LibreOffice-Suite-Base/C3/Create-tables/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:00 LibreOffice Base वरील स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:04 ह्या पाठात शिकणार आहोत,
00:07 Table बनवण्याची पध्दत:
00:09 a) Creating Views द्वारे,
00:11 b)Copy method द्वारे.
00:13 Library database वर जाऊ या.
00:16 डाव्या पॅनेलवरील Tables icon वर क्लिक करा.
00:21 उजव्या पॅनेलवर आपल्याला टेबल बनवण्याच्या तीन पध्दती दिसतील.
00:26 प्रथम Create View पर्याय बघणार आहोत.
00:30 त्याआधी Views म्हणजे काय ते जाणून घेऊ.
00:36 View हे टेबलप्रमाणेच असते. पण ते डेटा संचित करत नाही.
00:43 ह्याची व्याख्या Query Expression अशी आहे. ह्यातील डेटा टेबल्स किंवा इतर Views मधून आलेला असतो.
00:54 त्यामुळे View बघताना टेबलप्रमाणेच डेटा असलेले columns आणि rows दिसतात.
01:00 Viewsचा वापर डेटाबेसला limited access देण्यासाठी होतो.
01:06 किंवा डेटाबेसच्या टेबलमधील columns names, structure गोपनीय ठेवण्यासाठी होतो.
01:13 उदाहरणार्थ आपण लायब्ररीच्या सर्व सभासदांची सूची दाखवणारा simple view बनवू शकतो.
01:21 गोपनीयता ठेवण्यासाठी त्यांचे फोन नंबर्स काढून टाकू शकतो.
01:27 येथे View चे मूळ टेबल Members असेल.
01:32 Library database चे इतर युजर्स

Members tableच्या ऐवजी View एक्सेस करू शकतात.

01:40 युजर्स केवळ सदस्याची नावे पाहू शकतील. फोन नंबर्स नाही.
01:46 हा View बनवण्यासाठी बेसच्या मुख्य विंडोवर जाऊ.
01:53 उजव्या पॅनेलवरील Create View वर क्लिक करा.
01:58 View Design नामक नवी विंडो आणि Add tables नामक popup window दिसेल.
02:06 Members वर क्लिक करा.
02:09 ही popup window बंद करा.
02:12 आपण View design window मध्ये आहोत.
02:16 MemberId आणि Name fields वर डबल क्लिक करा.
02:21 Id field समाविष्ट करणे नेहमीच उपयोगी असते.
02:25 ह्यामुळे View इतर संबंधित टेबलशी जोडणे सोपे होते. उदाहरणार्थ BooksIssued Table.
02:34 आपण functions, criteria समाविष्ट करू शकतो, sort ही करू शकतो.
02:40 सदस्यांची नावे चढत्या क्रमाने sort करू.
02:45 तळातील Name column खालील Sort row मधील रिकाम्या सेलवर क्लिक करा.
02:54 ascending वर क्लिक करा.
02:58 पहिला View सेव्ह करू.
03:01 ह्या Viewला Members Name Only असे नाव देऊ.
03:10 Ok वर क्लिक करा.
03:14 संबंधित डेटा बघण्यासाठी सर्वात वरील एडिट मेनूवर क्लिक करा.
03:22 खाली असलेल्या Run Query वर क्लिक करा.
03:27 वरील नव्या भागात चढत्या क्रमाने लायब्ररीच्या सर्व सभासदांची सूची दिसेल.
03:36 येथे कोणताही फोन नंबर दिसत नाही.
03:40 हा simple view आहे.
03:43 आपण आवश्यकतेप्रमाणे views बनवू शकतो.
03:48 पुढे जाण्यापूर्वी एक assignment.
03:53 Members ना Issue झालेल्या आणि checked in न झालेल्या पुस्तकांसाठी View बनवा.
04:01 Viewमध्ये Book Titles, Member Names, Issue Date आणि Return Date ही फिल्डस समाविष्ट करा.
04:12 Viewला List of Books not checked in हे नाव द्या.
04:20 copy method द्वारे टेबल बनवू.
04:25 टेबलच्या रचनांमध्ये साधर्म्य असेल तर ही टेबल बनवण्याची सोपी पध्दत आहे.
04:33 लायब्ररीमध्ये DVDs आणि CDs आहेत असे समजू.
04:39 संबंधित डेटा Media ह्या नव्या टेबलमध्ये संचित करू.
04:44 उदाहरणार्थ CD किंवा DVD ला title आणि publish-year आहे.
04:51 audio आणि video मधील फरक समजण्यासाठी MediaType नावाचे field समाविष्ट करू.
05:00 Books table मध्ये अशाच प्रकारची फिल्डस असल्यामुळे हे आपण copy-paste करू शकतो.
05:08 नंतर फिल्डस आणि टेबलचे नाव बदलू शकतो.
05:14 कसे ते पाहू.
05:16 मुख्यBase window वर जा.
05:19 Books table वर राईट क्लिक करा.
05:23 copy option वर क्लिक करा.
05:28 राईट क्लिक करा.
05:31 paste आणि Paste Special ह्यासारखे अनेक पर्याय दिसतील.
05:39 आपण specific format मध्ये co py आणि paste करू.
05:44 Formatted text, HTML किंवा database table हे काही Formats आहेत.
05:51 येथे database table पर्याय निवडू.
05:55 right click करून मेनूतूनही पेस्ट करू शकतो.
05:59 हा wizard उघडेल. ह्या विंडोमध्ये,
06:03 टेबलचे नाव बदलून Media टाईप करा.
06:11 ह्या पर्यायांमधून Definition and Data निवडा.
06:16 Next button क्लिक करा.
06:19 पुढील विंडोमध्ये columns समाविष्ट करणार आहोत.
06:23 ह्या उदाहरणासाठी BookId, title आणि publish-year निवडा.
06:29 डाव्या बाजूला निवडलेली ही फिल्डस single arrow बटणाच्या सहाय्याने उजवीकडे स्थलांतरित करू.
06:39 Next क्लिक करा.
06:42 पुढील विंडोत columns दिसतील.
06:46 येथे फिल्डचे नाव आणि त्यांचा डेटा टाईप बदलणार आहे.
06:51 BookId च्या जागी MediaId लिहा
06:55 Create बटणावर क्लिक करा.
06:59 मुख्य Base window मध्ये Media हे नवीन table दिसेल.
07:05 audio किंवा video हा प्रकार संचित करणारे MediaType हे नवे फिल्ड समाविष्ट करण्यासाठी टेबल एडिट करू.
07:15 आपण table design window मध्ये आहोत.
07:19 येथे शेवटचा कॉलम म्हणून MediaType समाविष्ट करू.
07:24 Publishyear च्या खालील सेल वर क्लिक करा.
07:27 Field Name म्हणून MediaType असे टाईप करून Field Type मध्ये Text निवडा.
07:36 table design सेव्ह करा म्हणजे ही क्रिया पूर्ण होईल.
07:41 आपणCopy method द्वारे Media table बनवले.
07:48 assignment.
07:51 Use Wizard to Create table ह्या method ने टेबल बनवा.
07:57 येथे Assets हे sample table वापरून ते AssetsCopy असे रिनेम करा.
08:04 ह्या पध्दतीतील अनेक पर्याय वापरून बघा.
08:08 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
08:14 आपण शिकलो,
08:17 Table बनवण्याची पध्दत. Creating Views आणि Copy method द्वारे टेबल बनवणे.
08:23 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. हा प्रॉजेक्ट http://spoken-tutorial.org द्वारे सहबद्ध आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08:44 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Gaurav, Kavita salve, PoojaMoolya, Ranjana