LibreOffice-Suite-Calc-6.3/C2/Working-with-Cells-in-Calc/Marathi
From Script | Spoken-Tutorial
TIME | NARRATION |
00:01 | स्पोकन ट्युटोरियलच्या Working with Cells वरील पाठात आपले स्वागत. |
00:06 | या पाठात शिकणार आहोतः |
00:09 | spreadsheet मधे numbers, text, date आणि time समाविष्ट करणे. |
00:15 | Format Cells या डायलॉग बॉक्सचा वापर करणे. |
00:19 | cells मधे नेव्हिगेट करणे आणि |
00:22 | rows आणि columns मधील आयटम्स सिलेक्ट करणे. |
00:27 | या पाठासाठी वापरत आहे-
Ubuntu Linux OS वर्जन 18.04 आणि LibreOffice Suite वर्जन 6.3.5 |
00:41 | प्रथम cells मधे data कसा भरायचा हे जाणून घेऊ. |
00:46 | Personal-Finance-Tracker.ods फाईल उघडा. |
00:52 | ही फाईल या पाठाच्या Code files लिंकमधे दिलेली आहे. |
00:59 | कृपया ही फाईल डाऊनलोड करून एक्सट्रॅक्ट करा. |
01:03 | त्या फाईलची कॉपी बनवून सरावासाठी तिचा वापर करा. |
01:08 | आता कुठल्याही रिकाम्या cell मधे टेक्स्ट टाईप करण्यासाठी त्यावर क्लिक करा. त्यात कीबोर्डच्या सहाय्याने टाईप करून
Enter दाबा. |
01:18 | डिफॉल्ट रूपात हे टेक्स्ट left-aligned आहे. |
01:22 | Formatting Bar वरील कोणत्याही एका Alignment आयकॉनवर क्लिक करून alignment बदलू शकतो. |
01:30 | आपण टाईप केलेले undo करूया. |
01:33 | undo करण्यासाठी कीबोर्डवरील Ctrl + Z कीज दाबा. |
01:39 | या spreadsheet मधे आपण column हेडिंग्ज आधीच टाईप केली होती. |
01:45 | Calc मधे आपण हेडिंग्जसाठी वेगळी style लागू करून ती इतर data पेक्षा वेगळी दाखवू शकतो. |
01:53 | त्यासाठी cell A1 वर क्लिक करा. माऊसचे डावे बटण दाबून ठेवून तो कर्सर cell G1 पर्यंत ड्रॅग करा. |
02:04 | आता माऊसचे डावे बटण सोडा. |
02:07 | आपल्याला सर्व हेडिंग्ज हायलाईट झालेली दिसतील. |
02:12 | आता menu bar मधील Styles मेनूवर क्लिक करा. |
02:16 | आपल्याला विविध heading styles दिसतील.
आपण Accent 2 पर्याय निवडू. |
02:24 | आता हेडिंग्ज अनसिलेक्ट करण्यासाठी रँडमली कोणत्याही cell वर क्लिक करा. |
02:30 | लक्षात घ्या की हेडिंग्जची बॅकग्राऊंड आता राखाडी रंगाने हायलाईट झाली आहे. |
02:36 | Items या column मधे आपण एकाखाली एक काही घटकांची नावे टाईप करणार आहोत.
येथे दाखवल्याप्रमाणे टेक्स्ट टाईप करा. |
02:47 | cell मधे संख्या टाईप करण्यासाठी cell वर क्लिक करून संख्या टाईप करा आणि
Enter दाबा. |
02:57 | प्रत्येक data-entry नंतर नेहमी Enter चे बटण दाबायचे लक्षात ठेवा. |
03:03 | ऋण संख्या टाईप करताना त्या संख्येआधी minus sign टाईप करा किंवा ती संख्या parentheses म्हणजे गोल कंसात लिहा. |
03:13 | डिफॉल्ट रूपात संख्या right-aligned असतात आणि ऋण संख्येच्या सुरूवातीला minus symbol असतो. |
03:20 | या एंट्रीज डिलिट करूया. |
03:23 | Shift की दाबून ठेऊन जे cells डिलिट करायचे आहेत त्या प्रत्येक cell वर क्लिक करून ते सिलेक्ट करा.
आता कीबोर्डवरील Delete चे बटण दाबा. |
03:36 | SN column मधे आपल्याला प्रत्येक आयटमसाठी एकाखाली एक अनुक्रमांक द्यायचे आहेत. |
03:43 | त्यासाठी cell A2 वर क्लिक करून 1, 2, 3 असे एकाखाली एक आकडे टाईप करा. |
03:53 | प्रत्येक आकडा टाईप करून झाल्यावर Enter की दाबायचे लक्षात ठेवा. |
03:58 | यानंतरच्या cells मधे अनुक्रमांक आपोआप भरले जाण्यासाठी cell A4 वर क्लिक करा. |
04:06 | त्या cell च्या उजव्या कोपऱ्यात खाली छोटा black box दिसेल त्यावर क्लिक करा. |
04:13 | cell A7 पर्यंत ड्रॅग करून माऊसचे बटण सोडा. |
04:19 | आपल्याला दिसेल की cells A5, A6 आणि A7 मधे पुढील अनुक्रमांक आपोआप टाईप झालेले आहेत. |
04:28 | आता Cost या हेडिंगखाली प्रत्येक आयटमची किंमत टाईप करणार आहोत. |
04:35 | cell C3 वर क्लिक करा आणि House rent चा खर्च म्हणून Rupees 6000.00 टाईप करा. |
04:45 | आता ही संख्या Rupee या चिन्हासहित हवी असल्यास काय करायचे? |
04:51 | Ctrl आणि Z कीज एकत्रित दाबून cell C3 मधे टाईप केलेली व्हॅल्यू काढून टाका. |
04:59 | cell C3 वर राईट क्लिक करून Format Cells हा पर्याय निवडा. |
05:05 | Format Cells चा डायलॉग बॉक्स उघडेल. |
05:09 | Numbers हा पहिला टॅब आहे. तो आधीच निवडलेला नसल्यास त्यावर क्लिक करा. |
05:16 | येथे Category खाली विविध पर्याय दिसतील. |
05:21 | Number, Percent, Currency, Date, Time आणि इतर अनेक. |
05:29 | Currency पर्याय निवडा. |
05:31 | Format च्या सूचीत जगभरातील विविध currency symbols दिसतील. |
05:39 | Format च्या ड्रॉपडाऊनमधे डिफॉल्टरूपात INR Rupee English (India) हा पर्याय निवडलेला आहे. |
05:46 | तसे नसल्यास ड्रॉपडाऊनवर क्लिक करून सूचीतून तो पर्याय निवडा. |
05:51 | Format ड्रॉप डाऊनच्या खाली आपल्या निवडीवर आधारित काही नमुने बघता येतील. |
05:58 | minus Rupee 1234 decimal zero zero हे INR Rupees English India साठी निवडलेले आहे. |
06:10 | आपण निवडलेल्या format चा छोटा प्रिव्ह्यू एरिया उजवीकडे पाहू शकतो. |
06:16 | Category या भागाखाली Options नावाचा आणखी एक भाग आहे. |
06:22 | याच्या सहाय्याने Decimal places आणि Leading zeroes ची संख्या कमी जास्त करता येते. |
06:30 | असे केल्यावर नमुन्यात आणि प्रिव्ह्यू एरियामधे हे बदल बघता येतील. |
06:37 | आपण डिफॉल्ट व्हॅल्यू तशाच ठेवणार आहोत. |
06:41 | व्हॅल्यूजमधे स्वल्पविराम समाविष्ट करण्यासाठी Thousands separator हा चेकबॉक्स चेक करा. |
06:48 | Font टॅबवर क्लिक करून font style देखील बदलू शकतो. |
06:54 | यामधे Family, Style आणि Size असे अनेक पर्याय आहेत. |
06:59 | Font Effects आणि इतर टॅब्ज तुम्ही स्वतः वापरून बघा आणि जाणून घ्या. |
07:07 | Alignment टॅबमधील पर्यायांबद्दल पुढील पाठांत जाणून घेणार आहोत. |
07:13 | उजव्या कोपऱ्यात खाली OK बटण क्लिक करा. |
07:18 | आता cell C3 मधे 6000 टाईप करून Enter दाबा. |
07:24 | लक्षात घ्या 6000 ही संख्या Rupees 6000 आणि पुढे 2 decimal places अशी दाखवली गेली आहे. |
07:34 | आता Shift की दाबून ठेवून माऊसने cells वर क्लिक करून C4 ते C7 हे cells सिलेक्ट करा. |
07:43 | CTRL की दाबून cell G2 देखील निवडा. |
07:48 | निवडलेले सर्व cells हायलाईट झालेले दिसतील. |
07:52 | हायलाईट केलेल्या कोणत्याही cells वर राईट क्लिक करून Format Cells वर क्लिक करा. |
07:59 | आपण या आधी निवडलेलेच पर्याय निवडा. |
08:03 | उजव्या कोपऱ्यात खाली असलेले OK बटण क्लिक करा. |
08:07 | cells डिसिलेक्ट करण्यासाठी spreadsheet मधील कुठल्याही cell वर क्लिक करा. |
08:13 | येथे दाखवल्याप्रमाणे सर्व आयटम्ससाठी एका खाली एक अशाप्रकारे रक्कम टाईप करा. |
08:22 | Account या हेडिंगखाली महिन्याचा पगार म्हणून 30,000 टाईप करू. |
08:29 | आता Date column वर जाऊ.
cell F2 वर क्लिक करा. |
08:36 | Calc मधे date लिहिण्यासाठी cell सिलेक्ट करा आणि येथे दाखवल्याप्रमाणे date टाईप करा. |
08:42 | येथे तारखेतील घटकांमधे forward slash वापरला आहे. |
08:47 | तसेच तारखेतील घटक hyphen च्या सहाय्याने वेगळे करू शकतो. |
08:52 | किंवा 05 June 2020 अशाप्रकारे टेक्स्ट देखील वापरू शकतो. |
08:59 | Calc विविध रूपातील तारीख ओळखू शकतो. |
09:02 | आपल्या आवश्यकतेनुसार तारखेचा फॉरमॅट कस्टमाईज सुध्दा करू शकतो. |
09:09 | त्यासाठी cell वर राईट क्लिक करून Format Cells पर्याय निवडा. |
09:16 | Numbers टॅबवर क्लिक करा.
Category या भागात खाली Date हा पर्याय निवडा. |
09:22 | Format या भागात खाली तुमच्या गरजेनुसार तारखेचे स्वरूप निवडा.
आपण 31/12/1999 हा पर्याय निवडू. |
09:36 | preview area मधे याचा प्रिव्ह्यू बघा. |
09:40 | आपण निवडलेल्या पर्यायावर आधारित Format code अपडेट होईल.
येथे हा DD, MM आणि YYYY आहे. |
09:52 | एकदा फॉरमॅट अपडेट झाला की उजवीकडे खालील OK बटणावर क्लिक करा. |
09:58 | आता काही time चे पर्याय वापरून पाहू. |
10:02 | कोणत्याही एक cell वर क्लिक करा.
येथे दाखवल्याप्रमाणे time टाईप करा. |
10:08 | आपण वेळेतील घटक colons च्या सहाय्याने वेगळे केले आहेत. |
10:12 | वेळेचा फॉरमॅट कस्टमाईज करण्यासाठी सबंधित cell वर राईट क्लिक करून Format Cells पर्याय निवडा. |
10:20 | आता वरती Numbers टॅबवर क्लिक करा. |
10:23 | Category खाली Time हा पर्याय निवडा आणि Format मधून तुमच्या पसंतीचा फॉरमॅट निवडा.
आपण 13:37:46 निवडू. |
10:35 | preview area मधे ते कसे दिसते ते बघा. |
10:39 | तसेच Format code मधे हे HH:MM:SS असे दाखवत आहे. |
10:48 | आपणFormat code मधे थेट बदल देखील करू शकतो. |
10:51 | उजवीकडे खाली OK बटणावर क्लिक करा. |
10:56 | आपल्या spreadsheet वरील टाईमच्या सर्व एंट्रीज डिलिट करू. |
11:01 | spreadsheet मधील एका cell वरून दुसऱ्या cell वर कसे नेव्हिगेट करायचे हे जाणून घेऊ. |
11:07 | एखाद्या विशिष्ट cell वर केवळ cursor च्या सहाय्याने क्लिक करून त्यावर जाऊ शकतो. |
11:13 | यामुळे आपण new cell वर जातो. |
11:17 | दोन cells एकमेकांपासून दूर असतात तेव्हा ही पध्दत सर्वात उपयुक्त ठरते. |
11:22 | विशिष्ट cell वर जाण्यासाठीची दुसरी पध्दत म्हणजे cell reference चा वापर करणे. |
11:28 | Font Name च्या खालोखाल डाव्या कोपऱ्यात असलेल्या Name Box वर क्लिक करा. |
11:35 | सध्या तिथे असलेला cell reference काढून टाकून ज्या cell वर जायचे आहे तो cell reference टाईप करा. |
11:42 | B4 टाईप करून Enter दाबा. |
11:47 | cell B4 हायलाईट झालेला दिसेल. |
11:52 | आपण कीबोर्डच्या सहाय्याने cells मधे नेव्हिगेट देखील करू शकतो. |
11:57 | row मधे पुढील cell वर जाण्यासाठी Tab चे बटण दाबा. |
12:02 | row मधे मागील cell वर जाण्यासाठी Shift + Tab दाबा. |
12:07 | column मधे पुढील cell वर जाण्यासाठी Enter दाबा . |
12:12 | column मधे मागील cell वर जाण्यासाठी Shift + Enter दाबा. |
12:17 | आता cursor च्या सहाय्याने एकमेकांना लागून असलेल्या cells ची रेंज कशी सिलेक्ट करायची ते बघू. |
12:24 | प्रथम cell वर क्लिक करा आणि left mouse button दाबून ठेवा. |
12:29 | sheet वर cursor ड्रॅग करा. |
12:32 | आपल्याला हव्या असलेल्या cells चा संच हायलाईट झाला की माऊसचे डावे बटण सोडा. |
12:38 | सिलेक्ट केलेले cells हायलाईट झालेले दिसतील. |
12:42 | आता एकमेकांना लागून असलेले अनेक columns किंवा rows कसे सिलेक्ट करायचे हे जाणून घेऊ. |
12:55 | जो पहिला column किंवा row तुम्हाला निवडायचा आहे त्यावर क्लिक करा. |
12:59 | आता Shift की दाबून ठेवा आणि जो शेवटचा column किंवा row निवडायचा आहे त्यावर क्लिक करा.
निवडलेले cells हायलाईटेड दिसतील. |
13:08 | एकमेकांना लागून नसलेले अनेक columns किंवा rows कसे सिलेक्ट करायचे ते बघू. |
13:14 | जो पहिला column किंवा row निवडायचा आहे त्यावर क्लिक करा. |
13:19 | Control चे बटण दाबून ठेवा. |
13:21 | आता त्यानंतरचे जे columns किंवा rows निवडायचे आहेत त्यावर एकेक करून क्लिक करा. |
13:29 | आपण निवडलेले cells हायलाईट झालेले दिसतील. |
13:34 | कीबोर्डवरील Ctrl + S कीज दाबून फाईल सेव्ह करा. |
13:40 | आता उजव्या कोपऱ्यात वरती X या आयकॉनवर क्लिक करून फाईल बंद करा. |
13:46 | आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
थोडक्यात, |
13:52 | या पाठात आपण शिकलोः
Calc मधे numbers, text , date आणि time समाविष्ट करणे. |
14:01 | Format Cells डायलॉग बॉक्स वापरणे. |
14:05 | cells मधे नेव्हिगेट करणे आणि |
14:09 | rows आणि columns मधील आयटम्स सिलेक्ट करणे. |
14:13 | असाईनमेंट म्हणून:
Spreadsheet-Practice.ods फाईल उघडा. |
14:19 | SN खाली 1 ते 5 अनुक्रमांक एकाखाली एक टाईप करा आणि Center Align करा. |
14:27 | सध्या आहे त्याच text format मधे Date आणि Time ही column हेडिंग्ज समाविष्ट करा. |
14:33 | त्या columns मधे काही व्हॅल्यूज भरा. |
14:37 | cells फॉरमॅट करण्यासाठी Format Cells च्या डायलॉग बॉक्समधील पर्याय वापरा. |
14:43 | data साठी Code files ही लिंक बघा. |
14:47 | फाईल सेव्ह करून बंद करा. |
14:50 | दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता. |
14:58 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालवते आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.
अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा. |
15:08 | कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा. |
15:13 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
15:19 | DesiCrew Solutions Pvt. Ltd. यांनी 2011 मधे या पाठासाठी मूळ योगदान दिले होते.
|