Drupal/C4/RESTful-API-Implementation/Marathi
From Script | Spoken-Tutorial
|
|
00:01 | RESTful API Implementation वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत. |
00:06 | या ट्युटोरिअलमध्ये, आपण RESTful API म्हणजे काय ते समजावून सांगू. |
00:11 | Views वापरून RESTful API इम्पलेमेंटेशन (अंमलबजावणी) करणे शिकू. |
00:16 | हा ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी वापरत आहे Ubuntu Linux 16.04 |
00:22 | Drupal 8 आणि Firefox web browser |
00:25 | तुम्ही तुमच्या पसंतीनुसार कोणताही वेब ब्राउजर वापरू शकता. |
00:29 | या ट्युटोरियलचा अभ्यास करण्यासाठी, तुमच्याकडे Drupal चे मूलभूत ज्ञान असावे. |
00:34 | नसल्यास, संबंधित Drupal ट्युटोरिअल्ससाठी, दर्शविलेल्या लिंकला भेट द्या. |
00:40 | तुमच्याकडे कार्यरत इंटरनेट कनेक्शन देखील असावे. |
00:44 | RESTful API म्हणजे काय? |
00:47 | RESTful API हे REpresentational State Transfer (म्हणजे REST) तंत्रज्ञानावर आधारित आहे. |
00:55 | त्याला RESTful web service म्हणून देखील संदर्भित केले जाते. |
01:00 | RESTful API हे बाह्य clients ना server वर डेटा आणण्यासाठी, जोडण्यासाठी किंवा त्यात बदल करण्यासाठी पद्धती प्रदान करते. |
01:08 | उदाहरणार्थ: सामान server वापरून, आपण मोबाईल अॅप्स किंवा डेस्कटॉप वेबसाइट वापरुन बँक व्यवहार करू शकतो. |
01:17 | RESTful API एक सामान्य उद्देशाने वापरली जाणारी API आहे. |
01:20 | तर कोणतेही एप्लिकेशन, जसे कि इतर वेबसाईट, मूळ mobile apps आणि IoT devices तुमच्या server सह डेटाची देवाणघेवाण करू शकतात. |
01:31 | आपण क्रमाक्रमाने RESTful API implementation process शिकू. |
01:37 | खालील पायऱ्या Bitnami Drupal Stack वर लागू आहेत. |
01:41 | परंतु बहुतांश पायऱ्या इतर कोणत्याही Drupal इंस्टॉलेशनवर देखील लागू होतात. |
01:47 | Step No. 1
प्रथम आपण आपली Drupal8 site उघडू आणि आवश्यक core modules इन्स्टॉल करू. |
01:55 | असे करण्यासाठी, Extend टॅबवर जा. |
01:59 | खाली स्क्रोल करा आणि WEB SERVICES विभाग वर जा. |
02:03 | खालील मॉड्यूल्सवर चेक मार्क ठेवा: HAL, HTTP Basic Authentication, RESTful Web Services आणि Serialization. |
02:15 | नंतर त्यांना सक्षम करण्यासाठी खाली Install बटणावर क्लिक करा. |
02:20 | आपल्याला REST UI module स्वतः इन्स्टॉल करण्याची आवश्यकता असेल. |
02:25 | मी आधीच माझ्या मशीनमध्ये इन्स्टॉल आणि सक्षम केले आहे. |
02:29 | module कसे इन्स्टॉल करायचे ते जाणून घेण्यास, या सिरीजमधील Creating Dummy Content चे ट्युटोरिअल पहा. |
02:37 | Step No. 2
पुढे आपण REST client च्या विनंत्या स्वीकारण्यासाठी REST resources कॉन्फिगर करू. |
02:45 | असे करण्यासाठी, Configuration टॅबवर जा. WEB SERVICES अंतर्गत REST वर क्लिक करा. |
02:52 | REST resources पृष्ठ आता दिसत आहे. |
02:55 | Content च्या Edit बटणावर क्लिक करून formats ना प्रतिबंधित करू. |
03:01 | खाली स्क्रोल करा. Accepted request formats अंतर्गत json वर एक चेक मार्क द्या. |
03:08 | ते सेव्ह करण्यासाठी खाली Save configuration बटणवर क्लिक करा. |
03:13 | आता आपली Drupal site ही REST client कडून json format requests स्वीकारेल. |
03:19 | Step No. 3
पुढे आपल्याला authenticated users साठी उचित परवानग्या सेट करण्याची आवश्यकता आहे. |
03:26 | सामान्यपणे, तीन प्रकारचे users असतात जे RESTful API वापरू शकतात. |
03:32 | anonymous user |
03:34 | authenticated user आणि |
03:36 | कन्टेन्ट मध्ये बदल करण्यासाठी परवानगीसह authenticated users. |
03:41 | आता आपण आपली Drupal एक authenticated user साठी सेट करू जे स्वतःच्या कन्टेन्टला बनवू शकते, एडिट करू शकते आणि रद्ध करू शकते. |
03:50 | असे करण्यासाठी, People टॅबवर जा. |
03:53 | Permissions टॅबवर क्लिक करा. |
03:57 | खाली स्क्रोल करा आणि AUTHENTICATED USER साठी, दिलेल्यावर चेकमार्क करा.Basic Page: Create new content |
04:04 | Basic Page: Delete own content |
04:07 | Basic Page: Edit own content |
04:10 | खाली Save permissions बटणावर क्लिक करा. |
04:13 | मी authenticated users त्यांचे स्वतःचे कन्टेन्ट तयार करण्यास,एडिट करण्यास आणि रद्द करण्यास सक्षम केले आहे. |
04:20 | तुम्ही तुमच्या गरजेनुसार permissions देऊ शकता. |
04:24 | Step No. 4
आता आपल्याला content type ची आवश्यकता आहे ज्यावर आपल्याला RESTful API इम्पलिमेन्ट करायचे आहे. |
04:32 | Structure टॅबवर जा आणि Content types वर क्लिक करा. |
04:37 | मी RESTful API इम्पलिमेन्ट करण्यासाठी Events content type वापरणार आहे. |
04:42 | तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कोणतेही content type वापरू शकता. |
04:47 | Step No. 5
आता आपल्या Events content type साठी View आवश्यक आहे. |
04:53 | Views बद्दल जाणून घेण्यासाठी, या सिरीजमधील Displaying Contents using Views ट्युटोरिअल वर जा. |
05:00 | नवीन view, तयार करण्यासाठी, Structure आणि Views वर जा. |
05:06 | Add view वर क्लिक करा आणि त्यास Events underscore view म्हणून नाव द्या. |
05:12 | content of type बदलून All ते Events करा. |
05:17 | REST EXPORT SETTINGS अंतर्गत, Provide a REST export चेक करा. |
05:22 | REST export path आपण events म्हणून टाईप करू. |
05:27 | खाली Save and edit बटणवर वर क्लिक करा. |
05:30 | आता आपण आपले इव्हेंट्सचे डिस्प्ले (प्रदर्शन) सेटअप करू. |
05:34 | FORMAT विभागात, Show पर्यायमध्ये, Entity वर क्लिक करा. |
05:39 | दिसत असलेल्या REST export डायलॉग बॉक्समध्ये, Fields पर्याय निवडा. |
05:45 | Apply बटणवर क्लिक करा. |
05:47 | Row style options डायलॉग बॉक्समध्ये, सेटिंग्ज त्याप्रमाणे ठेवा. |
05:53 | नंतर Apply बटणवर क्लिक करा. |
05:55 | हे आपल्याला आपल्या view मध्ये fields जोडण्यास सक्षम करेल. |
06:00 | आता आपण आपल्या Events content type च्या सर्व fields जोडू शकतो. |
06:04 | Add बटणवर क्लिक करा. |
06:06 | हे उपलब्ध fields ची सूची उघडेल. |
06:10 | Search बॉक्समध्ये, टाईप करा body. |
06:13 | सूचीतुन Body निवडा, नंतर Add and configure fields बटणवर क्लिक करा. |
06:20 | Apply बटणवर क्लिक करा. |
06:22 | पुन्हा दुसरी फील्ड जोडण्यासाठी Add बटणवर क्लिक करा. |
06:27 | id साठी शोधा आणि सूचीमधून ID निवडा. |
06:32 | Add and configure fields बटणवर क्लिक करा. |
06:36 | नंतर Apply बटणवर क्लिक करा. |
06:38 | आपण आपल्या events view चा पाथ पाहू शकतो. |
06:43 | ही view सेव्ह करण्यासाठी आपण Save बटणवर क्लिक करू. |
06:47 | Step No. 6
पुढे डेटा पुनर्प्राप्त करण्यासाठी आपण एक नवीन view तयार करू. |
06:54 | Displays पॅनलमध्ये Add बटणवर क्लिक करा. |
06:59 | REST export पर्याय निवडा. |
07:02 | आता ही नवीन view कॉन्फिगर करू. |
07:05 | FORMAT विभागात, Entity वर क्लिक करा. |
07:09 | Fields पर्याय निवडा आणि Apply बटणवर क्लिक करा. |
07:14 | हे सर्व fields चेक करा जे आपल्याला आपल्या content type मध्ये पाहिजे.
आणि Apply बटणवर क्लिक करा. |
07:20 | येथे आपण पाहू शकता की आपले आवश्यक fields आता समाविष्ट आहेत. |
07:25 | PATH SETTINGS अंतर्गत, No path is set लिंकवर क्लिक करुन आपण पाथ सेट करू. |
07:31 | Path फील्डमध्ये, टाईप करा events slash percentage sign. |
07:37 | Percentage चिन्हाचा वापर व्हॅल्यूज सादर करण्यासाठी केला जातो जो contextual filter साठी वापरला जाईल. |
07:44 | तळाशी Apply बटणवर क्लिक करा. |
07:47 | आता उजव्या बाजूस, ADVANCED पर्यायावर क्लिक करा. |
07:51 | CONTEXTUAL FILTERS अंतर्गत, Add बटणवर क्लिक करा. |
07:56 | आपल्या node चा संदर्भ घेण्यासाठी आपण contextual filter साठी एक ID जोडू. |
08:00 | id साठी शोधा आणि सूचीमधून ID निवडा. |
08:05 | Apply बटणवर क्लिक करा. |
08:07 | इतर सेटिंग्ज त्याप्रमाणे ठेवा. |
08:10 | नंतर Apply बटणवर क्लिक करा. |
08:13 | हे कॉन्फिगरेशन सेव्ह करण्यासाठी Save वर क्लिक करा. |
08:17 | यासह, आपण Views चा वापर करून आपल्या Drupal साईटमध्ये RESTful API यशस्वीरीत्या इम्पलिमेन्ट (अंमलात) केले आहे. |
08:24 | नंतर सिरीजमध्ये , आपण REST Client वापरून आपले RESTful API कसा तपासावा हे शिकू. |
08:31 | यासह आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
08:34 | थोडक्यात. |
08:36 | या ट्युटोरिअलमध्ये, आपण शिकलो- RESTful API आणि Views वापरून RESTful API इम्पलेमेंटेशन (अंमलबजावणी). |
08:45 | असाइन्मेंट म्हणून- Article content type वर RESTful API इम्पलिमेन्ट करा. |
08:51 | खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा. |
08:58 | स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
09:09 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD आणि NVLI , Ministry of Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
09:19 | या ट्यूटोरियलचे योगदान विशाल जिंदल यांनी केले आहे.
आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद. |