Geogebra/C2/Angles-and-Triangles-Basics/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Measurement and Geometry
Author: Mohiniraj Sutavani
Keywords: Geogebra
Time | Narration |
00:00 | नमस्कार. Geogebra च्या Angles and Triangles Basics वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:06 | Geogebra पहिल्यांदाच वापरणारांनी याच साईटवरील Introduction to Geogebra ट्युटोरियल बघावे. |
00:14 | या पाठासाठी मी Ubuntu Linux 10.04 LTS ही operating system आणि Geogebra 3.2.40.0 वापरणार आहे. |
00:24 | या ट्युटोरियलमध्ये आपण Geogebra च्या सहाय्याने त्रिकोणाच्या आंतरकोनांची बेरीज नेहमीच 180 अंश असते हे तपासून बघणार आहोत. |
00:33 | या ट्युटोरियलमध्ये आपण Polygon, Angle, Insert Text या टूल्सचा वापर कसा करायचा ते शिकणार आहोत. |
00:42 | आता या ठिकाणी बहुभुजाकृती म्हणून त्रिकोण काढण्यासाठी प्रथम Polygon हे टूल सिलेक्ट करा. ड्रॉईंग पॅडवर क्लिक करून तीन शिरोबिंदू निवडा. आता एका शिरोबिंदूवर क्लिक करा. |
00:57 | त्रिकाणाचे आंतरकोन मोजण्यासाठी Angle हे टूल निवडा. कोनाचे माप दोन पध्दतीने मोजता येते. Clockwise निवडा. A, B नंतर C या शिरोबिंदूंवर क्लिक करा. अशा प्रकारे आपल्याला Alpha म्हणजेच ABC या कोनाचे माप मिळेल. |
01:15 | दुस-या पध्दतीत ज्या दोन रेषाखंडांनी हा कोन बनला आहे ते निवडा. येथे 'a' आणि 'b' रेषाखंड निवडा. anti-clockwise निवडा. अशा पध्दतीने beta म्हणजेच BCA कोनाचे माप मिळेल. |
01:27 | त्याच पध्दतीने आपल्याला gamma म्हणजेचCAB कोनाचे माप मिळेल. |
01:35 | सर्व कोनांना मान्यताप्राप्त गणिताच्या परिभाषेनुसार ग्रीक संज्ञा देण्यात येतील. |
01:41 | तसेच जर आपण anti clockwise पध्दतीने C B A या क्रमाने हे शिरोबिंदू निवडल्यास आपल्याला या बाह्यकोनाचे माप मिळेल. |
01:53 | ड्रॉईंग पॅडवर टेक्स्ट समाविष्ट करण्यासाठी Insert Text हे टूल निवडा. नंतर ड्रॉईंग पॅडवर कुठेही क्लिक करा. एक टेक्स्ट विंडो उघडेल. |
02:07 | आता कोन ABCदर्शवण्यासाठी double quotes मध्ये Angle ABC =असे टाईप करून double quotesपूर्ण करा. पुढे + चे चिन्ह काढून मग alphaवर क्लिक करा. OKवर क्लिक करा. आपल्याला कोन ABC चे माप मिळेल. |
02:28 | त्याचप्रमाणे त्रिकोणाच्या आंतरकोनांची बेरीज दर्शवण्यासाठी प्रथम Insert Text ह्या टूलवर क्लिक करून ड्रॉईंग पॅडवर क्लिक करा. नंतरdouble quotes मध्ये Sum of the interior angles of triangle ABC = असे टाईप करून, double Quotes पूर्ण करा. पुढे + चे चिन्ह काढून नंतर कंसात alpha + beta + gamma टाईप करून कंस पूर्ण करा. OKवर क्लिक करा. आता आपल्याला आंतरकोनांची बेरीज मिळेल. |
03:14 | पुढे move tool निवडा आणि free objects म्हणजेच येथे A B किंवा C हे शिरोबिंदू हलवा. आपल्याला त्रिकाणाच्या आंतरकोनांची बेरीज 180 अंशच राहिलेली दिसेल. |
03:32 | आता एक मजेशीर भाग बघू या. जेव्हा तिनही शिरोबिंदू एका ओळीत येतात तेव्हा दोन आंतरकोनांचे माप कमी होऊन ते शून्य होते. आणि तिस-या कोनाचे माप सरळ कोनाप्रमाणे 180 अंश होते. |
03:52 | पुढे अजून दोन गोष्टींबद्दल जाणून घेऊ या. त्या म्हणजे ड्रॉईंग पॅडचे गुणधर्म आणि Geogebra मध्ये एखादा घटक डिलिट करणे. |
04:04 | प्रथम ड्रॉईंग पॅडचे गुणधर्म बघू या. ड्रॉईंग पॅडवर कुठेही राईट क्लिक करून मग खालील ड्रॉईंग पॅड या पर्यायावर क्लिक करा. |
04:14 | ड्रॉईंग पॅड नामक एक विंडो उघडेल. येथे आपण ड्रॉईंग पॅडचा बॅकग्राऊंड कलर बदलू शकतो. |
04:20 | येथे आपण अक्षांसंबंधीचे गुणधर्म बदलू शकतो. X आणि Y अक्ष तसेच आपण येथे ग्रीड संबंधीच्या गुणधर्मांमध्येही बदल करू शकतो. |
04:31 | अक्षांची एकके, त्यांची नावे आणि x अक्षाचे Y अक्षाशी गुणोत्तर हे काही महत्त्वाचे गुणधर्म आहेत. |
04:43 | साधारणपणे आपण सामान्य भूमितीसाठी नेहमी एकास एक असे गुणोत्तर ठेवतो. |
04:49 | विंडो बंद केल्यावर येथे आपण केलेले बदल सेव्ह होतील. |
04:54 | आता ड्रॉईंग पॅड वरील घटक डिलिट करण्यासाठी त्या घटकावर माऊसचा कर्सर घेऊन जा. मी येथे बाह्य कोनावर कर्सर नेत आहे. त्यावर राईट क्लिक केल्यावर आपल्याला त्या घटकाचे नाव दिसेल. नंतर डिलिटवर क्लिक केल्यावर तो घटक डिलिट झालेला दिसेल. |
05:15 | घटक डिलिट करण्याची दुसरी पध्दत म्हणजे algebra view वरील घटक सिलेक्ट करा आणि त्यावर राईट क्लिक करून डिलिट हा पर्याय निवडा. |
05:25 | आपल्याला लक्षात येईल की कोन Gamma डिलिट झाल्यावर येथील टेक्स्ट देखील डिलिट झाले आहे कारण ते Gamma वर अवलंबून होते. |
05:35 | आपण डिलिट केलेले undo करण्यासाठी एडिट मेनूवर जाऊन undo वर क्लिक करा. किंवा CRTL Z दाबा. |
05:45 | Geogebra मध्ये एका वेळी अनेक घटक डिलिट करण्यासाठी ड्रॉईंग पॅडवर कुठेही माऊसचे डावीकडील बटण दाबून, आपल्याला डिलिट करायच्या घटकांवर माऊस ड्रॅग करा आणि मग माऊसचे बटण सोडून द्या. घटक सिलेक्ट झालेले दिसतील. आता की बोर्डवरील डिलिटचे बटण दाबा. |
06:05 | पुन्हा undoवर क्लिक करून हे undo करून घ्या. |
06:10 | आता मी आपल्याला टेक्स्ट समाविष्ट करण्यासाठीचा syntax परत एकदा समजवणार आहे. |
06:17 | आपल्याला जे टेक्स्ट दर्शवायचे आहे ते उदाहणात दाखवल्याप्रमाणे डबल कोटस मध्ये असणे आवश्यक आहे. |
06:25 | Geogebra व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज पाहण्यासाठी algebra viewमध्ये दिसत असल्याप्रमाणे कोटस न देता व्हेरिएबलची नावे वापरा. |
06:34 | या व्हॅल्यूजवर अंकगणिती क्रिया करण्यासाठी ही व्हेरिएबल्स कंसात () लिहा. |
06:40 | टेक्स्ट जोडण्यासाठी किंवा concatenate करण्यासाठी अधिकच्या चिन्हाचा वापर होतो. |
06:46 | पुढे आपण टेक्स्ट आणि कोन यांचे रंग एकसमान करण्याच्या काही पध्दती बघू या. |
06:59 | आता टेक्स्टचा रंग बदलण्यासाठी प्रथम टेक्स्टवर राईट क्लिक करून मग object properties या पर्यायावर क्लिक करा. मग कलर टॅबवर जाऊन रंगाची निवड करा आणि विंडो बंद करा. |
07:12 | आता येथे या कोनावर क्लिक करून मग राईट क्लिक करा. पुढे object properties वर जाऊन तोच रंग निवडण्यासाठी येथे Recent विंडोतील या रंगावर क्लिक करा. |
07:26 | तसेच आपल्याला zoom in आणि zoom out करायचे असेल त्यावेळी ह्या zoom in किंवा ह्या zoom out पर्यायावर क्लिक करून नंतर ड्रॉईंग पॅडवर क्लिक करू. |
07:47 | कोनाचे एकक बदलण्यासाठी ऑप्शन्स मेनूमधील angle unit वर जाऊन degreesऐवजी radians निवडा. |
08:02 | अशा प्रकारे आपण कोनाच्या मापाचे एकक बदलू शकतो. तसेच zoom in आणि zoom out देखील करू शकतो. |
08:15 | आता असाईनमेंट करू या. |
08:19 | येथे तुम्हाला त्रिकोणाच्या एका बाह्यकोनाचे माप त्या त्रिकोणाच्या विरूध्द बाजूच्या आंतरकोनांच्या बेरजेएवढे असते हे तपासायचे आहे. |
08:28 | polygon tool च्या सहाय्याने एक त्रिकोण काढा. |
08:32 | line through two points tool च्या सहाय्याने कुठलीही एक बाजू वाढवा. |
08:36 | Angle tool च्या सहाय्याने बाह्यकोन आणि त्याच्या विरूध्द आंतरकोनांच्या बेरजेचे माप मोजा. |
08:41 | रिझल्ट दर्शवण्यासाठी Insert Text tool चा वापर करा. आणि Move tool आणि free objects हलवून ते तपासून बघा. |
08:49 | मी काय केले ते मी तुम्हाला दाखवते. तुम्ही फक्त Move tool आणि free objects हलवून ते तपासून बघा. |
08:57 | आपल्या लक्षात येईल की बाह्यकोनाचे माप कायमच त्याच्या विरूध्द बाजूच्या आंतरकोनांच्या बेरजेइतके असते. |
09:08 | *"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
09:14 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
09:20 | *यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
09:24 | *ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मोहिनीराज सुतवणी यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |