Moodle-Learning-Management-System/C2/User-Roles-in-Moodle/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 User Roles in Moodle वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:06 या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत: user ला admin role कसे द्यावे?
00:13 एक course साठी teacher ला असाइन कसे करावे आणि एक course साठी student ची नावनोंदणी(एन्रॉल) कशी करावी.
00:20 हा ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरणार आहे:Ubuntu Linux OS 16.04
00:28 XAMPP 5.6.30 मधून प्राप्त Apache, MariaDB आणि PHP

Moodle 3.3 आणि Firefox वेब ब्राउजर.

00:42 तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउजर वापरू शकता.

तथापि, Internet Explorer टाळले पाहिजे कारण यामुळे काही डिस्प्ले विसंगती उद्भवतात.

00:54 या ट्युटोरियलच्या विद्यार्थ्यांकडे त्यांच्या Moodle वेबसाइटवर तयार केलेले काही courses असावेत.
01:01 नसल्यास, कृपया या वेबसाइटवरील आधीचे Moodle ट्यूटोरियल पहा.
01:08 ब्राउजर वर जा आणि तुमचे admin username आणि password वापरून तुमच्या Moodle वेबसाइटवर लॉगइन करा.
01:16 आता आपण admin dashboard मध्ये आहोत.
01:19 आता Course and Category Management पेजवर जाऊ.
01:24 तुमच्याMoodle interface वर हे अभ्यासक्रम आहेत याची खात्री करा.

नसल्यास, त्यांना तयार करण्यासाठी ट्यूटोरियल थांबवा आणि नंतर पुन्हा सुरु करा.

01:34 आपण बनविलेले सर्व users ना पाहू.
01:38 Site Administration वर क्लिक करा.
01:41 नंतर Users टॅबवर क्लिक करा.
01:44 Accounts सेकशन अंतर्गत, Browse list of users वर क्लिक करा.
01:50 आपल्याकडे आता 4 users आहेत.
01:53 user Priya Sinha वर क्लिक करू आणि तिची profile एडिट करू.
01:59 तर User details सेकशनमध्ये, Edit Profile link वर क्लिक करा.
02:04 खाली स्क्रोल करा आणि Optional सेकशनवर जा.

मग त्याचा विस्तार करण्यास त्यावर क्लिक करा.

02:11 लक्षात घ्या की फील्ड Institution, Department, Phone आणि Address स्वयं आपोआप भरले जाते .

हे आपण CSV फाईलमध्ये प्रविष्ट केले आहे.

02:23 पुन्हा users च्या यादीत परत जाऊ.

असे करण्यासाठी, Site Administration -> Users -> Browse list of users वर क्लिक करा.

02:33 आपण या System Admin2 user ला administrator role देऊ.
02:39 डाव्या मेनूवर, Site Administration वर क्लिक करा आणि नंतर Users टॅबवर क्लिक करा.
02:46 Permissions सेकशनपर्यंत खाली स्क्रोल करा आणि Site Administrators वर क्लिक करा.
02:52 येथे users चे 2 सेट आहेत.

पहिल्या सेटमध्ये वर्तमान site administrators चे नावे आहेत आणि दुसर्या सेटमध्ये इतर सर्व users ची यादी आहे.

03:05 दोन याद्या दरम्यान, विविध क्रिया करण्यासाठी बटणे आहेत.
03:11 Users box मधून, आपण System Admin2 user वर क्लिक करू.
03:17 जर बरेच यूजर्स असतील तर शोध घेण्यासाठी Users' बॉक्सच्या खाली Search box चा वापर करा. आणि नंतर, Add बटणवर क्लिक करा.
03:26 Confirm बॉक्समध्ये, Continue बटणवर क्लिक करा.
03:30 आता येथे 2 admin users आहेत.

आपल्याला पाहिजे तितके admin users असू शकतात.

03:38 तथापि, केवळ एक Main administrator असू शकतो.

Main administrator कधीही सिस्टममधून डिलीट केले जाऊ शकत नाही.

03:48 आता आपण Rebecca Raymond Calculus course साठी teacher म्हणून असाइन करू.
03:55 हे करण्यासाठी, येथे दर्शविल्याप्रमाणे Course and category management पेजवर जा.
04:02 1st Year Maths subcategory मधील courses पाहण्यासाठी त्यावर क्लिक करा.
04:09 Calculus कोर्सवर क्लिक करा. कोर्सचे तपशील पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा.

Enrolled Users वर क्लिक करा.

04:19 आपण पाहु शकतो की user Priya Sinha या कोर्समध्ये दाखल झाली आहे.
04:25 आपण हे upload user CSV द्वारे केले.
04:29 Moodle मध्ये शिक्षक समवेत प्रत्येकास, कोर्समध्ये नावनोंदणी करणे आवश्यक आहे.
04:35 त्यांना असाइन करणारे नवीन रोल कोर्समधील सध्याच्या रोलवर अवलंबून असते.
04:41 एकतर वरील उजव्या किंवा तळाशी उजव्या बाजूला Enrol users बटणवर क्लिक करा.
04:48 एक पॉप-अप विंडोज उघडते.
04:51 त्यात Assign roles साठी ड्रॉपडाउन आहे, Enrolment options आणि Search बटणसाठी फिल्ड्स आहेत.
05:00 आपण सर्व युजर्सची यादी पाहू शकतो ज्यांना सध्या course असाइन केलेले नाही.
05:06 Assign roles ड्रॉपडाउनमध्ये, Teacher निवडा.
05:11 नंतर Rebecca Raymond च्या पुढील Enrol बटणवर क्लिक करा.
05:16 शेवटी, पेजच्या तळाशी Finish Enrolling users बटणवर क्लिक करा.
05:24 विद्यार्थ्यांना समान पद्धतीने course असाइन करू शकता.
05:28 Teacher role मधून Rebecca Raymond अन-असाइन करण्यासाठी, Roles column मधील Trash आयकॉनवर क्लिक करा.
05:36 Confirm Role Change पॉपअप बॉक्समध्ये, Remove बटणवर क्लिक करा.
05:42 ज्यांची आधीच नाव नोंदणी झाली आहे त्यांच्यासाठी देखील Assign role आयकॉन वापरून role देऊ शकतो.
05:50 सर्व role नावांसह एक लहान पॉप-अप विंडो उघडण्यासाठी त्यावर क्लिक करा.
05:56 Rebecca Raymond ला teacher role असाइन करण्यासाठी Teacher वर क्लिक करा.

बॉक्स आपोआप बंद होते.

06:04 अगदी उजव्या बाजूच्या trash आयकॉनवर क्लिक करून एका कोर्स मधून Users ची नाव नोंदणी रद्द करू शकतो.
06:11 user enrolment तपशील एडिट करण्यासाठी उजवीकडे gear आयकॉन आहे,

त्यावर क्लिक करा.

06:20 यात user साठी निलंबित करण्याचा पर्याय आहे आणि enrolment start आणि end dates बदला.
06:28 enrolment पेजवर परत जाण्यासाठी Cancel बटणवर क्लिक करा.
06:33 आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.

थोडक्यात.

06:39 या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो: user ला admin role कसे द्यावे

course साठी teacher ला असाइन कसे करावे course साठी student ची नावनोंदणी(एन्रॉल) कशी करावी.

06:52 येथे तुमच्यासाठी एक असाइन्मेंट आहे:

Linear Algebra course साठी Rebecca Raymond ला teacher म्हणून असाइन करा.

07:00 Linear Algebra course साठी Priya Sinha ला student म्हणून असाइन करा.
07:06 खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते.

कृपया ते डाउनलोड करून पहा.

07:14 स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.

अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.

07:22 कृपया ह्या फोरममध्ये तुमचे कालबद्ध प्रश्न पोस्ट करा.
07:26 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India. यांच्याकडून मिळालेले आहे. या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.
07:38 या स्क्रिप्टचे योगदान प्रियंकाने केले आहे. आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते.

सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana