PhET/C2/Bending-Light/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या बेंडिंग लाईट या इंटरऍक्टिव्ह PhET सिम्युलेशन वरील पाठात आपले स्वागत.


00:07 या पाठात, बेंडिंग लाईट हे इंटरऍक्टिव्ह PhET सिम्युलेशन वापरायला शिकणार आहोत.
00:14 हा पाठ समजण्यासाठी, माध्यमिक शाळेतील विज्ञानाचे प्राथमिक ज्ञान असावे.
00:21 या पाठासाठी मी:

उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 14.04, जावा वर्जन 1.7, फायरफॉक्स वेब ब्राउजर वर्जन 53.02.2 वापरत आहे.

00:37 हे सिम्युलेशन वापरून आपण शिकणार आहोत:

1. प्रकाशाचे परावर्तन 2. प्रकाशाचे अपवर्तन 3. प्रकाशाचे अपस्करण 4. विविध माध्यमांमुळे परावर्तन आणि अपवर्तनात होणारे बदल.

00:52 तसेच शिकणार आहोत,

1. प्रिझम आणि लेन्ससारखी ऑप्टिकल उपकरणे वापरणे 2. प्रकाशाची तीव्रता मोजणे

01:02 3. प्रकाशाचा वेग मोजणे आणि तरंगांचे विविध नमुने बघणे.
01:08 परावर्तन, अपवर्तन, अपस्करण या बद्दल जाणून घेऊ.
01:14 परावर्तन म्हणजे प्रकाशकिरण एखाद्या पृष्ठभागावर आपटून परत फिरणे

उदाहरणार्थ- आरसा बघणाऱ्याची प्रतिमा परावर्तित करतो.

01:26 अपवर्तन म्हणजे प्रकाशकिरण माध्यमात शिरताना वक्रीभूत होतात.
01:32 वेगळ्या माध्यमात शिरताना प्रकाशाचा वेग आणि कोन बदलतो.

उदाहरणार्थ: पाण्यात बुडवलेल्या पेन्सिलची प्रतिमा पृष्ठभागाशी वाकलेली दिसते.

01:45 अपस्करण म्हणजे पांढऱ्या प्रकाशाचे सात रंगात होणारे विभाजन.
01:51 उदाहरणार्थ- ढगाळ वातावरणात आकाशात दिसणारे इंद्रधनुष्य.
01:57 चला, सुरूवात करूया.
01:59 दिलेली लिंक वापरून सिम्युलेशन डाऊनलोड करू .

http://phet.colorado.edu

02:03 मी Downloads फोल्डरमधे बेंडिंग लाईट हे सिम्युलेशन आधीच डाऊनलोड करून घेतले आहे.
02:09 सिम्युलेशन उघडण्यासाठी bending-light_en.html या फाईलवर राईट क्लिक करा.
02:14 Open With Firefox Web Browser हा पर्याय निवडा.

ब्राउजरमधे फाईल उघडेल.

02:23 हा बेंडिंग लाईट या सिम्युलेशनसाठीचा इंटरफेस आहे.
02:28 इंटरफेसचे तीन स्क्रीन्स आहेत- Intro, Prisms आणि More tools.
02:35 Intro स्क्रीनने सिम्युलेशन सुरू करू.

Intro स्क्रीनवर क्लिक करून ते उघडू.

02:42 या स्क्रीनवर डावीकडे कोपऱ्यात वरती Ray आणि Wave रेडिओ बटणे आहेत,

लेसर लाईट सुरू करण्यासाठी हलणारा लेसर पॉईंटर आहे.

02:53 लेसरवर माऊस पॉईंटर नेल्यावर हिरव्या रंगाचे बाण दिसतील.

हे बाण लेसर ज्या दिशेने हलवता येईल ती दिशा दाखवतात.

03:06 लेसरवर क्लिक करून तो शून्य ते 90 अंशापर्यंत हलवण्यासाठी ड्रॅग करा.

लेसर पुन्हा त्याच्या मूळ जागेवर आणून ठेवा.

03:16 आता डावीकडे खाली असलेल्या टूल्सवर जाऊ.
03:21 येथे टूल बॉक्स दिसेल.

त्यामधे कोनाचे माप मोजण्यासाठी कोनमापक आणि प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी Intensity टूल आहे.

03:32 टूल बॉक्सच्या खाली Normal पर्याय असलेला चेकबॉक्स आहे.

सिम्युलेशन रिसेट करण्यासाठी उजव्या बाजूच्या कोपऱ्यात खाली Reset बटण आहे.

03:44 सिम्युलेशन सुरू करू.
03:47 आपल्या इच्छेनुसार प्रकाश Ray (किरण), किंवा Wave (तरंग) स्वरूपात आपण दाखवू शकतो.
03:54 डिफॉल्ट रूपात Ray हा पर्याय निवडलेला आहे.

लेसर सुरू करण्यासाठी laser पॉईंटरवरील लाल बटणावर क्लिक करा.

04:03 लेसर लाईट परावर्तित आणि अपवर्तित झालेला दिसेल.
04:09 लेसर पॉईंटर ड्रॅग केल्यावर, परावर्तन आणि अपवर्तन कोन बदलताना दिसतील.
04:17 आपाती, परावर्तन आणि अपवर्तन कोन मोजण्यासाठी protractor टूल वापरू.
04:25 आपाती, अपवर्तित आणि परावर्तित किरण व लंब जेथे छेदतात त्या बिंदूशी कोनमापक ठेवू.
04:35 आपल्याला दिसेल की आपाती कोन परावर्तन कोनाइतकाच आहे.

कोनमापक पुन्हा जागेवर नेऊन ठेवा.

04:44 पुढे Intro स्क्रीनच्या उजवीकडे जाऊ.
04:50 येथे दोन्ही माध्यमांमधे refractive index मोजण्यासाठी आपल्याकडे नियंत्रक आहेत.
04:56 आपल्याकडे माध्यमाचा पदार्थ बदलण्यासाठी slider किंवा क्लिक करण्यासाठी बटणे आहेत. सुरूवातीला स्लाईडर Air च्या जवळ आहे.
05:07 आपण स्लाईडर ड्रॅग केल्यास, माध्यम Air ते Water आणि नंतर Glass मधे बदलते.
05:15 जसे माध्यम बदलते तसा अपवर्तन कोनही बदलतो. त्याचबरोबर Index of Refraction(n) सुध्दा बदलतो.
05:24 बॉक्समधे बदलती व्हॅल्यू दिसते. वरच्या मिडीयममधे स्लाईडर परत Air कडे ड्रॅग करा.
05:32 डिफॉल्ट रूपात, खालील मिडीयममधे स्लाईडर Water वर आहे.

खालील मिडीयममधे स्लाईडर ड्रॅग करून तो Water आणि Glass च्या मधे ठेवा.

05:44 आता Intensity टूलद्वारे प्रकाशाची तीव्रता मोजू.
05:49 Intensity टूल क्लिक आणि ड्रॅग करून मिडीयमवर नेऊ.
05:53 Intensity टूलमधे एक magnifier आणि एक meter आहे जे प्रकाशाची तीव्रता मोजते.
06:00 मी magnifier आपाती प्रकाशकिरणावर नेत आहे. Meter 100% तीव्रता दाखवते.
06:08 आता magnifier ड्रॅग करून अपवर्तित किरणावर नेऊ. Meter 86.08% अशी तीव्रता दाखवते.

माध्यमावर अवलंबून असल्यामुळे तीव्रता कमी होते.

06:24 आपण मिडीयम स्लाईडर वर ड्रॅग केल्यास, मीटरमधील तीव्रतेची किंमत बदलते.

याचे कारण अपवर्तन कोनातील बदल.

06:34 यातप्रकारे magnifier परावर्तित किरणावर न्या. Meter 13.55% अशी किंमत दाखवते.
06:44 तुम्ही स्लाईडर ड्रॅग केल्यास तीव्रतेची वेगळी किंमत दिसेल.
06:51 आता Ray वरून Wave वर जाऊ आणि प्रकाशाचे वक्रीभवन पाहू.
06:56 आता आपण Prisms स्क्रीनवर जाऊ.
07:00 इंटरफेसच्या खालील भागात असलेल्या Prisms स्क्रीनवर क्लिक करा.
07:06 या स्क्रीनवर पुढील टूल्स आहेत-

environment बदलण्यासाठी स्लाईडर,

मोनोक्रोमॅटिक रे,

07:15 मोनोक्रोमॅटिक बीम, व्हाईट लाईट, प्रकाशाची वेवलेंथ बदलणारा स्लाईडर.
07:22 स्क्रीनच्या खालच्या भागात आपल्याकडे-

प्रिझम्स आणि लेन्सेस आहेत,

07:29 Objects बदलण्यासाठी स्लाईडर,

Reflections, Normal आणि Protractor साठीचे चेकबॉक्सेस, तसेच उजवीकडील कोपऱ्यात खाली Reset चे बटण आहे.

07:43 लेसरच्या टोकाशी एक स्क्रू दिला आहे. हा स्क्रू वापरून लेसरची दिशा बदलता येऊ शकते.
07:52 येथे बाण हलण्याची दिशा दाखवतात. लेसर वर आणि खाली हलवता येऊ शकतो.
08:00 आता सिम्युलेशन सुरू करू.
08:03 monochromatic beam वर क्लिक करा. लेसर लाईटवर क्लिक करा.
08:09 अनेक परावर्तने बघण्यासाठी Reflections चेकबॉक्सवर क्लिक करा.
08:14 प्रकाशाच्या मार्गात प्रिझम ठेवा. प्रकाश वक्रीभूत झालेला दिसेल.
08:21 wavelength slider हळूहळू लाल रंगावरून जांभळ्या रंगाकडे हलवा.

वेवलेंथ बदलत असताना प्रकाशाच्या वक्रतेकडे लक्ष द्या.

08:32 प्रिझमच्या एका कोपऱ्यात एक स्क्रू दिलेला आहे.
08:38 प्रिझमची दिशा बदलण्यासाठी स्क्रू ड्रॅग करा.

दिशा बदलल्यावर प्रकाशाच्या वक्रतेत होणाऱ्या बदलाकडे लक्ष द्या.

08:47 असाईनमेट म्हणून प्रिझमच्या जागी काचेची स्लॅब वापरा आणि प्रकाशाची वक्रता बघा.
08:54 आता पांढऱ्या लाईटचा उपयोग करून प्रकाशाचे अपस्करण बघू.
08:59 White light tool वर क्लिक करा. प्रकाशाच्या अपस्करणाकडे लक्ष द्या.
09:05 Objects मिडीयम स्लाईडर ड्रॅग करा आणि प्रकाशाच्या अपस्करणाकडे लक्ष द्या.
09:11 अपस्करण झालेल्या प्रकाशकिरणांच्या मार्गात भिंग ठेवा.

अपस्करण झालेला प्रकाशकिरण अनेकदा परावर्तित झालेला दिसेल.

09:26 असाईनमेंट म्हणून:

विविध भिंग वापरून बघा आणि अपस्करण बघा.

09:32 Environments मधे विविध बदल करून अपस्करण बघा.
09:37 आता More Tools स्क्रीनवर जाऊ.
09:41 More Tools स्क्रीनवर क्लिक करा.

More Tools स्क्रीनमधे Intro आणि Prisms स्क्रीनमधील टूल्स एकत्रितपणे दिली आहेत.

09:51 खालील भागात असलेल्या टूल बॉक्समधे Speed आणि Time अशी टूल्स आहेत.

खालील भागात Angles चा चेकबॉक्स देखील आहे. Angles च्या चेकबॉक्सवर क्लिक करा.

10:04 आता लेसर लाईटला Wave मधे बदलू.
Normal आणि Slow Motion ही अतिरिक्त रेडिओ बटणे दिसतील. तसेच, Play/Pause आणि Forward बटणे दिसतील. 
10:18 सिम्युलेशन सुरू करू.
10:21 लेसर लाईट सुरू करू.


10:23 लाल बटणावर क्लिक करून लेसर पॉईंटर सुरू करा. आता Time टूलचा उपयोग करू.
10:31 Time टूल ड्रॅग करून ते माध्यमावर ठेवा. Time टूलमधे दोन भिंग आणि एक Meter आहे.
10:39 एक भिंग आपाती तरंगावर ठेवा आणि तरंगांच्या नमुन्याचे निरीक्षण करा.

दुसरे भिंग अपवर्तित तरंगांवर ठेवा.

10:51 तरंगांच्या नमुन्याचे निरीक्षण करा. हे phase shift दाखवतात.
10:56 परावर्तित तरंगांवर भिंग ठेवा.

आपल्याला कमी अँप्लीट्युडसह(आयामांसह) नवा तरंगांचा नमुना बघायला मिळेल.

11:06 कारण परावर्तित तरंगांची तीव्रता खूप कमी असते.
11:12 Speed टूल ड्रॅग करून अपवर्तित तरंगांवर ठेवा.

वेग 0.67 c आहे. येथे c म्हणजे प्रकाशाचा वेग जो 3x10^8 m/s इतका आहे. वेग कमी होतो.

11:33 कारण माध्यमांमधे प्रकाशाचा वेग कमी असतो.
11:39 असाईनमेंट म्हणून:

माध्यम बदला आणि वेग तसेच तरंगांचे नमुने यांमधील बदलांकडे लक्ष द्या.

11:48 या पाठात बेंडिंग लाईट हे इंटरऍक्टिव्ह PhET सिम्युलेशन कसे वापरायचे ते जाणून घेतले.
11:57 सिम्युलेशनच्या सहाय्याने आपण शिकलो:

1. प्रकाशाचे परावर्तन

2. प्रकाशाचे अपवर्तन

3. प्रकाशाचे अपस्करण

4. विविध माध्यमांमुळे परावर्तन आणि अपवर्तनात होणारे बदल.

12:12 तसेच आपण शिकलो:

1. प्रिझम आणि लेन्ससारख्या ऑप्टिकल उपकरणांचा वापर.


12:19 2. प्रकाशाची तीव्रता, प्रकाशाचा वेग मोजणे आणि तरंगांचे विविध नमुने बघणे.
12:29 दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल. हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.


12:36 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.
12:46 अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा. कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.


12:54 या प्रकल्पाला पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टिचिंग यांनी अंशतः अनुदान दिले आहे.


13:03 या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.


13:17 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.

सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali