Jmol-Application/C3/Surfaces-and-Orbitals/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | Jmol अप्लिकेशनमधील Surfaces and Orbitals वरील ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:07 | ह्यात आपण शिकणार आहोत. |
00:10 | Alicyclic आणि Aromatic रेणूंचे मॉडेल्स तयार करणे. |
00:14 | रेणूंचे विविध सर्फेसस दाखवणे. |
00:18 | अटॉमिक आणि मॉलिक्युलर ऑर्बिटल्स दाखवणे. |
00:22 | हा पाठ समजण्यासाठी तुम्हाला, Jmol अप्लिकेशनमध्ये रेणू मॉडेल्स कसे तयार करावे आणि एडिट करावे हे माहीत असावे. |
00:29 | नसल्यास, संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या. |
00:35 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे, |
00:38 | 'उबंटू' OS वर्जन 12.04 |
00:42 | Jmol वर्जन 12.2.2 आणि |
00:45 | Java (JRE) वर्जन 7 |
00:48 | मी एक नवीन Jmol अप्लिकेशन विंडो उघडली आहे. |
00:52 | प्रथम आपण cyclohexane चे मॉडेल तयार करू. |
00:56 | modelkit मेनूवर क्लिक करा. |
00:59 | पॅनेल वर 'methane (मिथेनचे)' चे मॉडेल दिसते. |
01:03 | cyclohexane तयार करण्यास, आपल्याला सहा कार्बन अणूंची हायड्रोकार्बन साखळी बनवायची आहे. |
01:09 | आपण मॉडेलमध्ये हायड्रोजनला मिथाईल गटाशी बदलू. |
01:13 | असे करण्यासाठी, hydrogen वर कर्सर नेऊन त्यावर क्लिक करू. |
01:18 | स्क्रीनवर हे ethane चे मॉडेल आहे. |
01:21 | ही पद्धत दोन वेळा पुन्हा करा आणि एकाच वेळी हायड्रोजनला मिथाईल गटाशी बदला. |
01:28 | 'हायड्रोजन्स' वर अशा प्रकारे क्लिक करा की स्ट्रक्चर एक वर्तुळ बनवेल. |
01:33 | आता Rotate molecule टूल वापरुन स्क्रीनवर स्ट्रक्चर फिरवू. |
01:38 | पॅनेलवर हे butane(ब्यूटेन) चे स्ट्रक्चर आहे. |
01:41 | modelkit मेनूवर क्लिक करा. |
01:45 | चैनीच्या शेवटी असलेल्या कोणत्याही 'कार्बन' अणूच्या 'हायड्रोजन' वर क्लिक करा. |
01:52 | इथे 'पॅनेल' वर pentane(पॅन्टेन) चे मॉडेल आहे. |
01:55 | कार्बन चैनीच्या शेवटी जवळ असलेल्या हायड्रोजन्समधून कोणत्याही एका हायड्रोजनवर क्लिक करा. |
02:00 | 'पॅनेल'वर cyclohexane(सायक्लोहेक्झेन) चे मॉडेल तयार केले आहे. |
02:04 | स्ट्रक्चर अनुकूल करण्यास, modelkit मेनूमधील minimize पर्याय वापरा. |
02:09 | आता Cyclohexane(सायक्लोहेक्झेन) चे मॉडेल, आपली सर्वात स्थिर “chair” कान्फॉर्मेशन मध्ये आहे . |
02:15 | वैकल्पिकपणे, 'cyclic structures' तयार करण्यासाठी आपण, modelkit मेनूमधील "Drag to bond" पर्यायदेखील वापरु शकतो. |
02:24 | हे वैशिष्ट्य दर्शवण्यासाठी मी pentane(पॅन्टेन) च्या मॉडेलचा वापर करून दाखवेन. |
02:29 | पॅनलवर हे pentane (पॅन्टेन) चे मॉडेल आहे. |
02:32 | cyclopentane रुपांतरीत करण्यासाठी, modelkit (मॉडेलकिट) मेनूमधून Drag to bond पर्याय निवडा. |
02:40 | कर्सरला चैनीच्या शेवटी असलेल्या कार्बनवर नेऊन ठेवा. |
02:45 | माऊस बटण दाबून ठेवा. |
02:47 | माऊस बटण न सोडता, चैनीच्या दुसर्या टोकावर असलेल्या कार्बनपर्यंत कर्सर आणा. |
02:54 | आता माऊस बटण सोडून द्या. |
02:57 | पॅनलवर आपल्याकडे 'cyclopentane चे मॉडेल आहे. |
03:01 | आता cyclohexane च्या मॉडेलसह Jmol पॅनेलवर परत जाऊ. |
03:06 | आता cyclohexane ला benzene रिंगमध्ये बदलू . |
03:10 | आपल्याला cyclohexane रींगमध्ये ऑल्टर्नेट पोझिशन्स वर डबल बॉन्ड्स लावायचे आहे . |
03:16 | modelkit मेनू उघडा. |
03:19 | कोणत्याही दोन 'कार्बन' अणू यांच्यामध्ये कर्सर ठेवा आणि त्यावर क्लिक करा. |
03:25 | आता आपल्याकडे 'पॅनेल' वर cyclohexene आहे. |
03:29 | पुढे, हे benzene मध्ये बदलण्यासाठी, आपल्याला स्ट्रक्चरमध्ये आणखीन दोन डबल बॉन्ड्स लावण्याची गरज आहे. |
03:36 | पुढील दोन ऑल्टर्नेट 'कार्बन' अणू यांच्यामधील बॉन्डवर क्लिक करा. |
03:41 | पॅनेलवर आपल्याकडे benzene चे मॉडेल आहे. |
03:44 | स्थिर कान्फॉर्मेशन मिळवण्यासाठी एनर्जी मिनिमाइज़ेशन करा. |
03:49 | Jmol अप्लिकेशन वापरून रेणूंची Surface topology दाखवली जाऊ शकते. |
03:56 | विविध सर्फेसेस पाहण्यासाठी, pop-up (पॉपअप) मेनू उघडा. |
04:01 | खात्री करून घ्या की modelkit मेनू बंद झाला आहे, जर हे उघडे असेल. |
04:06 | पॉप-अप मेनू उघडण्यासाठी, पॅनेलवर राईट क्लिक करा. |
04:10 | खाली स्क्रोल करा आणि '"Surfaces"' निवडा. |
04:14 | अनेक पर्यायासह एक sub-menu उघडते. |
04:18 | Dot Surface |
04:20 | van der Waal's, आणि काही इतर. |
04:23 | प्रदर्शन करण्यासाठी, मी Molecular surface निवडेन. |
04:28 | Benzene चा मॉडेल molecular surface सह प्रदर्शित होतो. |
04:33 | आता हे एका दुसर्या सर्फेसमध्ये बदलू, जसे Dot Surface |
04:38 | त्यासाठी, पॉप-अप मेनू पुन्हा उघडा आणि Dot Surface निवडा. |
04:44 | आपण सर्फेसना ओपेक किंवा ट्रांस्लूसेंट देखील बनवू शकतो. |
04:48 | असे करण्यासाठी, पॉप-अप मेनू उघडा. |
04:52 | Surfaces पर्यंत खाली स्क्रोल करून Make Opaque पर्याय निवडा. |
04:59 | लक्षा द्या की, benzene मॉडेल ओपेक झाले आहे. |
05:03 | सरफेस पर्याय बंद करण्यासाठी, पॉप-अप मेनू उघडा, Surfaces निवडा. |
05:10 | Off पर्यंत खाली स्क्रोल करून त्यावर क्लिक करा. |
05:15 | आता, कोणत्याही सर्फेसेसशिवाय आपल्याकडे benzene चे मॉडेल आहे. |
05:20 | Jmol, रेणूंचे अटॉमिक आणि मॉलेक्युलर ऑर्बिटल्स प्रदर्शित करू शकतो. |
05:25 | 'कंसोल' वर कमांडस् लिहून स्क्रीनवर ऍटोमिक ऑर्बिटल्स प्रदर्शित केले जाऊ शकतात. |
05:32 | File आणि New वर क्लिक करून एक नवीन Jmol विंडो उघडा. |
05:37 | आता 'कंसोल' विंडो उघडण्यासाठी, File वर क्लिक करून नंतर Console वर क्लिक करा. |
05:43 | स्क्रीनवर 'कंसोल' विंडो उघडते. |
05:47 | 'कंसोल' विंडो मॅग्निफाइ करण्यासाठी , मी KMag Screen magnifier वापरत आहे. |
05:53 | अटॉमिक ऑर्बिटल्ससाठी कमांड लाईन isosurface phase atomicorbital ने सुरू होते. |
06:00 | डॉलर प्रॉम्प्टवर टाईप करा , isosurface phase atomicorbital. |
06:06 | हे क्वांटम नंबर्स 'n', 'l' आणि 'm' च्या नंतर येतो जे प्रत्येक 'अटॉमिक ऑर्बिटल' साठी विशिष्ट आहेत. |
06:14 | s orbital प्रदर्शित करण्यासाठी, टाईप करा 2 0 0 |
06:20 | नंबर्स 2, 0, 0अनुक्रमे: 'n', 'l' आणि 'm' क्वांटम नंबर्स दर्शवतात. |
06:27 | कमांड कार्यान्वित करण्यासाठी, 'एंटर' की दाबा . |
06:31 | आपल्याकडे पॅनेलवर s orbital प्रदर्शित आहे. |
06:35 | येथे 'अटॉमिक ऑर्बिटल्स' आणि संबंधित 'स्क्रिप्ट कमांडस्' ची काही अधिक उदाहरणे आहेत. |
06:41 | कमांड लाईन सर्व 'अटॉमिक ऑर्बिटल्स' साठी समान आहे. |
06:45 | 'कंसोल' वर आधीची कमांड दाखवण्यासाठी, कीबोर्डवरील अप एरो की दाबा. |
06:51 | क्वांटम नंबर्स 'n', 'l' आणि 'm' ला एडिट करून 2 1 1 करा. |
06:58 | 'एंटर' की दाबा आणि Jmol पॅनेलवर 'px ऑर्बिटल पाहा. |
07:05 | अप एरो की पुन्हा दाबा आणि 'n', 'l' आणि 'm' ला एडिट करून '3', '2' आणि -1 करा. |
07:13 | 'एंटर' की दाबा आणि Jmol पॅनेलवर dxy ऑर्बिटल पाहा. |
07:19 | आपण हे इमेजेस विविध फाईल स्वरुपातदेखील सेव्ह करू शकतो, जसे jpg, png किंवा pdf |
07:27 | येथे सर्व 'अटॉमिक ऑर्बिटल्स' साठी कमांडस् ची सूची आहे (s, p, d आणि f). |
07:35 | ह्या स्लाईडवर दाखवले गेलेले मॉडेल्स 'अटॉमिक ऑर्बिटल्स' चे आहेत. |
07:40 | हे 'कंसोल' वर लिहिलेल्या 'स्क्रिप्ट कमांड्स' च्या मदतीने तयार केले होते. |
07:45 | 'मॉलेक्युलर ऑर्बिटल्स' कसे प्रदर्शित करायचे हे दाखविण्यासाठी येथे मी एक नवीन Jmol पॅनेल आणि 'कंसोल' उघडले आहे. |
07:53 | Jmol वापरून Hybridized 'मॉलेक्युलर ऑर्बिटल्स' जसे की sp3, sp2 आणि sp प्रदर्शित केले जाऊ शकतात . |
08:02 | आपल्याकडे पॅनेलवर methane(मिथेन) चे मॉडेल आहे. |
08:06 | 'मिथेन' sp3 टाईप चे 'मॉलिक्यूलर ऑर्बिटल्स' ठेवतो. |
08:11 | Linear Combination of Atomic Orbitals म्हणजे LCAO मेथड 'मॉलिक्यूलर ऑर्बिटल्स' तयार करण्यासाठी वापरली जाते. |
08:21 | अतः, कमांड लाईन lcaocartoon च्या नंतर create आणि ऑर्बिटल च्या नावा सह सुरू होते. |
08:30 | डॉलर प्रॉम्प्ट वर टाईप करा lcaocartoon create sp3. |
08:36 | 'एंटर' दाबा. |
08:38 | sp3 hybridized 'मॉलिक्यूलर ऑर्बिटल्स' सह 'मिथेन' चे मॉडेल पहा. |
08:45 | sp2 hybridized 'मॉलिक्यूलर ऑर्बिटल्स' पाहण्यासाठी, आपण एक उदाहरण म्हणून ethene घेऊ. |
08:52 | पॅनेलवर हे ethene चे रेणू आहे. |
08:56 | Ethene रेणूमध्ये तीन 'sp2 hybridized 'मॉलिक्यूलर ऑर्बिटल्स'आहेत. त्याचे नाव sp2a, sp2b आणि sp2c आहेत. |
09:08 | डॉलर प्रॉम्प्टवर, टाईप करा 'lcaocartoon create sp2a', 'एंटर' दाबा. |
09:17 | पॅनेलवर ethene मॉडेलवर sp2 ऑर्बिटल पहा. |
09:22 | अप एरो की दाबा आणि sp2a ला sp2b ने बदला, 'एंटर' दाबा. |
09:31 | पुन्हा, अप एरो की दाबा आणि sp2b ला sp2c ने बदला, 'एंटर' दाबा. |
09:41 | अंततः pi bond साठी, ऑर्बिटलचे नाव एडिट करून pz करा. |
09:48 | पॅनेलवर, सर्व 'मॉलिक्यूलर ऑर्बिटल्स' सह आपल्याकडे ethene रेणू आहे. |
09:55 | हे स्लाइड 'मॉलिक्यूलर ऑर्बिटल्स' सह काही इतर रेणूंचे उदाहरण दाखवते. |
10:01 | अधिक माहितीसाठी, Jmol स्क्रिप्ट' डॉक्यूमेंटेशन ची वेबसाईट पहा. |
10:08 | थोडक्यात |
10:10 | ह्या पाठात आपण शिकलो |
10:12 | cyclohexane आणि cyclopentane चे मॉडेल तयार करणे. |
10:17 | benzene चे मॉडेल तयार करणे. |
10:19 | रेणूंची surface topology दाखवणे. |
10:23 | आपण हे देखील शिकलो, अटॉमिक ऑर्बिटल्स (s, p, d, f) दर्शवणे. |
10:29 | 'कंसोल' वर स्क्रिप्ट कमांड्स लिहून 'मॉलिक्यूलर ऑर्बिटल्स' (sp3, sp2 and sp) दर्शवणे. |
10:38 | असाईनमेंटसाठी |
10:40 | 2-Butene चा मॉडेल तयार करणे आणि 'मॉलिक्यूलर ऑर्बिटल्स' दर्शवणे. |
10:45 | 'मॉलिक्यूलर ऑर्बिटल्स' चे रंग आणि आकार बदलण्यासाठी lcaocartoon कमांड तपासा. |
10:52 | कमांड्सच्या सूचीसाठी खालील लिंक पहा. |
10:57 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
11:01 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
11:04 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
11:09 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम: |
11:11 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
11:15 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
11:19 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
11:26 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
11:30 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
11:37 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
11:42 | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद. |