Inkscape/C2/Align-and-distribute-objects/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | इंकस्केप मधील “Align and distribute objects” या पाठात आपले स्वागत. |
00:07 | आपण शिकणार आहोत - |
00:09 | विविध ऑब्जेक्टस अलाईन आणि डिस्ट्रीब्यूट करणे |
00:12 | ऑब्जेक्टस rows आणि columns मधे ठेवणे |
00:16 | ऑब्जेक्टस मधे स्पेस सेट करणे आणि टाईल पॅटर्न बनवणे. |
00:22 | या पाठासाठी वापरणार आहोत, |
00:24 | उबंटु लिनक्स 12.04 OS |
00:27 | इंकस्केप वर्जन 0.48.4 |
00:31 | Dash home वर जाऊन Inkscape टाईप करा. |
00:35 | लोगोवर क्लिक करा. |
00:37 | मी आधीच सेव्ह केलेले Inkscape चे डॉक्युमेंट उघडत आहे. |
00:44 | कॅनव्हासवर पाच वेगवेगळे आकार वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेले दिसतील. |
00:50 | तुमच्या कॅनव्हासवर पाच आकार काढून ते येथे दाखवल्याप्रमाणे त्या जागी ठेवा. |
00:55 | आता ऑब्जेक्टस अलाईन करू. |
00:59 | Object मेनू खालील Align and Distribute वर क्लिक करा. |
01:04 | Align and Distribute चा डायलॉग बॉक्स interface च्या उजव्या बाजूला उघडेल. |
01:09 | येथे स्थान ठरवण्याच्या दोन पध्दती आहेत. |
01:12 | Align म्हणजे ऑब्जेक्टसच्या कडा किंवा मध्य एका रेषेत एकमेकांना जुळवून घेणे. |
01:18 | Distribute म्हणजे ऑब्जेक्टस त्यांच्या कडा किंवा मध्यांच्या संदर्भाने उभे किंवा आडवे पसरून ठेवणे. |
01:29 | हे पर्याय आणि त्यांच्या उपपर्यायांच्या सहाय्याने, ऑब्जेक्टस विविध पध्दतीने अलाईन करता येतात. |
01:36 | Relative to हे आणखी एक महत्वाचे फीचर आहे. |
01:39 | हे वापरून ऑब्जेक्टस कशाच्या तरी संदर्भाने अलाईन करता येतात. |
01:44 | येथील पर्याय बघण्यासाठी ड्रॉप डाऊन सूचीवर क्लिक करा. |
01:47 | येथे Last selected, First selected, Biggest object, Smallest object, Page, Drawing आणि Selection हे पर्याय आहेत. |
02:00 | डिफॉल्ट रूपात ऑब्जेक्टस Page ला अलाईन होतात. |
02:04 | म्हणजेच निवडलेली ऑब्जेक्टस Align and Distribute ऑपरेशन्समधे Page च्या मोजमापानुसार प्रतिसाद देतात. |
02:13 | कॅनव्हासवरील सर्व ऑब्जेक्टस निवडण्यासाठी Ctrl + A दाबा. |
02:17 | पहिले 5 आयकॉन ऑब्जेक्टसना उभ्या पध्दतीने अलाईन करतील. |
02:22 | पहिल्या आयकॉनवर क्लिक करा. |
02:25 | टूल टीपनुसार ऑब्जेक्टसच्या उजव्या कडा anchor च्या डाव्या कडांना अलाईन होतील. |
02:32 | येथे Relative to चा संदर्भ Page असल्याने anchor point हा page आहे. |
02:38 | हे दोन ऑब्जेक्टस एकमेकांवर ठेवले गेले आहेत. |
02:43 | मागील रचनेत ऑब्जेक्टस खूप जवळ असल्यास ते एकमेकांवर ठेवले जाऊ शकतात. |
02:48 | Distribute पर्यायाखालील Remove overlaps वर क्लिक करून हे दुरूस्त करू शकतो. |
02:56 | आता ऑब्जेक्टस वेगळी झाली आहेत. |
02:58 | ऑब्जेक्टसमधील उभ्या आणि आडव्या दिशांची अंतरे नीट करण्यासाठी H आणि V पर्याय वापरा. |
03:06 | Align खालील पर्यायांवर क्लिक करून ऑब्जेक्टस कशाप्रकारे अलाईन होतात ते पहा. |
03:14 | अलाईनमेंटबद्दल नीट समजून घेण्यासाठी CTRL + Z/undo पर्याय वापरा. |
03:21 | अलाईनमेंट नीट समजण्यासाठी टूल टीप्स खूप उपयोगी आहेत. |
03:28 | शेवटचा आयकॉन केवळ टेक्स्टवर कार्य करतो. त्याबद्दल पुढील पाठात पाहू. |
03:35 | ऑब्जेक्टसमधील अंतर नीट करण्यासाठी Distribute पर्याय वापरू. |
03:40 | ऑब्जेक्टस उभी ठेवलेली असल्यामुळे Distribute मधले शेवटचे चार पर्याय वापरावे लागतील. |
03:48 | प्रथम मध्यात अलाईन करू. |
03:51 | Distribute खालील पर्यायावर क्लिक करा. ऑब्जेक्टस कसे अलाईन होतात ते पहा. |
03:58 | अलाईनमेंट नीट समजण्यासाठी CTRL + Z/undo पर्याय वापरा. |
04:07 | अलाईनमेंट नीट समजण्यासाठी टूल टीप्स खूप उपयोगी आहेत. |
04:13 | Relative to पर्यायाखाली Treat selection as group हा पर्याय आहे. |
04:19 | हे एक ग्रुप म्हणून ही सर्व ऑब्जेक्टस अलाईन करेल. |
04:22 | check-box वर क्लिक करा. |
04:24 | प्रत्येक आयकॉन्स वर क्लिक करून बघा. सर्व ऑब्जेक्टस स्वतंत्ररित्या अलाईन न होता ग्रुपने अलाईन होतील. |
04:34 | बॉक्स अनचेक करा. |
04:36 | आता ऑब्जेक्टस स्वतंत्ररित्या अलाईन होतील. |
04:40 | आता ऑब्जेक्टस Last selected हा पर्याय वापरून अलाईन आणि डिस्ट्रीब्यूट करू. |
04:45 | Relative to चा पर्याय बदलून Last selected करा. |
04:49 | आता सर्व ऑब्जेक्टस कॅनव्हासच्या आत आणून वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा. |
05:01 | एकेक करून ऑब्जेक्टस निवडा. वर्तुळ सर्वात शेवटी निवडा. |
05:06 | आधीप्रमाणेच एकेक करून आयकॉनवर क्लिक करा. |
05:10 | शेवटी निवडलेले ऑब्जेक्ट वर्तुळ असल्यामुळे ऑब्जेक्टस वर्तुळानुसार अलाईन होतील. |
05:19 | याच प्रकारे Relative to मधील उपलब्ध पर्याय वापरून ऑब्जेक्टसची अलाईनमेंट कशी होते ते पहा. |
05:26 | Align and Distribute च्या डायलॉग बॉक्समधील ऍडव्हान्स पर्यायांबद्दल पुढील पाठात शिकू. |
05:32 | आता हा डायलॉग बॉक्स बंद करू. |
05:37 | पुढे rows आणि columns मधे ऑब्जेक्टस ठेवण्याबद्दल जाणून घेऊ. |
05:41 | Object मेनूखालील, |
05:43 | Rows and Columns वर क्लिक करा. |
05:46 | Rows and Columns चा डायलॉग बॉक्स उघडेल. |
05:50 | हा पर्याय वापरून ऑब्जेक्टस आवश्यक स्पेस देऊन rows आणि columns मधे ठेऊ शकतो. |
05:57 | कॅनव्हासवर ऑब्जेक्टस वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा. |
06:01 | आता ऑब्जेक्टस 2 rows आणि 3 columns मधे ठेवू. |
06:05 | Row चा पॅरामीटर बदलून 2 करा. |
06:09 | Row चा पॅरामीटर बदलल्यावर Column चा पॅरामीटर आपोआप बदललेला दिसेल. |
06:15 | उजवीकडे खाली असलेल्या Arrange बटणावर क्लिक करा. |
06:19 | Align हा पर्याय ऑब्जेक्टस उजव्या बाजूला मध्यात आणि डाव्या बाजूला अलाईन करेल. |
06:29 | प्रत्येक पर्याय वापरून बघा आणि होणारे बदल पहा. |
06:37 | Set spacing पर्याय वापरून rows आणि columns दोन्हीसाठी ऑब्जेक्टस मधील स्पेस सेट करता येते. |
06:45 | row आणि column दोन्हीसाठी स्पेस पॅरामीटर बदलून ते 5 करा. |
06:50 | Arrange वर क्लिक करा. |
06:53 | ऑब्जेक्टसमधील स्पेस बघा. |
06:56 | Align and Distribute द्वारे पॅटर्न कसा बनवायचा ते पाहू. |
07:01 | माझ्याकडे चार वेगळ्या आकारांचे आणि रंगांचे चौरस असलेली नवी Inkscape फाईल आहे. |
07:06 | सर्व चौरस सिलेक्ट करून असे फिरवा म्हणजे ते डायमंडच्या आकाराचे दिसतील. |
07:12 | Align and Distribute चा डायलॉग बॉक्स उघडेल. |
07:15 | Centre on vertical axis वर क्लिक करा. |
07:18 | Centre on horizontal axis वर क्लिक करा. |
07:22 | कॅनव्हासवर आता tile पॅटर्न तयार झाला आहे. |
07:25 | हे पर्याय कल्पकतेने वापरल्यास अनेक वैशिष्ट्यपूर्ण पॅटर्न तयार करू शकतो. |
07:30 | थोडक्यात, पाठात शिकलो: |
07:34 | विविध ऑब्जेक्टस अलाईन आणि डिस्ट्रीब्यूट करणे |
07:37 | ऑब्जेक्टस rows आणि columns मधे ठेवणे |
07:40 | ऑब्जेक्टस मधे स्पेस सेट करणे आणि टाईल पॅटर्न बनवणे. |
07:45 | ह्या दोन असाईनमेंट करा. |
07:47 | येथे दिलेल्या डायमेन्शन्सची पाच वर्तुळे काढा. |
07:54 | कॅनव्हासवर वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून ती सर्व सिलेक्ट करा. |
07:59 | Align and Distribute वापरुन Relative to पर्याय Biggest object मध्ये बदला. |
08:04 | Align left edges वर क्लिक करा. |
08:06 | Centre on horizontal axis वर क्लिक करा. |
08:10 | 100 * 100 पिक्सेल आकाराचे आणि निळ्या रंगाचे 6 चौरस काढा. |
08:17 | सर्व चौरस सिलेक्ट करून Rows and columns पर्याय उघडा. |
08:21 | हे 2 rows आणि 3 columns मधे ठेवा. |
08:25 | vertical आणि horizontal साठी स्पेस पॅरामीटर 20 ठेवा. |
08:29 | पूर्ण झालेली असाईनमेंट अशी दिसेल. |
08:35 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
08:43 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
08:51 | अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
08:54 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
09:03 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
09:07 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
09:09 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |