placemark डायलॉग बॉक्सवरील ओके बटणावर क्लिक करा.
05:51 नकाशावर एक नवीन  placemark जोडले आहे हे लक्षात घ्या.
05:56  Places पॅनेलमध्ये मुंबईचे स्थान जोडले आहे.
06:01 search panel मधील शोध परिणाम साफ करा.सर्च बॉक्समध्ये पुणे टाइप करा.
06:09 शोध पर्यायांमधून पुणे महाराष्ट्र निवडा.Search बटणावर क्लिक करा.
06:17 Google Earth पुणे शहर शोधण्यासाठी नकाशा झूम करेल.
06:22 पुण्याचे स्थान नकाशावर दिसत आहे.आपण पुण्यासाठी एक प्लेसमार्क ऍड करू.
06:31 टूलबारमधील Add placemark वर क्लिक करा.
06:35 placemark Mumbai करण्यासाठी आपण यापूर्वी केलेल्या त्याच पायऱ्या फॉलो करा.
06:43 सर्व पायऱ्या पूर्ण केल्यानंतर, पुण्यासाठी प्लेसमार्क ऍड केला असल्याचे लक्षात घ्या.
06:50 हीच पद्धत फॉलो करा आणि आणखी काही शहरे चिन्हांकित करा: सातारा, नाशिक, अमरावती, चंद्रपूर, जालना, लातूर आणि धुळे.
07:05 आपण महाराष्ट्रातील काही ठिकाणांसाठी स्थान नकाशा तयार केला आहे.
07:11 आता आपण या स्थानांसाठी boundary layer तयार करू.
07:16  Places in Maharashtra फोल्डर आयकॉनवर राईट क्लिक करा.
07:20 Add पर्यायावर क्लिक करा.सब-मेनूमधून फोल्डर निवडा.
07:28 Google Earth New Folde डायलॉग बॉक्स उघडतो.
07:33 Name फील्डमध्ये  Boundary टाइप करा.
07:37 स्क्रीनच्या तळाशी उजव्या कोपर्‍यात ओके बटणावर क्लिक करा.
07:43 Places पॅनेलमध्ये Boundary फोल्डर ऍड केले आहे .
07:48 झूम आउट करण्यासाठी उजवीकडे स्लाइडर ड्रॅग करा.
07:54 महाराष्ट्राची सीमा दिसत नाही तोपर्यंत स्लाइडर ड्रॅग करा.
07:59 टूलबारमधील Add polygon पर्यायावर क्लिक करा.
08:04 Name फील्डमध्ये Boundary टाइप करा.
08:08 महाराष्ट्राच्या सीमेवर क्लिक करणे सुरू करा आणि साधारणपणे महाराष्ट्राची सीमा काढा.
08:31 पूर्ण झाल्यावर बॉक्समधील ओके बटणावर क्लिक करा.
08:36 Places पॅनेलमध्ये Boundary polygon layer ऍड केले आहे .
08:41 Places in Maharashtra फोल्डरवर राईट क्लिक करा.
08:46 सब-मेनू मधून Save Place as... वर क्लिक करा.
08:51 Save file  डायलॉग बॉक्स उघडतो.
08:55 Places in Maharashtra असे फाईलला नाव देऊ
09:00 फाइल सेव्ह करण्यासाठी योग्य स्थान निवडा.मी डेस्कटॉप निवडेन.
09:07 तुम्ही ही फाईल दोन वेगवेगळ्या फाईल फॉरमॅटमध्ये सेव्ह करू शकता.
09:12 “Files of type" ड्रॉपडाउनमध्ये तुम्हाला Kml आणि Kmz पर्याय दिसतील.
09:20 Kmz ही Kml फाइलची संकुचित आवृत्ती आहे.
09:25 Kmz फाइल फॉरमॅट अनेकदा मोठी फाइल सेव्ह करण्यासाठी वापरला जातो.
09:31 तुम्ही येथे नमूद केलेल्या पर्यायांपैकी एक निवडू शकता.
09:36 मी फाइल सेव्ह करण्यासाठी Kml फॉरमॅट वापरेन.
09:40 फाइल्स ऑफ टाईप फील्डमधील Kml फॉरमॅटवर क्लिक करा.
09:45 डायलॉग बॉक्सच्या तळाशी-उजव्या कोपर्यात असलेल्या सेव्ह बटणावर क्लिक करा.
09:51 त्याचप्रमाणे Boundary file Kml फॉरमॅटमध्ये सेव्ह करा.
09:56 Places in Maharashtra.kml  आणि Boundary.kml या दोन फाइल डेस्कटॉपवर सेव्ह केल्या आहेत.
10:06 पुढे आपण QGIS मध्ये Google Earth Pro मध्ये तयार केलेल्या या दोन फाइल उघडू.
10:13 QGIS इंटरफेस उघडा.
10:17 डाव्या मेनूमधून वेक्टर लेयर जोडा टूलवर क्लिक करा.
10:22 वेक्टर लेयर जोडा डायलॉग बॉक्स उघडतो.
10:26 स्रोत फील्ड अंतर्गत, ब्राउझ बटणावर क्लिक करा.
10:31 डेस्कटॉप फोल्डरवर नेव्हिगेट करा.
10:35 Places in Maharashtra.kml आणि Boundary.kml या दोन्ही फाईल्स निवडा.
10:42 उघडा बटणावर क्लिक करा.
10:45 Add Vector Layer डायलॉग बॉक्समधील Open बटणावर क्लिक करा.
10:50 Select vector Layers to add डायलॉग बॉक्स  मध्ये Select All  बटणावर क्लिक करा.ओके बटणावर क्लिक करा.
11:01 इम्पोर्ट केलेल्या दोन्ही फायली आता QGIS कॅनव्हासवर  layers म्हणून ऍड केल्या आहेत.
11:08 हे  layers QGIS मधील टूल्स वापरून पुढील विश्लेषणासाठी वापरले जाऊ शकतात.
11:15 चला थोडक्यात बघू ,या ट्युटोरियलमध्ये आपण Google Earth Pro डाउनलोड आणि इंस्टॉल करायला शिकलो.
11:23 नेव्हिगेट करण्यासाठी आणि डेटासेट तयार करण्यासाठी Google Earth Pro वापरणे.
11:29 Google Earth Pro वापरून Kml फॉरमॅटमध्ये point आणि polygon फाइल तयार करणे.
11:36 QGIS मध्ये Kml फाइल उघडा.
11:40 असाइनमेंट म्हणून,भारतातील राज्यांच्या राजधानींचा data set  तयार करा.
11:46 Kml फॉरमॅटमध्ये point  आणि boundary files सेव्ह करा.सूचना: सर्व राज्यांच्या राजधानी शोधा आणि भारताची  boundary  काढा.
11:57 तुमची पूर्ण केलेली असाइनमेंट येथे दाखवल्याप्रमाणे दिसली पाहिजे.
12:03 खालील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश देतो.कृपया ते पहा डाउनलोड करा.
12:11 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा घेते आणि प्रमाणपत्र देते.अधिक तपशीलांसाठी कृपया आम्हाला लिहा.
12:21 कृपया या फोरमवर तुमचे कालबद्ध प्रश्न पोस्ट करा.
12:24 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टला भारत सरकारच्या MHRD द्वारे निधी दिला जातो.
12:31 या ट्यूटोरियलचे योगदान कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग पुणे येथील वैष्णवी होनप, स्नेहलता कलिअप्पन आणि IIT बॉम्बे मधील हिमांशी करवंजे यांनी दिले आहे. सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.

Contributors and Content Editors

Radhika