PHP-and-MySQL/C4/User-Login-Part-3/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:00 | "User login" ट्यूटोरियल च्या तिस-या भागात स्वागत. |
00:07 | येथे sessionबनवू. ह्यात युजर, पेजमधे एंटर करू शकेल आणि logged in असेपर्यंत त्याला पेजवर काम करता येईल. |
00:16 | कुठलेही सेशन सुरू करण्यासाठी "start session" फंक्शनची गरज असते. |
00:25 | हे "start session" की "session start", हे चटकन तपासून घेऊ. |
00:34 | माफ करा. मला खात्री नव्हती. हे "session start" असायला हवे. |
00:40 | तसे लिहू. रिफ्रेश करून रिसेंड करा. "You're in!" दिसेल. |
00:42 | आपण session सुरू केले. session variable समाविष्ट करू. |
00:51 | आता "You're in!" च्या पुढे लिहू. "Click here to enter the member page." |
01:12 | येथे "member dot php" पेजवर जाणारी लिंक असेल. |
01:19 | पुन्हा एकदा पाहू. योग्य डेटा पाठवल्यावर "Click here to enter the member page" दाखवणार आहोत, जे पेज अजून बनवलेले नाही. |
01:30 | येथे "session start" बनविले आहे जे अतिशय महत्त्वाचे आहे. |
01:36 | session बनवण्यासाठी लिहा dollar sign underscore session आणि square bracketsमधे सिंगल कोटसमधे सेशनचे नाव. |
01:53 | ज्याला मी "username" म्हणेन. ते आपल्या युजरचे नाव असेल. मी "dbusername" लिहिते कारण ती थेट डेटाबेसमधील व्हॅल्यू असेल . |
02:08 | आपले session सेट झाले आहे. |
02:10 | जेव्हा युजर आपण दिलेल्या ब्राऊजर मधे नसून स्वतःच्या browserमधे असतो, तेव्हा कोणत्याही पेजमधे session एको केल्यास ते sessionच्या रूपात सेट होईल. |
02:20 | हे तपासण्यासाठी नवे पेज बनवू. |
02:25 | त्याला "member dot php" नाव देऊ. |
02:28 | "member dot php" नावाने सेव्ह करू. |
02:30 | येथे टाईप करा "echo" आणि नंतर युजरनेम session एको करू. |
02:42 | सुरूवातीला "Welcome" आणि अधिक अर्थपूर्ण बनविण्यासाठी शेवटी उद्गार चिन्ह concatenate करू. |
02:55 | जोपर्यंत logged inआहोत, ही कमांड येथे कार्यान्वित होईल. आपण बनवलेल्या कोणत्याही पेजवर ब्राऊजरमधे युजरनेमने सेशन सेट करेल. |
03:06 | अन्य कोणत्याही पेजवर सेशन सेट करण्यासाठी हा कोड कार्य करू शकेल. |
03:11 | या फंक्शनची आपल्याला येथेही गरज असेल. |
03:18 | म्हणून प्रत्येक पेजमधे "session start" ची किंवा तो घोषित करण्याची गरज असते. |
03:29 | पुन्हा सुरूवात करू. मुख्य पेजवर जाऊ. |
03:35 | "Alex" आणि "abc" द्वारे log in करू. log inवर क्लिक करा. |
03:41 | "You're in! Click here to enter the member page". हा मेसेज दिसत आहे. कुठलीही एरर नाही. आपले session बनले आहे. |
03:49 | येथे क्लिक करा. फक्त "Welcome!" दिसत आहे का ते पाहू. |
03:52 | मागे जाऊन चूक तपासू. हे "username" असायला हवे. |
04:00 | येथे तुलना करत नाही आहोत. परंतु double equals चिन्ह दिले जे कदाचित चुकीचे आहे. |
04.07 | आता हे कार्य करायला हवे. "index" पेजवर जाऊ आणि पुन्हा log in करू. |
04:17 | Login केल्यावर "You're in! Click here to enter the member page" मेसेज दिसेल. त्यावर क्लिक केल्यास "Welcome, alex!" दिसेल. |
04:26 | आता login पेजवर जाऊ. |
04:28 | बहुतेकांना सर्व डेटा गेला आहे असे वाटेल. |
04:32 | परंतु "member dot php" पेजवर जाऊन एंटर दाबले तर ते अजूनही "alex"च दाखवत आहे. |
04:40 | आणि जर दुस-यांदा मी browser बंद करून reopen केला, "local host php academy" वर गेले . माझ्या पेजवर परत येऊन "login" session असलेल्या member पेजवर परत आले. मी logged in आहे असे दिसेल. |
05:03 | आपला युजर logged in आहे. browser बंद करून पुन्हा एंटर केले तरी logged in आहे. |
05:12 | तुम्ही असे logging in करत असल्यास हे अतिशय उपयोगी फंक्शन आहे . |
05:19 | अनेक वेबसाईटस logged in ठेवण्यासाठी असे करतात. |
05:23 | आता log out पेज बनवणार आहोत. |
05:26 | त्यासाठी स्वतंत्र पेज बनवून ते "logout dot php" नावाने सेव्ह करू. |
05:33 | आणि येथे session संपवणे गरजेचे आहे. |
05:39 | session संपविण्यापूर्वी ते सुरू करणे आवश्यक आहे. |
05:46 | म्हणून येथे "session start" टाईप करा. खात्री करा. |
05:55 | ठीक आहे. नंतर sestroy चुकलो "session destroy" लिहिणे गरजेचे आहे. |
06:04 | जर पेज कार्यान्वित केले तर हे session संपवेल. |
06:08 | येथे एक एरर मेसेज एको करू "You've been logged out. Click here to return". |
06:20 | येथे "index dot php" पेजवर नेणारी लिंक बनवू. |
06:32 | आता हे तपासू. |
06:35 | येथे break समाविष्ट करू. log out करणारी लिंक बनवू. |
06:41 | युजरला "logout dot php" पेजची लिंक देणे आवश्यक आहे. अन्यथा logout कसे करायचे ते समजणार नाही. |
06:50 | हे रिफ्रेश करू. php पेज वरुन log out करण्यासाठी लिंक बनवू. |
06:55 | त्यावर क्लिक करा "You've been logged out. Click here to return." मेसेज दिसेल. |
06:59 | logged out झालो असे समजू . member dot php वर जाण्याचा प्रयत्न करू. |
07:04 | येथे व्हेरिएबल मिळाले नाही. |
07:06 | आता युजरने हे पेज access करायला नको कारण तो logged in नाही. |
07:13 | म्हणून session start नंतर if session आणि सेशन नेम जे युजरनेम आहे. |
07:19 | पुढे "Welcome" आणि डेटा एको करू. |
07:25 | आणि पुढे else dieआणि कंसात "You must be logged in". |
07:45 | session उपलब्ध असल्यास किंवा ते योग्य युजरनेम व पासवर्डद्वारे बनवले असेल तर "Welcome" मेसेज एको होईल. अन्यथा पेज kill करून "You must be logged in!" मेसेज दिसेल. |
07:55 | आपण अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. शिकलो ते थोडक्यात, |
08:04 | मी logged in नाही. प्रथम login करू. |
08:06 | loginकेले. हे member आहे. log out करू शकते . मी येथे पुन्हा आलो. |
08:10 | आता member dot phpवर जाऊन Enter दाबा. |
08:14 | "You must be logged in!" दिसेल. |
08:16 | मला log in करायचे आहे पण मी येथे क्लिक करणार नाही. |
08:22 | मी स्वतःला "member dot php" वर forward करेन. मेसेज बनला आहे आणि मी access करू शकतो. |
08:29 | हा पाठाचा शेवटचा भाग आहे. आपल्या शंका असल्यास त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. |
08:37 | हे भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद. |