GChemPaint/C2/View-Print-and-Export-structures/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:00 नमस्कार.
00:02 GChemPaint मधील View, Print and Export structures वरील पाठात आपले स्वागत.
00:09 यात शिकणार आहोत,
00:11 व्ह्यूचे पर्याय
00:13 झूम फॅक्टर , पेज सेटअप
00:15 प्रिंट प्रिव्ह्यू
00:17 प्रिंट डॉक्युमेंट
00:19 इमेज, "SVG" आणि "PDF" फॉरमॅट मधे एक्सपोर्ट करणे.
00:24 आपण,
00:26 उबंटु लिनक्स OS वर्जन 12.04,
00:30 GChemPaint वर्जन 0.12.10 वापरू.
00:35 हा पाठ समजून घेण्यासाठी तुम्हाला,
00:40 GChemPaint केमिकल स्ट्रक्चर एडिटरची माहिती असावी.
00:43 नसल्यास संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या.
00:48 नवे GChemPaint अॅप्लिकेशन उघडण्यासाठी,
00:52 Dash home वर क्लिक करा. Search bar मधे टाईप करा GChemPaint.
00:58 GChemPaint च्या आयकॉन वर क्लिक करा.
01:01 प्रथम फाईल उघडू.
01:05 टूलबारवरील Open a file आयकॉन वर क्लिक करा.
01:09 फाईल्स आणि फोल्डर्स असलेली विंडो उघडेल.
01:12 सूचीतून “pentane-ethane” ही फाईल सिलेक्ट करा.
01:16 Open वर क्लिक करा.
01:19 प्रथम "View" चे पर्याय पाहू.
01:23 View मेनूत जा.
01:25 View मेनूमधे Full Screen आणि Zoom हे दोन पर्याय आहेत.
01:31 Zoom पर्याय निवडू.
01:33 zoom factorsची सूची असलेला सबमेनू उघडेल.
01:38 सूचीमधे खाली स्क्रॉल करून Zoom to % पर्याय निवडा.
01:43 zoom factor (%) असलेला डायलॉग बॉक्स उघडेल.
01:47 zoom factor(%) ची डिफॉल्ट व्हॅल्यू दाखवलेली असेल.
01:51 आपण Zoom factor गरजेप्रमाणे कमी-जास्त करू शकतो.
01:57 अप किंवा डाऊन अॅरो त्रिकोणावर क्लिक करा आणि झूमिंग कडे लक्ष द्या.
02:03 Apply वर क्लिक करून OK वर क्लिक करा.
02:07 दिलेल्या zoom factor प्रमाणे रचना दिसेल.
02:11 पुढे पेज सेटअप कसा करायचा ते पाहू.
02:15 File मेनूमधे पेज सेटअप वर जाऊन क्लिक करा.
02:20 पेज सेटअप विंडो उघडेल.
02:23 ह्या विंडोमधे - Page आणि Scale ह्या दोन टॅब्ज आहेत.
02:29 पेज टॅबमधे पेपर, सेंटर ऑन पेज आणि ओरिएंटेशन अशी फिल्डस आहेत.
02:36 पेपर फिल्डमधे पेपरचा डिफॉल्ट साईज सेट करू शकतो.
02:41 Change Paper Type वर क्लिक करा.
02:44 पेज सेटअप डायलॉग बॉक्स उघडेल.
02:48 त्यात फॉरमॅट फॉर , पेपर साईज आणि ओरिएंटेशन असे तीन पर्याय आहेत.
02:55 Format for फिल्डमधे डिफॉल्ट प्रिंटर निवडा.
03:00 मी डिफॉल्ट प्रिंटर निवडत आहे.
03:03 Paper size फिल्ड मधे विविध आकारांच्या पेपरची सूची असलेला ड्रॉप डाऊन आहे.
03:09 मी "A4" निवडत आहे.
03:11 या फिल्डखाली "A4" साईजची मापे दाखवली आहेत.
03:17 लक्षात घ्या निवडलेल्या प्रत्येक पेपर साईजची मापे दाखवली जात आहेत.
03:24 ओरिएंटेशन फिल्डमधे '4' रेडिओ बटणे आहेत -
03:29 Portrait, Landscape
03:31 Reverse portrait, आणि Reverse landscape.
03:35 डिफॉल्ट रूपात Portrait निवडलेले आहे.
03:39 ते तसेच ठेवून Apply वर क्लिक करा.
03:43 आपल्याकडे मार्जिन साईजेस आहेत.
03:46 Top margin, Left margin, Right margin आणि Bottom margin.
03:52 येथे गरजेप्रमाणे मार्जिन्समधे बदल करू शकतो.
03:56 Unit हे पुढचे फिल्ड आहे.
03:59 Unit फिल्ड inches, millimetres आणि points मधे सेट करता येऊ शकते.
04:05 Unit मधे बदल केल्यावर त्याला साजेसा असा मार्जिनचा आकार आपोआप बदलेल.
04:14 आता Center on page विषयी जाणून घेऊ.
04:17 येथे Horizontally आणि Vertically असे दोन चेक बॉक्सेस आहेत.
04:22 Horizontally च्या चेक बॉक्सवर क्लिक करा.
04:26 प्रिव्ह्यू बटणावर क्लिक करून आपण रचनेचा प्रिव्ह्यू पाहू शकतो.
04:33 येथे प्रिव्ह्यू दिसत आहे.
04:35 प्रिव्ह्यू विंडो बंद करू.
04:38 ओरिएंटेशन फिल्डमधे आपल्याकडे रेडिओ बटणे आहेत.
04:43 Portrait, Landscape
04:45 Reverse portrait आणि Reverse landscape
04:49 डिफॉल्ट रूपातPortrait निवडलेले आहे.
04:53 आता Landscape रेडिओ बटणावर क्लिक करा.
04:57 आणि नंतर प्रिव्ह्यू बटणावर क्लिक करा.
05:01 येथे Landscape ओरिएंटेशनचा प्रिव्ह्यू बघू शकतो.
05:06 तुम्ही ओरिएंटेशनचे इतर पर्याय वापरून बघू शकता.
05:11 प्रिंट बटणावर क्लिक केल्यावर आपण केलेल्या बदलानुसार फाईल प्रिंट होईल.
05:17 प्रिंट करण्यापूर्वी तुम्ही रचनेचे स्केल तुमच्या गरजेनुसार निवडू शकता.
05:23 त्यासाठी Scale टॅबमधील विविध पर्याय वापरता येतात.
05:28 Scale टॅब मधील पर्याय स्वतः वापरून बघा.
05:32 पेज सेटअप विंडो बंद करण्यासाठी Close वर क्लिक करा.
05:37 पुढे इमेज एक्सपोर्ट कशी करायची ते पाहू.
05:41 File मेनूवर जाऊन “Save as image” सिलेक्ट करा.
05:44 “Save as image” डायलॉग बॉक्स उघडेल.
05:48 File Type फिल्डमधे इमेजच्या पर्यायांची सूची आहे.
05:52 आपण इमेज SVG, EPS, PDF, PNG, JPEG आणि इतर काही फॉरमॅटमधे एक्सपोर्ट करू शकतो.
06:04 SVG इमेज निवडू.
06:07 “Pentane-ethane” असे फाईलला नाव द्या.
06:11 "Save" वर क्लिक करा.
06:13 फाईल SVG इमेज म्हणून सेव्ह होईल.
06:18 पुढे इमेज PDF डॉक्युमेंट म्हणून एक्सपोर्ट करू.
06:23 File मेनूत जाऊन “Save as image” सिलेक्ट करा.
06:27 Save as image” हा डायलॉग बॉक्स उघडेल.
06:31 File Type मधून PDF डॉक्युमेंट सिलेक्ट करा.
06:35 फाईलला “Pentane-ethane” हे नाव द्या.
06:39 "Save" वर क्लिक करा.
06:41 येथे फाईल PDF डॉक्युमेंट म्हणून सेव्ह झालेली दिसेल.
06:46 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
06:50 थोडक्यात, या पाठात शिकलो
06:54 व्ह्यूचे पर्याय
06:56 झूम फॅक्टर, पेज सेटप
06:58 प्रिंट प्रिव्ह्यू
07:00 डॉक्युमेंट प्रिंट करणे
07:03 इमेज एक्सपोर्ट करणे.
07:05 असाईनमेंट म्हणून, रचना 'A5', 'B5' आणि 'JB5' फॉरमॅटमधे प्रिंट करा.
07:12 इमेजेस "EPS" आणि "PNG" फॉरमॅटमधे एक्सपोर्ट करा.
07:18 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
07:22 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:25 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07:30 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
07:32 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07:35 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07:39 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
07:46 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07:51 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07:59 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08:04 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, PoojaMoolya, Ranjana