Moodle-Learning-Management-System/C2/Installing-Moodle-on-Local-Server/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Installing Moodle on Local Server वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:07 या ट्युटोरिअलमध्ये, आपण Moodle डाउनलोड आणि इन्स्टॉल कसे करावे हे शिकू.
00:15 Moodle इन्स्टॉल करण्यासाठी तुमच्या सिस्टिममध्ये खालील सपोर्ट असावे.

Apache 2.x (किंवा उच्च व्हर्जन)

00:23 MariaDB 5.5.30 (किंवा कोणतेही उच्च व्हर्जन) आणि PHP 5.4.4 +(किंवा कोणतेही उच्च व्हर्जन)
00:36 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरणार आहे:

Ubuntu Linux OS 16.04

00:44 XAMPP 5.6.30 मधून प्राप्त Apache, MariaDB आणि PHP
00:53 Moodle 3.3 आणि Firefox वेब ब्राउजर.
00:59 तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउजर वापरू शकता.
01:03 तथापि, Internet Explorer टाळले पाहिजे कारण यामुळे काही डिस्प्ले विसंगती उद्भवतात.
01:11 कृपया सुरू करण्यापूर्वी आपल्याकडे Internet कनेक्टिव्हिटी आहे याची खात्री करा.
01:16 या सिरीजमधील मागील ट्यूटोरियल पहा.

आणि याची खात्री करा की पूर्वीची आवश्यकता पूर्ण झाली आहे आणि database योग्यरित्या सेटअप केली आहे.

01:27 आपल्याकडे XAMPP कार्यरत असावा आणि आपल्याकडे username moodle-st सह database सेटअप असावा.
01:37 प्रथम, मी वेब ब्राउजर वर जाते आणि XAMPP लाँच करते.
01:42 ऍड्रेस बारमध्ये, टाईप करा http colon double slash 127 dot 0 dot 0 dot 1 आणि एंटर दाबा.
01:56 स्क्रीनच्या उजव्या बाजूस वरती असलेल्या मेनूमध्ये, PHPinfo वर क्लिक करा.
02:02 आता Ctrl + F कीज दाबून DOCUMENT underscore ROOT वर जा.
02:10 हे Apache Environment टेबलमध्ये मिळेल.
02:14 DOCUMENT underscore ROOT च्या व्हॅल्यूसाठी एकतर slash opt slash lampp slash htdocs किंवा slash var slash www असेल.
02:30 माझ्या मशीनमध्ये, हे slash opt slash lampp slash htdocs आहे.
02:37 कृपया या पाथची नोंद घ्या. आपण येथे Moodle इन्स्टॉल करणार आहोत.
02:43 आता Moodle डाउनलोड सुरवात करू करू.

Moodle च्या ऑफिशिअल(अधिकृत) वेबसाइटवर जा, जे moodle.org आहे.

02:53 शीर्ष मेनूमधील Downloads लिंकवर क्लिक करा.

आणि नंतर नवीनतम रिलीझ MOODLE 3.3+. बटणावर क्लिक करा.

03:04 या ट्यूटोरियल रेकॉर्डिंगच्या वेळी, नवीनतम स्थिर Moodle व्हर्जन 3.3 आहे.

जेव्हा तुम्ही प्रयत्न करता तेव्हा ते भिन्न असू शकते.

03:15 Download zip बटणवर क्लिक करा. हे आपल्या मशीनवर Moodle डाउनलोड होण्यास सुरवात होईल.
03:22 मी आधीच ही फाईल डाउनलोड केली आहे आणि ती माझ्या Downloads फोल्डरमध्ये आहे.

तर मी हे स्टेप वगळेन.

03:30 Ctrl + Alt + T कीज एकत्र दाबून टर्मिनल उघडा.
03:36 टर्मिनलवर, मी डिरेक्टरी Downloads मध्ये बदलेल.
03:40 हे करण्यासाठी, कमांड टाईप करा: cd space Downloads आणि एंटर दाबा.
03:48 जेथे तुम्ही तुमच्या सिस्टिमवर Moodle डाउनलोड केले आहे तेथे तुम्हाला path टाईप करावा लागेल.
03:53 आपण ज्या डिरेक्टरीमध्ये आहोत तर त्या फायली सूचीबद्ध करण्यास ls टाईप करून एंटर दाबा.
04:01 येथे माझी Moodle इन्स्टॉलेशन फाइल आहे. त्याचे नाव moodle hyphen latest hyphen 33 dot zip आहे.
04:11 डाउनलोड दरम्यान तुम्ही त्यास इतर नावाने पुनर्नामित केले असल्यास तुमच्या फोल्डरमध्ये ती फाईल शोधा.
04:19 नंतर आपल्याला या zip फाईलचे कॉन्टेन्टस moodle फोल्डरमध्ये एक्सट्रॅक्ट करावी लागेल.
04:26 command prompt वर टाईप करा: sudo space unzip space moodle hyphen latest hyphen 33 dot zip space hyphen d space slash opt slash lampp slash htdocs slash आता Enter दाबा.
04:51 Ctrl + L दाबून टर्मिनल क्लिअर करा.
04:56 आता टाईप करा cd space slash opt slash lampp slash htdocs आणि Enter दाबा.
05:06 डिरेक्टरीमध्ये फाईल्स सूचिबद्ध करण्यासाठी ls टाईप करून एंटर दाबा.
05:12 तुम्ही पाहु शकता की moodle नावाचा एक नवीन फोल्डर तयार झाला आहे.
05:18 आपण moodle फोल्डरचे owner आणि group members ला read, write आणि execute permissions देऊ.
05:27 तर टाईप करा- sudo space chmod space 777 space moodle slash आणि Enter दाबा.
05:39 विचारल्यास administrative पासवर्ड प्रविष्ट करा आणि एंटर दाबा.
05:45 आता ब्राउजरवर जा आणि टाईप करा- http colon double slash 127.0.0.1 slash moodle किंवा http colon double slash localhost slash moodle
06:06 मी येथे माझा localhost IP टाईप केला आहे.
06:10 हा IP moodle इन्स्टॉल केलेल्या मशीनचे IP असणे आवश्यक आहे.

कृपया लक्षात घ्या की moodle हे फोल्डर आहे ज्यामध्ये आपण पूर्वी एक्सट्रॅक्ट केले होते.

06:23 एंटर दाबा आणि तुम्हाला Moodle इन्स्टॉलेशन पेज दिसेल.
06:29 डीफॉल्टनुसार, आपण स्टेप नंबर एक म्हणजेच Configuration मध्ये आहोत.

कृपया लक्षात घ्या: Moodle एकाधिक भाषांमध्ये इन्स्टॉल केले जाऊ शकते.

06:40 परंतु आतासाठी आपण फक्त इंग्लिश भाषा निवडू.

तर, येथे English निवडा. language ड्रॉपडाउन च्या खाली Next बटणवर क्लिक करा.

06:52 नंतर Paths पेज आहे.

येथे web address, moodle directory आणि data directory परिभाषित केली आहे.

07:02 एकदा Moodle इन्स्टॉल झाले कि त्याला ऍक्सेस करण्यास Web address आपल्यासाठी URL आहे.
07:08 हे तेच URL आहे जे आम्ही वर दिले आहे, जे येथे दर्शविले आहे:
07:14 Moodle directory हे फोल्डर आहे जेथे सर्व Moodle कोड उपलब्ध आहे.
07:20 येथे लक्ष द्या- Web address आणि Moodle directory दोन्ही फिल्ड्स एडिट करू शकत नाही. हे आपण बदलू शकत नाही.
07:31 पुढे Data directory आहे.

हे ते फोल्डर आहे जिथे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अपलोड केलेली सर्व फाईल कॉन्टेन्ट संग्रहित केली जाईल.

07:42 या फोल्डरला read आणि write permission आवश्यक आहे म्हणून फायली येथे संग्रहित केल्या जाऊ शकतात.
07:50 तथापि सुरक्षा कारणांमुळे ते वेबवर थेट एक्सेसिबल नसले पाहिजे.
07:57 म्हणून, ते इंस्टॉलेशन फोल्डरच्या बाहेर ठेवले पाहिजे.
08:03 lampp फोल्डरच्या आत moodledata हे डिफॉल्ट data directory आहे जे installer तयार करण्याचा प्रयत्न करते.
08:11 तथापि, येथे फोल्डर तयार करण्याची परवानगी नाही.

तर, आपल्याला हे फोल्डर मॅन्युअली तयार करावे लागेल आणि आवश्यक परवानग्या द्याव्या लागतील.

08:23 terminal विंडोवर जा .

prompt वर, टाईप करा sudo space mkdir space slash opt slash lampp slash moodledata आणि Enter दाबा.

08:41 आता टाईप करा - sudo space chmod space 777 space slash opt slash lampp slash moodledata आणि Enter दाबा.
08:57 आता ब्राउजर वर परत जा आणि Next बटणवर क्लिक करा.
09:02 या नंतर database configuration पेज येते.

ड्रॉपडाउन मधून MariaDB निवडा आणि Next बटणवर क्लिक करा.

09:13 Database Host Name म्हणून localhost प्रविष्ट करा.
09:18 आता आपल्याला database name, username आणि password प्रविष्ट करावे लागेल.

हे यापूर्वी आपण 'phpMyAdmin' मध्ये तयार केले होते.

09:30 मी database name मध्ये moodle-st प्रविष्ट करेल.
09:36 नंतर database username मध्ये moodle-st प्रविष्ट करेल.
09:41 आणि माझ्या database password मध्ये moodle-st.
09:46 Table Prefix आणि इतर फिल्ड्स त्याप्रमाणे सोडून द्या आणि Next वर क्लिक करा.
09:54 आपण terms and conditions पेज पाहू शकतो.
09:59 हि ती पायरी आहे जिथे आपल्याला परवाना करार वाचावे लागेल आणि त्यासाठी सहमत आहे.

टेक्स्ट वाचा आणि नंतर Continue वर क्लिक करा.

10:10 आपण पुढे Server Checks पाहू शकतो.

मेसेज पाहायण्यासाठी खाली स्क्रोल करा Your server environment meets all minimum requirements.

10:23 दर्शविल्याप्रमाणे तुम्हाला इतर एरर्स मिळू शकतातः

निराकरण साठी या ट्युटोरिअलचे Additional reading material लिंक पहा.

10:33 Continue वर क्लिक करा.
10:36 आपल्या इंटरनेट गतीच्या आधारावर या स्टेपसाठी काही वेळ लागू शकतो.

जर तुम्ही पेज रिफ्रेश केले तर आपल्याला एक एरर मेसेज मिळू शकेल Site is being upgraded, please retry later.

10:50 त्या बाबतीत, कृपया काही वेळानंतर रीफ्रेश करा.
10:54 इंस्टॉलेशनकरिता आपल्याला सक्सेस मेसेज (यश संदेश) मिळाल्यावर Continue वर क्लिक करा.
11:00 पुढील पेज administrator configuration साठी आहे.
11:05 Moodle Administrative पेजसाठी तुम्हाला पाहिजे असलेले username प्रविष्ट करा. मी username मध्ये admin प्रविष्ट करेल.
11:15 आता Moodle Administrator साठी पासवर्ड प्रविष्ट करा.

येथे दर्शविल्याप्रमाणे दिलेल्या पासवर्डसाठी या नियमांचे पालन करावे.

11:26 पासवर्ड प्रविष्ट करण्यासाठी, Click to enter text लिंकवर क्लिक करा.
11:32 मी माझा admin password म्हणून Spokentutorial1@ टाईप करेल. पासवर्ड उघडण्यासाठी Unmask आयकॉनवर क्लिक करा.
11:43 भविष्यातील वापरासाठी आपण तयार केलेले username and password लक्षात ठेवा.
11:49 Email address एक अनिवार्य फील्ड आहे.

मी येथे priyankaspokentutorial@gmail.com प्रविष्ट करेल.

11:59 Select a country ड्रॉपडाउन मध्ये, India निवडा.

timezone मध्ये Asia/Kolkata निवडा.

12:08 उर्वरित फील्ड त्यांच्या डिफॉल्ट व्हॅल्यूज सह सोडू.
12:13 खाली स्क्रोल करा आणि Update Profile बटणवर क्लिक करा.
12:18 कृपया लक्षात घ्या की Moodle हा एक संसाधन वापरणारा सॉफ्टवेअर आहे.

प्रत्येक स्टेप पूर्ण होण्यास वेळ लागेल.

12:27 पुढील पेज लोड होण्याची प्रतीक्षा करा आणि पेज बंद किंवा रीफ्रेश करू नका.
12:34 पुढील स्क्रीन Front page settings साठी आहे.

जेव्हा लोक आपल्या moodle site ला भेट देतात तेव्हा ते हे पेज पहातील.

12:45 Full Site Name मध्ये Digital India LMS प्रविष्ट करा.
12:50 Short name for site मध्ये पुन्हा Digital India LMS प्रविष्ट करा.

नेव्हिगेशन बारमध्ये moodle site चे नाव म्हणून हे दिसेल.

13:03 आतासाठी Front Page Summary रिक्त म्हणून सोडू.

timezone मध्ये Asia/Kolkata निवडा.

13:11 पुढील ड्रॉपडाउन Self Registration आहे.

जर Self Registration सक्षम असेल तर नवीन यूजर्स स्वतःच आपली नोंदणी करु शकतात.

13:23 ड्रॉपडाउन मधून Disable निवडा.

पुढील no-reply address टेक्स्ट बॉक्स आहे.

13:31 या फील्डमधील डीफॉल्ट व्हॅल्यू noreply@localhost आहे.

हे एक वैध ईमेल आयडी नसल्यामुळे ते noreply@localhost.com वर बदला.

13:46 जर Moodle कडे कोणतेही ई-मेल आय डी दाखवण्यासाठी नसेल तर ही ई-मेल आय डी From ऍड्रेसवर दाखवेल.
13:55 उदाहरणासाठी, जर मला माझ्या ऍड्रेस ला private ठेवायचे असेल ,तर जे पण मेल माझ्या कडून जातील ते ह्या ई-मेल आय डी मधून जातील.

शेवटी, Save Changes बटणवर क्लिक करा.

14:10 आपण आता Moodle वापरण्यास तयार आहोत.

आपण येथे नवीन साइटचे पुढील पेज पाहू शकता.

14:17 यासह आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात.
14:23 या ट्युटोरिअलमध्ये, आपण शिकलो: moodle.org मधून Moodle डाउनलोड करणे आणि लोकल सर्वर वर Moodle इन्स्टॉल करणे.
14:33 खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते.

कृपया ते डाउनलोड करून पहा.

14:41 स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.

14:51 या Spoken Tutorial संदर्भात तुम्हाला काही प्रश्न आहेत का?

कृपया या साईटला भेट द्या. http://forums.spoken-tutorial.org'

15:00 तुम्हाला ज्या ठिकाणी प्रश्न पडला आहे ते मिनिट आणि सेकंद निवडा.

तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा. आमच्या टीम मधील सदस्य याचे उत्तर देतील.

15:10 स्पोकन ट्युटोरियल फोरम या पाठाशी संबंधित प्रश्नांसाठी बनवली आहे.
15:15 कृपया पाठाशी संबंधित नसलेले किंवा जनरल प्रश्न यावर टाकू नयेत.
15:21 यामुळे गोंधळ टाळण्यास मदत होईल. फारशी अव्यवस्था नसल्यास ही चर्चा शैक्षणिक सामग्री म्हणून वापरता येईल.
15:31 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India. यांच्याकडून मिळालेले आहे. या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.
15:45 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते.

सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana