PhET/C2/The-Greenhouse-Effect/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 ग्रीनहाऊस इफेक्ट या इंटरऍक्टिव्ह PhET सिम्युलेशनवरील पाठात आपले स्वागत.
00:07 या पाठात, ग्रीनहाऊस इफेक्ट हे इंटरऍक्टिव्ह PhET सिम्युलेशन दाखवणार आहोत.


00:14 हा पाठ समजण्यासाठी, माध्यमिक शाळेतील विज्ञानाचे प्राथमिक ज्ञान असावे.
00:20 या पाठासाठी मी:

उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 14.04,

00:26 जावा वर्जन 1.7.0,


00:30 फायरफॉक्स वेब ब्राउजर वर्जन 53.02.2 वापरत आहे.
00:36 हे सिम्युलेशन वापरून तुम्ही शिकणार आहात:

1. ग्रीनहाऊस वायूंचा वातावरणीय तापमानावर होणारा परिणाम

00:44 2. Ice age आणि आजच्या वातावरणाची माहिती घेऊन तुलना करणे.
00:49 3. Glass panes आणि Clouds यांचा वातावरणीय तापमानावर होणारा परिणाम


00:55 4. वातावरणीय वायूंबरोबर फोटॉन्सची आंतरक्रिया
00:59 5. ग्रीनहाऊस परिणामामध्ये वातावरणातील वायूंचे योगदान.
01:04 हरितगृह( ग्रीनहाऊस) परिणाम म्हणजे,

सूर्याकडून येणारे प्रारण (रेडिएशन) पृथ्वीच्या वातावरणाने अडवून शोषून घेण्याची क्रिया.

01:13 हा परिणाम वातावरणातील वायूंमुळे होतो.
01:17 ते वायू पृथ्वीच्या पृष्ठभागावरून परत येणारी उष्णता टिकवून ठेवतात.
01:22 या स्लाइडमध्ये हरितगृह वायू आणि त्यांची टक्केवारी दर्शविली गेली आहे.
01:27 ही प्रक्रिया ग्रीनहाऊसमध्ये जे घडते त्या प्रमाणेच आहे.
01:32 थंड प्रदेशात, फळे आणि भाज्या काचेच्या झाकलेल्या भागात पिकविल्या जातात त्याला ग्रीनहाऊस म्हणतात .
01:40 ग्रीनहाउसमध्ये, सूर्यकिरणे पारदर्शक काचेमधून जातात आणि माती गरम करतात.
01:47 यापैकी काही उष्णता काचेच्या द्वारे शोषली जाते आणि काही परावर्तित होते.
01:52 ही यंत्रणा सूर्याच्या उर्जेला ग्रीनहाऊसमध्ये अडकवून ठेवते.
01:58 दिलेली लिंक वापरून सिम्युलेशन डाऊनलोड करू.
02:02 मी Downloads फोल्डरमधे Greenhouse Effect हे PhET सिम्युलेशन आधीच डाऊनलोड केले आहे.


02:08 सिम्युलेशन उघडण्यासाठी मी टर्मिनल वापरत आहे.
02:12 टर्मिनल उघडू.
02:14 प्रॉमप्टवर टाइप करा: cd Downloads आणि एंटर दाबा.
02:20 त्यानंतर टाईप करा: java space hyphen jar space greenhouse_en.jar आणि एंटर दाबा.
02:31 ग्रीनहाऊस इफेक्ट सिम्युलेशन उघडेल.
02:35 सिम्युलेशनला 3 स्क्रीन्स आहेतः

Greenhouse Effect,

Glass Layers आणि

Photon Absorption.

02:45 ग्रीनहाऊस इफेक्ट स्क्रीन पृथ्वीचे वातावरण दर्शवितो.
02:49 सूर्यापासून मिळणारा प्रकाश दाखवण्यासाठी पिवळ्या रंगाचे फोटॉन वापरले आहेत.
02:54 पृथ्वीच्या पृष्ठभागावरून उत्सर्जित झालेली उष्णता लाल इन्फ्रारेड फोटॉन्स म्हणून दाखवली आहे.
03:00 पॅनेलवर उजव्या बाजूला वातावरणाची माहिती घेण्यासाठी आपल्याकडे पर्याय दिलेले आहेत.
03:06 डीफॉल्ट रूपात, Atmosphere during Today म्हणून सेट केले आहे.
03:11 आजच्या वातावरणासाठी ग्रीनहाऊस वायूंच्या घटकांचे निरीक्षण करा.
03:16 तापमान नोंदवण्यासाठी केल्विन आणि फॅरेनहाइट मापनश्रेणीतील तापमापी आहे.
03:23 ऑप्शन्स या पॅनेलमधे तापमान फॅरेनहाइट किंवा सेल्सियस या एककात दर्शवण्यासाठी रेडिओ बटणे आहेत.
03:31 स्क्रीनच्या खालील भागात सिम्युलेशन पॉज आणि प्ले करण्यासाठी बटणे आहेत.
03:37 जास्त वेगातील ऍनिमेशनचा वेग कमी करण्यासाठी स्लायडर fast ते slow असा ड्रॅग करा.
03:44 तापमापीवरील तापमानाचे निरीक्षण करा.
03:48 Adjustable concentration बटणावर क्लिक करा.
03:52 ह्याने ग्रीनहाऊस वायूंची तीव्रता वाढवता येईल.
03:57 नंतर Greenhouse Gas Concentration चा स्लायडर Lots च्या दिशेने ड्रॅग करा.
04:03 तापमापीवर तापमानाचे निरीक्षण करा.
04:07 ग्रीनहाऊस वायूंची तीव्रता जशी वाढेल, तसे तापमान वाढेल.
04:13 वातावरणातील ढग ग्रीनहाऊस इफेक्ट कमी करतात का?
04:18 Options मेनूमधून सिम्युलेशनमधे Clouds समाविष्ट करा.
04:23 तापमानाचे निरीक्षण करा. लक्षात घ्या की ढग वातावरणात उष्णता टिकवून ठेवण्यास मदत करतात.
04:30 तसेच तुम्ही 18 व्या शतकातील आणि हिमयुगातील वातावरणाची तुलना करू शकता.
04:36 1750 या रेडिओ बटणावर क्लिक करा.
04:40 ग्रीनहाऊस वायूंच्या घटकांचे निरीक्षण करा.
04:44 Ice age या रेडिओ बटणावर क्लिक करा.
04:47 ग्रीनहाऊस वायूंच्या घटकांतील बदलाचे निरीक्षण करा.
04:52 हिमयुगातील ग्रीनहाऊस वायूंच्या घटकांची टक्केवारी खूपच कमी आहे.
04:58 सिम्युलेशन रिसेट करण्यासाठी स्क्रीनच्या खालील भागात असलेल्या Reset All बटणावर क्लिक करा.
05:04 तुमच्या कृतीची पुष्टी करण्यासाठी Yes वर क्लिक करा.
05:08 आता या विंडोमधील इतर स्क्रीन वापरून बघूया.
05:13 Glass Layers टॅबवर क्लिक करा.
05:16 येथे सिम्युलेशनमधे ग्लास पेन्स समाविष्ट करण्याचा पर्याय आहे.
05:22 हे ग्लास पेन्सचा वातावरणातील तापमानावर होणारा परिणाम समजण्यास मदत करेल.
05:28 ग्लास पेन समाविष्ट करून तापमानातील बदलाचे निरीक्षण करा.
05:33 आणखी ग्लास पेन्स समाविष्ट करून काय होते ते बघा.
05:38 Photon Absorption टॅबवर क्लिक करा.
05:41 फोटॉन्स सोडण्यासाठी इन्फ्रारेड फोटॉन स्लायडर ड्रॅग करा.
05:46 Atmospheric Gases खालील रेडिओ बटणांवर एकेक करून क्लिक करा आणि कंपनांचे निरीक्षण करा.
06:00 Build Atmosphere या रेडिओ बटणावर क्लिक करा.
06:04 संबंधित अणूंसाठी स्लायडर्स ड्रॅग करा.
06:19 नंतर Infrared किंवा Visible Photons सोडण्यासाठी स्लायडर ड्रॅग करा.
06:25 रेणूंच्या कंपनांचे निरीक्षण करा.
06:29 थोडक्यात,
06:31 या पाठात आपण शिकलो- ग्रीनहाऊस वायूंचा वातावरणातील तापमानावर होणारा परिणाम,
06:38 Ice age आणि आजच्या वातावरणाची तुलना,
06:43 वातावरणातील तापमानावर ग्लास पेन्स आणि ढगांचा परिणाम,
06:48 वातावरणातील गॅसेसची फोटॉनबरोबर होणारी आंतरक्रिया
06:52 वातावरणातील वायूंचा ग्रीनहाऊस इफेक्टमधील सहभाग.
06:57 असाईनमेंट म्हणून: 18 व्या शतकातील आणि Ice ageच्या वातावरणातील तापमानाची तुलना करा.
07:05 सिम्युलेशनमधे Clouds समाविष्ट करून तापमानातील बदलाचे निरीक्षण करा.
07:11 Glass layers आणि Photon Absorption हे स्क्रीन वापरून बघा.
07:16 ग्लास पेन्स वातावरणाचे तापमान का वाढवतात हे समजावून सांगा.
07:22 दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल. हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.
07:31 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.
07:41 अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.


07:45 कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.


07:49 या प्रकल्पाला पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टिचिंग यांनी अंशतः अनुदान दिले आहे.


07:57 या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.


08:09 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.

सहभागासाठी धन्यवाद.


Contributors and Content Editors

Manali