Linux/C2/File-Attributes/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:00 | Linux मधील File Attributeच्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:05 | ह्या ट्युटोरियलची पूर्वतयारी म्हणून example1 example2 example3 example4 example5 आणि testchown नामक रिकाम्या फाईल्स तयार करा. |
00:18 | तसेचtest_chown आणि directory1 नामक रिकाम्या डिरेक्टरीज देखील बनवा. |
00:25 | File Attribute ही फाईल संबंधीची विशिष्ठ माहिती असते जिला Metadata असेही म्हणतात. |
00:33 | File Attributes मधे फाईलची मालकी, फाईलचा प्रकार, ती वापरण्याच्या permissions इत्यादि गोष्टींचा समावेश होतो. |
00:45 | chown कमांडचा वापर फाईल किंवा डिरेक्टरीची ओनरशिप बदलण्यासाठी होतो. ही एक admin कमांड असून केवळ root user फाईल किंवा डिरेक्टरीचा ओनर बदलू शकतो. |
01:00 | chown space options space ownername space filename or directoryname हा chown कमांडचा सिंटॅक्स आहे. |
01:13 | आपण chown कमांड सोबत पुढील पर्याय देऊ शकतो. |
01:18 | hyphen R: चालू डिरेक्टरी मध्ये असलेल्या सबडिरेक्टरीज मधील फाईल्सची परमिशन बदलण्यासाठी. |
01:28 | hyphen c: प्रत्येक फाईलची परमिशन बदलण्यासाठी. |
01:33 | hyphen f: chown कमांडने दिलेले Error messagesथांबवण्यासाठी |
01:37 | आता आपण काही उदाहरणे बघूया. |
01:40 | त्यासाठी टर्मिनलवर जा. आपण जिथे रिकाम्या फाईल्स आणि फोल्डर्स बनवले आहेत त्या डिरेक्टरीमध्ये जाऊ या. त्यासाठी cd space Desktop slash 'file attribute' टाईप करून एंटर दाबा. |
01:56 | आता ls space -l space testchown that is t-e-s-t-c-h-o-w-n असे टाईप करून एंटर दाबा. |
02:11 | येथे आपल्याला दिसेल की testchown या फाईलचा ओनर शाहिद आहे. |
02:18 | फाईलचा ओनर बदलण्यासाठी sudo space c-h own space that is a-n-u-s-h-a anusha space testchown that is t-e-s-t-c-h-o-w-n टाईप करा आणि एंटर दाबा. |
02:36 | sudo पासवर्ड टाईप करून पुन्हा एंटर दाबा. |
02:44 | आता ls space -l space t-e-s-t-c-h-o-w-n टाईप करा आणि एंटर दाबा. येथे आपल्याला दिसेल की फाईलची नवी ओनर अनुषा आहे. |
03:03 | आता आपण डिरेक्टरीचा ओनर कसा बदलायचा ते पाहू. |
03:07 | ls -l ही कमांड टाईप करून एंटर दाबा. test_chown ह्या डिरेक्टरीचा ओनर शाहिद आहे. हे आपल्याला दिसत आहे. |
03:21 | डिरेक्टरीचा ओनर बदलण्यासाठी हे टाईप करा. |
03:26 | sudo space chown space minus capital R space a-n-u-s-h-a anusha spacetest_chown जे डिरेक्टरीचे नाव आहे आणि एंटर दाबा. |
03:44 | गरज भासण्यास sudo पासवर्ड टाईप करा आणि पुन्हा एंटर करा. |
03:49 | आपल्या सोईसाठी आपण Ctrl आणि L च्या सहाय्याने स्क्रीन क्लियर करून घेऊ. आता ls space -l टाईप करून एंटर दाबा. येथे आपल्याला दिसेल की अनुषा ही ह्या डिरेक्टरीची नवी ओनर आहे. |
04:06 | chmod कमांडने एक किंवा अधिक फाईल्सचा access mode बदलता येतो. |
04:13 | chmod कमांडचा syntax पुढीलप्रमाणे आहे. chmod space [options] space mode space filename. आपण chmod कमांड सोबत पुढील पर्याय देऊ शकतो. |
04:29 | hyphen c: बदल केलेल्या फाईल्सची माहिती छापण्यासाठी. |
04:34 | hyphen f: chmod, कमांडने बदल न केलेल्या फाईल्सची नावे न देण्यासाठी. |
04:41 | access किंवा परवानगीचे हे प्रकार आहेत. |
04:44 | r: read म्हणजे वाचणे
w: write म्हणजे लिहिणे x: Execute म्हणजे कार्यान्वित करणे s: user किंवा ग्रुप ID सेट करणे |
04:54 | तीन आकडी Octal Numbers वापरूनही आपण परमिशन बदलू शकतो. |
05:00 | पहिला अंक ओनरची परमिशन, दुसरा ग्रुपसाठी व तिसरा अंक इतरांसाठीची परमिशन दाखवतो. |
05:09 | परमिशनचा अंक पुढील Octal Numbers ची बेरीज करून तयार होतो.
read म्हणजे वाचण्यासाठी 4 write म्हणजे लिहिण्यासाठी 2 व Execute करण्यासाठी 1 |
05:20 | आता आपण chmod ची काही उदाहरणे बघू. टर्मिनलवर जाऊन example1 फाईलला execute-by-user परमिशन देणारी कमांड टाईप करा. |
05:30 | त्यापूर्वी आपण Ctrl L च्या सहाय्याने स्क्रीन पुन्हा क्लियर करून घ्या. |
05:36 | आता chmod space u+x space example1 असे टाईप करून एंटर दाबा. |
05:49 | आता झालेले बदल बघण्यासाठी ls space hyphen l space example1 असे टाईप करा.आणि एंटर दाबा. |
06:01 | example1 फाईलसाठी owner ला read/write/execute, groupला read/execute आणि इतरांना execute-only परमिशन देऊ या. |
06:15 | आता chmod space 751 space example1 ही कमांड टाईप करून एंटर दाबा. |
06:26 | आता ls space hyphen l space example1 टाईप करा आणि एंटर दाबा. |
06:35 | आपल्याला असे दिसेल की example1 फाईलसाठी owner ला read/write/execute, groupला read/execute आणि इतरांना execute-only परमिशन मिळालेली आहे. |
06:52 | सर्वांसाठी example1 ह्या फाईलला read-only परमिशन देण्यासाठी chmod space =r space example1 ही कमांड टाईप करा आणि एंटर दाबा. |
07:08 | आता ls space hyphen l space example1 टाईप करा आणि एंटर दाबा. |
07:19 | येथे आपण बघू शकता की example1 ह्या फाईलला सर्वांसाठी read only परमिशन देण्यात आली आहे. |
07:30 | डिरेक्टरी Directory1 मधील सर्व फाईल्ससाठी सर्वांना read/execute परमिशन recursively बदलण्यास व owner ला जास्तीची write परवानगी देण्यासाठी कमांड टाइप करू या. |
07:44 | chmod space hyphen capital R space 755 space directory1 आणि एंटर दाबा. |
08:00 | आता झालेले बदल बघण्यासाठी ls space hyphen l टाईप करून एंटर दाबा. |
08:09 | user ला example2 ह्या फाईलची execute permission देण्यासाठी chmod space u+x space example2 ही कमांड टाईप करून एंटर दाबा. |
08:27 | आता ls space hyphen l space example2 ही कमांड टाईप करून एंटर दाबा. |
08:40 | येथे आपण बघू शकता की example2 साठी user ला execute permission दिली गेली आहे. |
08:50 | ग्रुपमध्ये example3 ह्या फाईलची write permission समाविष्ट करण्यासाठी chmod space g+w space example3 ही कमांड टाईप करून एंटर करा. |
09:10 | आणि आता ls space hyphen l space example3 टाईप करून एंटर करा. |
09:23 | येथे आपल्याला ग्रुपसाठी write permission समाविष्ट झाल्याचे दिसेल. |
09:30 | सर्वांसाठी दिलेली write permission काठून टाकण्यासाठी chmod space a-w space example3 ही कमांड टाईप करून एंटर दाबा. |
09:45 | आता ls space hyphen l space example3 टाईप करून एंटर दाबा. |
09:55 | येथे आपल्याला दिसेल की सर्वांना दिलेली write permission काढून टाकण्यात आली आहे. |
10:02 | chgrp कमांडने एक किंवा जास्त फाईल्सचा group, Newgroup मधे बदलता येतो |
10:10 | Newgroup हा एकतर group id नंबर किंवा group चे नाव असते जे slash etc slash group मध्ये उपलब्ध असते. |
10:20 | केवळ फाईलच्या ओनरला किंवा विशेष अधिकार असलेला user ग्रुप बदलू शकतो. |
10:26 | chgrp कमांडचा सिंटॅक्स chgrp space [options] space newgroup space files हा आहे. |
10:36 | आता टर्मिनलवर जाऊन chgrp या कमांडची काही उदाहरणे पाहू. ls space hyphen l space example4 टाईप करून एंटर दाबा. |
10:57 | आपण बघू शकतो की शाहीद ह्या user ला ग्रुप परमिशन आहे. |
11:03 | ग्रुप परमिशन बदलण्यासाठी sudo space chgrp space rohit space example4 टाईप करा. |
11:20 | एंटर दाबा. आवश्यक असलेला sudo पासवर्ड टाईप करा. |
11:27 | आता ls space hyphen l space example4 टाईप करा. आणि एंटर दाबा. |
11:38 | इथे आपल्याला दिसेल की group शाहीद वरून रोहितवर बदलला गेला आहे. |
11:46 | Inode number हा device ला दिलेला विशिष्ट नंबर असतो. |
11:51 | सामान्य फाईल किंवा डिरेक्टरीची माहिती आयनोड मध्ये असते. |
11:57 | सर्व फाईल्स आयनोडशी हार्ड लिंक केलेल्या असतात. |
12:00 | एखादा प्रोग्रॅम जेव्हां फाईलचे नाव refer करतो, त्यावेळी सिस्टीम प्रत्यक्षात सदर फाईलचा Inode number शोधते. |
12:12 | फाईलचा आयनोड नंबर बघण्यासाठी आपण ls space hyphen i ह्या कमांडचा उपयोग करू शकतो. |
12:19 | ls space hyphen i space example5 ही कमांड टाईप करून एंटर दाबा. |
12:29 | फाईलच्या डावीकडे लिहिलेली संख्या फाईलचा आयनोड नंबर असतो. |
12:35 | आयनोड एकावेळी निश्चित रूपात केवळ एकाच डिरेक्टरीशी जोडलेला असतो. |
12:41 | एका आयनोडला अनेक डिरेक्टरीज जोडण्यासाठी hard link वापरल्या जातात. ln कमांडने link बनवल्या जातात. |
12:52 | हार्ड लिंक बनवण्यासाठी ln कमांडचा सिंटॅक्स अशा प्रकारे आहे. |
12:57 | ln space source space link; येथे source ही एक फाईल असते. बनणारी फाईल म्हणजे लिंक. |
13:06 | आता आपण hard link ची काही उदाहरणे पाहू. |
13:10 | आपण पुन्हा एकदा स्क्रीन क्लियर करून घेऊ. आता ln space example1 space exampleln टाईप करून एंटर दाबा. |
13:25 | दोन्ही फाईल्सचा आयनोड नंबर दर्शविण्यासाठी ls space -i space example1 space exampleln टाईप करून एंटर दाबा. |
13:41 | येथे आपण पाहू शकता की दोन्ही फाईल्सचा आयनोड नंबर सारखाच आहे. exampleln ही फाईल example1 ची hard link आहे. |
13:54 | soft link, symbolic link ही एक विशेष प्रकारची फाईल असते ज्यात दुस-या फाईल किंवा डिरेक्टरीचा reference, absolute किंवा relative path च्या स्वरूपात असतो. |
14:07 | soft link बनवण्यासाठी ln कमांडचा सिंटॅक्स आहे |
14:12 | ln space -s space {target-filename} space {symbolic-filename} |
14:19 | आता आपण soft link ची काही उदाहरणे बघू या. |
14:25 | soft link बनवण्यासाठी टाईप करा ln space -s space example1 space examplesoft |
14:40 | एंटर दाबा. |
14:43 | आता आयनोड नंबर आणि दोन्ही फाईल्सची यादी दर्शविण्यासाठी टाईप करा ls space -li space example1 space examplesoft |
15:01 | एंटर दाबा. |
15:03 | येथे आपण बघू शकतो की दोन्ही फाईलस् चा आयनोड नंबर वेगवेगळा आहे. आणि examplesoft ही example1 ची soft link आहे. |
15:16 | अशा प्रकारे आपण Linux File Attribute मध्ये शिकलो की file ची permission, ownership, group बदलणे |
15:26 | तसेच आपण आयनोड soft आणि hard link बद्दलही शिकलो. |
15:31 | आपण ह्या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. |
15:35 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
15:44 | *यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
15:50 | *ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद. |