Linux/C2/Installing-Software-16.04/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | नमस्कार. Ubuntu Linux 16.04 ऑपरेटिंग सिस्टिममध्ये Installing Software वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत. |
00:10 | या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत, उबंटू लिनक्स 16.04 ऑपरेटिंग सिस्टिममध्ये सॉफ्टवेअर कसे इन्स्टॉल करायचे. खालील द्वारे Terminal |
00:21 | Synaptic Package Manager आणि Ubuntu Software Center |
00:27 | हा ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी Ubuntu Linux 16.04 Operating System वापरत आहे. |
00:34 | या ट्युटोरिअलसह पुढे जाण्यासाठी तुमचे Internet कनेक्ट असणे आवश्यक आहे. |
00:39 | सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला System Administrator किंवा Administrator rights असणे आवश्यक आहे. |
00:46 | Synaptic Package Manager a p t साठी ग्राफिकल प्रोग्रॅम आहे. |
00:51 | apt-get command line युटिलिटीसाठी GUI आहे. |
00:57 | डीफॉल्टनुसार सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर, उबंटू लिनक्स 16.04 मध्ये पूर्व-स्थापित होणार नाही. |
01:05 | त्यामुळे terminal द्वारे कसे इन्स्टॉल करायचे ते शिकू. |
01:10 | तुमच्या कीबोर्डवरील Ctrl, Alt आणि T कीज दाबून terminal उघडा. |
01:18 | आता terminal मध्ये टाईप करा, sudo space a p t hyphen get space install space s y n a p आणि Tab की दाबा. |
01:34 | हे सॉफ्टवेअरची सूची प्रदर्शित करेल जे s y n a p सह सुरू होते. |
01:40 | आता synaptic म्हणून शब्द पूर्ण करा.
आणि Enter दाबा. |
01:46 | तुम्हाला तुमचे administrator password प्रविष्ट करण्यास विचारले जाईल. |
01:51 | तुमचे admin password प्रविष्ट करा. |
01:54 | टर्मिनलमध्ये पासवर्ड टाईप करताना, ते आपल्याला दृश्यमान होणार नाही.
तर काळजीपूर्वक टाइप करा. |
02:02 | एंटर दाबा. |
02:04 | आता टर्मिनल पॅकेजेस इन्स्टॉल करण्यासाठीची सूची प्रदर्शित करते. |
02:09 | आणि फाईल्सच्या साईज बद्दलची माहिती डाउनलोड करायची आहे आणि इंस्टॉलेशन नंतर डिस्कची स्पेस |
02:17 | याची पुष्टी करण्यासाठी Y दाबा. |
02:19 | एंटर दाबा. |
02:22 | इंस्टॉलेशन आता सुरु होते. आपल्या इंटरनेटच्या वेगानुसार, यास समाप्त होण्यासाठी काही वेळ लागू शकतो. |
02:31 | आता आपण Synaptic Package Manager यशस्वीरित्या इन्स्टॉल केले आहे. |
02:36 | आता terminal बंद करू. |
02:39 | इंस्टॉलेशनची पुष्टी करण्यासाठी, Dash home वर जा. search bar मध्ये, टाईप करा synaptic. |
02:46 | आपण सर्च रिजल्ट मध्ये (शोध परिणामात) Synaptic Package Manager icon पाहू शकतो. |
02:51 | आता Synaptic Package Manager वापरून सॉफ्टवेअर कसे इन्स्टॉल करायचे ते शिकू. |
02:57 | Synaptic Package Manager icon वर क्लिक करा. |
03:01 | येथे Authentication डायलॉग बॉक्स password साठी विचारत आहे. |
03:06 | admin password टाईप करा आणि Enter दाबा. |
03:10 | जेव्हा आपण पहिल्यांदा 'सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर' वापरतो, एक परिचित डायलॉग बॉक्स दिसेल. |
03:17 | या डायलॉग बॉक्समध्ये 'सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर' कसे वापरावे याविषयी माहिती आहे. |
03:23 | हा डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी Close बटणावर क्लिक करा. |
03:27 | सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजरमधे Proxy आणि Repository कॉन्फिगर करू. |
03:33 | आपल्याला application किंवा package स्थापित करण्यापूर्वी हे करावे लागेल. |
03:38 | Settings वर जा आणि Preferences वर क्लिक करा. |
03:42 | Preferences विंडोमधे अनेक टॅब्ज स्क्रीनवर दिसतील. |
03:48 | Proxy settings कॉन्फिगर करण्यासाठी Network वर क्लिक करा. |
03:52 | Proxy Server अंतर्गत दोन पर्याय आहेत - Direct Connection आणि Manual Proxy. |
04:00 | मी Direct Connection वापरणार आहे.
तुम्ही तुमच्या आवडीनुसार पर्याय निवडू शकता. |
04:06 | विंडो बंद करण्यासाठी तळाशी OK बटणावर क्लिक करा. |
04:11 | पुन्हा एकदा, Setting वर जा आणि Repositories वर क्लिक करा. |
04:16 | Software & Updates विंडो स्क्रीन वर दिसेल. |
04:20 | Ubuntu software डाउनलोड करण्याचे अनेक स्रोत आहेत. |
04:24 | Download From या ड्रॉप-डाऊन मेनूवर क्लिक करा आणि repositories ची सूची पाहण्यासाठी माऊस बटण दाबून ठेवा. |
04:31 | Other जगभरातील servers ची सूची दर्शवते. |
04:36 | ही विंडो बंद करण्यासाठी Cancel बटणावर क्लिक करा. |
04:41 | मी येथे दर्शविल्याप्रमाणे Server for India वापरत आहे. |
04:45 | Software Sources विंडो बंद करण्यासाठी Close बटणावर क्लिक करा. |
04:50 | जर तुम्ही सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर पहिल्यांदा वापरत असाल, तर तुम्हाला packages रीलोड करावी लागतील. |
04:57 | असे करण्यासाठी, टूलबार वरील Reload बटणावर क्लिक करा. |
05:02 | यासाठी काही सेकंद लागू शकतात. |
05:05 | येथे पहा. आपल्याला Internet द्वारे packages स्थलांतरीत होतांना आणि अपडेट होतांना दिसतील. |
05:13 | मी आता उदाहरण म्हणून VLC player इन्स्टॉल करत आहे. |
05:18 | टूलबारवर असलेल्या Search field वर जाऊया. |
05:23 | Search डायलॉग बॉक्समध्ये, vlc टाईप करा आणि नंतर Search बटणावर क्लिक करा. |
05:29 | येथे आपण सूचीबद्ध केलेल्या सर्व VLC packages पाहू शकतो. |
05:34 | VLC package निवडण्यासाठी, चेक बॉक्सवर राईट क्लिक करा.
आणि मेनूबारमधून Mark for installation हा पर्याय निवडा. |
05:45 | repository packages ची सर्व सूची दाखवणारा डायलॉग बॉक्स दिसेल. |
05:51 | सर्व dependencies packages आपोआप मार्क होण्यासाठी Mark बटणावर क्लिक करा. |
05:57 | टूलबारवर जाऊन Apply बटणावर क्लिक करा. |
06:01 | एक Summary विंडो दिसेल जे 'packages चे विवरण दाखवते. |
06:07 | इंस्टॉलेशन सुरु करण्यासाठी तळाशी Apply बटणावर क्लिक करा. |
06:12 | इंस्टॉलेशनची प्रक्रिया काही वेळ घेईल. |
06:16 | हे इन्स्टॉल केल्या जाणाऱ्या packages च्या संख्या आणि आकारावर अवलंबून असते. |
06:21 | इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यावरच Applying Changes विंडो बंद होईल. |
06:27 | Synaptic Package Manager विंडो बंद करा. |
06:31 | आता आपण VLC player यशस्वीरीत्या इन्स्टॉल झाले आहे का हे तपासू. |
06:37 | Dash home वर जा. |
06:39 | search bar मध्ये टाईप करा vlc. |
06:42 | आपण प्रदर्शित सूचीमध्ये VLC icon पाहू शकतो.
ते उघडण्यासाठी त्यावर क्लिक करा. |
06:49 | त्याचप्रमाणे, Synaptic Package Manager वापरून आपण इतर applications इन्स्टॉल करू शकतो. |
06:56 | पुढे आपण Ubuntu Software Center द्वारे सॉफ्टवेअर कसे इन्स्टॉल करावे ते शिकू. |
07:02 | Ubuntu Software Centre हे एप्लिकेशन आहे जे आपल्याला Ubuntu Linux OS वर सॉफ्टवेअर व्यवस्थापित करण्यास परवानगी देते. |
07:10 | तुम्ही याचा वापर सॉफ्टवेअर शोधण्यास, डाउनलोड, इन्स्टॉल, अपडेट किंवा अनइन्स्टॉल करण्यास करू शकता. |
07:17 | तुम्ही ते वापरण्यापूर्वी software बद्दल माहिती देखील देते. |
07:23 | Ubuntu Software Center उघडण्यासाठी, launcher वर जा. |
07:27 | Ubuntu Software आयकॉनवर क्लिक करा. |
07:31 | Ubuntu Software Centre विंडो दिसेल. |
07:35 | शीर्षस्थानी, आपण 3 टॅब पाहू शकतो - All, Installed आणि Updates |
07:42 | All टॅबवर क्लिक करा. |
07:44 | वरती आपण search बार पाहू शकतो. |
07:47 | हे आपल्याला उपलब्ध software शोधण्यास मदत करेल. |
07:51 | आता आपण Inkscape सॉफ्टवेअर इन्स्टॉल करूया. |
07:55 | search bar मध्ये टाईप करा inkscape. |
07:59 | Inkscape बद्दलची थोडी माहिती प्रदर्शित केली आहे. |
08:03 | आता उजव्या कोपऱ्यात Install बटणावर क्लिक करा. |
08:07 | Authentication डायलॉग बॉक्स दिसेल. |
08:10 | तुमचा admin password प्रविष्ट करा. आणि नंतर Authenticate बटणावर क्लिक करा. |
08:16 | प्रोग्रेस(प्रगती) बार सूचित करते कि Inkscape इन्स्टॉल होत आहे. |
08:21 | इंस्टॉलेशन होण्यास काही वेळ लागेल हे इन्स्टॉल केल्या जाणाऱ्या packages च्या संख्या आणि आकारावर अवलंबून असते. |
08:28 | वरती Installed टॅबमध्ये प्रोग्रेस (प्रगती) देखील दर्शविली आहे.
त्यावर क्लिक करा. |
08:35 | कोणतेही इंस्टॉलेशन होत असतांना तुम्ही इतर applications ऍक्सेस करू शकता. |
08:41 | Inkscape शब्दावर क्लिक करा. |
08:44 | हे Inkscape बद्दल माहिती प्रदर्शित करेल. |
08:48 | एकदा Inkscape इन्स्टॉल झाले कि, आपण त्यापुढील दोन बटणे Remove आणि Launch पाहू शकता. |
08:55 | जर तुम्हाला सॉफ्टवेअर अनइंस्टॉल करायचे असेल, तर Remove बटणावर क्लिक करा. |
09:00 | application लाँच करण्यासाठी, Launch बटणावर क्लिक करा.
मी त्यावर क्लिक करते. |
09:06 | हे Inkscape एप्लिकेशन लाँच करेल. |
09:10 | Ubuntu Software Center वर परत जा.
वरती डाव्या बाजूला असलेल्या बॅक एरो बटणावर क्लिक करा, आणि मुख्य स्क्रीनवर परत या. |
09:18 | आता Updates टॅबवर क्लिक करा . |
09:21 | आपण पाहू शकतो कि ते म्हणते कि Software is up to date आहे. |
09:25 | वरती डाव्या बाजूला refresh आयकॉनवर क्लिक करा.
हे कोणत्याही नवीन अपडेट्ससाठी तपासणी करेल. |
09:31 | आता आपल्याला OS updates मिळाले आहेत. |
09:34 | तपशील पाहण्यासाठी त्यावर क्लिक करा. मी हे बंद करते. |
09:39 | जर तुम्हाला हे अपडेट इन्स्टॉल करायची इच्छा असेल, तर Install बटणावर क्लिक करा.
नाही तर हे वगळा. |
09:46 | आपण या ट्युटोरिअल च्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात |
09:52 | या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो, उबंटू लिनक्स 16.04 ऑपरेटिंग सिस्टिममध्ये सॉफ्टवेअर कसे इन्स्टॉल करायचे. खालील द्वारे Terminal |
10:02 | Synaptic Package Manager आणि Ubuntu Software Center |
10:07 | खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा. |
10:15 | स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
10:24 | अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
10:28 | कृपया या फोरममध्ये आपले कालबद्ध प्रश्न पोस्ट करा. |
10:32 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. |
10:44 | स्पोकन ट्युटोरियल टीमद्वारे या ट्यूटोरियलसाठी स्क्रिप्टचे योगदान केले गेले आहे.
आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद. |