Koha-Library-Management-System/C2/Receive-Serials/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 How to Receive Serials वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:06 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत:

Serials कसे मिळवणे, लेट Serials क्लेम(दावा) करणे, Serials expiration तपासणे Serials नूतनीकरण (रिन्यू) करणे आणि Serials शोधणे

00:23 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे:

Ubuntu Linux OS 16.04 आणि Koha version 16.05.

00:36 ह्या ट्युटोरिअलचे अनुसरण करण्यासाठी तुम्हांला लायब्ररी सायन्सचे ज्ञान असावे.
00:41 ह्या ट्युटोरिअलचा सराव करण्यासाठी, तुमच्या सिस्टमवर Koha इन्टॉल केलेला असावा.
00:47 आणि आपल्याकडे कोहामध्ये Admin ऍक्सेस असणे आवश्यक आहे.
00:51 कृपया अधिक माहितीसाठी ह्या वेबसाइटवरील Koha Spoken Tutorial सीरीज पहा.
00:58 Serials मिळवण्यासाठी युजर नेम Superlibrarian Bella आणि पासवर्डसह लॉगिन करा.
01:06 Koha Home page वर, Serials वर क्लिक करा.
01:11 नवीन पृष्ठाच्या शीर्षस्थानी, Title साठी फील्ड शोधा.
01:17 journal च्या शीर्षकातील पहिला किंवा कोणताही शब्द प्रविष्ट करा. उदाहरणार्थ, मी टाईप करेन Indian.
01:25 field च्या उजव्या बाजूला Submit बटणावर क्लिक करा.
01:30 एक नवीन पृष्ठ Serials subscriptions उघडते.
01:34 हे पृष्ठ ह्यासाठी तपशील दर्शविते

ISSN ,Title,Notes, Library, Location, Call number, Expiration date, आणि Actions.

01:55 टेबलच्या अगदी उजव्या बाजूला टॅब Actions वर क्लिक करा.
02:00 ड्रॉप-डाऊनमधून, Serial receive निवडा.
02:05 दुसरे पृष्ठ Serial edition Indian Journal of Microbiology टेबलसह उघडते.
02:12 ह्या टेबलमध्ये, Status च्या खाली ड्रॉप डाऊनवर क्लिक करा आणि Arrived निवडा.
02:20 पुढे, पृष्ठाच्या तळाशी असलेल्या Save बटणावर क्लिक करा.
02:25 आणखी एक पृष्ठ Serial collection information for Indian Journal of Microbiology ह्या शीर्षकासह उघडते.

येथे आपण Subscription summary पाहू शकतो.

02:37 अशाप्रकारे आपण Serials मिळवू शकतो.
02:41 आता, लेट सीरियलचा दावा कसा करायचा ते पाहू.
02:46 जर तेथे एखादा issue(अंक) मिळाला नाही तर कोहा Serials vendors ला ईमेल संदेश पाठवू शकतो.
02:53 उदाहरणार्थ:

4 सीरियल्सइश्यूंपैकी, लायब्ररीला फक्त 1, 2 आणि 4 ह्या अंकांचे इश्यू, मिळाले आहेत. आणि, इश्यू क्रमांक 3 प्राप्त झाला नाही.

03:08 अशा प्रकरणात, इश्यू क्रमांक 3 साठी दावा (क्लेम) पाठविला जाऊ शकतो जो अद्याप प्राप्त व्हायचा आहे.
03:15 मुख्य Serials पृष्ठाच्या डाव्या बाजूला Claims नावाचा ऑप्शन आहे.
03:21 Claims वर क्लिक करा.
03:24 डायलॉग बॉक्ससह एक नवीन पृष्ठ उघडते : No claims notice defined. Please define one.

Please define one वर क्लिक करा.

03:35 एक नवीन पृष्ठ Notices and Slips उघडते.
03:39 Notices and Slips अंतर्गत, Select a library: टॅब शोधा.

ड्रॉप-डाऊनमधून, आपल्या लायब्ररीचे नाव निवडा.

03:49 मी निवडेन Spoken Tutorial Library.
03:53 Select a library: टॅब खाली New notice टॅबवर क्लिक करा.
04:00 Add notice शीर्षकासह एक नवीन पृष्ठ उघडते.
04:05 त्याच पृष्ठावर, लायब्ररी, कोहा सेक्शनसाठी, डिफॉल्टपणे, लायब्ररीचे नाव निवडा.
04:12 माझ्या बाबतीत, मी निवडेन Spoken Tutorial Library.
04:17 Koha module: साठी ड्रॉप डाऊनमधून, Claim Serial issue निवडा.
04:24 लक्षात घ्या की जसे Claim serial issue ड्रॉप डाऊनवरून निवडले जाईल,

कोहा, Library म्हणून All libraries साठी फिल्ड स्वयं निवडते (ऑटोसिलेक्ट करते).

04:38 तर, पुन्हा Library टॅबवर जा आणि ड्रॉप-डाऊनमधून Spoken Tutorial Library निवडा.
04:47 चला पुढे जाऊ.
04:49 फिल्डमध्ये Code साठी टाईप करा : Claim.
04:53 फिल्डमध्ये, Name साठी टाईप करा : Unsupplied Issues.
04:59 पुढे Email सेक्शनवर क्लिक करा.
05:04 फिल्डमध्ये Message subject: साठी टाईप करा : Unsupplied Issues.
05:11 Message body: सेक्शनच्या अंतर्गत विक्रेत्यास (वेंडरला) ईमेल टाईप करा.
05:17 माझ्या बाबतीत, विक्रेता (वेंडर) आहे - Mumbai Journal Supplier.
05:22 मी माझ्या विक्रेत्यास (वेंडरला) एक लहान ईमेल लिहिला आहे. आपण व्हिडिओ पॉज करू शकता आणि आपल्या लायब्ररीच्या विक्रेत्यास (वेंडरला) ईमेल लिहू शकता.
05:31 पुढे, आवश्यक असल्यास आपण Phone, Print आणि SMS साठी तपशील भरू शकता. मी ते रिक्त (ब्लँक) ठेवेन.
05:43 पुढे, पृष्ठाच्या तळाशी Submit बटणावर क्लिक करा.
05:48 एक नवीन पृष्ठ Notices and Slips उघडते.
05:52 Notices and Slips खाली Select a library टॅब शोधा.
05:58 कोहाने, Spoken Tutorial Library ची स्वतः निवड (ऑटोसिलेक्ट केले आहे) केली आहे.
06:03 आवश्यकतेनुसार ड्रॉप-डाऊनमधून आपण आपली लायब्ररी निवडू शकता.
06:08 त्याच पृष्ठावर, खालील टॅबखाली तपशीलासह भरलेला एक टेबल आहे:

Library, Module, Code, Name,Copy notice आणि Actions.

06:28 पुढे, कोहाच्या होमपेजवर परत जा. असे करण्यासाठी, अगदी डावीकडील कोपऱ्यात जा आणि Home वर क्लिक करा.
06:39 Koha homepage वर Serials वर क्लिक करा.
06:44 उघडणाऱ्या नवीन पृष्ठावर डाव्या बाजूला जा आणि Claims वर क्लिक करा.
06:51 नवीन पृष्ठावर, वेंडरसाठी फिल्डमध्ये, ड्रॉप-डाऊनमधून आवश्यक वेंडर निवडा.
06:58 जरी Journals साठी माझ्याजवळ फक्त एकच वेंडर असला, मी Mumbai Journal Supplier वेंडरसह पुढे जाईन.
07:06 पुढे, फिल्डच्या उजव्या बाजूस OK वर क्लिक करा.
07:12 Missing issues शीर्षक असलेले नवीन पृष्ठ उघडते.
07:17 नवीन पृष्ठावर Mumbai Journal Supplier च्या डावीकडील चेक बॉक्सवर क्लिक करा.
07:25 आपण आपल्या वेंडरनुसार चेक-बॉक्स क्लिक करू शकता.
07:29 पुढे, पृष्ठाच्या तळाशी Send notification वर क्लिक करा.
07:36 तेच पृष्ठ पुन्हा उघडते आणि यासह वेंडरला ईमेल पाठविला गेला आहे.
07:42 लक्षात घ्या की ईमेल Koha server कडून संबंधित वेंडरला पाठविला गेला आहे.
07:48 आता आपण Check expiration बद्दल शिकू.
07:52 Check expiration हे सबस्क्रिप्शन्सची पूर्तता केव्हा होत आहे ते तपासण्यासाठी वापरली जाते.
07:59 त्याच पृष्ठावर डाव्या बाजूला जा आणि Check expiration वर क्लिक करा.
08:06 Check expiration पृष्ठ उघडते.
08:10 आता, Filter results, खाली Library: वर जा आणि ड्रॉप-डाऊनमधून Spoken Tutorial Library निवडा.

आपण येथे आपली लायब्ररी निवडू शकता.

08:26 पुढे, Expiring before चा उल्लेख करा.
08:30 यामुळे सर्व जर्नल्सची संपूर्ण यादी मिळेल जी त्या विशिष्ट तारखेपूर्वी कालबाह्य (एक्सपायर) होईल.
08:38 Expiring before: साठी, मी प्रविष्ट करेन 01/01/2019
08:47 आता पृष्ठाच्या तळाशी असलेल्या Search बटणावर क्लिक करा.
08:52 त्याच पृष्ठावर, 01/01/2019 पर्यंत कालबाह्य (एक्सपायर) होणाऱ्या जर्नल्सची सूची, एका सारणीस्वरूपात प्रदर्शित होते.
09:04 आपण खालील तपशीलदेखील पाहू शकता-

ISSN, ,Title, ,Library, , OPAC note, , Nonpublic note, , Expiration date आणि Actions.

09:23 आता, Actions टॅबखाली, Renew बटणावर क्लिक करा.
09:29 Subscription renewal for Indian Journal of Microbiology शीर्षकासह नवीन विंडो उघडते.
09:37 ह्या पृष्ठावर, खालील प्रविष्ट करा:

Start Date साठी कृपया आपल्या आवश्यकतेनुसार तारीख प्रविष्ट करा. मी 01/01/2018 प्रविष्ट करेन.

09:51 पुढील आहे Subscription length.
09:54 तीन फिल्ड्सपैकी एक भरण्यासाठी सूचित केले जाते- त्यांची नावे आहेत -

Number of num ज्याचा अर्थ इश्यू आहे, Number of weeks आणि Number of months.

10:09 माझे जर्नल एक त्रैमासिक(क्वाटरली) प्रकाशन आहे म्हणून, कोहाने डिफॉल्ट रूपात Number of num म्हणून 4 निवडले आहे.
10:18 आपण आपल्या गरजेनुसार प्रविष्ट करू शकता.
10:22 Note for the librarian that will manage your renewal request हे फिल्ड रिक्त सोडून द्या.
10:30 पुढे, पृष्ठाच्या तळाशी Submit बटणावर क्लिक करा.
10:35 Subscription renewed संदेशासह एक विंडो प्रदर्शित होते.
10:40 ही विंडो बंद करण्यासाठी, वर डाव्या कोपऱ्यावर जा आणि क्रॉस चिह्नावर क्लिक करा.
10:47 पुन्हा, दुसरा पॉप-अप संदेश प्रदर्शित होतो :
10:51 To display this page, Firefox must send information that will repeat any action (such as a search or order confirmation) that was performed earlier.
11:03 या संदेशाअंतर्गत दोन पर्यायांपैकी-

Cancel आणि Resend Resend वर क्लिक करा.

11:11 आपण Check expiration पृष्ठावर आलो.
11:15 येथे, Filter results विभागाखाली, Expiring before म्हणून' 01/12/2019 निवडा

Expiring date चा उल्लेख फक्त लक्षात ठेवा.

11:32 यामुळे सर्व जर्नल्सची संपूर्ण यादी मिळेल जी त्या विशिष्ट तारखेपूर्वी कालबाह्य (एक्सपायर) होईल.
11:39 आता, Filter results सेक्शनच्या तळाशी Search बटणावर क्लिक करा.
11:45 त्याच पृष्ठावर, 01/12/2019 पूर्वी कालबाह्य (एक्सपायर) होणाऱ्या जर्नल्सची सूची, एका सारणीच्या स्वरूपात दिसते.
11:56 आपण खालील तपशीलदेखील पाहू शकता-

ISSN, , Title, ,Library, ,OPAC note, ,Nonpublic note, ,Expiration date आणि Actions.

12:15 अशाप्रकारे आपण सीरियलसाठी शेड्यूल तयार करू शकतो आणि Volume and issues च्या येण्यानुसार त्यांना प्राप्त करू शकतो.
12:25 आपण आता Koha Superlibrarian अकाउंटमधून लॉग आऊट करू शकता.
12:30 कोहा इंटरफेसच्या वर उजव्या कोपऱ्यात जा. Spoken Tutorial Library वर क्लिक करा आणि ड्रॉप डाऊन वरून Log out निवडा.
12:42 आपण ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
12:46 सारांशित करू :

ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो : Serials कसे मिळवणे, लेट Serials क्लेम करणे, Serials expiration तपासणे, Serials नूतनीकरण (रिन्यू) करणे आणि Serials शोधणे.

13:04 मागील ट्युटोरिअलमध्ये, Journal of Molecular Biology ची नवीन सबस्क्रिप्शन जोडली गेली.
13:11 असाईनमेंट म्हणून, त्याच सबस्क्रिप्शनचे नूतनीकरण करा.
13:15 खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते.
13:19 कृपया ते डाउनलोड करून पहा.
13:22 स्पोकन ट्युटोरिअल टीम कार्यशाळा चालविते आणि परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते.

अधिक माहितीसाठी कृपया आम्हांला लिहा.

13:31 कृपया या फोरम मध्ये तुमचे कालबद्ध प्रश्न पोस्ट करा.
13:35 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.

या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.

13:46 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana