PHP-and-MySQL/C2/Variables-in-PHP/Marathi
From Script | Spoken-Tutorial
|
|
---|---|
00:00 | PHP variables वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:04 | प्रथम आपण काही गोष्टी समजून घेऊ या. |
00:07 | PHP variables हे वापरण्यास अतिशय सोपे असल्यामुळे मला खात्री आहे की ती तुम्हाला सहज समजतील. |
00:14 | ती declare करणे आवश्यक नसते तसेच ती लिहायला सोपी असतात. |
00:18 | आपण स्क्रिप्टच्या मधेच व्हेरिएबलमध्ये व्हॅल्यू समाविष्ट करू शकतो. |
00:23 | तसेच आवश्यकतेनुसार ही व्हेरिएबल्स आपोआपच आपला data टाईप बदलू शकतात. |
00:28 | अशा प्रकारे प्रत्येक वेळी वेगवेगळ्या रूपात ती declare करणे किंवा त्यांना व्हॅल्यू देणे आवश्यक नसते. |
00:36 | उदाहरणादाखल आपले PHP टॅग्ज बनवून त्यांच्यामध्ये आपले घटक भरू या. |
00:41 | आता प्रथम dollar चे चिन्ह लिहून मग पुढे आपल्या व्हेरिएबलचे नाव देऊ या. |
00:48 | नावाची सुरूवात आपण अंकाने म्हणजेच 1 सारख्या आकड्याने ने सुरू करू शकत नाही. |
00:53 | आपण underscoreकिंवा letter ने सुरूवात करू शकतो. |
00:57 | underscores, अक्षरे व अंक याशिवाय कुठलीही special characters नावात चालत नाहीत. शिवाय अंकाने सुरूवात होऊ शकत नाही. |
01:06 | त्यामुळे हे व्यवस्थित चालू शकते. |
01:09 | आपणnameनामक व्हेरिएबल बनवू या. ज्याची व्हॅल्यू ही double quotes मध्ये असलेली string व्हॅल्यू असेल, जसे आपणecho फंक्शन मध्ये केले होते. |
01:21 | समजा माझे नाव Alex आहे. |
01:23 | पुढील ओळीवर dollar चिन्हाच्या सहाय्याने age नामक अजून एक व्हेरिएबल बनवू या. त्याची व्हॅल्यू 19असेल आणि ही व्हॅल्यू double quotes मध्ये असणार नाही. |
01:33 | याचे कारण असे की हा एक integer आहे. |
01:36 | तुम्ही याचा उपयोग decimal values साठी देखील करू शकता. येथे 19.5 म्हणजेच साडे एकोणीस देखील असू शकते. |
01:43 | हे आपोआप decimal मध्ये बदलून घेतले जाते. |
01:48 | आता आपण केवळ integer वापरणार आहोत. अशाप्रकारे आपल्याकडे nameहे string आणि age हे integer व्हेरिएबल आहे. |
01:57 | आता echo करून पाहू. |
02:00 | त्यासाठी echo, व्हेरिएबलचे नाव आणि शेवटी line terminator म्हणून सेमीकोलनची आवश्यकता आहे. |
02:06 | आता आपली व्हेरिएबल नामक फाईल उघडा. |
02:11 | Alexअसे echoझाले आहे. कारण आपण येथे echo name असे म्हटले होते. |
02:16 | आता आपण age echo करून पाहू. |
02:19 | हे केवळinteger व्हेरिएबल आहे जे आपण येथे echo केले होते. |
02:24 | अजून एक म्हणजे व्हेरिएबल्स अगदी सोप्या पध्दतीने string मध्ये concatenate करता येतात. |
02:30 | कदाचितconcatenation हा चुकीचा शब्द असू शकतो. ते आपल्याला string मध्ये सहजपणे समाविष्ट करता येतात. |
02:37 | जर तुम्हाला concatenation म्हणजे काय हे माहित नसेल तर त्याचा अर्थ एका ओळीत दोन गोष्टी किंवा दोन strings एकमेकांना जोडणे. |
02:46 | concatenation चे एक उदाहरण बघू या. 'concat', नंतर '.' आणि त्यानंतर 'ination'. |
02:56 | आता echo केल्यावर concatination असे दिसेल. |
02:59 | हे करून बघा. |
03:03 | यावर आधारित संपूर्णपणे वेगळे ट्युटोरियल आहे. त्यामुळे आत्तासाठी echo करताना आपण हे एका व्हेरिएबलच्या रूपात समाविष्ट करण्याची गरज नाही. |
03:14 | तुम्हाला जर हे समजले नसेल तर काळजी करू नका. हे अतिशय सोपे आहे. |
03:18 | येथे असे लिहू या "My name is" नंतर name व्हेरिएबल" आणि नंतर " my age is" आणि शेवटी age व्हेरिएबल. |
03:24 | आता हे सर्व एका stringमध्ये, एका echoमध्ये आहे. आपल्याकडे 'My name is' हे प्लेन टेक्स्ट आहे. |
03:32 | name व्हेरिएबल कॉल केल्यावर त्याची व्हॅल्यू येथे दिसेल. आणि age व्हेरिएबल कॉल केल्यावर त्याची व्हॅल्यू येथे दिसेल. |
03:40 | आता रिफ्रेश केल्यावर आपल्याला दिसेल "My name is Alex". हे आपले व्हेरिएबल आहे. " my age is 19" आणि हे आपले व्हेरिएबल आहे. |
03:48 | अशा प्रकारे हे stringमध्ये समाविष्ट करणे अतिशय सोपे आहे. |
03:52 | व्हेरिएबलशी संबंधित एवढ्या गोष्टी तुम्हाला माहित असणे पुरेसे आहे. |
03:56 | boolean, decimal सारखे व्हेरिएबलचे इतर टाईप्स आहेत. आपण '19.5' हे डेसिमलचे उदाहरण पाहिले होते. |
04:06 | dollar चिन्हासोबत ही व्हेरिएबल्स सुध्दा डिक्लेयर करता येतात. |
04:10 | याचा अभ्यास करा आणि नीट समजून घ्या. पुढील ट्युटोरियलमध्ये आपण advanced functionality बद्दल अधिक जाणून घेऊ. |
04:19 | सहभागाबद्दल धन्यवाद. या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . |