Jmol-Application/C2/Introduction-to-Jmol-Application/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 नमस्कार, Jmol अप्लिकेशनच्या प्राथमिक ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:07 ह्या ट्युटोरियलमध्ये मी थोडक्यात स्पष्ट करेन:
00:11 Jmol अप्लिकेशन विंडो आणि काही बेसिक ऑपरेशन्स.
00:16 पुढे शिकणार आहोत
00:18 ”’मेनू बार, टूल बार आणि Jmol पॅनल.
00:22 'Jmol' पॅनलचा आकार कसा रुपांतरीत कराल.
00:25 साध्या सेंद्रिय रेणूंचे मॉडेल्स तयार करणे.
00:28 हाइड्रोजन च्या जागी 'Methyl' गट बदलून रेणू तयार करणे.
00:34 आपण हेदेखील शिकणार आहोत.
00:36 स्थिर कन्फर्मेशन प्राप्त करण्यासाठी एनर्जी मिनिमाइज करणे.
00:41 आणि इमेज .mol file म्हणून सेव्ह करणे.
00:45 ह्या ट्युटोरियलचे अनुसरण करण्यास, आपणास,
00:49 माध्यमिक शाळेचे रसायनशास्त्र, प्राथमिक सेंद्रिय रसायनशास्त्राचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
00:53 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरात आहे,
00:56 "उबंटू" ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 12.04,
01:00 Jmol वर्जन 12.2.2
01:03 आणि Java वर्जन 7
01:06 कृपया लक्षात घ्या. Jmol अप्लिकेशन सहजतेने रन करण्यासाठी आपल्या सिस्टमवर Java स्थापित असले पाहिजे.
01:14 Jmol अप्लिकेशनबद्दल माहिती.
01:17 हे फ्री आणि ओपन सोर्स 'Molecular Viewer' आहे.
01:21 केमिकल स्ट्रक्चरचे 3 डायमेंशनल मॉडेल्स तयार करण्यासाठी आणि पाहण्यासाठी वापरले जाते.
01:27 तसेच 'proteins' आणि 'macromolecules' चे सेकेंडरी स्ट्रक्चर्स पाहण्यासाठीदेखील वापरले जाते.
01:33 डाऊनलोड आणि इंस्टॉलेशनसंबंधित माहिती.
01:37 उबंटू OS करिता 'Ubuntu Software Center' चा वापर करून 'Jmol' चे इंस्टॉलेशन(प्रतिष्ठापन) केले जाते.
01:45 कृपया आमची वेबसाइट www.spoken-tutorial.org वर 'Linux' सिरीजमधील ह्या ट्युटोरियल चे अनुसरण करा.
01:56 विंडोज, Mac OS आणि Android डिव्हाइसवरील इंस्टॉलेशनकरीता, कृपया www.jmol.sourceforge.net वर जा.
02:08 आणि संकेतस्थळावर इंस्टॉलेशनच्या सुचनांचे पालन करा.
02:13 मी आधीच 'Ubuntu Software Center' वापरून आपल्या सिस्टमवर Jmol अप्लिकेशन स्थापित केले.
02:20 'Jmol' अप्लिकेशन, उघडण्यासाठी 'Dash home' वर क्लिक करा.
02:24 सर्च बॉक्समध्ये Jmol टाईप करा.
02:27 Jmol आयकॉन स्क्रीनवर दिसेल.
02:30 Jmol अप्लिकेशन उघडण्यासाठी Jmol आयकॉनवर क्लिक करा.
02:35 Jmol अप्लिकेशनच्या विंडोवर 'menu bar' आहे.
02:40 'menu bar' खाली 'Tool bar' आहे.
02:43 येथे 'Display area' आहे, ज्याला Jmol पॅनल म्हटले जाते.
02:48 मेनू बारमध्ये विविध पर्याय आहेत, जसे फाईल, एडिट, डिसप्ले इत्यादी.
02:56 यापैकी प्रत्येक पर्यायाला विविध उप पर्याय आहेत.
03:00 इतर पर्यायांशिवाय, अणूंमधील अंतर मोजण्यासाठी Tools मेनूमध्ये टुल्स आहेत.
03:07 आपण नंतरच्या ट्यूटोरियलमध्ये हे पर्याय समजून घेणार आहोत.
03:12 Help मेनू Jmol अप्लिकेशनबद्दल भरपूर उपयुक्त माहिती ठेवतो.
03:18 हे एक यूज़र गाईडदेखील आहे ज्या मध्ये डॉक्यूमेंटेशन आहे.
03:23 'Tool bar' मध्ये अनेक मेनू आयकॉन्स आहेत.
03:27 मेनू आयकॉन्स काही फंक्शन्स ताबडतोब निष्पादीत करतो, जसे ओपन, सेव्ह, एक्सपोर्ट, प्रिंट इत्यादी.
03:37 येथे रोटेट, अणूचे सेट निवडणे, अंतराचे मोजमाप करणे इत्यादीसाठी आयकॉन्सचे सेट अहेत.
03:47 मॉलिक्यूलर मॉडेल्सला एडिट आणि बनवण्यासाठी “ modelkit " आयकॉनचा वापर केला जातो.
03:53 आपल्या गरजेप्रमाणे Jmol पॅनल रीसाईज करू शकतो.
03:58 कर्सरला विंडोच्या कोणत्याही कोपर्‍यात आणा, तोपर्यंत हा एरो इंडिकेटर मध्ये बदलेल.
04:04 आता विंडो तिरपी वरच्या किंवा खालच्या दिशेने ड्रॅग करून रिसाईज करा.
04:10 पॅनलचा आकार बदलण्यासाठी मेनू बारमधील डिसप्ले बारचा देखील वापर केला जाऊ शकतो.
04:16 'Display' मेनूवर क्लिक करून 'Resize' पर्याय निवडा.
04:20 एक डायलॉग बॉक्स उघडतो, ज्यात आपण width आणि height 'pixels' मध्ये स्पष्ट करू शकतो.
04:27 मला 800 by 600 पिक्सेल विंडो हवी आहे.
04:32 तर मी टाईप करेन 800 space 600 आणि OK बटणावर क्लिक करेन.
04:41 आता Jmol पॅनल 800 by 600 'pixels' मध्ये रीसाईज होतो.
04:47 आता काही सोप्या सेंद्रिय रेणूंचे मॉडेल्स तयार करूया.
04:53 Modelkit आपणास एनर्जी मिनिमाइज़ेशनच्या सह मॉडेल्सला रुपांतरीत करण्यास आणि बनवण्यासाठी अनुमती देते.
05:00 'टूल बार' मधील modelkit वर क्लिक करा.
05:04 पॅनलवर 'मीथेन' चा एक मॉडेल प्रदर्शित होतो.
05:07 Jmol पॅनलच्या वर डाव्या कोपर्‍यात एक मेनू प्रदर्शित होतो.
05:12 या मेनू ची वैशिष्ट्ये * सहजगत्या अणू ला एड, डिलिट आणि ड्रॅग करण्याची क्षमता यांच्यात समाविष्ट आहे.
05:19 फंक्शनल ग्रुप जोडणे.
05:21 बॉण्ड्स डिलीट, एड आणि रोटेट करणे.
05:25 एड हायड्रोजन्स, मिनिमाइज़ आणि सेव्ह फाईलस् इत्यादी.
05:30 मेनूतील विशिष्ट वैशिष्ट्य वापरण्यास, उपलब्ध चेक बॉक्सवर क्लिक करा.
05:35 'Modelkit' फंक्शन एका हायड्रोजन अणूला एका 'Methyl' गटासह बदलण्यास अनुमती देते.
05:41 ज्या हायड्रोजन अणू मध्ये आपल्याला बदल करायचे आहे त्यावर कर्सर न्या.
05:46 या हायड्रोजन अणूवर एक लाल रिंग प्रदर्शित होते.
05:50 अणूवर क्लिक करा.
05:52 तुम्ही पाहू शकता की एक Methyl गट जोडला गेला आहे.
05:56 'मिथेन' रेणू आता इथेनमध्ये रुपांतरित झाला आहे.
06:00 आधी केलेली स्टेप पुन्हा करू.
06:03 प्रोपेनचे मॉडेल मिळवण्यासाठी हायड्रोजन अणूवर क्लिक करा.
06:07 ह्या रेणूवर 'एनर्जी मिनिमाइझेशन' आपल्याला सर्वात स्थिर कान्फॉर्मेशन देईल.
06:13 'एनर्जी मिनिमाइझेशन' करण्यासाठी :
06:15 'model kit' मेनूमधील पर्यायावर खाली स्क्रोल करा.
06:19 'minimize' पर्यायावर क्लिक करा.
06:22 आता आपल्याकडे 'प्रोपेन रेणू' चे सर्वात स्थिर कान्फॉर्मेशन मॉडेल आहे.
06:28 हे स्ट्रक्चर .mol फाईल म्हणून सेव्ह करण्यासाठी, Modelkit मेनू उघडा.
06:33 मेनूवर खाली स्क्रोल करा आणि 'save file पर्यायवर क्लिक करा.
06:37 स्क्रीन वर 'Save' डायलॉग बॉक्स दिसते.
06:41 त्या फोल्डरवर क्लिक करा जेथे आपली फाइल सेव्ह करायची आहे.
06:45 मी आपली फाइल सेव्ह करण्यास 'Desktop' निवडते.
06:50 तर, 'Desktop' निवडा आणि Open बटणावर क्लिक करा.
06:54 'File Name' वर जा आणि टेक्स्ट बॉक्समध्ये 'Propane' टाईप करा.
06:59 Files of Type वर क्लिक करा आणि mol पर्याय निवडा.
07:03 आता, डायलॉग बॉक्सच्या तळाशी उजवीकडे 'Save' बटणावर क्लिक करा.
07:08 डेस्कटॉपवर प्रोपेनचे 3D मॉडेल '.mol' फाईल म्हणून सेव्ह होईल.
07:14 Jmol मधून बाहेर पडण्यासाठी, ' File' मेनूवर क्लिक करून प्रोग्राममधून बाहेर पडण्यासाठी Exit पर्याय निवड.
07:21 थोडक्यात, या ट्युटोरियलमध्ये आपण शिकलो:
07:25 Jmol अप्लिकेशन विंडोबद्दल.
07:27 Jmol पॅनल रिसाईज करणे.
07:29 सरळ सेंद्रिय रेणू जसे मिथेन, इथेन आणि प्रोपेन चे 3D मॉडेल्स तयार करण्यासाठी टूल बारमधील मॉडेलकीट फंक्शनचा वापर करणे.
07:40 हायड्रोजनला Methyl गटासह बदलून रेणू तयार करणे.
07:45 स्थिर कॉन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी एनर्जी मिनिमाइझेशन करणे.
07:48 आणि इमेज .mol फाईल म्हणून सेव्ह करणे.
07:52 Jmol Modelkit फंक्शन वापरून खालील रेणूंचे मॉडेल्स तयार करणे:
07:58 2-4 Dimethyl Pentane आणि 3-Ethyl, 5-Methyl Heptane.
08:03 स्थिर कन्फर्मेशन प्राप्त करण्यासाठी एनर्जी मिनिमाइज़ करणे.
08:07 .mol फाईल म्हणून इमेज सेव्ह करणे.
08:11 टूल बारमध्ये rotate molecule वापरुन मॉडेल फिरवणे.
08:15 आपल्या पूर्ण असाईनमेंटचे आऊटपुट खालीलप्रमाणे दिसले पाहिजे.
08:19 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
08:22 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
08:26 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth (बँडविथ) नसेल तर आपण व्हिडिओ download (डाऊनलोड) करूनही पाहू शकता.
08:30 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
08:36 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08:40 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
08:47 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
08:52 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08:59 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
09:04 या ट्युटोरियलचे भाषांतर अतुल यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana