Moodle-Learning-Management-System/C2/Getting-Ready-for-Moodle-Installation/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | Getting ready for Moodle installation वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:07 | या ट्युटोरिअलमध्ये आपण Moodle इन्स्टॉल करण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींबद्दल जाणून घेऊ. |
00:14 | आपण हे देखील शिकू लोकलहोस्ट वर पॅकेजेस तपासणे आणि डेटाबेस सेटअप करणे. |
00:22 | हा ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे.
Ubuntu Linux OS 16.04 |
00:30 | XAMPP 5.6.30 मधून प्राप्त Apache, MariaDB आणि PHP आणि Firefox वेब ब्राउजर. |
00:42 | तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही ब्राउजर वापरू शकता. |
00:46 | Moodle 3.3 इन्स्टॉल करण्यासाठी, तुमच्या मशीनमध्ये दिलेले सपोर्ट असले पाहिजे. |
00:52 | Apache 2.x + (किंवा उच्च व्हर्जन)
MariaDB 5.5.30 +(किंवा कोणतेही उच्च व्हर्जन)आणि PHP 5.4.4 +(किंवा कोणतेही उच्च व्हर्जन) |
01:08 | जर तुमच्याकडे वरील जुने व्हर्जन असेल, तर पुढे जाण्यापूर्वी हे अनइन्स्टॉल करा. |
01:16 | MariaDB हा सर्वात वेगाने वाढणारा ओपन सोर्स डेटाबेस आहे. |
01:21 | हे MySQL डेटाबेस साठी एक पर्याय आहे. |
01:26 | वेब सर्वर वितरण तुम्हाला Apache, MariaDB आणि PHP एकत्रित देते. |
01:34 | तुम्ही हे वेगेळे इन्स्टॉल करू शकता किंवा XAMPP, WAMPP किंवा LAMPP सारखे वेब सर्वर वितरण वापरून करू शकता. |
01:44 | मी आधीच माझ्या मशीनमध्ये XAMPP इन्स्टॉल केले आहे. |
01:49 | सर्वप्रथम, आपल्याला आपल्या मशीनवर XAMPP कार्य करत आहे कि नाही ते तपासले पाहिजे. |
01:54 | वेब ब्राउजरमध्ये, टाईप करा http colon double slash 127 dot 0 dot 0 dot 1 आणि एंटर
दाबा. |
02:08 | हे Unable to connect मेसेज दाखवते. |
02:12 | याचा अर्थ XAMPP सर्विस(सेवा) चालू नाही. |
02:16 | तर आपल्याला XAMPP service सुरु करावी लागेल. |
02:20 | Ctrl + Alt + T कीज एकत्र दाबून टर्मिनल उघडू. |
02:26 | sudo space slash opt slash lampp slash lampp space start टाईप करून XAMPP सुरु करा. |
02:38 | जेव्हा ही administrative पासवर्ड विचारले जाईल प्रविष्ट करा आणि Enter करा. |
02:44 | जर आपल्याला असा मेसेज मिळाला असेल
Starting XAMPP for Linux …. XAMPP: Starting Apache...ok. XAMPP: Starting MySQL...ok. XAMPP: Starting ProFTPD...ok. तर |
02:59 | याचा अर्थ असा की आपल्या सिस्टममध्ये XAMPP इन्स्टॉल झाले आहे आणि आपण सर्विस सुरु केली आहे. |
03:05 | कृपया लक्षात घ्या XAMPP 5.6.30 हे MySQL च्या ऐवजी MariaDB चा वापर करते. |
03:13 | दोन्हीसाठी कमांड्स आणि टूल्स समान आहेत. |
03:17 | आता परत ब्राउजरवर जाऊ आणि पेज रीफ्रेश करू. |
03:21 | आपण आता XAMPP स्क्रीन पाहू शकतो. |
03:25 | तुम्हाला टर्मिनलमध्ये Command not found मेसेज मिळेल. |
03:30 | याचा अर्थ तुमच्या मशीनमध्ये XAMPP इन्स्टॉल केलेला नाही. |
03:34 | तसे असल्यास, या वेबसाईटवरील PHP and MySQL Series मधील XAMPP Installation ट्युटोरिअल पहा. |
03:42 | वरील ट्युटोरियलमध्ये दिलेल्या निर्देशांचे पालन करा आणि XAMPP चे नवीनतम व्हर्जन इन्स्टॉल करा. |
03:49 | आता टर्मिनलवर परत जाऊ. |
03:52 | आता XAMPP service सुरू करण्यास उपरोक्त स्टेप्सचे अनुसरण करा. |
03:57 | आता तुमच्या सिस्टमवर PHP चे व्हर्जन तपासू. |
04:02 | टर्मिनल वर टाईप करा sudo space slash opt slash lampp slash bin slash php space hyphen v आणि Enter दाबा. |
04:17 | जेव्हा ही administrative पासवर्ड विचारले जाईल प्रविष्ट करा आणि Enter करा. |
04:23 | माझे PHP चे व्हर्जन 5.6.30 आहे. |
04:29 | हा मेसेज सूचित करतो की PHP यशस्वीरित्या इन्स्टॉल झाला आहे. |
04:34 | जर आपल्याला 5.4.4 पेक्षा कमी व्हर्जन मिळते, तर आपण XAMPP चे नवीनतम व्हर्जन इन्स्टॉल करावे. |
04:42 | पुढे, आपल्या सिस्टिम वर MariaDB चे व्हर्जन तपासू. |
04:48 | टर्मिनल वर टाईप करा sudo space slash opt slash lampp slash bin slash mysql space hyphen v आणि Enter दाबा. |
05:03 | जेव्हा ही administrative पासवर्ड विचारले जाईल प्रविष्ट करा आणि Enter करा. |
05:08 | माझे MariaDB चे व्हर्जन 10.1.21 आहे. |
05:14 | जर आपल्याला 5.5.30 पेक्षा कमी व्हर्जन मिळते, तर आपण XAMPP चे नवीनतम व्हर्जन इन्स्टॉल करावे. |
05:23 | कृपया लक्षात ठेवा. PHP चे व्हर्जन् आणि डेटाबेस तपासण्यासाठी तुमच्या कडे XAMPP कार्यरत असावे. |
05:29 | हे देखील लक्षात घ्या की command prompt आता बदलला आहे. |
05:34 | MariaDB च्या बाहेर पडण्यासाठी backslash q टाईप करा आणि एंटर दाबा. |
05:40 | येथे दर्शविल्याप्रमाणे आपल्याला इतर एरर्स देखील मिळू शकतात. |
05:44 | तुम्हाला “An apache daemon is already running” असा मेसेज मिळेल. |
05:50 | याचा अर्थ म्हणजे स्टार्टअप स्क्रिप्ट XAMPP-Apache सुरु झाली नाही. |
05:55 | हे दर्शविते की आणखी एक Apache instance आधीच कार्यरत आहे. |
06:01 | XAMPP योग्यरित्या सुरू करण्यास, तुम्हाला प्रथम daemon थांबवावा लागेल. |
06:06 | Apache थांबवण्यासाठी ही कमांड आहे.
sudo space /etc/init.d/apache2 space stop |
06:19 | तुम्हाला MySQL daemon failed to start असा मेसेज मिळेल. |
06:25 | याचा अर्थ स्टार्टअप स्क्रिप्ट MySQL सुरु झाली नाही. |
06:30 | हे दर्शविते की आणखी एक database instance आधीच कार्यरत आहे. |
06:36 | XAMPP योग्यरित्या सुरू करण्यास, तुम्हाला प्रथम daemon थांबवावा लागेल. |
06:41 | MySQL थांबवण्यासाठी ही कमांड आहे: sudo space /etc/init.d/mysql space stop |
06:54 | सर्व एरर्सचे निराकरण करा आणि XAMPP यशस्वीरीत्या कार्यरत मिळेल. |
06:59 | नंतर तुमच्या वेब ब्राउजरवर जा आणि पेज रिफ्रेश करा. |
07:03 | जर भाषा निवडीसाठी विचारले असेल तर, English निवडा. |
07:08 | आता आपल्याला यूजर जोडण्याची गरज आहे आणि Moodle साठी database तयार करा. |
07:14 | आपण हे phpmyadmin मध्ये करू, जे MariaDB साठी ग्राफिकल यूजर इंटरफेस आहे. |
07:21 | हे XAMPP च्या इंस्टॉलेशनसह येते. |
07:25 | आपण परत ब्राउजरवर जाऊ. |
07:28 | XAMPP पेजवर, वरच्या मेनूमधील phpMyadmin वर क्लिक करा. |
07:34 | वरच्या मेनूमधील User Accounts वर क्लिक करा आणि नंतर Add User Account वर क्लिक करा. |
07:42 | उघडणार्या नवीन विंडोमध्ये, तुमच्या पसंतीचे username प्रविष्ट करा. |
07:48 | मी माझे username म्हणून moodle hyphen st टाईप करेल. |
07:53 | Host ड्रॉप-डाउन सूचीमधून, Local निवडा. |
07:57 | Password टेक्स्ट-बॉक्स मध्ये तुमच्या पसंतीचा password प्रविष्ट करा. |
08:02 | मी माझे password म्हणून moodle hyphen st टाईप करेल. |
08:07 | Re-type टेक्सटबॉक्स मध्ये समान पासवर्ड टाईप करा. |
08:12 | Authentication Plugin पर्याय असेच ठेवा. |
08:17 | आता साठी विचारलेल्या Generate Password वर कृपया क्लिक करू नका. |
08:22 | Database for user account अंतर्गत, आपण पर्याय पाहू शकतो- |
08:26 | Create database with same name and grant all privileges. |
08:31 | आपण हा पर्याय चेक करू आणि या पेजच्या तळाशी उजवीकडे Go बटणवर क्लिक करू. |
08:38 | विंडोच्या शीर्षावर आपण “You have added a new user” हा मेसेज पाहु शकतो. |
08:44 | याचा अर्थ moodle-st नावासह एक नवीन database हे moodle-st यूजरसह तयार केले गेले आहे. |
08:54 | username, password आणि database नावांची एक सूची तयार करा. |
08:59 | नंतर Moodle इन्स्टॉलेशन पूर्ण करण्यासाठी हे आवश्यक असेल. |
09:04 | कृपया लक्षात घ्याः Database चे नाव आणि username सारखेच असणे आवश्यक नाही. |
09:10 | भिन्न नावासाठी प्रथम database तयार करा आणि नंतर त्या database साठी एक यूजर तयार करा. |
09:18 | नावाच्या प्रकारासाठी, username मध्ये कोणतेही स्पेस नसावे. |
09:25 | आता आपल्याकडे XAMPP कार्यरत आहे आणि आपला database तयार आहे. |
09:29 | आता आपण Moodle इन्स्टॉल करण्यासाठी तयार आहोत. |
09:32 | पुढील ट्युटोरियलमध्ये आपण Moodle च्या इंस्टॉलेशनसह पुढे जाऊ. |
09:37 | यासह आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
09:41 | थोडक्यात. |
09:43 | या ट्युटोरिअलमध्ये आपण |
09:45 | Moodle इन्स्टॉल करण्यास आवश्यक असलेल्या बाबींबद्दल शिकलो. |
09:49 | पूर्वीची तपासणी कशी करावी
डेटाबेस कसा सेट करावा आणि युजर कसा जोडावा. |
09:57 | खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. |
10:03 | कृपया ते डाउनलोड करून पहा. |
10:06 | स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
10:11 | अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
10:15 | या Spoken Tutorial संदर्भात तुम्हाला काही प्रश्न आहेत का? |
10:18 | कृपया या http://forums.spoken-tutorial.org साईटला भेट द्या. |
10:27 | तुम्हाला ज्या ठिकाणी प्रश्न पडला आहे ते मिनिट आणि सेकंद निवडा. |
10:30 | तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा.
आमच्या टीम मधील सदस्य याचे उत्तर देतील. |
10:36 | स्पोकन ट्युटोरियल फोरम या पाठाशी संबंधित प्रश्नांसाठी बनवली आहे. |
10:41 | कृपया पाठाशी संबंधित नसलेले किंवा जनरल प्रश्न यावर टाकू नयेत. |
10:46 | यामुळे गोंधळ टाळण्यास मदत होईल. |
10:48 | फारशी अव्यवस्था नसल्यास ही चर्चा शैक्षणिक सामग्री म्हणून वापरता येईल. |
10:54 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India. यांच्याकडून मिळालेले आहे. |
11:01 | या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. |
11:06 | आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. |
11:10 | सहभागासाठी धन्यवाद. |