Java/C2/Getting-started-java-Installation/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Getting started with Java: Installation वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:07 या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू,
00:09 सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वापरुन JDK इनस्टॉल करणे,
00:13 Java कशासाठी? Java चे प्रकार आणि एप्लिकेशन्स.
00:17 येथे आपण वापरत आहोत,
00:19 उबुंटु वर्जन 11.10 आणि
00:21 Java डेवलपमेंट एन्वाइरन्मेंट JDK 1.6
00:26 या ट्यूटोरियलच्या अनुसरणा साठी इंटरनेट ची जोडणी असणे आवश्यक आहे.
00:31 तुमच्या सिस्टम वर सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर इनस्टॉल असायला हवा.
00:35 तुम्हाला लिनक्स मधील टर्मिनल, टेक्स्ट एडिटर आणि सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर चे ज्ञान असणे आवश्यक आहे.
00:43 जर नसेल तर कृपया spoken-tutorial.org वर उपलब्ध असलेले लिनक्स वरील स्पोकन ट्यूटोरियल पहा.
00:51 java प्रोग्राम कार्यान्वित करण्यासाठी JDK म्हणजेच Java डेवलपमेंट किट इनस्टॉल करण्याची गरज आहे.
00:57 JDK बदद्ल आणखी शिकण्याकरिता खालील लिंक ला भेट द्या.
01:02 JDK आता सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वापरुन JDK इनस्टॉल करू.
01:07 यासाठी रूट परमिशन्स आवश्यक आहे.
01:10 तुम्हाला रिपॉज़िटरी निवडणे हि माहित असणे आवश्यक आहे.
01:14 अगोदर उल्लेख केलेल्या लिनक्सवरील आवश्यक ट्यूटोरियल मध्ये हे स्पष्ट केले आहे.
01:19 डेस्कटॉप च्या डाव्या कोपऱ्यावर तुम्हाला टास्कबार दिसेल.
01:25 सर्वात वर डॅशहोम दिसेल.
01:28 डॅशहोम वर क्लिक करा.
01:31 सर्चबार मध्ये Synaptic (सिनॅप्टिक) टाइप करा. .
01:35 तुम्हाला येथे Synaptic Package Manager( सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर ) दिसेल.
01:38 Synaptic Package Manager ( सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर ) वर क्लिक करा.
01:42 तुम्हाला ऑथेनटिकेशन साठी पासवर्ड विचारला जाईल.
01:47 पासवर्ड टाइप करून Authenticate (ऑथेनटिकेट) वर क्लिक करा..
01:56 हे सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर उघडेल.
02:03 आता Quick Filter (क्विक फिल्टर) बॉक्स मध्ये jdk टाइप करा.
02:08 आपण openjdk-6-jdk नामक पॅकेज पाहत आहोत.
02:13 त्यावर राइट-क्लिक करा आणि इन्स्टलेशन साठी मार्क वर क्लिक करा.
02:17 नंतर Apply (अप्लाइ)वर क्लिक करा.
02:20 तुम्हाला मार्क केलेले बदल सुनिश्चित करण्यास विचारले जाईल.
02:24 To be Installed (टू बी इनस्टॉल्ड )वर क्लिक करा आणि नंतर Apply (अप्लाइ)वर क्लिक करा.
02:30 इन्स्टलेशन काही सेकंद घेईल.
02:38 आता आपण पाहतो की, openjdk-6-jdk पर्याय हिरव्या रंगात आहे.
02:48 अशाप्रकारे आपले इन्स्टलेशन पूर्ण झाले आहे.
02:52 चला आता इन्स्टलेशन पडताळू, यासाठी Ctrl , Alt आणि T किज एकत्रित दाबून टर्मिनल उघडा.
03:03 मी अगोदरच माझे टर्मिनल उघडले आहे.
03:06 कमांड प्रॉम्प्ट मध्ये टाइप करा java space hyphen version आणि एंटर दाबा.
03:15 आपण पाहतो की jdk चा वर्जन नंबर प्रदर्शित झाला आहे .
03:20 तुम्ही वापरलेल्या वितरणा अनुसार तुमचा वर्जन नंबर वेगळा असु शकतो.
03:26 तर आपण यशस्वीरित्या jdk इनस्टॉल केले आहे.
03:30 आता एक साधा Java प्रोग्राम कार्यान्वित करून हे कार्य करते का ते पाहु.
03:35 मी खालील कोड अगोदरच TestProgram dot java नावाच्या फाइल मध्ये सेव केला होता.
03:42 हा कोड संकलित करून कार्यान्वित करू.
03:45 हा कोड टर्मिनल वर We have successfully run a Java Program असे प्रदर्शित करेल.
03:53 पुन्हा टर्मिनल वर जाऊ.
03:57 लक्ष द्या मी Home Directory (होम डाइरेक्टरी ) मध्ये TestProgram dot java ही फाइल सेव केली होती.
04:03 आणि सध्या मी Home Directory (होम डाइरेक्टरी ) मध्ये आहे.
04:07 कमांड प्रॉम्प्ट वर टाइप करा, javac space TestProgram dot java.
04:19 हे कोड संकलित करण्यासाठी आहे.
04:21 एंटर दाबा.
04:25 आता मी कोड कार्यान्वित करते.
04:27 टाइप करा, java space TestProgram आणि एंटर दाबा.
04:35 आपल्याला We have successfully run a java program असे आउटपुट मिळेल.
04:44 अशाप्रकारे आपले इन्स्टलेशन पूर्ण झाले आहे.
04:48 आता स्लाइड्स वर परत जाऊ.
04:51 आता मी Java का उपयोगी आहे हे स्पष्ट करेल.
04:55 Java हे सोपे आहे.
04:57 हे "ऑब्जेक्ट ओरियेनटेड" आहे.
04:59 हे एक स्वतंत्र मंच आहे.
05:01 हे सुरक्षित आहे. Java कडे उच्च कार्य आहे.
05:04 Java हे मल्टी – थ्रेडड आहे.
05:07 आता आपण Java चे काही प्रकार आणि एप्लिकेशन्स पाहु.
05:11 -JSP, किंवा Java सर्वर पेजस: हे सामान्य HTML टॅग्स सहित कोड वर आधारित आहे.
05:18 JSP हे गतिमान वेब पेजस बनविन्यास मदत करते.
05:22 -Java Applets: हे वेब एप्लिकेशन्स ला इंटर एक्टिव वैशिष्ट्य पुरवीण्यास वापरले जाते.
05:28 -J2EE किंवा Java एंटरप्राइज़ एडिशन: J2EE कंपनीज़ वापरते.
05:33 हे XML संरचित डॉक्युमेंट्स बदलण्यास उपयोगी आहे .
05:38 -JavaBeans: JavaBeans हे पुन्हा वापरण्यात येणारे सॉफ्टवेअर घटक आहे .
05:43 हे नवीन आणि प्रगत एप्लिकेशन्स बनवण्यास वापरल्या जाऊ शकते.
05:47 -Mobile Java: हे विविध मनोरंजक साधनांसाठी वापरले जाते, जसे की, मोबाइल फोन.
05:53 तर या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो,
05:56 सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वापरुन JDK इनस्टॉल करणे,
05:59 java प्रोग्राम संकलित करून कार्यान्वित करणे,
06:02 Java वापरण्याचे फायदे,
06:04 Java चे प्रकार आणि एप्लिकेशन्स.
06:08 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
06:14 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
06:17 जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
06:22 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
06:24 स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
06:27 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
06:30 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
06:36 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
06:41 यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि ,गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे.
06:47 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
06:52 http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro
06:58 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
07:01 मी कविता साळवे आपला निरोप घेते.
07:04 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble