LibreOffice-Impress-on-BOSS-Linux/C2/Viewing-a-Presentation-Document/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Viewing a Presentation
Author: Manali Ranade
Keywords: Impress
Time | Narration |
00:00 | लिबर ऑफिसच्या 'Viewing a Presentation' वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:06 | या ट्युटोरियलमध्ये आपण View मधील उपलब्ध पर्याय, त्याचे उपयोग तसेच Master Pages बद्दल शिकणार आहोत. |
00:13 | इथे आपण GNU/Linux ही Operating System आणि Libre Office Suite 3.3.4 वापरणार आहोत. |
00:22 | प्रथम 'Sample Impress' हे प्रेझेंटेशन उघडण्यासाठी, त्यावर डबल क्लिक करू. |
00:27 | लिबर ऑफिस इम्प्रेस मध्ये अनेक Views चे पर्याय आहेत जे आपल्याला चांगले प्रेझेंटेशन बनवायला मदत करतील. |
00:34 | जेव्हा आपण लिबर ऑफिस इम्प्रेस सुरू करतो तेव्हा Default रूपात हा स्क्रीन दिसतो. |
00:41 | याला 'Normal View' असे म्हणतात. |
00:43 | जेव्हा प्रेझेंटेशन इतर कुठल्या View मध्ये असेल तर |
00:48 | तुम्ही 'Normal' Tab वर क्लिक करून 'Normal View' वर पुन्हा येऊ शकता. |
00:53 | किंवा 'View' वर क्लिक करून नंतर 'Normal' वर क्लिक करा. |
00:57 | 'Normal View' मध्ये आपण स्लाईड बनवून त्यात बदलही करू शकतो. |
01:02 | उदाहरणार्थ आपण स्लाईडचे डिझाईन बदलू शकतो. |
01:05 | हे करण्यासाठी 'Overview' असे शीर्षक असलेल्या स्लाईडवर जा. |
01:09 | उजवीकडील 'Task pane' मध्ये 'Master pages section' च्या अंतर्गत 'used in this presentation खाली आपल्याला the slide design is prs strategy दिसेल. |
01:21 | यात सध्या उपलब्ध असलेल्या स्लाईड्सची डिझाईन बघता येतात. |
01:27 | एका डिझाईनवर क्लिक करा. |
01:30 | 'Work Space Pane' मधल्या स्लाईड डिझाईन मध्ये झालेल्या बदलाकडे लक्ष द्या. |
01:33 | बघा, स्लाईड डिझाईन बदलणे किती सोपे आहे! |
01:39 | तुम्ही बनवलेले डिझाईनही स्लाईडची बॅकग्राऊंड म्हणून समाविष्ट करता येईल. |
01:43 | पुढे आपण 'Outline View' बद्दल जाणून घेऊ. |
01:47 | तुम्ही या Viewवर जाण्यासाठी 'View' वर क्लिक करून मग 'Outline' वर क्लिक करा. |
01:53 | किंवा 'Outline' या टॅबवर क्लिक करू शकता. |
01:57 | तुम्हाला दिसेल की या View मध्ये टेबलमधील घटकांप्रमाणे स्लाईड एकाखाली एक मांडलेल्या दिसतात. |
02:05 | येथे तुम्हाला स्लाईडस् ची हेडिंग्ज दिसतील. |
02:08 | 'Overview' हे हेडिंग हायलाईटेड स्वरूपात दिसेल. |
02:12 | याचे कारण असे की, आपण 'Outline' tab क्लिक करण्याचे वेळी आपण 'Overview' ह्या स्लाईडवर होतो. |
02:18 | येथील आयकॉन तुम्हाला bullet points प्रमाणे दिसतील. |
02:23 | कर्सर या बुलेट पॉईंटवर नेल्यास त्याचे रूपांतर तळहातासारख्या आयकॉन मध्ये होईल. |
02:29 | याद्वारे स्लाईडमधील ओळींचा क्रम आपण स्लाईडमध्ये वरखाली बदलू शकतो. |
02:38 | किंवा दुस-या स्लाईडवरही नेऊ शकतो. |
02:40 | केलेले बदल 'Ctrl + Z' दाबून undo करू या. |
02:49 | Slide sorter view चा उपयोग स्लाईडस् चा अनुक्रम बदलण्यासाठी करता येतो. |
02:53 | Slide sorter view मध्ये जाण्यासाठी प्रथम view वर क्लिक करून नंतरsorter वर क्लिक करू. |
03:00 | किंवा Slide sorter टॅब वर क्लिक करू. |
03:04 | स्लाईड्सचा क्रम बदलण्यासाठी याचा उपयोग करतात. |
03:08 | उदाहरणार्थ स्लाईड क्रमांक 9 आणि 10 यांची अदलाबदली करण्यासाठी स्लाईड क्रमांक10 वर क्लिक करून ती स्लाईड, स्लाईड क्रमांक 9 च्या वर ड्रॅग करा. |
03:18 | आता माऊसचे बटण सोडून द्या. |
03:22 | स्लाईडस् ची अदलाबदल झालेली दिसेल. |
03:26 | नोटस् या Viewमध्ये आपण स्लाईडला तळटीप लिहू शकतो. |
03:31 | नोटस् View वर जाण्यासाठी 'View' मधील 'Notes Page' निवडा. |
03:36 | किंवा तुम्ही 'Notes' या टॅबवर देखील क्लिक करू शकता. |
03:39 | स्लाईडस् pane मधील 'Development up to present' ही स्लाईड सिलेक्ट करा. |
03:44 | तळटीप लिहिण्याच्या जागेत काही मजकूर टाईप करा. |
03:49 | प्रेझेंटेशन प्रोजेक्टरद्वारे दाखवताना ही तळटीप मॉनिटरवर तुम्हाला दिसेल पण तुमचे दर्शक ती बघू शकणार नाहीत. |
03:58 | आता 'Normal' Tab वर क्लिक करा. |
04:01 | प्रेझेंटेशनचा लेआऊट 'Task Pane' मधील लेआऊट विभागात जाऊन बदलता येतो. |
04:08 | Task pane स्क्रीनवर ठेवण्यासाठी किंवा काढून टाकण्यासाठी, |
04:12 | view मधील Task pane क्लिक करा. |
04:14 | यामुळे Task pane दाखवले जाईल किंवा काढून टाकले जाईल. |
04:18 | स्लाईडचा लेआऊट बदलण्यासाठी लेआऊट या विभागाचा उपयोग करू या. |
04:23 | 'Development up to present' हे शीर्षक असलेली स्लाईड सिलेक्ट करा. |
04:26 | लेआऊट विभागातून 'Title Content over content' हा पर्याय निवडा. |
04:33 | त्यामुळे स्लाईडचा लेआऊट बदलला आहे. |
04:37 | आपण ह्या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
04:40 | आपण काय शिकलो ते थोडक्यात. View मधील उपलब्ध पर्याय, त्याचे उपयोग तसेच Master Pages |
04:46 | COMPREHENSION TEST ASSIGNMENT |
04:49 | नवीन प्रेझेंटेशन तयार करा. |
04:52 | फिकट निळ्या रंगाचा टायटल एरिया आणि गडद निळ्या रंगाची बॅकग्राऊंड असलेले मास्टर पेज बनवा. |
04:58 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
05:02 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
05:05 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
05:09 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
05:15 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
05:19 | अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
05:26 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे. |
05:30 | यासाठी National Mission on Education through ICT, MHRD, यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे. |
05:38 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
05:49 | ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज जगदीश शिंदे यांचा आहे.सहभागासाठी धन्यवाद.
|