PHP-and-MySQL/C4/User-Password-Change-Part-1/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:00 नमस्कार. या पाठात युजर त्याचा पासवर्ड कसा बदलू शकतो हे शिकू.
00:08 युजरला पासवर्ड बदलण्यासाठी पर्याय कसा द्यायचा ते पाहू.
00:13 हे जास्त वेळ घेणार नाही. हे 3 भागात पूर्ण होईल.
00:18 युजरला एक फॉर्म देऊ त्यात जुना पासवर्ड आणि नवा पासवर्ड दोन वेळा टाईप करायला सांगू.
00:27 डेटाबेसमधील त्याचा जुना पासवर्ड तपासू.
00:31 तो encrypted आहे.
00:33 नंतर दोन्ही नव्या पासवर्डसची तुलना करू. ते समान आहेत, त्यात फरक नाही हे तपासू.
00:39 नंतर नव्या sql कोडस द्वारे डेटाबेस अपडेट करू.
00:44 माझ्या "member" पेजवर माझे "session" सुरू करेन. येथे "session_start" दिसत आहे.
00:53 मी ते कॉपी करून पेजच्या सुरूवातीला पेस्ट करत आहे. आपण सेशन सुरू केले आहे.
00:59 येथे "user" हे व्हेरिएबल वापरु . ज्याची व्हॅल्यू underscore SESSION ['user name']च्या समान असेल.
01:09 प्रथम युजरने त्याचा पासवर्ड बदलण्यापूर्वी log in केले आहे का ते तपासू. आपण ह्या कोडबद्दल बोलत आहोत.
01:19 हे "user" व्हेरिएबल "session" नावाच्या रूपात येथे सेट करू.
01:24 येथे लिहू “ if the user exists”, तर त्याचा पासवर्ड बदलणार आहोत. अन्यथा हे पेज kill करून लिहू “You must be logged in to change your password".
01:41 “User logged in” असेल तर त्यासाठी हा block आहे . आता युजरने log in केले आहे याची खात्री केल्यावर युजरला भरण्यासाठी फॉर्म देणे आवश्यक आहे.
01:49 येथे कोड एको करणार आहोत जो आपला फॉर्म आहे. हा स्वतः सबमिट होणारा फॉर्म आहे. म्हणजे हा "change password dot php" वर परत जाईल. येथे फॉर्म संपवू.
02:14 तर आपण या पेजवर आहोत. आता आपण सर्व तपशील तपासू.
02:21 URL वर पासवर्डची कोणतीही माहिती दिसू द्यायची नसल्यामुळे फॉर्मसाठी POST मेथड वापरू.
02:30 पुढे काही input boxes बनवू. पहिला “Old password:” जो पासवर्ड प्रकारचा नसल्याने गुप्त ठेवला जाणार नाही, तो "text" टाईप ठेवून त्याला "password" हे नाव देऊ.
02:48 येथे paragraph breakदेऊ. पुढे "New password:". याचा इनपुट टाईप "password"असेल ज्यामुळे तो गुप्त राहिल. याचे नाव new password असेल.
03:02 येथे line break देऊन ओळ कॉपी पेस्ट करू आणि त्यात काही बदल करू. येथे “Repeat new password” असे लिहून नाव "repeat new password" करा आणि पुढे paragraph break द्या.
03:23 शेवटी “submit" बटणाची गरज आहे. त्याचे नाव "submit" असेल. ते दाबले जाते का ते पाहू. त्याची व्हॅल्यू "Change password" असेल.
03:33 पेजवर जाऊ. पासवर्ड बदलण्यासाठी सोय व्हावी म्हणून members.phpमधे एक लिंक देणार आहे.
03:40 आता login करू. “abc हा माझा पासवर्ड आणि “Alex” हे युजरनेम आहे.
03:48 login क्लिक केल्यावर "Welcome Alex" दिसेल. हे मेंबर पेज आहे. session सेट झाले आहे. log outकरायचे असल्यास तुम्ही करू शकता. परंतु पासवर्ड बदलण्यासाठी दुस-या पर्यायाची गरज आहे.
04:01 त्यासाठी "member dot php" वर जाऊन तिथे आणखी link बनवू.
04:08 ती म्हणजे “Change password”.
04:11 ही लिंक “change password dot php" ला जोडलेली असेल.
04:14 हे रिफ्रेश केल्यावर एक पर्याय दिसेल. येथे क्लिक केल्यावर मागे बनवलेला आपला फॉर्म मिळेल. येथे जुना आणि येथे नवा पासवर्ड टाईप करू.
04:26 "Change password" वर क्लिक करा. काहीच झाले नाही. हे सबमिट झाले की नाही हे तपासू. जास्तीच्या ओळी डिलिट करू.
04:38 येथे आपल्याला एक If स्टेटमेंट द्यावे लागणार आहे. लिहा “if POST submit” म्हणजेच युजरने सबमिट बटण प्रेस केले आहे काय? याचे नाव submit असेल. येथे सबमिट लिहू.
04:52 युजरनी सबमिट केलेले असल्यास येथे पासवर्ड बदलू शकतो.
04:59 सबमिट केलेले नसल्यास हा कोड एको करणार आहोत.
05:05 युजरने आधी सबमिट केलेले नसल्यास फॉर्म सबमिट करण्यासाठी त्यांना फॉर्म द्यावा लागेल.
05:12 आता हे टेस्ट करू. हे कार्य करते की नाही हे बघण्यासाठी “test” एको करू.
05:18 आता मागे जाऊन हे भरू. प्रत्यक्षात आपल्याला काही भरण्याची गरज नाही. सबमिटवर क्लिक करू. आणि “test” असे एको झालेले दिसेल. जे आपला फॉर्म यशस्वीरित्या सबमिट झालेला दाखवेल.
05:34 आता पासवर्ड बदलण्याची गरज आहे. हे डिलिट करून येथे “check fields” लिहा.
05:40 येथे काही व्हेरिएबल्स सेट करण्याची गरज आहे. variable “old password” equal to underscore POST आणि ते नाव फॉर्ममधे खाली दिले आहे.
05:55 ज्या व्हॅल्यूज सबमिट करायच्या आहेत त्या आपण येथे लिहिणार आहोत.
06:00 पुढे “new password” आणि “repeat new password” आहे. हे देखील बदलणार आहोत.
06:10 हे कार्य करत असल्याची खात्री करण्यासाठी “old password”, “new password” आणि ”repeat new password” एको करण्याचे मी सुचवेन.
06:25 हे फॉर्मची उपलब्धता तसेच तो सबमिट झाला का ते तपासेल तसेच आपले व्हेरिएबल व पोस्ट व्हेरिएबल variable nameमधे आले का ते पाहिल.
06:38 हे कार्य करत असल्याची खात्री करण्यासाठी box मधे टाईप केलेले सर्व एको करू.
06:40 “abc” हा जुना पासवर्ड आणि “123” हा नवा पासवर्ड आहे. "Change password" क्लिक केल्यावर abc, 123 आणि 123 एको झालेले दिसेल.
06:52 म्हणजे फॉर्मची माहिती नीट सबमिट झाली आहे. स्पेलिंगची चूक नाही. युजर नवा पासवर्ड सेट करू शकतो.
07:00 हा पाठ येथे संपला. पुढील भागात डेटाबेसमधील जुन्या पासवर्ड बरोबर नवा पासवर्ड कसा तपासायचा, नवा व पुन्हा लिहिलेला नवा पासवर्ड जर बरोबर असतील तर युजरचा पासवर्ड कसा बदलायचा हे पाहू.
07:24 सहभागासाठी धन्यवाद. हे भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.

Contributors and Content Editors

Gaurav, Kavita salve, Pratik kamble