Health-and-Nutrition/C2/Breast-crawl/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:00 | Breast crawl वरील स्पोकन ट्युटोरिअल मध्ये आपले स्वागत आहे. |
00:05 | ह्या ट्युटोरिअल मध्ये आपण शिकणार आहोत, ब्रेस्ट क्रॉल म्हणजे काय? |
00:10 | ब्रेस्ट क्रॉलची प्रक्रिया आणि |
00:13 | ब्रेस्ट क्रॉलचे महत्व. |
00:18 | प्रथम आपण समजून घेऊ, ब्रेस्ट क्रॉल म्हणजे काय? |
00:23 | बाळ जन्मताच दूध पिण्याच्या स्वाभाविक सवयीने जन्म घेतो. |
00:28 | प्रसूतीनंतर लगेच, बाळाला आईच्या उघड्या पोटावर ठेवल्यास बाळ आईचे स्तन शोधू शकते आणि स्तनपान करण्यास सुरवात करू शकते. |
00:40 | ह्या संपूर्ण प्रक्रियेला Breast Crawl म्हटले जाते. |
00:46 | हे लक्षात घ्या की पूर्ण-वेळेत जन्मलेले , स्थिर बाळ जे नैसर्गिक किंवा सिजेरियन प्रसुतीमुळे जन्माला आले आहे, |
00:58 | आणि जे जन्मानंतर लगेचच `रडतात, ब्रेस्ट कॅरोल त्यांच्या द्वारे केले जाऊ शकते. |
01:03 | कमी वजन असलेल्या बाळांसाठी ब्रेस्ट कॅरोल केले जात नाही, कारण ते श्वासनाच्या समस्यांमुळे त्रासलेले असतात जसे कि श्वास घेण्यात त्रास. |
01:15 | आता, आपण ब्रेस्ट कॅरोलची प्रक्रिया आणि नंतर त्याचे महत्व शिकूया. |
01:22 | सर्व प्रथम खात्री करून घ्या कि, डिलिव्हरी रूमचे तापमान 26 अंश सेल्सियसच्या जवळपास असावे. |
01:29 | आता बाळाला आईच्या उघड्या पोटावर ठेवून स्वच्छ करावयाचे आहे. |
01:35 | बाळाचे हाथ सोडून संपूर्ण शरीर स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घ्या. |
01:42 | लक्षात ठेवा - बाळाचे हात ओले ठेवावे. |
01:46 | पुसताना तिच्या त्वचेवरचा संरक्षणात्मक पांढरा थर काढू नका. |
01:53 | तापमान थंड असल्यास, ते बाळाचे रक्षण करेल. |
01:56 | बाळाला पुसल्यानंतर ओला कपडा काढून टाका. |
02:01 | बाळाला पुसुन घेतल्यानंतर, जन्म सेविकाने बाळाच्या नाळची नाडी जाणून घेतली पाहिजे. |
02:08 | एकदा का धड धड थांबली कि, तिने नाळ कापली पाहिजे. |
02:13 | नंतर, बाळाला तुम्ही आईच्या उघड्या पोटावर अश्या पद्धतीने ठेवा कि जेणेकरून बाळाचे पोट आईच्या पोटाला स्पर्श करेल. |
02:22 | बाळाचं डोकं आईच्या न धुतलेल्या स्तनांमध्ये ठेवले पाहिजे. |
02:26 | बाळाचं तोंड आईच्या स्तनाखाली असावे. |
02:30 | आता breast crawl करण्यासाठी बाळ अगदी योग्य ठिकाणी आहे. |
02:37 | नवजात बाळासाठी पुढे सरकणे फार नैसर्गिक आहे, त्यामुळे ती सहजपणे आईच्या स्तनाकडे सरकू शकते. |
02:46 | पुढे काय करायचे आहे कि - बाळ आणि आई दोघांना उबदार ठेवण्यासाठी स्वच्छ कोरडा कपडा पांघरावा. |
02:54 | बाळाच्या डोक्यावर टोपी घालावी. |
02:57 | कृपया लक्ष्यात घ्या - आम्ही नंतरच्या प्रतिमांमध्ये टोपी आणि कपडा दाखवलेला नाही. |
03:04 | हे आपल्याला breast crawl च्या दरम्यान बाळाला स्पष्टपणे पाहण्यास मदत करेल. |
03:10 | बाळाला कपड्यात गुंडल्यानंतर - आईला तिच्या हाताने बाळाच्या पाठीस आधार द्याचा आहे. |
03:18 | आता बाळाच्या क्षमतांबद्दल चर्चा करू जे ब्रेस्ट कॅरोल करण्यात मदत करतात. |
03:24 | प्रसूतीनंतर बाळ खूप सावध आणि स्वाभाविक असतात. |
03:29 | तिच्या अस्वच्छ हाथांचा वास तिला लाळ गाळण्यास उत्तेजित करतो. |
03:35 | तसेच बाळ तिची कमी दृष्टी वापरून, तिच्या आईचा चेहरा आणि एरीओला पाहू शकते. |
03:43 | एरीओला हा निप्पलभोवतीचा गडद भाग आहे. |
03:47 | अखेरीस, हात आणि पाय वापरुन बाळ सरकू लागते, हळूहळू तिच्या आईच्या स्तनाकडे रांगत जाते. |
03:57 | काही बाळ ताबडतोब रांगणे सुरू करतात आणि काही वेळ घेतात. |
04:04 | स्तनापर्यंत पोहोचल्यावर, सर्वात पहिले बाळ आपल्या हाताने स्तनाला पकडण्याचा प्रयत्न करतो. |
04:12 | जोपर्यंत बाळ तिचे पहिले स्तनपान घेत नाही तो पर्यंत आई आणि बाळात अडथळा आणू नका. |
04:20 | जन्म सेविका आणि आईने या प्रक्रियेदरम्यान संयम राखला पाहिजे. |
04:27 | बाळाला तिच्या पहिल्या स्तनपानासाठी आईच्या स्तनापर्यंत पोहोचण्यास 30 ते 60 मिनिटे लागू शकतात. |
04:35 | स्तनपानाच्या सुरुवातीस- बाळ तिचे तोंड रुंद उघडेल आणि आईच्या स्तनाशी योग्य पकड करेल. |
04:45 | स्तनपान पूर्ण केल्यानंतर, बाळाला एक तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ त्याच स्थितीत राहू द्या. |
04:52 | असे केल्याने, आई आणि बाळ यांच्यात संबंध वाढण्यास मदत होते. |
04:58 | आईने कोणतीही औषधे घेतली असल्यास कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या. |
05:05 | कधीकधी असे होऊ शकते की प्रसूतीनंतर आईला प्रसूती खोली मधून दुस-या खोलीत हलवावे लागेल. |
05:13 | अशा परिस्थितीत, आईला दुसर्या खोलीत हलविल्यानंतर- बाळाला आईच्या उघड्या पोटावर ठेवून लगेचच दोघांमध्ये त्वचेचा स्पर्श होऊ द्या . |
05:29 | आता सिजेरियनद्वारे जन्माला आलेल्या बाळांसाठी breast crawl बद्दल चर्चा करू या- |
05:35 | अश्या स्थितीत: बाळाला आईच्या पोटाऐवजी छातीवर अश्या पद्धतीतीने ठेवा, कि बाळाचे पाय आईच्या डोक्याकडे असले पाहिजे. |
05:47 | बाळाची छाती आणि पोट आईच्या खांद्यावर आणि तोंड आईच्या स्तनावर असावे. |
05:54 | ऑपरेशन रूममध्ये शक्य असेल तोपर्यंत बाळाला स्तनपान करू द्या. |
05:59 | लक्षात ठेवा - प्रसूतीनंतर लगेचच अन्य नवजात शिशु काळजी पेक्षा आईच्या त्वचेचा स्पर्श बाळाच्या त्वचेशी सर्वात महत्वाचा आहे. |
06:09 | लक्षात ठेवा - breast crawl पूर्ण झाल्यानंतरच, प्रसूती नंतर नवजात शिशु काळजी दिली पाहिजे. |
06:17 | आता, नवजात शिशुसाठी breast crawl च्या महत्त्वबद्दल चर्चा करूया. |
06:23 | ब्रेस्ट कॅरोल बाळाला आईचे पहिले दूध मिळण्यास मदत करते ज्याला colostrum म्हटले जाते. |
06:29 | हे रंगात पिवळसर आणि घट्ट असते. |
06:33 | लक्षात ठेवा की, प्रसूतीनंतर – प्रत्येक स्तनपानादरम्यान बाळ जेवढे कॉलेस्ट्रॅम घेईल त्याच्या पिण्याच्या प्रमाणात हळूहळू वाढ होईल. |
06:43 | दर वेळी स्तनपानादरम्यान बाळ प्रत्येक स्तनांमधून पहिल्या दिवशी ५ मिलीलिटर, |
06:47 | दुसर्या दिवशी 10 मिलीलिटर, |
06:50 | तिसर्या दिवशी 25 मिलीलीटर, |
06:53 | चौथ्या दिवशी 40 मिलीलीटर आणि पाचव्या दिवशी 55 मिलीलीटर दूध पिईल. |
07:05 | हे नवजात बाळासाठी पुरेसे आहे. |
07:09 | म्हणूनच बाळाला कोलोस्ट्रम ऐवजी अन्य काहीही खायला देऊ नये. |
07:15 | कोलोस्ट्रम हे बाळासाठी पहिले लसीकरण मानले जाते, आणि ह्यात सौंसर्गाशी लढणारे प्रथिने समाविष्ट असतात ज्यामुळे बाळाची रोग प्रतिकारशक्ती वाढते. |
07:27 | आईच्या प्रसूतीनंतर बाळासाठी ऊर्जेचा हा पहिला स्त्रोत आहे. |
07:33 | तसेच Colostrum, glucose रक्ताची पातळी कमी होऊ देत नाही. |
07:37 | हे बाळाची अन्य शरीरक्रियांना व्यवस्थित ठेवण्यास मदत करते. |
07:42 | हे मेंदूचा आरोग्यदायी विकास करण्यात मदत करते. |
07:46 | हे बाळाचे प्रथम मल बाहेर येण्यात मदत करते. |
07:50 | Breast crawl मुळे आई आणि बाळ या दोघांमधील त्वचेचा स्पर्श बाळाला उबदार ठेवतो. |
07:57 | बाळ स्वतःच शिकतो की आपल्या आईच्या स्तनाशी योग्य पकड कशी करावी . |
08:04 | Breast crawl मुळे आईचे स्वस्थ जीवाणू बाळाच्या शरीरात जातात. |
08:08 | हे जीवाणू बाळाच्या आतड्यांमध्ये जातात आणि संसर्गांशी लढतात. |
08:13 | अखेरीस यामुळे बाळाची रोग प्रतिकारशक्ती वाढते. |
08:18 | Breast crawl हे बाळाला प्रेम आणि सुरक्षिततेची भावना देखील देते आणि आई व तिच्या बाळाच्या दरम्यान संबंध जोडते. |
08:29 | breast crawl आईसाठी देखील फायदेशीर आहे. |
08:34 | बाळाच्या पायाच्या हालचालीमुळे आईच्या गर्भावर दाब पडते, ह्या दाबामुळे गर्भाशयाच्या आकुंचनात आणि नाळ बाहेर पडण्यास मदत होते. |
08:45 | स्तनपान सुरू केल्याने आईच्या शरीरात oxytocin वाढते. |
08:51 | oxytocin च्या वाढल्यामुळे नाळ बाहेर पडण्यास देखील मदत होते. |
08:56 | म्हणून breast crawl मुळे रक्त कमी जाते आणि आईमध्ये anaemia होण्यापासून थांबवते. |
09:03 | Anaemia हि एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये लाल रक्तपेशींची संख्या कमी होते. |
09:08 | यामुळे आईमध्ये थकवा आणि कमजोरी येऊ शकते. |
09:13 | म्हणूनच,breast crawl आई आणि बाळ दोघांसाठी अत्यंत फायदेशीर नैसर्गिक प्रक्रिया आहे. |
09:21 | आपण breast crawl ह्या स्पोकन ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
09:26 | आय आय टी बॉम्बेतर्फे मी रंजना ऊके आपला निरोप घेते.
सहभागासाठी धन्यवाद. |