Jmol-Application/C3/Script-Console-and-Script-Commands/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | Jmol अप्लिकेशनमधील Script console and script commands वरील ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:08 | ह्यात आपण शिकणार आहोत, |
00:11 | script commands बद्दल. |
00:13 | script console विंडो कसे वापरावे. |
00:16 | script commands वापरून मॉडेलचे डिस्प्ले बदलणे. |
00:21 | पॅनलवर टेक्स्टच्या लाइन्स दर्शवणे. |
00:24 | हा पाठ समजण्यासाठी तुम्हाला, |
00:26 | Jmol अप्लिकेशनमधील रेणूतील मॉडेल्सला कसे तयार आणि एडिट करणे माहीत असले पाहिजे. |
00:32 | नसल्यास, संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या. |
00:37 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी वापरत आहे |
00:39 | 'उबंटू' OS वर्जन 12.04 |
00:44 | Jmol वर्जन 12.2.2 |
00:47 | Java वर्जन 7 |
00:51 | खालील गोष्टी वापरून Jmol पॅनेलवरील डिसप्ले संपादित केला जाऊ शकतो. |
00:55 | मेनूबारमधील पर्याय |
00:57 | पॉप-अप मेनूमधील पर्याय किंवा |
01:00 | स्क्रिप्ट 'कंसोल' वर स्क्रिप्टींग कमांड्सद्वारे. |
01:04 | आपण आधीच्या ट्यूटोरियल्समध्ये, मेनू बार आणि पॉप-अप मेनू वापरून डिसप्ले रुपांतरीत करण्यास शिकलो होतो. |
01:13 | या ट्युटोरियलमध्ये आपण स्क्रिप्ट कमांड्सचा वापर करण्यास शिकू. |
01:18 | कमांड्स च्या सेट ला स्क्रिप्ट कमांड म्हटले जाते. |
01:22 | स्क्रिप्ट कमांड्स पॅनेलवर मॉडेलचा डिस्प्ले नियंत्रित करतात. |
01:27 | RasMol प्रोग्रामवर आधारित भाषा Jmol कमांड वापरते. |
01:32 | अशा प्रकारचे कमांड्स लिहिणे याला स्क्रिप्टिंग म्हणतात. |
01:36 | Jmol च्या स्क्रिप्टिंग लॅंग्वेजचे डॉक्युमेंटेशन आणि कमांड्सची सूची ह्या साईटवर उपलब्ध आहे. |
01:44 | आता स्क्रिप्ट कमांड्स कसे वापरावे: |
01:47 | स्क्रिप्ट कन्सोल विंडोवर स्क्रिप्ट कमांड्स टाईप केले जातात. |
01:53 | स्क्रिप्ट'कंसोल Jmol ची कमांड लाईन इंटरफेस आहे. |
01:58 | हे मेनूबार वर 'फाईल' आणि 'कंसोल' पर्यायामध्ये उपलब्ध आहे. |
02:03 | स्क्रिनवर प्रोपेनच्या मॉडेलसह Jmol अप्लिकेशन विंडो आहे. |
02:08 | आता डिस्प्ले बदलण्यासाठी स्क्रिप्ट कंसोल चा वापर करण्यास शिकू. |
02:12 | स्क्रिप्ट कंसोल' विंडो उघडण्यासाठी , मेनू बारमधील File मेनूवर क्लिक करा. |
02:19 | ड्रॉप-डाऊनमध्ये खाली स्क्रोल करून Console वर क्लिक करा. |
02:24 | स्क्रीनवर Jmol स्क्रिप्ट 'कंसोल' विंडो उघडते. |
02:29 | स्क्रिप्ट कंसोल विंडोमध्ये कमांड्स टाईप करण्यास एक टेक्स्ट एरिया आहे. |
02:34 | विंडोच्या तळाशी, स्क्रिप्ट एडिटर विंडो उघडण्यासाठी एक बटण आहे. |
02:40 | ह्या विंडोवर वेरियबल्स, क्लियर, हिस्टरी आणि स्टेट, नामक इतर बटणेदेखील आहेत. |
02:49 | उपलब्ध असलेल्या 'स्क्रिप्ट कमांड्स' ची सूची दर्शवणारे पान उघडण्यासाठी Help बटणावर क्लिक करा. |
02:57 | ही विंडो बंद करण्यासाठी OK बटणावर क्लिक करा. |
03:01 | आता काही साधे स्क्रिप्ट कमांड्स लिहिण्याचा प्रयत्न करू. |
03:05 | हे कमांड्स कसे लिहावेत. |
03:08 | 'स्क्रिप्ट कंसोल' विंडोवर $ (डॉलर) प्रॉम्प्ट नंतर कमांड टाईप करा. |
03:13 | 'स्क्रिप्ट कमांड्स' ची सुरवात 'कमांड वर्ड' ने होते. |
03:17 | स्पेसेसने वेगळे केलेले पॅरामीटर्सच्या सेट सह चालू राहते. |
03:22 | आणि 'एंड ऑफ लाईनकॅरक्टर' किंवा 'सेमीकोलनने समाप्त होते. |
03:27 | जोवर तुमचे कमांड टाईप करून पूर्ण होत नाही तोपर्यंत कमांड लाल दिसेल. |
03:33 | कमांड सक्रिय करण्यास, कीबोर्डवरील Enter की दाबा. |
03:37 | 'कंसोल' मॅग्निफाय करण्यासाठी मी 'Kmag स्क्रिन मैग्निफायर' वापरत आहे. |
03:44 | उदाहरणार्थ, प्रोपेनमधील सर्व कार्बन्सचे रंग नारंगीमध्ये बदलण्यासाठी कर्सर 'स्क्रिप्ट कंसोल' विंडोवर नेऊन ठेवा. |
03:53 | डॉलर प्रॉमप्टवर, टाईप करा select carbon semicolon color atoms orange |
04:05 | कीबोर्डवरील Enter की दाबा. |
04:08 | पॅनलवरील प्रोपेन मॉडेलमध्ये आता सर्व कार्बन्स नारंगी रंगात आहेत. |
04:14 | आता सर्व बॉण्ड्सचे रंग निळ्या रंगात बदलू. |
04:18 | डॉलर प्रॉमप्टवर टाईप करा. |
04:20 | select all bonds semicolon color bonds blue |
04:26 | एंटर दाबा. |
04:29 | लक्ष द्या, आता प्रोपेन मॉडेलमधील सर्व बॉन्ड्स निळ्या रंगात आहेत. |
04:35 | पुढे, आपण बॉन्ड्सचे आकार बदलू. |
04:39 | डॉलर प्रॉमप्टवर, टाईप करा wireframe 0.05. |
04:45 | angstromsमध्ये बॉण्ड्सचे रेडियस स्पेसिफाई करण्यासाठी डेसिमल नंबर वापरला जातो. एंटर दाबा |
04:53 | प्रोपेने मॉडेलमधील बॉन्डसच्या आकारातील बदल लक्षात घ्या. |
04:58 | त्याचप्रमाणे, बॉन्ड्सचा आकार वाढवण्यासाठी, प्रॉमप्टवर, टाईप करा wireframe 0.1. |
05:07 | पुन्हा एकदा, बॉन्डसच्या आकारातील बदल लक्षात घ्या. |
05:12 | अणूंचा आकार बदलण्यासाठी, आपण डेसिमल नंबरानंतर असलेल्या 'spacefill कमांडचा वापर करू. |
05:20 | डॉलर प्रॉमप्टवर, टाईप करा spacefill 0.2 |
05:26 | डेसिमल नंबर अणूचा रेडियस angstroms मध्ये दर्शवत आहे. |
05:30 | एंटर दाबा |
05:33 | लक्ष द्या, प्रोपेन रेणूमध्ये अणूंचा आकार कमी होतो. |
05:39 | त्याचप्रमाणे, अणूंचा आकार वाढविण्यासाठी टाईप करा: |
05:43 | spacefill 0.5 |
05:46 | एंटर दाबा |
05:48 | तुम्ही अणूंच्या आकारात बदल पाहू शकता. |
05:51 | वैकल्पिकपणे, आपण कमांड cpk नंतर पर्सेंटेज किंवा डेसिमल नंबरदेखील वापरू शकता. |
05:59 | हे पर्सेंटेज अणूची vanderwaals रेडियस प्रस्तुत करते. |
06:04 | उदाहरणार्थ, टाईप करा cpk 20% आणि एंटर दाबा. |
06:11 | अणूंच्या आकारातील बदलाकडे लक्ष द्या. |
06:15 | Jmol पॅनेलवर टेक्स्टच्या लाइन्स प्रदर्शित करण्यासाठी, कमांड्स लिहीणे शक्य आहे. |
06:22 | टेक्स्टसाठी कमांड लाईन 'set echo ने सुरू होते. |
06:27 | स्क्रीनवर हे टेक्स्टच्या स्थितीनंतर येते. |
06:31 | उदाहरणार्थ, पॅनेलच्यावर मध्यभागी रेणूचे नाव प्रोपेन म्हणून प्रदर्शित होईल. |
06:39 | त्यामुळे, टाईप करा set echo top center semicolon echo Propane आणि एंटर दाबा. |
06:48 | आपण पाहू शकता की पॅनेलच्यावर मध्यभागी प्रोपेनचे टेक्स्ट प्रदर्शित झाले आहे. |
06:54 | पॅनलवर आपण टेक्स्टच्या इतर लाईन्सदेखील प्रदर्शित करू शकतो. |
06:58 | उदाहरणार्थ, मला पॅनलखाली डाव्या कोपर्यात काही टेक्स्ट हवेत. |
07:04 | डॉलर प्रॉमप्टवर, |
07:06 | टाईप करा set echo bottom left semicolon echo This is a model of Propane. |
07:15 | एंटर दाबा |
07:17 | आपण पॅनलच्या खाली डाव्या कोपऱ्यात टेक्स्ट लाईन पाहू शकतो. |
07:22 | प्रदर्शित केलेल्या टेक्स्टचे रंग, आकार आणि फॉन्ट बदलणेदेखील शक्य आहे. |
07:29 | उदाहरणार्थ, मला टेक्स्ट Arial Italic फॉन्टमध्ये हवा आहे. |
07:34 | डॉलर प्रॉम्प्टवर टाईप करा font echo 20 Arial italic |
07:42 | एंटर दाबा, हे टेक्स्ट Arial Italic फॉन्टमध्ये बदलेल. |
07:48 | टेक्स्टचा रंग बदलण्यासाठी, आपण 'color echo' नंतर रंगाचे नाव वापरू. |
07:55 | त्यामुळे, टाईप करा color echo yellow आणि एंटर दाबा. |
08:01 | फॉन्टच्या रंगातील बदल लक्षात घ्या. |
08:05 | अशाचप्रकारे, तुम्ही अनेक कमांड्स शोधू शकता आणि बदलांचे निरीक्षण करू शकता. |
08:11 | थोडक्यात. |
08:13 | ह्या पाठात आपण शिकलो आहोत, |
08:15 | स्क्रिप्ट कमांड्स आणि |
08:17 | 'स्क्रिप्ट कंसोल', आपण हेदेखील शिकलो आहोत, |
08:19 | 'स्क्रिप्ट कमांड्स' वापरून मॉडेलची डिसप्ले प्रॉपर्टीस बदलणे आणि |
08:24 | पॅनलवर डिसप्लेच्या लाईन्स दाखवणे. |
08:28 | असाईनमेंट |
08:30 | 3-methyl-pentane चे मॉडेल तयार करणे. |
08:33 | खालीलप्रमाणे करण्यासाठी, स्क्रिप्ट कमांड्स वापरणे. |
08:36 | सर्व हायड्रोजन्सचे रंग निळ्या रंगात बदलणे. |
08:40 | सर्व बॉन्ड्सचे रंग 'लाल' मध्ये बदलणे. |
08:43 | आणि स्पिनसाठी रेणू सेट करा. |
08:46 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
08:49 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
08:52 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
08:57 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
08:59 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
09:02 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
09:06 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
09:13 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
09:17 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
09:24 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
09:30 | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद. |