Java/C2/Instance-fields/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:02 Java मधील Instance Fields वरील ट्युटोरियलमधे आपले स्वागत.
00:06 आपण शिकणार आहोत,
00:08 instance fields विषयी,
00:10 class ची instance फिल्डस accessकरणे,
00:13 instance fields चे Modifiers.
00:15 instance fields हे नाव का आले?
00:18 आपण वापरणार आहोत,
00:20 Ubuntu version 11.10
00:22 jdk 1.6
00:24 आणि Eclipse IDE 3.7.0
00:27 आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे,
00:30 Eclipse द्वारे Java मधे class बनवणे,
00:33 class चे object बनवणे.
00:38 नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:43 आपण जाणतो, objects त्यांची स्थिती fields मधे संचित करतात.
00:48 ही फिल्डस static keyword शिवाय घोषित केलेली असतात.
00:51 static fields विषयी पुढील पाठात जाणून घेऊ.
00:55 Non-static fields ना instance variables किंवा instance fields असेही म्हणतात.
01:01 आधी बनवलेल्या Student ह्या class वर जाऊ.
01:09 येथे roll_no आणि name ही class ची instance fields आहेत.
01:15 ही fields कशी access करायची ते पाहू.
01:18 त्यासाठी पूर्वी बनवलेला TestStudent हा class उघडू.
01:27 दुसरे object बनवणारे स्टेटमेंट काढून टाका.
01:33 तसेच println स्टेटमेंट देखील काढून टाका.
01:41 roll_no आणि name ही student class ची फिल्डस stud1 आणि dot operator द्वारे access करू.
01:49 त्यासाठी टाईप करा System dot out dot println कंसात आणि double quotes' मधे The roll number isनंतर plus stud1 dot आणि options मधून roll_no निवडा, एंटर दाबा, नंतर semicolon.
02:15 पुढील ओळीवर टाईप करा System dot out dot println कंसात आणि double quotes मधे The name is, plus stud1 dot आणि options मधून name निवडा, एंटर दाबा, नंतर semicolon.
02:39 TestStudent.java फाईल सेव्ह करून कार्यान्वित करण्यासाठी Ctrl S आणि Ctrl F11 दाबा.
02:48 आपल्याला हे आऊटपुट दिसेल,
02:51 The roll number is 0.
02:53 The name is null.
03:00 कारण ही व्हेरिएबल्स कुठल्याही व्हॅल्यूने initialize केलेली नाहीत.
03:05 Java मधे fields ला random व्हॅल्यूज नसतात.
03:09 objects ना मेमरी दिल्यावर ही fields शून्य किंवा null केली जातात.
03:15 हे कार्य constructor करतो.
03:18 पुढील पाठात त्या विषयी जाणून घेऊ.
03:21 आता fields स्पष्टपणे initialize करून आऊटपुट पाहू.
03:27 त्यासाठी टाईप करा int roll_no equal to 50' पुढील ओळीवर string name equal to double quotes मधे Raju.
03:42 फाईल सेव्ह करून कार्यान्वित करण्यासाठी Ctrl S आणि Ctrl F11 दाबा.
03:50 अपेक्षित आऊटपुट दिसेल The roll number is 50.
03:54 The name is Raju.
03:56 ह्याचे कारणStudent ह्या class मधील व्हेरिएबल्स स्पष्टपणे initialize केली होती.
04:04 येथे fields ला modifier किंवा default modifier नाही.
04:10 Creating Classes मधे modifiers शिकलो होतो.
04:14 Student.java आणि TestStudent.java ही दोन्ही फिल्डस एकाच package मधे असल्याने access करता येतील.
04:22 आपल्याला दिसेल की ते एकाच default package मधे आहेत.
04:30 packages विषयी पुढील पाठात जाणून घेऊ.
04:34 आता modifier बदलून तो private करू.
04:37 field घोषित करण्याच्या आधी private टाईप करा. private space int roll no=50 असे टाईप करा.
04:48 पुढील ओळीवर private space string name =Raju.
04:53 आता Student.java फाईल सेव्ह करा.
05:00 TestStudent.java मधे errors दिसतील.
05:05 error चिन्हावर माऊस न्या.
05:08 The field Student dot roll number is not visible असे दिसेल.
05:12 आणि The field Student dot name is not visible ही एरर दिसेल.
05:16 कारण private fields केवळ त्याच्या स्वतःच्या class मधूनच access होऊ शकतात.
05:23 Student class मधूनच roll_no आणि name, access करू शकतो.
05:27 आपण कुठल्याही error शिवाय access करू शकतो.
05:32 आता modifier बदलून protected करा.
05:52 सेव्ह करून प्रोग्राम कार्यान्वित करा.
06:00 console वर आऊटपुट दिसेल. The Roll no is 50, the name is Raju.
06:07 कारण protected fields त्याच package मधून access केली जाऊ शकतात.
06:17 instance fields हे नाव का आले ते पाहू.
06:22 कारण त्यांची व्हॅल्यू class च्या प्रत्येक instance साठी unique असते.
06:29 म्हणजेच class च्या प्रत्येक object ला स्वतःच्या व्हॅल्यूज असतात.
06:34 TestStudent class वर जाऊ.
06:43 येथे TestStudent class चे आणखी एक object बनवू.
06:50 पुढील ओळीवर टाईप करा Student space stud2 equal to new space Student, opening and closing brackets semicolon.
07:06 आता ही दोन्ही objects आपण Student class मधे initialize करू.
07:18 पुढील ओळीवर टाईप करा stud1 dot आणि options मधून roll_no निवडा, एंटर दाबा equal to 20 semicolon.
07:32 पुढील ओळीवर टाईप करा stud1 dot आणि options मधून name निवडा, एंटर दाबा equal to double quotes मधे Ramu, semicolon एंटर दाबा.
07:54 आपण पहिल्या object साठी फिल्डस initialize केली.
07:58 आता दुस-या object साठी करू.
08:02 त्यासाठी टाईप करा stud2 dot आणि options मधून roll_no निवडा, equal to 30 semicolon.
08:15 पुढील ओळीवर टाईप करा stud2 dot' आणि दिलेल्या option मधून निवडा name equal to double quotes मधे Shyamu semicolon एंटर दाबा.
08:32 आता println स्टेटमेंटनंतर टाईप करा System dot out dot println कंसात आणि double quotes मधे The roll number is, plus stud2 dot आणि options मधून निवडा roll_no आणि semicolon.
09:03 System dot out dot println कंसात आणि double quotes मधे The name is, plus stud2 dotआणि options मधून निवडा name आणि semicolon.
09:28 फाईल सेव्ह करून कार्यान्वित करण्यासाठी Ctrl s आणि Ctrl F11 दाबा.
09:38 आऊटपुट दिसेल. The roll_no is 20, The name is Ramu roll_no is 30, name is shyamu.
09:47 stud1 आणि stud2 हे दोन वेगळ्या objects चा संदर्भ घेत आहेत.
09:52 म्हणजे दोन्ही objects ना स्वतःच्या व्हॅल्यूज आहेत.
09:56 येथे बघू शकतो. 20 आणि Ramu ह्या पहिल्या object च्या व्हॅल्यू आहेत.
10:02 तर 30 आणि Shyamu ह्या दुस-या object च्या व्हॅल्यू आहेत.
10:09 आता अजून एक object बनवू.
10:13 त्यासाठी टाईप करा Student space stud3 equal to new space Student, opening and closing brackets semicolon.
10:36 आता तिस-या object च्या व्हॅल्यूज प्रिंट करण्यासाठी,
10:44 टाईप करा System dot out dot println' कंसात आणि double quotes मधे The roll_no is, plus stud3 dot आणि options मधून निवडा roll_no semicolon.
11:09 पुढील ओळीवर टाईप करा System dot out dot println कंसात आणि double quotes मधे The name is, plus stud3 dot name semicolon.
11:29 फाईल सेव्ह करून कार्यान्वित करण्यासाठी Ctrl S आणि Ctrl F11 दाबा.
11:36 आपल्याला दिसेल की 50 आणि Raju ह्या तिस-या object च्या व्हॅल्यूज आहेत.
11:46 कारण Student class ची फिल्डस 50 आणि Raju ह्या व्हॅल्यूजनी स्पष्टपणे initialize केली होती.
11:54 आता फिल्डस initialize न करता तिस-या object चे आऊटपुट काय मिळते ते पाहा.
12:02 या पाठात आपण शिकलो,
12:05 instance fields विषयी,
12:07 dot operator द्वारे फिल्डस Access करणे.
12:11 असाईनमेंट,
12:13 पूर्वी बनवलेल्या Test Employee class मधे emp2 हे object बनवा.
12:18 dot operator द्वारे दोन objects च्या व्हॅल्यूज initialize करा.
12:23 पहिल्या object साठी 55 आणि Priya ह्या व्हॅल्यूज वापरा.
12:27 दुस-या object साठी 45 आणि Sandeep ह्या व्हॅल्यूज वापरा.
12:31 आऊटपुट मधे दोन्ही objects च्या व्हॅल्यूज दाखवा.
12:34 प्रकल्पाची अधिक माहिती
12:37 दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
12:40 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
12:43 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
12:47 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
12:49 Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
12:52 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
12:56 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
13:01 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
13:05 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
13:11 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
13:19 हा पाठ येथे संपत आहे.
13:22 सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana