Inkscape/C3/Create-an-A4-Poster/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Inkscape वापरून “Create an A4 Poster” बनवण्याच्या पाठात आपले स्वागत.
00:07 आपण शिकणार आहोत-
00:10 डॉक्युमेंट प्रॉपर्टीज बदलणे
00:12 A4 आकाराच्या पोस्टरची रचना करणे
00:14 पोस्टर 'pdf' फॉरमॅटमधे सेव्ह करणे.
00:17 या पाठासाठी वापरणार आहोत-
00:19 उबंटु लिनक्स 12.04 OS
00:22 इंकस्केप वर्जन 0.48.4
00:26 इंकस्केप उघडू.
00:28 File मेनू खालील New वर क्लिक करा.
00:32 हे कॅनव्हासचे डिफॉल्ट रूपात उपलब्ध असलेले आकार आहेत.
00:37 डिफॉल्ट रूपात माझा कॅनव्हास A4 आकारात आहे.
00:41 तो मी तसाच ठेवत आहे.
00:44 जर तुमच्या मशीनवर तसे नसल्यास A4 आकार निवडा.
00:49 आता काही सेटींग्ज बदलू.
00:51 File मेनूखालील Document properties वर क्लिक करा.
00:54 अनेक टॅब आणि पर्याय असलेला डायलॉग बॉक्स उघडेल.
00:59 त्याबद्दल आपण एकेक करून जाणून घेऊ.
01:03 Page या पहिल्या टॅबमधील Default units या ड्रॉपडाऊन वर क्लिक करा.
01:08 एकेकावर क्लिक केल्यास मोजपट्टीच्या एकेकात बदल होताना दिसेल.
01:13 pixels हे युनिट ठेवू.
01:16 Background पर्याय वापरून बॅकग्राऊंडचा रंग व पारदर्शकता बदलता येते.
01:21 त्यावर क्लिक केल्यावर नवा डायलॉग बॉक्स उघडेल.
01:24 RGB स्लायडर्स डावीकडे आणि उजवीकडे सरकवा.
01:29 कॅनव्हासवरील बॅकग्राऊंडचे रंग दिसण्यासाठी alpha slider उजवीकडे सरकवा.
01:35 यामुळे पारदर्शकता दिलेल्या 'RGB' व्हॅल्यूजना बदलेल.
01:40 Document properties विंडोमधे मी बदल करत असताना बॅकग्राऊंड पर्यायाचे रंग बदलताना दिसतील.
01:47 Alpha स्लायडर डावीकडच्या टोकाला सरकवून डायलॉग बॉक्स बंद करा.
01:52 Page size खाली अनेक पर्याय आहेत.
01:55 हे पर्याय वापरून कॅनव्हासचा आकार बदलू शकतो.
02:00 येथे क्लिक केल्यावर कॅनव्हासच्या आकारात झालेला बदल लक्षात घ्या.
02:04 पानाचा आकार A4 ठेवू.
02:08 Orientation मधे Portrait किंवा Landscape हे पर्याय निवडू शकता.
02:12 कॅनव्हासमधे होणारे बदल बघण्यासाठी दोन्ही पर्याय वापरून बघा.
02:17 Width आणि Height हे पॅरामीटर्स वापरून कॅनव्हासची रुंदी आणि उंची बदलू शकतो.
02:23 Units च्या ड्रॉपडाऊनवर क्लिक करा. येथे गरजेनुसार एकेक बदलू शकतो.
02:31 आता युनिटस बदलून ते pixels करू.
02:34 Resize page to content वर क्लिक करा.
02:37 उपलब्ध असलेले अनेक पर्याय उघडतील.
02:41 येथे सर्व बाजूंसाठी मार्जिन सेट करू शकतो.
02:45 मार्जिन सेट केल्यावर Resize page to drawing or selection वर क्लिक करणे गरजेचे आहे.
02:51 पुढे Border हा पर्याय आहे. येथे 3 चेक बॉक्सचे पर्याय दिसतील.
02:57 हे पर्याय वापरून बघण्यासाठी प्रथम अशाप्रकारे ellipse काढू.
03:03 पहिला पर्याय पानाच्या बॉर्डरचा आहे जो कॅनव्हासची बॉर्डर दाखवतो.
03:08 हा पर्याय अनचेक करा. बॉर्डर्स दिसेनाशा होतील.
03:13 पुन्हा पर्याय निवडा. बॉर्डर्स पुन्हा आलेल्या दिसतील.
03:18 दुसरा पर्याय चित्राच्या वरच्या बाजूला बॉर्डर सेट करेल ज्यामुळे ती आपल्याला स्पष्ट दिसेल.
03:25 पुन्हा एकदा हे पर्याय निवडा आणि काढून टाका आणि कॅनव्हासवर होणारे बदल बघा.
03:31 तिसरा पर्याय कॅनव्हासची सावली उजवीकडे आणि खालच्या बाजूला दाखवेल.
03:36 येथे उजव्या आणि खालच्या बाजूची बॉर्डर इतर दोन बाजूंपेक्षा थोडी जाडसर दिसत आहे.
03:42 तिसरा पर्याय अनचेक केल्यावर ही सावली गेलेली दिसेल.
03:47 हे सर्व पर्याय आपण पसंती आणि गरजेनुसार वापरू शकतो.
03:52 Border color हा पर्याय वापरून बॉर्डरचा रंग निवडता येतो.
03:57 आपण डिफॉल्ट रंगच ठेवणार आहोत.
04:01 पुढे Guides टॅबवर क्लिक करा.
04:03 Guides टेक्स्ट आणि ग्राफिक ऑब्जेक्टस कॅनव्हासवर अलाईन करण्यास मदत करतात.
04:08 आपण येथे रुलर गाईडस बनवू शकतो.
04:12 उभ्या मोजपट्टीवर क्लिक करून गाईडलाईन ड्रॅग करा.
04:15 Show Guides हा पहिला पर्याय एकदा निवडा आणि मग काढून टाका.
04:19 कॅनव्हासवर गाईडलाईन आलेली आणि दिसेनाशी झालेली दिसेल.
04:25 Guide color हा guideline चा रंग आहे.
04:28 Highlight color हा गाईडलाईन एखाद्या विशिष्ट जागेपर्यंत ड्रॅग करताना दिसणारा रंग आहे.
04:33 guide आणि highlight चे डिफॉल्ट रंग येथे दिसत आहेत.
04:37 तुम्ही ते पसंतीनुसार बदलू शकता.
04:41 मी डिफॉल्ट रंगच ठेवत आहे.
04:44 ड्रॅगिंग करताना Snap guides while dragging पर्यायामुळे ऑब्जेक्टस किंवा बाऊंडिंग बॉक्स नजीकच्या गाईडलाईन्सना snap करतात.
04:52 पुढे Grids टॅबवर क्लिक करा.
04:54 हा पर्याय वापरून कॅनव्हासवरील कलाकृतीच्या मागे grid सेट करू शकतो.
05:00 ह्या ग्रीडसचा उपयोग कॅनव्हासवर ऑब्जेक्टस योग्य जागी ठेवण्यासाठी होतो. ग्रीडस प्रिंट होत नाहीत.
05:07 ड्रॉपडाऊन सूचीवर क्लिक करा.
05:09 Rectangular grid आणि Axonometric grid हे ग्रीडसचे दोन प्रकार उपलब्ध आहेत.
05:16 Rectangular grid निवडून New वर क्लिक करा.
05:20 लगेचच कॅनव्हासवर बॅकग्राऊंडला ग्रीड तयार झालेले दिसेल.
05:25 उपलब्ध पर्याय वापरून गरजेनुसार ग्रीडच्या प्रॉपर्टीज सेट करता येतात.
05:31 खालच्या बाजूचे Remove बटण क्लिक करून grid काढून टाकू शकतो.
05:36 याचप्रकारे Axonometric grid चे पर्याय वापरून बघू शकता.
05:41 पुढील 3 टॅब्जमधील पर्यायांबद्दल ऍडव्हान्स लेव्हल्सच्या पाठात जाणून घेऊ.
05:47 आता पोस्टर बनवायला सुरूवात करू.
05:50 प्रथम ellipse आणि guideline काढून टाकू.
05:53 आपल्या पोस्टरसाठी प्रथम बॅकग्राऊंडची रचना करून घेऊ.
05:58 Rectangle टुलवर क्लिक करा.
06:00 संपूर्ण canvas चा समावेश होईल एवढा मोठा आयत काढा.
06:06 त्याला फिकट निळा ग्रॅडियंट रंग द्या.
06:08 Bezier tool च्या सहाय्याने कॅनव्हासच्या वरच्या भागात header area
06:16 आणि खालच्या भागात footer area काढा.
06:23 त्याला निळा रंग देऊ.
06:25 आता Spoken Tutorial चा लोगो इंपोर्ट करू.
06:28 हा लोगो Code Files च्या लिंकवर दिलेला आहे.
06:32 प्रथम हा पाठ थांबवा. Code Files वर क्लिक करून zip file डाऊनलोड करा.
06:39 फोल्डर unzip करून फाईल्स मशीनवर योग्य ठिकाणी सेव्ह करा.
06:45 आता इंकस्केप डॉक्युमेंटवर क्लिक करा.
06:47 File मेनूखालील Import वर क्लिक करा.
06:51 लोगो सेव्ह केलेल्या फोल्डरवर जा.
06:54 Spoken Tutorial चा लोगो सिलेक्ट करून Open क्लिक करा.
06:59 नवा डायलॉग बॉक्स उघडेल. OK क्लिक करा.
07:03 आता हा लोगो canvas वर इंपोर्ट केला जाईल.
07:06 त्याचा आकार बदलून 100×100 पिक्सेल्स करा.
07:09 header area च्या डाव्या कोप-यात वरती हे नेऊन ठेवा.
07:14 आता “Spoken Tutorial” हे टेक्स्ट टाईप करा.
07:18 ते बोल्ड करा.
07:20 टेक्स्टच्या फाँटचा आकार बदलून तो 48 करा.
07:24 हे टेक्स्ट, लोगोच्या उजव्या बाजूला नेऊन ठेवा.
07:27 त्यानंतर “partner with us...help bridge the digital divide” टेक्स्ट टाईप करा.
07:35 या टेक्स्टचा आकार बदलून 20 करा.
07:39 पुढे काही टेक्स्ट समाविष्ट करा.
07:42 हे टेक्स्ट मी लिबर ऑफिस रायटरमधे सेव्ह करून ठेवले आहे.
07:47 हे टेक्स्ट Code Files मधे दिलेले आहे.
07:51 तुम्ही सेव्ह केलेल्या फोल्डरमधे ही फाईल शोधा.
07:54 आता पोस्टरवरील रिकाम्या भागात हे टेक्स्ट कॉपी करून पेस्ट करा.
08:00 फाँटचा आकार 28 करा.
08:04 लाईन स्पेसिंग सेट करा.
08:06 प्रत्येक वाक्याच्या आधी याप्रकारे bullets द्या.
08:10 त्याखाली 2 इमेजेस समाविष्ट करणार आहोत.
08:13 पूर्वी प्रमाणेच एकेक इमेज इंपोर्ट करू.
08:17 मी त्या images या फोल्डरमधे सेव्ह केलेल्या आहेत.
08:20 या इमेजेस Code Files मधे दिलेल्या आहेत.
08:24 त्या सेव्ह केलेल्या फोल्डरमधे शोधा.
08:27 इमेजेस सिलेक्ट करून त्यांचा आकार बदला.
08:30 आणि पोस्टरच्या खालच्या भागात त्या नेऊन ठेवा.
08:33 footer area मधे संपर्काचा तपशील लिहू.
08:37 पुन्हा एकदा लिबर ऑफिस रायटरच्या डॉक्युमेंटमधून हे टेक्स्ट कॉपी करून पेस्ट करा.
08:42 फाँटचा आकार 18 करा.
08:45 आपले पोस्टर तयार झाले आहे.
08:47 पुढे हे pdf फॉरमॅटमधे कसे सेव्ह करायचे ते पाहू.
08:51 File खालील Save As वर क्लिक करा.
08:55 डायलॉग बॉक्स उघडेल.
08:58 फाईल सेव्ह करण्यासाठी फोल्डर निवडा.
09:00 मी डेस्कटॉप निवडत आहे.
09:02 डायलॉग बॉक्सच्या खाली उजवीकडे असलेल्या ड्रॉपडाऊन सूचीवर क्लिक करून pdf हा फॉरमॅट निवडा.
09:09 येथे Name या फिल्डमधे Spoken-Tutorial-Poster.pdf असे टाईप करा.
09:16 Save वर क्लिक करा.
09:18 आपले पोस्टर डेस्कटॉपवर सेव्ह झाले आहे.
09:21 डेस्कटॉपवर जाऊन पोस्टर पाहू.
09:25 आपले पोस्टर pdf फॉरमॅटमधे आहे.
09:28 आपण शिकलो ते थोडक्यात,
09:32 डॉक्युमेंट प्रॉपर्टीज बदलणे
09:34 A4 पोस्टरची रचना करणे
09:36 पोस्टर 'pdf' मधे सेव्ह करणे.
09:38 असाईनमेंट.
09:40 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी A4 पोस्टर बनवा.
09:44 असाईनमेंट पूर्ण झाल्यावर ती अशी दिसणे अपेक्षित आहे.
09:48 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवरील व्हिडिओ बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल
09:54 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
10:01 अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
10:04 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:10 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10:14 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
10:16 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana