PERL/C3/Perl-and-HTML/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | Perl and HTML वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:06 | ह्या ट्यूटोरियल मध्ये, आपण शिकणार आहोत html pages आणि CGI module कसे तयार करणे. |
00:14 | हा ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे:
उबंटु लिनक्स 12.04 ऑपरेटिंग सिस्टम, पर्ल 5.14.2, 'फायरफॉक्स वेब ब्राउज़र' 'Apache HTTP Server' आणि gedit टेक्स्ट एडिटर. |
00:31 | तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही टेक्स्ट एडिटर वापरू शकता. |
00:35 | हे ट्यूटोरियल अनुसरण करण्यासाठी, तुम्हाला पर्ल प्रोग्रँमिंगचे प्राथमिक ज्ञान असावे. |
00:40 | नसल्यास संबंधित पर्ल ट्यूटोरियल्ससाठी स्पोकन ट्यूटोरियल वेबसाईट वर जा. |
00:47 | पर्ल प्रोग्राम जे web वर वापरले जाते, त्याला Perl CGI म्हटले जाते. |
00:52 | CGI म्हणजे Common Gateway Interface आहे. |
00:56 | हे client-server वेब संवाद वापरण्यासाठी एक इंटरफेस आहे. |
01:01 | CGI.pm एक पर्ल मॉड्यूल आहे जे पर्ल इन्स्टॉलेशनसह स्थापित केले जाते जे संवादात मदत करते. |
01:10 | CGI.pm, Perl CGI एप्लिकेशन्स लिहिण्यास, विकसकांना मदत करण्यास, फंक्शन्स वापरण्यास तयार आहेत. |
01:19 | जेव्हा HTTP server मधून विपरीत, वेब ब्राउज़र मधून कोणत्याही डाइरेक्टरी मध्ये फाइल विनंती केली जाते तेव्हा Perl CGI स्क्रिप्ट्स कार्यान्वित केले जाते आणि डिसप्ले साठी ब्राउज़र वर पुन्हा आउटपुट पाठविले जाते. |
01:33 | ह्या फंक्शनला CGI म्हटले जाते आणि प्रोग्रामसला CGI scripts म्हटले जाते. |
01:40 | CGI प्रोग्राम्स् Perl script, Shell Script, C किंवा C++ program असु शकते. |
01:47 | आता एक सॅंपल Perl प्रोग्रॅम पाहु. |
01:50 | टर्मिनल वर जाऊ. |
01:53 | मी आधीच सेव्ह केलेली cgiexample.pl फाइल gedit मध्ये उघडते. |
02:01 | cgiexample dot pl फाइल मध्ये, स्क्रीन वर दर्शवल्याप्रमाणे कोड टाइप करा. |
02:08 | आता कोड समजून घेऊ. |
02:11 | use CGI स्टेट्मेंट पर्लला सांगते की आम्हाला आमच्या प्रोग्राममध्ये CGI.pm मॉड्यूल वापरायचे आहेत. |
02:19 | हे मॉड्यूल लोड करेल आणि आपल्या कोड साठी उपलब्ध CGI functions चे सेट बनवेल. |
02:26 | HTML सुरू करण्यासाठी, आपण start_html() मेथड वापरु. |
02:33 | “My Home Page” वेब पेज साठी दिलेल्या पेजचा शीर्षक आहे. |
02:38 | आपण CGI module वापरुन कोणताही HTML टॅग प्रिंट करू शकतो. |
02:43 | शीर्षक टॅग्स h1, h2 इत्यादीने प्रस्तुत केले जातात. |
02:49 | end_html मेथड BODY आणि HTML टॅग्स रिटर्न करते. |
02:55 | आता फाइल सेव्ह करा. |
02:57 | Web server मधून स्क्रिप्ट रन करण्यापूर्वी, command line मधून रन करण्याचे प्रयत्न करू. |
03:04 | टर्मिनल वर परत जा आणि टाइप करा: perl cgiexample.pl आणि एंटर दाबा. |
03:12 | आउटपुट HTML सारखे दिसते. |
03:15 | पुढे, आपण त्याच स्क्रिप्टला web server शी तपासू. |
03:20 | प्रथम तपासू की , वेब सर्वर काम करत आहे की नाही. |
03:25 | आपले 'वेब ब्राउज़र' उघडा आणि मशीन वर IP address प्रविष्ट करून एंटर दाबा. |
03:31 | अन्यथा, तुम्ही "localhost" टाइप करू शकता. |
03:35 | जर सर्व काही ठीक काम करत असेल तर तुम्हाला ब्राउज़र मध्ये काहीतरी या सारखे दिसेल. |
03:40 | जर तुम्हाला कोणतेही एरर मिळाले, तर web service प्रतिष्ठापित नसेल किंवा ते ON स्टेटस मध्ये नसेल. |
03:48 | माझ्या मशीन वर Apache HTTP server प्रतिष्ठापित आहे. |
03:52 | जर ते प्रतिष्ठपित नसेल, तर टर्मिनल वर खालील कमांड कार्यान्वित करा. |
03:58 | अन्यथा सर्वर कॉनफिगरेशन साठी तुमच्या सिस्टम अड्मिनिस्ट्रेटरला विचारा. |
04:04 | आता, आपण तीच स्क्रिप्ट वेब सर्वर शी तपासू. |
04:09 | ह्यासाठी, आपल्याला काही स्टेप्स अनुसराव्या लागतील. |
04:13 | प्रथम cgi-bin डाइरेक्टरी मध्ये आपले प्रोग्रॅम ठेवा जेथे वेब सर्वर CGI स्क्रिप्ट म्हणून ओळखता येईल. |
04:22 | प्रोग्रॅम फाइलचे नाव dot pl किंवा dot cgi एक्सटेन्शन ने समाप्त झाले पाहिजे. |
04:29 | सर्वर वर कार्यान्वित करण्यासाठी फाइलची परवानगी सेट करा. |
04:33 | स्क्रिप्ट Run करा. |
04:35 | ह्या प्रोग्राम साठी URL म्हणून स्लाइड मध्ये प्रदर्शित होईल. |
04:40 | टर्मिनल वर जाऊ. |
04:42 | आता आपण cgi-bin डाइरेक्टरी वर ती फाइल कॉपी करूया. |
04:47 | ह्या साठी, कमांड टाइप करा: sudo space cp space cgiexample.pl space /usr/lib/cgi-bin/. |
05:03 | आवश्यक असल्यास पासवर्ड प्रविष्ट करा. |
05:06 | पुढे, आपल्याला फाइल साठी वेब-सर्वर यूज़रला 'read' आणि 'execute' ची परवानगी देणे गरजेचे आहे. |
05:13 | ह्या साठी, टाइप करा: sudo space chmod space 755 space /usr/lib/cgi-bin/cgiexample.pl |
05:31 | आता, आपली फाइल जी cgi-bin डाइरेक्टरी मध्ये स्थीत होती ती कार्यान्वित करण्यासाठी तयार आहे. |
05:38 | वेब ब्राउज़र वर जा. |
05:41 | टाइप करा: localhost/cgi-bin/cgiexample.pl आणि एंटर दाबा. |
05:50 | आपण आउटपुट पाहु शकतो जे वेब ब्राउज़र वर कार्यान्वित झाले आहे. |
05:55 | आता आणखी एक प्रोग्राम पाहू. हा प्रोग्रॅम फॉर्म मध्ये फील्ड्सला जोडेल आणि आपल्या वेब पेज वर प्रविष्ट केलेल्या व्हॅल्युजना परत मिळवेल. |
06:06 | पुर्वी तयार केलेली cgi-bin directory मध्ये, मी 'form.cgi' फाइल सेव्ह केलेली आहे. मी ही फाइल gedit मध्ये उघडेल. |
06:17 | आता, खालील ओळी जोडा. हा प्रोग्राम एक feedback form निर्माण करतो. |
06:24 | यूज़र ला first name, last name, gender आणि फीडबॅकचे तपशिल प्रविष्ट करायचे आहेत. |
06:31 | एक form सुरवात करण्यासाठी आपण start_form() मेथड वापरत आहोत. |
06:36 | Form field मेथड्स, standard html tag मेथड्सच्या खूप समान आहेत. |
06:42 | फॉर्म मध्ये टेक्स्टबॉक्स तयार करण्यासाठी, बऱ्याच पॅरमीटर्स सह Textfield() मेथड वापरले जाते. |
06:49 | येथे “fname”, “lname” टेक्स्ट बॉक्सचे नाव आहेत जे यूज़र कडून इनपुट मिळवतात. |
06:57 | radio underscore group, “Male” आणि “Female” दोन पर्यायांसह रेडिओ बटणंना निर्देशीत करते. |
07:05 | हे hyphen values पॅरमीटर द्वारे निर्दिष्ट केले जाते. |
07:09 | hyphen default पॅरमीटर रेडिओ बटणाची डिफॉल्ट निवड सूचित करते. |
07:15 | popup underscore menu लिस्टबॉक्स पर्याय निर्दिष्ट करते. |
07:20 | Submit बटण URL provider वर प्रविष्ट केलेला डेटा सब्मिट (जमा) करण्यासाठी वापरले जाते. |
07:26 | Clear बटण form ला रिकामी करण्यास वापरले जाते. |
07:30 | displayform फंक्शन त्या व्हॅल्युजना पुन्हा प्राप्त करते जे आपण फॉर्म मध्ये प्रविष्ट केले होती. |
07:36 | param() फंक्शन फॉर्म फील्डला व्हॅल्यू देते ज्याचे नाव पॅरमीटर म्हणून पास केले जाते. |
07:42 | येथे “fname” ते नाव आहे जे “First Name” टेक्स्ट बॉक्स मध्ये दिले आहे. |
07:47 | ही वॅल्यू dollar name1 वेरियबल मध्ये पुन्हा प्राप्त करून संचित केले जाते. |
07:53 | आता प्रोग्राम कार्यान्वित करू. |
07:56 | वेब ब्राउज़र वर जाऊ. |
07:58 | टाइप करा: localhost/cgi-bin/form.cgi आणि एंटर दाबा. |
08:06 | feedback form प्रदर्शित आहे. |
08:09 | मी येथे दाखवल्याप्रमाणे ह्या फॉर्म मध्ये डेटा प्रविष्ट करेल. |
08:15 | नंतर फॉर्म मधून पुन्हा प्राप्त केलेले आउटपुट पाहण्यासाठी Submit बटण दाबा. |
08:21 | आपण ह्या ट्यूटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात. |
08:26 | ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण CGI मॉड्यूल वापरुन html pages तयार करणे शिकलो. |
08:33 | असाइन्मेंट साठी-
form.cgi प्रोग्राम मध्ये, Java, C/C++ आणि Perl लॅंग्वेज साठी checkbox पर्याय जोडा. |
08:44 | यूज़र फीडबॅक मिळण्यासाठी textarea पर्याय जोडा. |
08:48 | वेबपेज वर यूज़र द्वारे प्रविष्ट केलेली माहिती प्रिंट करा. |
08:52 | स्क्रीनवर दिसणार्या लिंकवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमधे तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया डाउनलोड करून पहा. |
08:59 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
कार्यशाळा चालविते, परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते |
09:08 | अधिक माहितीसाठी, आम्हाला लिहा. |
09:11 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे.
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
09:23 | मी रंजना उके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |