Koha-Library-Management-System/C3/Copy-cataloging-using-Z39.50/Marathi
00:01 | Copy Cataloging using Z39.50 वरील Spoken Tutorial मध्ये आपले स्वागत आहे. |
00:09 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत - Z39.50 वापरून catalog मध्ये records कसे जोडणे. |
00:20 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे - Ubuntu Linux operating system 16.04 |
00:28 | आणि Koha version 16.05. |
00:33 | कृपया खात्री करा कि तुम्ही इंटरनेट शी जुडलेले आहात. |
00:38 | ह्या ट्युटोरिलचे अनुसरण करण्यासाठी, विद्यार्थ्यांना लायब्ररी सायन्सचे, |
00:45 | कॅटलॉगिंग स्टँण्डर्ड, AACR2 आणि MARC21 चे ज्ञान असावे. |
00:54 | ह्या ट्युटोरिअलचा सराव करण्यासाठी, तुमच्या सिस्टमवर Koha इन्स्टॉल असले पाहिजे. |
01:00 | आणि, आपल्याकडे Koha मध्ये Admin ऍक्सेस असणे आवश्यक आहे. |
01:05 | अधिक माहितीसाठी, कृपया Koha Spoken Tutorial ह्या वेबसाइटवरील सीरिज पहा. |
01:13 | तर, Z39.50 काय आहे? |
01:18 | Z39.50 हे रिमोट कम्प्युटर डेटाबेसमधून माहिती शोधण्यासाठी आणि पुनर्प्राप्त करण्यासाठी हे एक client–server protocol आहे.
थोडक्यात, हे एक टूल आहे जे कॅटलॉगिंग कॉपी करण्यासाठी वापरले जाते. |
01:37 | सुरवात करू.
प्रथम मी Koha इंटरफेसवर जाते आणि Superlibrarian, Bella म्हणून लॉग इन करते. |
01:47 | Koha homepage वर, Koha administration वर क्लिक करा. |
01:53 | ह्या पृष्ठावर, खाली(तळाशी) स्क्रोल करा आणि Additional parameters वर जा.. |
01:59 | मग, Z39.50/SRU server वर क्लिक करा. |
02:07 | एक नवीन पृष्ठ Z39.50/SRU servers administration उघडते. |
02:16 | तेथे दोन टॅब्स आहेत - +New Z39.50 server आणि +New SRU server. |
02:26 | +New Z39.50 server टॅबवर क्लिक करा. |
02:32 | New Z39.50 server शीर्षकासह नवीन पृष्ठ उघडते. |
02:40 | लक्षात ठेवा की, target Z39.50 Server जोडण्यासाठी, server चा तपशील आपल्याला माहित असला पाहिजे. |
02:51 | जर आपल्याला Z39.50 server चे कोणतेही तपशील माहित नसेल तर, आपण ह्या URL वर Z39.50 servers ची सूची शोधू शकतो. |
03:05 | आपल्याला काही तपशील भरण्यास उद्युक्त करण्यासाठी IRSpy पृष्ठ उघडले आहे. |
03:12 | सुरवात करू. |
03:14 | (Anywhere) फिल्ड रिक्त(ब्लँक) सोडा. |
03:18 | Name साठी, मी टाईप करेन: Library of Congress. |
03:23 | याचे कारण ही सर्वात मोठी लायब्ररी आहे आणि त्यात मोठा बिब्लिऑग्राफिकल डेटा आहे. |
03:31 | पुढे, Country साठी field मध्ये, ड्रॉप-डाऊनमधून United States निवडा. |
03:38 | Protocol साठी, ड्रॉप-डाऊनमधून Z39.50 निवडा. |
03:46 | आपण आपल्या आवश्यकतेनुसार उर्वरित तपशील भरू शकता. |
03:51 | त्यानंतर पृष्ठाच्या तळाशी Search बटणावर क्लिक करा. |
03:57 | शोध परिणामांसह (सर्च रिझल्ट्ससह) एक नवीन पृष्ठ उघडते. |
04:01 | वेगवेगळ्या शीर्षकाखालील 9 लायब्ररींची सूची दिसते -
Title, Host Connection Reliability, Host, Port आणि DB. |
04:16 | Koha मध्ये New Z39.50 server वर तपशील भरण्यासाठी ह्या तपशीलांचा वापर केला जाईल. |
04:26 | लक्षात घ्या की आपण लायब्ररींची एक भिन्न सूची पाहू शकता जे 10 पेक्षा जास्त असू शकतात. |
04:32 | लक्षात ठेवा, कोणताही target Z39.50 server जोडण्याआधी, कृपया Host Connection Reliability सुनिश्चित करा. |
04:43 | मी Title : Library of Congress वर क्लिक करेन. |
04:48 | Library of Congress शीर्षक असलेले नवीन पृष्ठ उघडते. |
04:54 | हे पृष्ठ उघडे ठेवा, कारण आपल्याला थोड्या वेळाने ह्या पृष्ठावरील तपशीलाची गरज भासेल. |
05:01 | आता पुन्हा New Z39.50 server पृष्ठावर जाऊ, जे आपण ह्या ट्युटोरिअलमध्ये आधीपासूनच उघडले होते. |
05:12 | आणि ह्या पृष्ठावर आवश्यक तपशील भरणे सुरू करा. |
05:17 | Library of Congress पृष्ठावरील माहिती जी आपण उघडली आहे. |
05:23 | तर सुरूवात करू. |
05:25 | New Z39.50 server पृष्ठावर, Server name साठी टाईप करा Library of Congress. |
05:34 | हे तपशील Library of Congress पृष्ठामधील Name सेक्शनमधून आहे. |
05:41 | New Z39.50 server पृष्ठावर मी काही इतर तपशील भरले आहेत, ज्याची मी Library of Congress पृष्ठावरून नोंद केली होती. |
05:54 | आपण व्हिडिओ थांबवू शकता आणि आपल्या आवश्यकतेनुसार तपशील भरू शकता. |
06:01 | कृपया लक्षात घ्या की लाल रंगातील field अनिवार्य आहेत. |
06:06 | पुढे, आपण Preselected (searched by default) चेक-बॉक्स पहातो. |
06:12 | आपल्याला ह्या विशिष्ट लायब्ररीचा डेटाबेस नेहमी डीफॉल्टनुसार शोधण्याची इच्छा असल्यास हे क्लिक करा.
मी ते अनचेक सोडेन. |
06:23 | आता आपण Rank (display order)साठी फिल्डमध्ये आलो आहोत.
लायब्ररी यादीच्या शीर्षस्थानी आपल्याला ही लायब्ररी सूचीबद्ध करायची असल्यास येथे 1 प्रविष्ट करा. |
06:37 | लक्षात घ्या की जर आपल्याला अनेक z39.50 targets जोडण्याचे असेल, तर आपण रँकच्या अनुसार त्यांची व्यवस्था करू शकता. |
06:47 | Syntax साठी, ड्रॉप-डाऊनवरून मी MARC21/USMARC निवडेल.
आपल्या आवश्यकतेनुसार आपण कोणताही Syntax निवडू शकता. |
07:00 | Encoding साठी, कोहा डीफॉल्टनुसार, utf8 निवडतो.
मी ते आहे तसे सोडून देईल. |
07:08 | परंतु आपल्या आवश्यकतेनुसार आपण इतर व्हॅल्यू निवडू शकता. |
07:14 | पुढील आहे - Time out (0 its like not set). |
07:20 | येथे, परिणाम प्रदर्शित होण्यासाठी तुम्ही प्रतीक्षा करू इच्छित सेकंदांची संख्या टाईप करा.
मी 240 प्रविष्ट करेन . |
07:32 | Record type साठी कोहा डीफॉल्टनुसार, स्वयं Bibliographic निवडतो.
असे केल्यावर, प्रत्येक रेकॉर्डमध्ये Bibliographic तपशील असेल. |
07:44 | सर्व तपशील त्यात भरल्यानंतर, पृष्ठाच्या तळाशी Save बटणावर क्लिक करा. |
07:51 | Z39.50/SRU servers administration पृष्ठ पुन्हा उघडते. |
08:00 | आपण ह्या पृष्ठावर, विविध हेडिंग्सखाली जोडलेली माहिती पाहू शकतो. |
08:06 | आता, ह्या लायब्ररीमधील रेकॉर्ड शोधण्यासाठी, Koha homepage वर जा आणि Cataloging वर क्लिक करा. |
08:16 | दोन पर्यायांसह एक नवीन पृष्ठ उघडते.
+New record आणि New from Z39.50/SRU. |
08:29 | New from Z39.50/SRU वर जा आणि ड्रॉप-डाऊनमधून BOOKS निवडा. |
08:40 | एक नवीन Z39.50/SRU search विंडो उघडते. |
08:48 | पृष्ठाच्या अगदी उजव्या बाजूस Search targets फिल्ड वर जा. |
08:54 | येथे आपण Z39.50 target पाहू शकता जो आपण ह्या ट्युटोरियलमध्ये आधी जोडला होता.
जो आहे - LIBRARY OF CONGRESS. |
09:07 | आता LIBRARY OF CONGRESS च्या समीप असलेल्या चेक-बॉक्सवर क्लिक करा. |
09:14 | त्याच पृष्ठाच्या डाव्या बाजूला विविध फिल्ड्सह Z39.50/SRU search आहे. |
09:25 | ह्या फिल्ड्समध्ये, Title वर जा आणि टाईप करा: Clinical Microbiology. |
09:33 | आपली इच्छा असेल तर आपण उर्वरित fields भरू शकता.
मी ते रिक्त(ब्लँक) सोडेन. |
09:40 | आता पृष्ठाच्या तळाशी Search बटणावर क्लिक करा. |
09:46 | तथापि क्लिक करण्यापूर्वी, कृपया खात्री करा कि तुम्ही इंटरनेट शी जुडलेले आहात. |
09:52 | आणखी एक नवीन पृष्ठ Results उघडेल, हेडिंगसह तपशील दर्शविते:
Server, Title, Author, Date, Edition, ISBN, LCCN, MARC आणि Card. |
10:11 | आता, पृष्ठाच्या अगदी उजव्या बाजूला जा आणि Import फिल्ड वर जा. |
10:18 | Title: Clinical Microbiology फिल्डसाठी मी Import वर क्लिक करेन. |
10:25 | आपण आपल्या आवश्यकतेनुसार, Import साठी अन्य कोणत्याही Title वर क्लिक करू शकता. |
10:32 | Import वर क्लिक केल्यावर, Add MARC record नामक एक नवीन विंडो उघडते. |
10:39 | आपण काही tags पाहाल जे Library of Congress डेटाबेसमधून इन्पोर्ट केले आहेत. |
10:47 | परंतु, आपल्या आवश्यकतेनुसार, संबंधित tags साठी रिक्त(ब्लँक) फिल्ड्स तुम्हांला भरावे लागतील. |
10:55 | लक्षात घ्या, आपण ह्या पृष्ठाचा तपशील आधीच्या ट्युटोरिअलमध्ये भरला आहे. |
11:02 | व्हिडिओ थांबवा आणि तपशील भरा. |
11:06 | तपशील भरल्यानंतर, पृष्ठाच्या वरील भागातील Save बटणावर क्लिक करा. |
11:13 | एक नवीन पृष्ठ Items for Clinical microbiology by Ross, Philip W. उघडते. |
11:22 | आता, पृष्ठाच्या तळाशी असलेल्या Add item बटणावर क्लिक करा. |
11:28 | Items for Clinical microbiology by Ross, Philip W. पृष्ठ उघडते. |
11:36 | यासह, आपण Library of Congress मधून Clinical microbiology पुस्तकाचे तपशील Koha मध्ये यशस्वीरित्या इम्पोर्ट केले आहे. |
11:48 | थोडक्यात - |
11:50 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो - Z39.50. वापरून Catalog मधील रेकॉर्ड्स कसे जोडणे. |
12:00 | असाईनमेंटसाठी-
Z39.50. वापरून Catalog मध्ये Serial रेकॉर्ड्स जोडा. |
12:10 | खालील लिंकवरील व्हिडिओ Spoken Tutorial प्रोजेक्टचा सारांश देतो.
कृपया तो डाऊनलोड करून पहा. |
12:18 | Spoken Tutorial प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालविते आणि परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते. |
12:28 | ह्या फोरममध्ये आपले कालबद्ध प्रश्न पोस्ट करा. |
12:32 | "स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट" साठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India ह्यांच्याकडून मिळालेले आहे.
ह्या मिशनवरील अधिक माहिती ह्या लिंकवर उपलब्ध आहे. |
12:45 | आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद. |