Moodle-Learning-Management-System/C2/Enroll-Students-and-Communicate-in-Moodle/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Moodle मध्ये Enroll Students and Communicate वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:08 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत : ज्या विद्यार्थ्यांना csv file ने course वर अपलोड केले होते अशा विद्यार्थ्यांची नोंदणी कशी करावी.
00:18 courses मध्ये groups कसे बनवणे आणि messages आणि notes विद्यार्थ्यांना कसे पाठवणे.
00:26 हा ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरणार आहे:

Ubuntu Linux OS 16.04

00:33 XAMPP 5.6.30 माध्यमातून प्राप्त Apache, MariaDB आणि PHP
00:41 'Moodle 3.3 आणि Firefox वेब ब्राऊझर

तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राऊझर वापरू शकता.

00:51 तथापि, Internet Explorer टाळले पाहिजे, कारण यामुळे काही डिसप्ले विसंगती उद्भवतात.
01:00 हे ट्युटोरिअल गृहीत धरते की, site administrator ने तुमची teacher म्हणून नोंदणी केली आहे आणि

तुम्हांला किमान एक कोर्स असाईन केला आहे.

01:11 हे देखील मानले जाते की,तुम्ही तुमच्या course साठी काही कोर्स मटेरिअल, असाईनमेट्स आणि quizzes जोडले आहेत.
01:19 नसल्यास, कृपया ह्या वेबसाईटवरील संबंधित Moodle ट्युटोरिअल्स पहा.
01:26 आपण सुरू करण्यापूर्वी, users to your Moodle site ला 5 किंवा 6 युजर्स जोडण्यासाठी कृपया तुमच्या Moodle site administrator ला विचारा.
01:36 तुम्ही हे नवीन users तुमच्या course ला नंतर जोडणार आहात. म्हणून नवीन users आपल्या मूडल साईटवर जोडले आहेत ह्याची खात्री करा.
01:47 Moodle मधील शिक्षक नवीन users सिस्टममध्ये जोडू शकत नाहीत.

site administrator द्वारे आधीपासून जोडलेले users केवळ नोंदणी करू शकतात.

01:59 ब्राऊझरवर जा आणि तुमच्या Moodle site वर teacher म्हणून लॉगिन करा.
02:06 डाव्या navigation menu मध्ये Calculus course वर क्लिक करा.
02:11 वरील उजवीकडे,gear icon वर क्लिक करा आणि नंतर More... वर क्लिक करा.
02:18 आपण Course Administration पृष्ठावर आहोत.
02:22 Users टॅबवर क्लिक करा.
02:25 Users सेक्शनमध्ये Enrolled users लिंकवर क्लिक करा.
02:30 तिथे 2 users नी ह्या course मध्ये नोंदणी केली आहे - Rebecca Raymond आणि Priya Sinha.
02:38 Rebecca Raymond चा teacher role आणि Priya Sinha चा student role आहे.
02:44 आता उजव्या तळाशी असलेल्या Enrol users बटणावर क्लिक करा.
02:49 ह्या सूचीमध्ये असे विद्यार्थी आहेत ज्यांची मी माझ्या Calculus course मध्ये नोंदणी करू इच्छिते.
02:55 Assign Roles ड्रॉपडाऊनमध्ये Student निवडा.
03:00 नंतर आपण नोंदणी करू इच्छित असलेल्या users च्या पुढील Enrol बटणावर क्लिक करा.
03:06 आता मी काही विद्यार्थ्यांची माझ्या course मध्ये नोंदणी करेन.
03:11 एकदा पूर्ण झाल्यानंतर, तळाशी उजवीकडे Finish enrolling users बटणावर क्लिक करा.
03:18 पृष्ठाच्या शीर्षावर आपण Calculus course साठी नोंदणी केलेल्या users संख्या पाहू शकतो.
03:25 पुढे, course मध्ये काही groups कसे बनवायचे ते पाहू.
03:30 हे groups group activities साठी विद्यार्थ्यांना असाईन करण्यात आपल्याला मदत करतील.
03:36 मी दोन गट तयार करेन - Explorers आणि Creators
03:42 course page वर परत जाण्यासाठी breadcrumb मध्ये Calculus वर क्लिक करा.
03:48 आणि Course Administrator पृष्ठावर पुन्हा जा.
03:52 Groups टॅब मधील Groups लिंकवर क्लिक करा.
03:56 खाली स्क्रोल करा आणि Create group बटणावर क्लिक करा.
04:01 Group name म्हणून Explorers टाईप करा.
04:05 तिथे इतर कोणतेही अनिवार्य फिल्ड्स नाहीत.
04:08 खाली स्क्रोल करा आणि Save changes बटणावर क्लिक करा.
04:12 लक्षात घ्या की Explorers हे आता groups च्या सूचीमध्ये डाव्या बाजूला पाहता येऊ शकते.
04:19 त्यापुढील संख्या शून्य दर्शविते की अद्याप त्या group मध्ये users नाहीत .

आधीच निवडले नसल्यास, Explorers निवडा.

04:30 नंतर तळाशी उजव्या बाजूला Add/remove users बटणावर क्लिक करा.
04:36 विद्यार्थ्यांच्या सूचीमधून मी Susmitha आणि Sai निवडेन.
04:42 आणि नंतर 2 कॉलम्सच्या मध्यभागी Add बटणावर क्लिक करा.
04:48 डावीकडील group Explorers मधील users ची सूची पहा.
04:54 उजवीकडे, ह्या course मध्ये नोंदणी केलेल्या इतर सर्व विद्यार्थ्यांची सूची पहा.
05:00 शिक्षकांद्वारे आणि आवश्यकतेनुसार ते ह्या group मध्ये जोडले जाऊ शकतात.
05:06 आपण जेव्हा सूचीमधून users निवडतो तेव्हा Add आणि Remove 2 सूचींमधील बटण्स, सक्षम होतात.
05:15 पृष्ठाच्या तळाशी Back to groups बटणावर क्लिक करा.
05:21 हे ट्युटोरिअल थांबवा आणि ही छोटीशी असाईनमेंट करा. Creators नावाचा एक नवीन group जोडा.
05:28 2 नवीन users त्या group ला असाईन करा

पूर्ण झाल्यानंतर ट्युटोरिअल पुन्हा सुरू करा.

05:35 आता आपण ह्यासारखी स्क्रीन पाहण्यास सक्षम असाल.
05:40 लक्षात घ्या, Roles, Groups आणि Enrolment Methods कडे आयकॉन्स आहेत.
05:48 त्यांचे कार्य समजून घेण्यासाठी प्रत्येक icons वर तुमचा माऊस फिरवा.
05:55 लक्षात ठेवा की : नोंदणी केलेला विद्यार्थी एका पेक्षा जास्त group शी संबंधित असू शकतो.
06:02 आता पाहू की, आपण विद्यार्थ्यांना message कसा पाठवू शकतो.
06:07 डाव्या नेव्हिगेशन बारमधील Participants लिंकवर क्लिक करा.
06:12 हे, course मधील सर्व enrolled users ची सूची त्यांना नियुक्त केलेल्या roles सह दर्शवेल.
06:19 डीफॉल्टपणे, Moodle Participants पृष्ठ केवळ 20 विद्यार्थी दर्शवतो.
06:25 जर तुमच्याकडे 20 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत तर सर्व विद्यार्थी पाहण्यासाठी Show all वर क्लिक करणे आवश्यक आहे.

लिंक आता दिसत नाही कारण माझ्याकडे 20 पेक्षा जास्त विद्यार्थी नाहीत.

06:38 users सूचीच्या वर काही फिल्टर्स दर्शविले आहेत. users च्या योग्य सेटची निवड करण्यात मदत करण्यासाठी त्यांचा वापर करा.
06:46 मी Current role ड्रॉपडाऊनमध्ये Student निवडेन.
06:51 ज्यांना users असाईन केले आहे त्यांना हे केवळ users दर्शविण्याकरिता सूची फिल्टर करेल.
06:58 सर्व विद्यार्थी निवडण्यासाठी पृष्ठाच्या तळाशी Select all बटणावर क्लिक करा.
07:04 नंतर With selected users ड्रॉपडाऊनमध्ये Send a message निवडा.
07:11 हे सर्व निवडलेल्या students साठी एक कॉमन message पाठवेल.
07:16 ट्युटोरिअल थांबवा आणि इथे Message body मध्ये दर्शविल्याप्रमाणे message टाईप करा.
07:22 नंतर, पाठविण्यापूर्वी message चे पूर्वावलोकन करण्यासाठी तळाशी, Preview बटणावर क्लिक करा.
07:29 आवश्यक असल्यास, Update बटणावर क्लिक करून तुम्ही messageदेखील अपडेट करू शकता.
07:35 message पाठविण्यासाठी Send message बटणावर क्लिक करा.
07:40 participants lists वर परत जाण्यासाठी तुम्हांला एक पुष्टीकरण संदेश आणि एक लिंक दिसेल.
07:46 Back to participants list वर क्लिक करा.
07:50 With selected users ड्रॉपडाऊनवर क्लिक करा. notes पाठविण्यासाठी खाजगी आणि सामान्य दोन्ही पर्याय लक्षात घ्या.
08:00 कोणतेही 2 users निवडू.
08:03 With selected users ड्रॉपडाऊनमधून Add a new note निवडा.
08:09 एका user च्या Content टेक्स्ट एरियामध्ये, दर्शविल्याप्रमाणे मी note टाईप करेन.
08:15 Content टेक्स्ट एरियामध्ये अन्य user च्या पुढे, इथे दर्शविल्याप्रमाणे मी note टाईप करेन.
08:22 उजवीकडे Context ड्रॉपडाऊन पहा.
08:26 note चे Context कोणते users note पाहू शकतात ते निश्चित करते.
08:31 personal note केवळ शिक्षक आणि विद्यार्थ्यांना दिसेल आणि विद्यार्थी पाठवत असलेला.
08:38 course note ह्या course च्या इतर शिक्षकांना दृश्यमान असेल.
08:44 site note सर्व 'courses मधील सर्व शिक्षकांना दृश्यमान असेल.
08:50 शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील संपर्काविषयी बऱ्याच संस्थांचे स्वतःचे नियम असतात.
08:57 ह्या गाईडलाईन्सवर आधारित तुम्ही Context ठरवू शकता.
09:02 मी Context ला course राहू देईन.
09:06 पूर्ण झाल्यावर Save changes बटणावर क्लिक करा.
09:10 ह्या सह आपण अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात.
09:16 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो : course मध्ये users ची नोंदणी कशी करावी.
09:22 course मध्ये groups कसा तयार करणे आणि विद्यार्थ्यांना messages आणि notes कसे पाठवणे.
09:29 आपल्यासाठी येथे एक छोटीशी असाईनमेंट आहे.

Calculus कोर्सला Moodle site admin ने आधी तयार केलेल्या सर्व users नोंदणी करा.

09:40 नवीन विद्यार्थी विद्यमान groups मध्ये जोडा आणि त्यांना welcome message पाठवा.

मग विद्यार्थ्यांना notes पाठवा.

09:50 अधिक माहितीसाठी ह्या ट्युटोरिअलच्या Assignment लिंकचा संदर्भ घ्या.
09:55 खालील लिंकवरील व्हिडिओ Spoken Tutorial प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाऊनलोड करा आणि पहा.
10:04 Spoken Tutorial प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालविते आणि प्रमाणपत्र देते.अधिक माहितीसाठी कृपया आम्हांला लिहा.
10:14 कृपया ह्या फोरममध्ये आपली कालबद्ध प्रश्न पोस्ट करा.
10:19 Spoken Tutorial Project ला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of Indiaह्यांच्याकडून मिळालेले आहे. ह्या मिशनवरील अधिक माहिती दाखवलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
10:31 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते.

सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana