LaTeX/C2/Mathematical-Typesetting/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | LaTeX मध्ये Mathematical Typesetting वरील स्पोकन ट्युटोरिअल मध्ये आपले स्वागत. |
00:08 | लक्षात ठेवा आपल्याला ह्याला लेटेक बोलावले पाहिजे लॅटेक्स नाही. |
00:15 | या ट्युटोरियलमध्ये आपण LaTeX मधील गणितीय चिन्हे कसे तयार करायचे ते शिकू. |
00:20 | विशेषत: गणितीय मोडमधून कसे जावे व ह्यातून बाहेर पडावे. 'spaces' ची भूमिका आणि ती तयार करणे शिकू, |
00:29 | गणितीय चिन्ह |
00:31 | अखेरीस, A M S math package आणि matrices तयार करण्यामध्ये त्याचे वापर. |
00:37 | मी हे ट्युटोरियल 10,000 रु. पेक्षा कमी लॅपटॉपवर तयार करत आहे. |
00:43 | मी Ubuntu, TeXworks आणि LaTeX वापरत आहे. |
00:47 | 'LaTeX' वरील मूलभूत स्पोकन ट्यूटोरियल खालीलप्रमाणे आहेत. |
00:53 | साइड-बाय-साइड ट्युटोरिअलची माहिती. |
00:56 | सर्व आमच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. |
01:00 | मी 'maths.tex' फाईल वापरेल. |
01:04 | हे आपल्या वेब पेज मध्ये कोड फाईल म्हणून उपलब्ध आहे जिथे तुम्ही हा ट्युटोरिअल पाहिला. |
01:11 | त्याच स्थानावर, तुम्हाला TeX user group, India मधून ही 'pdf' फाईल मिळेल. |
01:17 | असाइन्मेंट्स कर्त्यावेळी आपण ते वापरूया. |
01:20 | आता मी ‘TeXworks’ विंडो वर जाते. |
01:24 | मी आधीच 'maths.tex' फाईल उघडली आहे. |
01:27 | कृपया ही फाईल डाउनलोड करा आणि माज्यासोबत त्याचा सराव करा. |
01:32 | आपण आधीच या फाईलच्या सर्वात वर असलेल्या कमांडस बघितल्या आहेत. |
01:36 | ही कमांड paragraph indent काढून टाकते. |
01:42 | आपण एका असाइन्मेंट द्वारे या विधानाच्या प्रभावाचा अभ्यास करू. |
01:47 | आपण ग्रीक चिन्हां सह सुरवात करूया जे गणितात वापरले जातात. |
01:52 | आम्ही LaTeX मधील गणितीय मोडमध्ये जाण्यासाठी dollar चिन्ह वापरतो. |
01:57 | आपण alpha सह सुरवात करूया. आपण dollar back slash alpha dollar लिहितो. |
02:06 | आता कंपाइल करूया आणि 'pdf' मध्ये ग्रीक अक्षर alpha मिळतो का ते पाहूया. |
02:15 | पहिला डॉलर दाखवतो कि आपण गणितीय मोड मध्ये जात आहोत. |
02:20 | दुसरा डॉलर दाखवतो कि आम्ही हा मोड सोडून देत आहोत. |
02:24 | आतापासून, मी स्पष्टपणे डॉलर किंवा बॅक स्लॅश दर्शविणार नाही. |
02:30 | पण तुम्हाला अगदी तेच करायचे आहे जे तुम्ही स्क्रीनवर पाहता. |
02:34 | त्याचप्रमाणे आपण 'बीटा, गामा आणि डेल्टा' लिहितो. आता कंपाइल करू. |
02:50 | मी 'tex' फाईल सेव्ह केले नाही कारण कि TeXworks हे आपोआप करते. |
02:56 | आता आपण हे डिलीट करू. |
03:00 | पुढे आपण गणितीय एक्सप्रेशन्समध्ये (अभिव्यक्ती) spaces च्या संकल्पनाशी सुरवात करूया. |
03:05 | आपण alpha a कसे निर्माण करतो जो alpha आणि 'a' चा गुणाकार आहे? |
03:12 | आता 'alpha a' चा प्रयत्न करूया. |
03:17 | आता मी कंपाइल करते. |
03:21 | 'LaTeX' हे दर्शवितो कि 'alpha a' एक अपरिभाषित कंट्रोल सिक्वेन्स आहे. |
03:27 | हे दर्शवितो कि त्याला ही कमांड समजत नाही. मी हे बंद करते. |
03:34 | LaTeX प्रत्येक कमांड नंतर एक space द्वारे ह्याला हाताळतो. |
03:39 | आता 'alpha' च्या नंतर एक space देऊया. |
03:44 | आता कंपाइलेशन रद्द करूया. पुन्हा कंपाइल करूया; या समस्येचे निराकरण झाले. |
03:52 | जसे की ही कमांड रद्द करण्यासाठी वापरली जाते, म्हणून space, 'pdf' मध्ये दिसत नाही. |
03:57 | जर आपल्याला आउटपुट मध्ये spaces आणायचे असेल तर आपण काय करावे? |
04:03 | आपल्याला LaTeX ला स्पष्टपणे सांगावे लागेल, जसे आता आपण करत आहोत. |
04:07 | आता आपण LaTeX ला एक नवीन ओळ सुरू करण्यास विचारू. |
04:11 | आता आपण alpha backslash space a लिहूया. |
04:17 | कंपाइल करूया. |
04:20 | हा space देतो. |
04:23 | जर तुम्हाला अधिक space हवी असेल तर 'quad' वापरा, जसे आम्ही आता करतो. |
04:31 | कंपाइल करूया. |
04:34 | तुम्ही पाहू शकता कि 'quad' अधिक 'space देतो. |
04:40 | आता आपण अन्य विषयावर जाऊया. |
04:43 | शेवटच्या दोन ओळी डिलीट करूया. कंपाइल करूया. |
04:50 | फॉन्ट मध्ये काय होते जेव्हा आपण टेक्स्ट मधून गणितीय पद्धतीने जातो? |
04:56 | हे समजण्यासाठी, आता लिहूया “Product of $\alpha and a is”. |
05:04 | कंपाइल करा. |
05:07 | तुम्ही पाहू शकता कि दोन्ही 'a' चा फॉन्ट वेग वेगळे आहेत. |
05:14 | डॉलर चिन्हांमध्ये देखील हा 'a' लिहिल्याने ह्याचे निराकरण होते. |
05:25 | कंपाइल करूया. |
05:27 | आता या दोन 'a' चे फॉन्ट एकसारखे आहेत. |
05:32 | वेरिएबल्सचे फॉन्ट समान न ठेवणे एक सामान्य चूक आहे. |
05:37 | आता त्यांना काढून टाका. |
05:40 | कंपाइल करूया. |
05:43 | आता माइनस चिन्हे तयार करण्याच्या नियमाची चर्चा करूया. |
05:48 | समजा आपल्याला 'माइनस अल्फा' तयार आणि कंपाइल करायचे आहे. |
05:58 | कंपाइल करूया. |
06:01 | लक्ष द्या कि माइनस चिन्ह येथे एक छोटे डॅश म्हणून दिसेल. |
06:07 | आता डॉलर चिन्हाच्या आतमध्ये देखील माइनस चिन्हा सह कॉपी करू शकतो. |
06:15 | पुन्हा कंपाइल करूया. |
06:18 | आता माइनस चिन्हात फरक पहा. दुसरा म्हणजे आम्हाला जे हवे आहे, डॅश वापरला जाणार नाही. |
06:27 | डॉलर चिन्हात माइनस चिन्ह न ठेवणे नवशिक्यांची सामान्य चूक आहे. |
06:33 | या सर्वांना डिलीट करूया. |
06:36 | पुढे आम्ही 'frac' कमांड समजवणार आहोत जे फ्रॅक्शन्स तयार करण्यासाठी वापरले जाते. |
06:43 | 'frac a b'. कंपाइल करू. |
06:50 | हे 'a' बाय 'b' बनवतो. 'frac' कमांड space शी समाप्त होते. हे दोन 'आर्ग्युमेंट्स' साठी दिसते. |
07:00 | पहिला कॅरेक्टर 'a' प्रथम आर्ग्युमेंट म्हणून घेतले जाते. हे नुमरेटर म्हणजेच अंश बनते. |
07:07 | दुसरा कॅरेक्टर 'b' दुसरे आर्ग्युमेंट म्हणून घेतले जाते. हे डिनॉमिनेटर म्हणजेच भाजक बनते. |
07:13 | लक्षात घ्या 'a' आणि 'b' चे आकार आपोआप कमी होतील. |
07:20 | लांब कॅरेक्टर्स असल्यास काय होते? |
07:24 | जर आपल्याला ab बाय cd बनवायचे असेल तर काय होईल? माझी इच्छा आहे कि तुम्ही हे प्रयेत्न करून पहा. |
07:31 | LaTeX मध्ये, एका कॅरेक्टर पेक्षा लंबे आर्ग्युमेंट्स कंसने बंद केले जाते. |
07:37 | उदाहरणार्थ, आता येथे कंस घालू या. |
07:41 | जेव्हा आपण हे कंपाइल करतो तेव्हा आपल्याला अपेक्षित आऊटपुट मिळते. |
07:47 | कंसातील सर्व नोंदी (एन्ट्रीज) सिंगल आर्ग्युमेंट म्हणून घेतली जातात. |
07:52 | परिणामस्वरुप, आपण कंसात काही क्लिष्ट एक्सप्रेसशन (अभिव्यक्ती) प्रविष्ट करू शकतो. आता ह्या सर्वांना डिलीट करू. |
08:01 | आता आपण सबस्क्रिप्ट्स आणि सुपरस्क्रिप्ट्स पाहूया. |
08:05 | x underscore a, x sub a तयार करते. |
08:14 | 'A' चा आकार आपोआप एक योग्य स्तरावर कमी होते. |
08:19 | काय होईल जर आपल्याला 'ab' ला सबस्क्रिप्ट म्हणून ठेवायचे असेल. तुम्हाला कंस वापरायचे आहेत. हे स्वतःच करून पहा. |
08:28 | सुपरस्क्रिप्ट्स caret किंवा up arrow चिन्हाद्वारे तयार केल्या जातात. |
08:33 | उदाहरणार्थ जर आपण 'x' चा घात 3 बनवू इच्छित असाल तर आपण लिहू शकतो 'x up arrow 3' |
08:43 | आपण एकाच वेळी सबस्क्रिप्ट्स आणि सुपरस्क्रिप्ट्स देखील लिहू शकतो. |
08:48 | आता x sub a superscript b लिहूया; कंपाइल करूया. |
08:58 | पुन्हा एकदा, कंस वापरून, आपण जटिल सबस्क्रिप्ट्स आणि सुपरस्क्रिप्ट्स तयार करू शकतो. मी हे डिलीट करते. |
09:08 | आता आपण पुढील Matrices वर जाऊया. |
09:12 | a m s math पॅकेज काही मॅट्रिक्स व्याख्या ठेवतो जे मला आवडतात. |
09:19 | आपण त्याला 'usepackage' कमांडच्या द्वारे समाविष्ट करू. |
09:26 | ampersand म्हणजे and चिन्ह, कॉलम्स वेगळे करण्यासाठी वापरतात. |
09:31 | आता एक मॅट्रिक्स तयार करू. |
09:34 | आपण 'begin matrix' 'a' आणि 'b', 'end matrix' लिहू. डॉलर चिन्हे विसरू नका. |
09:44 | कंपाइल करा आणि अपेक्षेप्रमाणे मॅट्रिक्स पहा. |
09:49 | आता समजा, आपल्याला ह्यात एक दुसरी रो जोडायची आहे, आपण दोन back slashes देऊ, याचा अर्थ आहे, पुढच्या ओळीवर जा. |
09:59 | समजा की आपल्याला दुसऱ्या ओळीत तीन नोंदी हव्या आहेत, जसे 'c, d, e'. कंपाइल करा आणि आता समाविष्ट झालेली दुसरी रो देखील पहा. |
10:11 | समजा आपण मॅट्रिक्स 'begin' आणि 'end' मध्ये 'pmatrix' मध्ये बदलूया. |
10:17 | कंपाइल करा आणि हे मिळवा. |
10:21 | आता तुमच्याकडे शोध लावण्याची वेळ आहे. आता आपण स्लाईडस् वर जाऊ या. |
10:28 | थोडक्यात आपण ह्या ट्युटोरिअल मध्ये काय शिकलो- |
10:31 | spaces वापरून गणितीय मोड मध्ये जाणे आणि बाहेर येणे आणि त्यांना बनवणे. |
10:37 | फ्रकॅशन्स, सबस्क्रिप्ट्स आणि सुपरस्क्रिप्ट्स. कंसात एक आर्ग्युमेंट परिभाषित करणे. |
10:44 | मेट्रीसेस तयार करण्यासाठी 'amsmath' पॅकेज. |
10:48 | मी काही असाइन्मेंट्स देते. |
10:51 | हि असाइन्मेंट spaces वर आहे - मोठे आणि लहान, कृपया विडिओ थांबवा, स्लाइड वाचा आणि असाइनमेंट करा. |
11:01 | हि असाइन्मेंट कंस वापरून फ्रॅकशन्स वर आहे. |
11:06 | हि असाइन्मेंट सबस्क्रिप्ट्स आणि सुपरस्क्रिप्ट्स वर आहे. |
11:11 | या असाइनमेंटद्वारे आपण मेट्रिसस तयार करण्यासाठी आणखी काही पद्धती शिकू. |
11:17 | हि असाइन्मेंट अधिक गणितीय चिन्हे तयार करण्यावर आहे. |
11:21 | हे TUG India LaTeX गाईड वर आधारित आहे. आता आपण त्या डॉक्युमेंटला पाहू. |
11:29 | मी तुम्हाला आधीपासूनच आमच्या वेब पेजवरून हा डॉक्युमेंट डाउनलोड करण्यास सांगितले आहे. |
11:34 | या डॉक्युमेंटमध्ये दिलेल्या काही चिन्हे आपण पुन्हा करूया. |
11:39 | पुढील असाइन्मेंट मध्ये तुम्ही अधिक चिन्हे वापरून पाहु शकता. |
11:43 | हि असाइन्मेंट देखील TUG India डॉक्युमेंट वर आधारित आहे |
11:48 | ह्या असाइन्मेंट मध्ये पॅराग्राफ इंडेन्ट सह प्रयोग करूया. |
11:53 | आपण ह्या ट्युटोरिअल च्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
11:56 | ज्यामध्ये तुम्हाला Spoken Tutorial प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
12:00 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
12:04 | स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट टीम. Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. कृपया आमच्याशी संपर्क साधा. |
12:11 | या Spoken Tutorial संदर्भात तुम्हाला काही प्रश्न आहेत का? कृपया या साईटला भेट द्या. तुम्हाला ज्या ठिकाणी प्रश्न पडला आहे ते मिनिट आणि सेकंद निवडा. |
12:20 | तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा. आमच्या टीम मधील सदस्य याचे उत्तर देतील. |
12:27 | स्पोकन ट्युटोरियल फोरम या पाठाशी संबंधित प्रश्नांसाठी बनवली आहे. कृपया पाठाशी संबंधित नसलेले किंवा जनरल प्रश्न यावर टाकू नयेत. |
12:36 | यामुळे गोंधळ टाळण्यास मदत होईल. फारशी अव्यवस्था नसल्यास ही चर्चा शैक्षणिक सामग्री म्हणून वापरता येईल. |
12:44 | या पाठात न आलेल्या टॉपिक्ससाठी या पत्त्यावरील stack exchange वापरावे. |
12:50 | LaTeX वरील प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी ही उत्तम जागा आहे. |
12:53 | तुम्हाला कार्यशाळा, प्रमाणपत्र इत्यादी संबंधीही प्रश्न असतील. त्यासाठी आमच्याशी इमेलद्वारे संपर्क साधा. |
13:03 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
13:09 | मी रंजना उके आई आई टी बॉम्बे आपली राजा घेत. सहभागासाठी धन्यवाद. |