K3b/C2/Creating-and-burning-CD-DVD-using-K3b/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 k3b वापरून Creating and burning CD/DVD वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:08 या ट्युटोरियलमध्ये आपण CD वर फाईल्स कशा बर्न कराव्यात हे शिकणार आहोत.
00:14 हेदेखील शिकू. सेटिंग्स बदलणे
00:17 प्रोजेक्ट सेव्ह करणे आणि 'CD' ला नाव देणे.
00:21 आपण k3b सोबत काय करू शकतो ?
00:24 CD/DVD वर फाईल्स तयार आणि बर्न करण्यास k3b चा वापर होतो.
00:30 बर्निंग फाईल्स म्हणजे डेस्कटॉप वरुन फाईल्स CD/DVD वर कॉपी करणे.
00:37 ऑडियो, व्हिडियो किंवा डेटा बर्न करण्यासाठी k3b सर्व फाईल फॉरमॅट्सला समर्थन करते.
00:44 येथे आपण 'उबंटू लिनक्स' 12.04. वर K3b 2.0.2 वापरत आहोत.
00:54 या ट्युटोरियलसाठी ड्राईव्हमध्ये CD किंवा एक DVD निविष्ट केली आहे का याची खात्री करून घ्या.
01:01 Myk3bCD फोल्डरमध्ये मी ऑडियो फाईलदेखील समाविष्ट केली आहे.
01:09 आपण उबंटू डेस्कटॉप वर हा फोल्डर पूर्वीच बनवून सेव्ह करून ठेवला आहे.
01:16 ह्या फोल्डरमध्ये मी Learningk3b ऑडियो फाईल समाविष्ट केली आहे.
01:21 तुम्ही तुमच्या आवडीची कोणतीही ऑडियो फाईल वापरू शकता.
01:26 प्रथम आपल्या संगणकावर, डेस्कटॉपवरील डाव्या कोपर्‍यात असलेले गोल बटण Dash Home वर क्लिक करा.
01:35 सर्च बॉक्स दिसेल.
01:37 k3b टाईप करा.
01:40 K3b चा आयकॉन दिसेल.
01:44 ऍप्लिकेशन उघडण्यास त्यावर क्लिक करा.
01:47 k3b वापरून CD तयार आणि बर्न करू.
01:52 यासाठी, New Project आयकॉनवर क्लिक करा.
01:55 दिसत असलेल्या ड्रॉप-डाऊनमधून New Data Project निवडा.
02:01 वरच्या डाव्या पॅनलवरून Home folder निवडा.
02:05 आपण Home folder मध्ये फाईल्स आणि फोल्डर्स पाहू शकतो .
02:11 नंतर Desktop वर क्लिक करा.
02:15 आपल्या मशीनवर कोणतेही फोल्डर किंवा फाईल निवडू शकतो.
02:20 या निर्देशनासाठी, मी Myk3bCD चा फोल्डर निवडेन.
02:26 Myk3bCD फोल्डरवर राईट क्लिक करा.
02:31 आणि Add to Project पर्याय निवडा.
02:35 आपण खालच्या पॅनेलमध्ये निवडलेले फोल्डर पाहू शकतो.
02:41 पुढे आपण CD वर एक फोल्डर तयार करून त्यात Myk3bCD चा फोल्डर स्थलांतरित करूया.
02:49 खाली डाव्या पॅनलवर राईट क्लिक करा.
02:52 दिसत असलेल्या पर्यायांच्या सूचीमधून New Folder निवडा.
02:58 आपण डायलॉग बॉक्स पाहू शकतो.
03:00 टेक्स्ट बॉक्समध्ये FolderOne टाईप करा.
03:05 OK क्लिक करा.
03:07 खालच्या पॅनलमधून, Myk3bCD निवडा.
03:11 नंतर Writer1 फाईल निवडा.
03:15 निवडलेली Writer1 फाईल ड्रॅग करून FolderOne मध्ये ड्रॉप करा.
03:21 Writer1 फाईल कॉपी झाली आहे का ते तपासण्यास, FolderOne वर क्लिक करू.
03:28 येथे आपण Writer1 फाईल पाहू शकतो.
03:33 खालच्या पॅनेलमधून, Burn आयकॉनवर क्लिक करा.
03:39 Data Project – k3b विंडो दिसते.
03:44 पुढे, Data Project – k3b विंडोमधील सेटिंग्स बदलू.
03:50 येथे Writing टॅब निवडून, Writing Mode च्या अंतर्गत Auto निवडणार आहोत.
03:56 लक्षात घ्या, Auto हे डीफॉल्ट सेटिंग आहे.
04:01 आता Filesystem टॅब निवडू.
04:05 हे डीफॉल्टनुसार Linux/Unix+Windows म्हणून सेट केलेले आहे.
04:11 त्यामुळे येथे काही बदल करण्याची गरज नाही.
04:16 आता, आपण Misc टॅबवर जाऊ.
04:20 आणि येथे Multisession च्या अंतर्गत Auto निवडा.
04:24 CD मध्ये डेटा बर्न करण्यास, Burn निवडा.
04:30 बर्निंगची प्रक्रिया सुरू होते.
04:33 येथे, आपण विंडोमध्ये प्रोग्रेस स्टेटस बार पाहू शकतो.
04:38 बर्निंग पूर्ण झाल्यानंतर, CD आपोआप बाहेर येते.
04:43 फाईल्स आता CD वर कॉपी झाल्या आहेत.
04:47 येथे बर्निंगची प्रक्रिया पूर्ण झाली.
04:51 दुसर्‍या CD वर ऑडियो फाईल्स बर्न आणि सेव्ह करू.
04:56 प्रथम खात्री करून घ्या की, एक नवीन CD निविष्ट केली असून ड्राईव्ह बंद आहे.
05:03 पूर्वीसारखेच, New Project वर जाऊन New Audio CD Project निवडा.
05:09 येथे, वर डाव्या पॅनलमधून Myk3bCD फोल्डर ब्राऊज करा.
05:17 आता वर उजव्या पॅनेलमधून Learningk3b ऑडियो फाईल निवडू.
05:25 नंतर , ऑडियो फाईल ड्रॅग करून खालच्या उजव्या पॅनलवर ड्रॉप करा.
05:31 आपण योग्य फाईल ड्रॅग आणि ड्रॉप केली आहे का ते तपासू.
05:35 खालच्या पॅनलमध्ये, येथे फाईलीचे तपशील तपासू शकता.
05:40 या फाईलसाठी, दर्शविलेले Artist, Title आणि File name पाहू शकतो.
05:47 आता, हा ऑडियो कसा बर्न करावा हे शिकू.
05:52 यासाठी, मुख्य टूलबारमधून Save क्लिक करा.
05:56 आपण Save As – k3b विंडो पाहू शकतो.
06:00 येथे, टेक्स्ट बॉक्समध्ये आपल्या प्रोजेक्टसाठी एक नाव टाईप करा.
06:05 मी MyWork टाईप करून Save वर क्लिक करेल.
06:12 Burn वर क्लिक करा.
06:15 हे Audio Project – k3b विंडो उघडते.
06:20 येथे, आपण डिफॉल्ट टॅब सेटिंग वापरू शकतो.
06:24 परंतु आपण आपल्या गरजेनुसार, टॅबमध्ये बदल करू शकतो.
06:30 आता, पुन्हा Burn वर क्लिक करा.
06:34 आपण प्रोग्रेस स्टेटस विंडो पाहू शकतो.
06:37 आणि बर्निंग पूर्ण झाल्यानंतर CD बाहेर येते.
06:43 याचा अर्थ ऑडियो फाईलचे सेविंग आणि बर्निंग पूर्ण झाले आहे.
06:49 k3b वापरून Creating and burning CD/DVD वरील ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
06:57 या ट्यूटोरियलमध्ये आपण k3b इंटरफेसविषयी जाणून घेतले.
07:02 आपण हे देखील शिकलो : स्वतः फाईल्स कशा निवडाव्या
07:07 वेगवेगळ्या फाईल्सच्या स्वरुपात CD बर्न करणे.
07:10 प्रोजेक्ट सेव्ह करणे.
07:12 CD ला नाव देणे.
07:15 येथे तुमच्यासाठी असाइनमेंट आहे.
07:17 CD वर दोन ऑडियो फाईल्स बर्न करा.
07:21 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. (पहा.)
07:24 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा (प्रोजेक्टचा) सारांश मिळेल.
07:28 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07:32 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट (प्रोजेक्ट) टीम,
07:35 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07:38 परीक्षा उत्तीर्ण होणा-या (होणार्‍या) विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07:42 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
07:48 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा (प्रोजेक्टचा) भाग आहे.
07:52 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08:00 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08:10 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana