PHP-and-MySQL/C3/MySQL-Part-2/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:00 नमस्कार. पहिल्या भागात आपण "php academy" ह्या डेटाबेसमध्ये टेबल बनवले. तसेच त्यात डेटा भरण्यासाठी योग्य डेटाटाईप्स वापरून फिल्डस बनवली.
00:14 काही dummy data आपल्या डेटाबेसमध्ये समाविष्ट करू.
00:21 आपण "Insert" बटण वापरणार नाही. कारण त्यामुळे अगदी सोपा interface मिळेल जिथे firstname, lastname, तसेच calender ने date of birth भरू शकतो.
00:33 हा पॉप अप पहा.
00:35 येथे gender भरू शकतो.
00:37 हे mysql php tutorial असल्यामुळे mysql किंवा php च्या सहाय्याने डेटा insert कसा करायचा ते पाहू .
00:49 प्रथम डेटाबेसला कनेक्ट करू.
00:52 "connect dot php" फाईल include करण्यासाठी आपण "mysql dot php" मधील "include" function वापरू.
01:00 जर तुम्ही त्याच डिरेक्टरीत नसाल तर "subdirectory आणि नंतर connect" असे लिहू.
01:07 ते व्यवस्थित लिहा.
01:09 जर "Rest of the page" कार्यान्वित करायचे नसेल तर आपण "require" function वापरू शकतो.
01:18 "required" गोष्ट न सापडल्यास पेज संपुष्टात आणले जाते.
01:23 "include" फंक्शन ते समाविष्ट करून echo करेल किंवा उरलेले पेज दाखवेल.
01:29 "require" फंक्शन मधील गोष्ट न सापडल्यास पेज "kill" होते.
01:34 आपण "require connect dot php" लिहू. डेटाबेस कनेक्ट न झाल्यास पुढील पान निरर्थक आहे.
01:41 आपल्या पानावर गार्बेज लिहून येईल.
01:44 प्रथम "require connect dot php" आणि connect dot php मध्ये php mysql functions लिहू.
01:52 आपण "connect" ह्या व्हेरिएबलने सुरूवात करू आणि ते "mysql_connect" हे फंक्शन वापरेल.
02:01 हे फंक्शन समजून घेऊ.
02:03 ह्या फंक्शनमुळे mysql डेटाबेसला आपण जोडले जातो.
02:08 हे तीन parameters घेते.
02:11 पहिला parameter म्हणजे webserver चा address.
02:17 माझ्या संगणकावरील local webserver, local host मी वापरणार आहे.
02:22 आपण local host ऐवजी 127.0.0.1 IP address देखील लिहू शकतो.
02:32 मी local host लिहिणे पसंत करीन.
02:35 मी standard username आणि password वापरणार आहे.
02:41 म्हणजेच "root". पासवर्ड दिलेला नसल्यामुळे तो अस्तित्वात नाही.
02:50 आपण कनेक्शन प्रस्थापित केले आहे पण जर हे नीट झाले नाही,
02:56 तर येथे "or die" असे लिहून कंसात error message देता येतो. उदाहरणार्थ "connection failed".
03:02 कनेक्शन काम करत आहे असे समजू.
03:11 "connected" असे echo करू या.
03:18 कनेक्शन प्रस्थापित झाले असल्यास उरलेले script रन होईल व "connected" असे echo होईल
03:26 आता येथे backup उघडू.
03:30 Refresh केल्यावर "connect dot php" तसेच "mysql dot php" दिसेल त्यावर क्लिक करा.
03:37 mysql मध्येही आपण "connect dot php" लिहिल्यामुळे connect क्लिक केले नाही.
03:44 दोन्ही सेव्ह केल्यावर mysql dot php रन करू.
03:48 आपण कनेक्ट झालो आहोत.
03:50 जर आपणhost च्या जागी "I dont exist" टाईप केले तर या नावाचा host आपल्या computer वर उपलब्ध नसल्यामुळे एरर मेसेज मिळेल.
04:08 refresh करू. हा मेसेज दिसेल. याला वेळ लागत आहे..... ठीक आहे.
04:14 आपल्याला mysql error मिळाली आहे. connection failed हा text मेसेज दिसत आहे.
04:21 unknown mysql server host असे दिसत आहे.
04:25 ही एरर तुम्हाला कळली आहे.
04:27 हा आपला host आहे आणि या ओळीवर हे लिहिले आहे. इथे debugging message code दिसत आहे.
04:36 मी तुम्हाला आणखी एक उपयोगाची गोष्ट सांगतो. आपण इथे "die" लिहून त्यात दुसरे फंक्शन लिहू शकतो.
04:46 हे दुसरे फंक्शन समजून घेऊ.
04:50 "I don't exist" डेटाबेस नाव तसेच ठेवून पेज रिफ्रेश करू.
04:57 हे थोडा वेळ घेत आहे.
05:06 आपल्याला हे दिसेल. आधी php ने दिलेला error message परतecho झाला आहे.
05:12 जर error reporting युजरसाठी बंद केलेले असेल तर ही पध्दत तुम्हाला योग्य तो संदेश देईल.
05:24 हे आपणecho करणार नाही.
05:26 येथे "error reporting" लिहू.
05:30 कृपया error reporting वरील ट्युटोरियल पहा.
05:33 आपण हे शून्य वर सेट करू.
05:40 त्यामुळे error reporting बंद होईल.
05:43 येथील ही error दाखविली न जाता ही विशिष्ट error दाखविली जाईल.
05:49 हे रिफ्रेश करू. हे थोडा वेळ घेत आहे.
05:58 आपल्याला हे दिसेल. आता ही विशिष्ट error मिळालेली आहे.
06:03 ह्या फंक्शनद्वारे आपण कनेक्ट झालो आहोत. नसेल तर एरर मेसेज मिळेल. आता डेटाबेस निवडायचा आहे.
06:13 हे करण्यासाठी "mysql_select db" हे फंक्शन वापरू.
06:20 हे केवळ डेटाबेसचे नाव हा एकच parameter घेते.
06:24 "php myadmin" वर पुन्हा क्लिक करू जेथे "phpacademy" हा डेटाबेस दिसेल.
06:31 केवळ phpacademy टाईप केले तरी ते चालले पाहिजे.
06:36 पुन्हा or die feature चा वापर करू.
06:40 डेटाबेस उपलब्ध नसल्यास die function च्या सहाय्याने mysql_error स्पष्ट करू शकतो.
06:47 हे रिफ्रेश करू.
06:50 "local host" टाईप करून नंतर ते रिफ्रेश करायला हवे. म्हणजे ते योग्य कार्य करेल.
06:59 हे कनेक्ट झाले आहे. डेटाबेस उपलब्ध नसल्यास error मिळेल.
07:04 "I don't exist" हे डेटाबेसचे नाव लिहून refresh करा. "Unknown database "idon'texist" असे दिसेल.
07:12 हे नीट काम करत आहे.
07:14 अशाप्रकारे एरर समजणे युजरला उपयोगाचे असते.
07:20 आपल्याकडे "phpacademy" आहे.
07:23 सर्व ठीक आहे असे समजून रिफ्रेश करू.
07:29 पुन्हा "phpacademy" टाईप करून सेव्ह करा.
07:33 रिफ्रेश करा. हे कनेक्ट झाले आहे.
07:36 ह्याचा log ठेवू. आपण कनेक्ट झालो आहोत.
07:41 उरलेला code सुरू रहाण्यासाठी हा paragraph संपवू. पुढील ट्युटोरियलमध्ये डेटाबेसमध्ये डेटा लिहिण्याबद्दल आपण जाणून घेऊ.
07:56 धन्यवाद. या टयूटोरियल चे भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केला असून मी रंजना भांबळे अपला नीरोप घेते सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Gaurav, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana