PHP-and-MySQL/C2/Arithmatic-Operators/Marathi
From Script | Spoken-Tutorial
|
|
---|---|
00:00 | basic arithmetic operators वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:03 | आपण प्रथम बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार बघणार आहोत. |
00:09 | हे अशा प्रकारे लिहिले जाते. बेरीज, वजाबाकी, गुणाकारासाठी asterisk आणि भागाकारासाठी forward slash |
00:17 | आपल्याकडे दोन variables असतील. |
00:20 | आपण num1नामक variable बनवून त्याला 10ही value देऊ. आणि num2या व्हेरिएबलला 2 ही value देऊन ते सेव्ह करू या. |
00:30 | हे दोन्ही दशांश चिन्ह नसलेले integer numbers आहेत. |
00:34 | आता समजा आपल्याला num1 आणि num2 यांची बेरीज करायची आहे. |
00:40 | मग आपण num1 अधिक num2 हे उत्तर echo करू या. |
00:44 | हे तपासून बघू. |
00:47 | येथे 12दिसत आहे. num1 आणि num2 म्हणजेच10 and 2यांची बेरीज केल्यावर त्याचे उत्तर 12 येते. |
00:55 | आता वजाबाकी करून बघू या. आपण येथे केवळ चिन्ह वजाने बदलू. |
01:01 | Refresh केल्यावर येथे 8 हे उत्तर दिसेल. |
01:05 | आता गुणाकार करू या. 10 X 2 = 20 आणि आपल्याला 20 हे उत्तर मिळालेले आहे. |
01:11 | पुढे 10 / 2 म्हणजेच 10 च्या निम्मे = 5. |
01:18 | आता आपल्याला याच्या शेवटी काही समाविष्ट करायचे असल्यास ते आपण कसे करू शकतो. |
01:24 | समजा याला num2 ने भागायचे आहे. |
01:27 | मला असे वाटते की हे operation अशा प्रकारे होईल. येथे num1आणि num2म्हणजे 10 and 2 यांची बेरीज होईल आणि उत्तर 12 मिळेल. 12 ला 2 ने भागले जाईल. |
01:39 | आता 12 / 2 म्हणजेच आपल्याला 6 उत्तर मिळेल. |
01:43 | परंतु येथे प्रत्यक्षात काय होते आहे तर num2 / num2 = 1 हे उत्तर मिळाले जे num1 मध्ये मिळवले गेले. |
01:56 | म्हणजेच आपल्याला 6 ऐवजी 11 हे उत्तर मिळाले. |
02:00 | याचे कारण असे की भागाकाराची क्रिया बेरजेच्या क्रियेच्या आधी होते. गुणाकाराचेही तसेच असते. |
02:10 | अपेक्षित उत्तर मिळवण्यासाठी आपण कंस समाविष्ट करू या. |
02:16 | कंस कसे कार्य करेल? तर कंसातील क्रिया आधी केली जाईल. नंतर भागाकार केला जाईल जो एखादा integer किंवा variable असू शकतो. |
02:29 | म्हणजेच येथे num1 + num2 म्हणजेच 10 + 2 = 12 हे उत्तर मिळेल याला 2 ने भागल्यावर आपल्याला 6 हे उत्तर मिळेल. |
02:39 | त्यासाठी रिफ्रेश करा. आपल्याला योग्य उत्तर मिळाले आहे. |
02:43 | हे काही basic arithmetic operators आहेत, जे वापरण्यासाठी अगदी सोपे आहेत. |
02:48 | तुम्हाला काही अडचण आल्यास किंवा हे नीट कार्य करते की नाही हे तपासून बघण्यासाठी तुमची आकडेमोड calculator द्वारे तपासून पहा. |
02:55 | लवकरच आपण अजून अशा प्रकारच्या काही क्रिया बघणार आहोत. |
02:58 | एकने वाढणा-या increment arithmetic operator बद्दल आपण जाणून घेणार आहोत. |
03:05 | याचा सराव करा आणि तुम्हाला नीट समजले आहे याची खात्री करून घ्या. |
03:09 | सहभागाबद्दल धन्यवाद. या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज---यांनी दिला आहे. |