PhET/C3/Curve-Fitting/Marathi
Time | Narration |
00:01 | Curve Fitting वरील पाठात आपले स्वागत. |
00:05 | या पाठात, Curve Fitting या PhET सिम्युलेशनचे प्रात्यक्षिक बघणार आहोत. |
00:12 | या पाठासाठी मी:
उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 16.04, |
00:21 | जावा वर्जन 1.8.0 |
00:25 | फायरफॉक्स वेब ब्राउजर वर्जन 60.0.2 वापरत आहे. |
00:31 | हा पाठ समजण्यासाठी, माध्यमिक शाळेतील गणिताचे ज्ञान असावे. |
00:37 | हे सिम्युलेशन वापरून आपण बघणार आहोत,
रेषा |
00:43 | Quadratic बहुपदी |
00:46 | Cubic बहुपदी |
00:49 | Quartic बहुपदी |
00:52 | Reduced chi squared statistic (काय वर्ग) आणि कोरिलेशन कोएफिशियंट r वर्ग |
00:59 | सुरूवात करूया. |
01:01 | दिलेली लिंक वापरून सिम्युलेशन डाऊनलोड करू. |
01:06 | मी डाऊनलोड्स फोल्डरमधे Curve Fitting हे सिम्युलेशन आधीच डाऊनलोड केले आहे. |
01:13 | jar फाईल उघडण्यासाठी टर्मिनल उघडा. |
01:17 | टर्मिनल प्रॉम्प्टवर cd Downloads टाईप करून एंटर दाबा.
|
01:27 | java space hyphen jar space curve hyphen fitting underscore en dot jar.
टाईप करून एंटर दाबा.
|
01:42 | ब्राऊजरमधे html फॉरमॅटमधे फाईल उघडेल.
|
01:48 | हा Curve Fitting सिम्युलेशनचा इंटरफेस आहे.
|
01:53 | पहिल्या क्वाड्रंटमधे Help button, Functions बॉक्स आणि Data Points बकेटचे निरीक्षण करा. |
02:02 | फंक्शन्स बॉक्समध्ये, Linear आणि Best Fit रेडिओ बटणे डीफॉल्ट रूपात निवडलेली आहेत. |
02:11 | Help बटणावर क्लिक करा. |
02:15 | draggable error bars लिजंड पहिल्या क्वाड्रंटमधे दिसेल. |
02:21 | डेटा बिंदू बाहेर काढता येतात किंवा बकेटमध्ये ठेवता येतात. |
02:28 | चौथ्या क्वाड्रंटमधे a आणि b डिस्प्ले बॉक्सेसहित Best Fit equation दिसेल. |
02:37 | y बरोबर a अधिक bx हे समीकरण आहे. डिस्प्ले बॉक्सेसच्या खाली कोरिलेशन कोएफिशियंट r वर्ग दाखवला आहे. |
02:49 | दुसऱ्या आणि तिसऱ्या क्वाड्रंटसमधे reduced chi squared statistic साठी एक पट्टी दाखवली जाईल. |
02:56 | chi squared statistic चे सूत्र Help बॉक्समधे दिलेले आहे. |
03:02 | सूत्राच्या खाली fit च्या स्थिती दाखवल्या आहेत. |
03:08 | chi squared statistic 1 किंवा 1 पेक्षा कमी असेल तेव्हा समीकरणाशी डेटाच्या फिटची स्थिती चांगली किंवा उत्तम असते. |
03:19 | या बॉक्सेस न दाखवण्यासाठी Hide Help वर क्लिक करा. |
03:24 | बकेटमधून तीन डेटा बिंदू ड्रॅग करा.
त्यांना -10 comma -4, -4 comma 4, आणि 5 comma 10 वर ठेवा. |
03:40 | माऊस पॉईंटर त्यावर नेल्यावर co-ordinates दिसतील. |
03:45 | लक्षात घ्या, काढलेल्या बेस्ट फिट रेषेचे समीकरण y बरोबर 6.07 अधिक 0.912 x आहे. |
03:57 | बेस्ट फिट लाईनचा कोरिलेशन कोएफिशियंट r वर्ग 0.9616 आहे. |
04:06 | r वर्ग जेवढा 1 च्या जवळ जाईल, तसा x साठी y चा variance जास्त चांगला असेल. |
04:14 | लक्षात घ्या reduced chi squared statistic 6.74 आहे. bar तांबडा आहे. |
04:24 | हेल्पवर क्लिक करा आणि लक्षात घ्या की fit निकृष्ट आहे. पुन्हा हाईड हेल्पवर क्लिक करा. |
04:35 | एक नवीन डेटा बिंदू ड्रॅग करा आणि तो y अक्षावर 0 comma 11 वर ठेवा. |
04:44 | बेस्ट फिट लाईन आता y बरोबर 7.51 अधिक 1.004 x अशी झालेली दिसेल. |
04:55 | बेस्ट फिट लाईनचा स्लोप 0.912 वरून थोडासा वाढून 1.004 झाला आहे. |
05:03 | y इंटरसेप्टसुध्दा 6.07 वरून 7.51 असा वाढला आहे. |
05:10 | डेटा बिंदू 0 comma 11 हा बेस्ट फिट लाईनपासून इतर डेटा बिंदूंच्या तुलनेत थोडा दूर आहे. |
05:18 | r वर्ग व्हॅल्यू 0.9616 वरून 0.8529 पर्यंत कमी झालेली दिसेल. |
05:28 | हे समीकरण दिलेल्या x बिंदूसाठी y चे variance अनुमान कमी विश्वसनीयरित्या करीत आहे. |
05:35 | लक्षात घ्या reduced chi squared statistic ची किंमत 6.74 वरून 18.66 पर्यंत वाढली आहे. |
05:45 | 0 comma 11 वरून 0 comma 6 पर्यंत डेटा बिंदू ड्रॅग करा. |
05:53 | समीकरण y बरोबर 6.05 अधिक 0.911 x असे बनले आहे हे लक्षात घ्या. |
06:03 | r वर्ग मूल्य 0.9635 पर्यंत वाढले आणि reduced chi squared statistic 3. 37 पर्यंत खाली आले आहे. |
06:15 | -4 comma 4 वरून -4 comma 3.5 पर्यंत डेटा बिंदू ड्रॅग करा. |
06:24 | r वर्गचे मूल्य 0.9772 पर्यंत वाढलेले दिसेल. |
06:30 | reduced chi squared statistic 2.12 वर आले.
bar आता हिरवा झाला आहे. |
06:39 | हेल्पवर क्लिक करा. ग्रीन झोन चांगला फिट दाखवते. |
06:45 | हाईड हेल्प वर क्लिक करा. |
06:48 | चांगली बेस्ट फिट लाईन सर्व डेटाशी सुसंगत असते आणि सर्व x व्हॅल्यूजना योग्य y व्हॅल्यूजनी अनुमानित करते. |
06:58 | Adjustable Fit रेडिओ बटणावर क्लिक करा. स्लायडर्स a आणि b शून्याकडे ड्रॅग करा. |
07:08 | ह्यामुळे पूर्वी काढलेली रेषा पुसली गेलेली दिसेल. |
07:13 | X अक्षास समांतर असलेली एक रेषा दिसत आहे. |
07:18 | बॉक्सेसमधे a आणि b स्लायडरच्या व्हॅल्यूज दिसत आहेत. |
07:24 | डेटा बिंदू आपण पूर्वी जिथे ठेवले तिथेच आहेत.
परंतु reduced chi square statistic खूप वाढले असून ते तांबड्या झोनमधे आहेत. |
07:35 | r वर्ग व्हॅल्यू शून्य आहे, म्हणजेच कोरिलेशन निकृष्ट आहे. |
07:41 | Best Fit radio button परत दाबा. |
07:45 | a आणि b च्या व्हॅल्यूजची नोंद घ्या.(5.94 and 0.918). |
07:53 | पुन्हा Adjustable Fit रेडिओ बटणावर क्लिक करा. स्लायडर्स a आणि b एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत ड्रॅग करून बघा. |
08:04 | यामुळे रेषेत होणारे बदल पहा. A स्लायडर 6 वर आणि b स्लायडर 0.97 वर ड्रॅग करा. |
08:16 | ही रेषा आपण आधी पाहिलेल्या बेस्ट फिट लाईनसारखी दिसत आहे.
r वर्ग आणि reduced chi squared statistic च्या व्हॅल्यूची नोंद घ्या. |
08:28 | Show deviations चेक करून Best Fit वर क्लिक करा. |
08:35 | डेटा बिंदूंपासून बेस्ट फिट लाईनवर काढलेल्या उभ्या रेषा बिंदूंचे लाईनपासून विचलन दाखवतात. |
08:43 | -4 comma 3.5 आणि 0 comma 6 हे दोन्ही डेटा बिंदू बकेटमधे नेऊन टाका.
आता लाईन फक्त दोन डेटा बिंदूंमधून जात आहे. |
08:59 | r वर्ग 1 झाला आहे आणि reduced chi squared statistic शून्य झाले आहे. |
09:06 | लाईन फिट अति चांगला झाला आहे कारण ही रेषा फक्त दोन बिंदूंनी निश्चित केली आहे. |
09:13 | तिसऱ्या बिंदूशिवाय लाईन ही बेस्ट फिट लाईनशिवाय दुसरी काही असूच शकत नाही. |
09:20 | आता आपण quadratic बहुपदीच्या आलेखाविषयी काही माहिती पाहू. |
09:27 | Quadratic बहुपदीचे समीकरण y बरोबर a अधिक bx अधिक c x वर्ग असे असते. |
09:36 | या बहुपदीची डिग्री (श्रेणी) 2 असल्याने तिला quadratic म्हणतात. |
09:44 | या फंक्शनला जास्तीत जास्त 2 रूटस(मूळ) आहेत. |
09:48 | डेटा बिंदू ड्रॅग करून खालील co-ordinates वर ठेवा.
-9 comma 10, -7 comma 2, 2.5 comma -2.5 आणि 5 comma 10 |
10:03 | r वर्ग आणि reduced chi squared statistic च्या व्हॅल्यूजची नोंद घ्या. |
10:09 | याशिवाय Adjustable Fit वर क्लिक करून a, b, c व्हॅल्यूजचा फिटवरील परिणाम पहा. |
10:17 | quadratic बहुपदीसाठी बेस्ट फिट आलेख असा दिसेल. |
10:25 | Cubic बहुपदी
आता आपण Cubic बहुपदीच्या आलेखाविषयी काही माहिती पाहू. |
10:33 | r वर्ग आणि reduced chi squared statistic च्या व्हॅल्यूजची नोंद घ्या. |
10:39 | cubic बहुपदीसाठी बेस्ट फिट आलेख असा दिसेल. |
10:46 | Quartic बहुपदी
आता आपण quartic बहुपदीच्या आलेखाविषयी काही माहिती पाहू.
|
10:55 | r वर्ग आणि reduced chi squared statistic च्या व्हॅल्यूजची नोंद घ्या. |
11:01 | quartic बहुपदीसाठी बेस्ट फिट आलेख असा दिसेल.
|
11:08 | असाईनमेंट म्हणून, डेटा बिंदू आणि त्यांची संख्या बदला. |
11:14 | आधी दाखवलेल्या सर्व पायऱ्यांचे अनुकरण करून सर्व बहुपदींसाठी बेस्ट फिट ग्राफ काढा. |
11:20 | या पाठात, Curve Fitting या PhET सिम्युलेशनचे प्रात्यक्षिक पाहिले. |
11:27 | सिम्युलेशन वापरून आपण पाहिलेः
रेषा Quadratic बहुपदी Cubic बहुपदी Quartic बहुपदी Reduced chi square statistic (काय वर्ग) आणि कोरिलेशन कोएफिशियंट r वर्ग
|
11:49 | दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता. |
11:58 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते.
ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते. अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा. |
12:12 | कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा. |
12:16 | या प्रकल्पाला पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टिचिंग यांनी अंशतः अनुदान दिले आहे.
|
12:24 | या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. |
12:37 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.
सहभागासाठी धन्यवाद. |