PHP-and-MySQL/C4/Sending-Email-Part-1/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:00 | नमस्कार. आपण email script कशी बनवायची ते शिकणार आहोत. विशेषतः युजरला वेबसाईटवर रजिस्टर करताना. |
00:12 | युजर रजिस्टर झाला आहे हे कळवणारा email कसा पाठवायचा? "Send me an email" ही स्क्रिप्ट बनवून हे करू. |
00:24 | हा HTML फॉर्म असेल ज्यामधे आपण विषय आणि मेसेज लिहू शकतो आणि दिलेल्या address वर पाठवू शकतो. |
00:34 | त्यासाठी address व्हेरिएबल बनवू. |
00:39 | मी येथे माझा "hotmail" address टाईप करत आहे. |
00:48 | मी माझे "hotmail" पेज उघडत आहे "Inbox" वर क्लिक केल्यावर माझ्याकडून काहीही ईमेल नाही हे दिसेल. |
00:55 | ह्याक्षणी कोणताही नवीन ईमेल नाही. |
01:05 | हा address माझ्या address व्हेरिएबलमधे आहे. त्याला "to" नावाने रिनेम करू. |
01:13 | हे पाठवण्यासाठी मेल फंक्शनचा वापर करू. |
01:17 | येथे from आणि subject असेल. |
01:21 | "Email from PHPAcademy" हा ठरवलेला सब्जेक्ट असेल . |
01:32 | सबमिट करण्यासाठी HTML फॉर्म हवा आहे. मी एक self submission फॉर्म बनविणार आहे. |
01:39 | येथे काही html code लिहू. "send me an email dot php" सहित हा फॉर्म पेजवर सबमिट होईल. |
01:54 | आपली मेथड POST ही असणार आहे. |
01:59 | येथे फॉर्मचा शेवट करू. |
02:02 | युजर येथे दिलेल्या email address वर काहीही लिहून पाठवू शकतात. |
02:10 | तुम्ही यास अकाउंट मधून घेऊ शकता, फॉर्म बनवताना तुम्ही सांगू शकता की तुम्हाला या विशिष्ट addressला मेल पाठवायचा आहे. |
02:18 | हे आपले "send me an email" script आहे. तुमच्या वेबसाईटवर हा इमेल ठेवलेला असेल. |
02:27 | आता आपण "text" इनपुट लिहू. |
02:31 | हे मला इमेल पाठविणा-या व्यक्तीचे नाव असेल. |
02:34 | आपल्याकडे "name" नावाचे आणि "text" टाईपचे इनपुट आहे. |
02:39 | आपण "max length" आत्तासाठी 20 घेत आहोत. |
02:45 | याच्याखाली आपण text area बनवू. |
02:49 | येथे "textarea" टाईप करून तो असा बंद करा. |
02:53 | त्याला "message" असे नाव द्या. |
02:59 | येथे पॅराग्राफची सुरूवात आणि येथे शेवट करू. |
03:04 | येथे खाली submit बटण बनवू. ज्याची व्हॅल्यू असेल "Send" |
03:14 | किंवा... "Send me this" |
03:17 | जर येथे येऊन आपण हे पेज निवडले, |
03:21 | ही नावासाठी आणि ही मेसेजसाठी दिलेली जागा आहे. |
03:25 | येथे "Name:" आणि येथे "Message:" असे लिहू. |
03:31 | आता हे नीट दिसत आहे. आपल्याकडे name box आणि message box आहे. |
03:38 | ह्या बटणावर क्लिक केल्यावर email पाठवला जाईल. |
03:44 | प्रथम आपण php कोडमधे हे सबमिट बटण प्रेस झाले आहे का ते तपासू. |
03:53 | त्यासाठी "if" स्टेटमेंट कंसात आहे आणि कंडिशन TRUE असेल तर काय करायचे ते ह्या curly brackets मधे असेल. |
04:01 | आपली कंडिशन ह्या कंसात असेल. |
04:05 | सबमिट बटणाचे पोस्ट व्हेरिएबल ही आपली कंडिशन असेल. |
04:15 | जोपर्यंत सबमिट बटणाला व्हॅल्यू आहे. येथे स्पेलिंग चुकले आहे. |
04:19 | सबमिट बटण दाबल्यावर त्याच्याकडे "Send me this" ही व्हॅल्यू असेल. |
04:30 | याचाच अर्थ फॉर्म सबमिट झाला आहे कारण बटण दाबले गेले आहे. |
04:37 | आता येथे आतमधे फॉर्ममधील डेटा घ्यायचा आहे. |
04:44 | तो म्हणजे फॉर्म सबमिट केल्यावर इमेल पाठविणा-या व्यक्तीचे नाव. |
04:49 | आणि ते नाव ह्या फिल्डमधे आहे. ज्याचे नाव "name" आहे. |
04:56 | तसेच आपल्याकडे मेसेज आहे. ही व्हेरिएबलची रचना आपण पुन्हा सहज बनवू शकतो. आणि येथे मेसेज लिहू. |
05:08 | हे तपासण्यासाठी आपण नेम एको करू. |
05:12 | आणि मेसेज त्यामधे concatenate करू. |
05:17 | हे तपासून पाहू. येथे "Alex" टाईप करा. |
05:21 | आणि येथे "Hi there!" टाईप करा. |
05:23 | "Send me this" क्लिक केल्यावर "Alex" आणि "Hi there!" मिळेल. |
05:28 | आपला फॉर्म डेटा योग्यप्रकारे सबमिट झाला आहे. |
05:33 | पुढील भागात हे validate करणे आणि हा मेल दिलेल्या email-id वर युजरला कसा पाठवायचा ते पाहू. |
05:42 | पुढच्या पाठात भेटू. |
05:45 | हे भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे. धन्यवाद. |