Drupal/C4/Hosting-a-Drupal-website/Marathi
From Script | Spoken-Tutorial
| |
|
| 00:01 | स्पोकन ट्युटोरियलच्या Hosting a Drupal website वरील पाठात आपले स्वागत. |
| 00:06 | या पाठात आपण शिकणार आहोत- आपल्या वेबसाईटसाठी कोड आणि डेटाबेस तयार करणे, |
| 00:13 | आपली Drupal वेबसाईट होस्ट करणे आणि या वेबसाईटवर आपले घटक अपलोड करणे. |
| 00:20 | या पाठासाठी आपण वापरणार आहोत, उबंटु लिनक्स 16.04 आणि फायरफॉक्स वेब ब्राउजर. |
| 00:28 | तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता. |
| 00:32 | या पाठाच्या सरावासाठी तुमच्याकडे चालू स्थितीतील इंटरनेट कनेक्शन असणे गरजेचे आहे. |
| 00:37 | तसेच cPanel सारखे वेब होस्टिंग कंट्रोल पॅनेल आणि डोमेन नेम आवश्यक आहे. |
| 00:43 | हा पाठ समजण्यासाठी तुम्हाला ड्रुपलचे बेसिक ज्ञान असावे. |
| 00:47 | नसल्यास, Drupal च्या संबधित पाठांसाठी कृपया येथे दर्शवलेल्या लिंकसना भेट द्या. |
| 00:53 | प्रथम Drupal web hosting services बद्दल जाणून घेऊ. |
| 00:57 | तिथे Godaddy, Bigrock आणि HostCats यासारख्या अनेक वेब होस्टिंग सर्व्हिसेस उपलब्ध आहेत. |
| 01:06 | हे सर्व्हिस प्रोव्हायडर्स ऑटो इन्स्टॉलर स्क्रिप्टसह cPanel बेस्ड आहेत. |
| 01:12 | या प्रोव्हायडर्सना पैसे देऊन येथे जागा विकत घेता येते. |
| 01:17 | वेबसाईट होस्ट करण्यासाठी तुम्हाला लोकल Drupal वेबसाईटचा कोड आणि डेटाबेस लागेल. |
| 01:24 | होस्ट करण्याची आपली लोकल Drupal वेबसाईट उघडू. |
| 01:29 | आपण प्रथम cache क्लिअर करू. ते करण्यासाठी Configuration मेनूवर क्लिक करा. |
| 01:35 | Development खालील Performance वर क्लिक करा. |
| 01:40 | येथे Aggregate CSS files आणि Aggregate JavaScript files यांचे चेकमार्क्स काढून टाका. |
| 01:48 | Save configuration बटणावर क्लिक करा. |
| 01:52 | आता Clear all caches बटणावर क्लिक करा. caches क्लिअर झालेल्या दिसतील. |
| 02:00 | आता आपला कोड तयार ठेवू. त्यासाठी File browser उघडा. |
| 02:06 | आपण लोकल मशीनवर जिथे Drupal इन्स्टॉल केले आहे त्या फोल्डरवर जा. |
| 02:11 | आता apps मधील drupal मधील htdocs फोल्डरवर जा. |
| 02:16 | htdocs फोल्डरमधे आपल्या लोकल वेबसाईटचा कोड उपलब्ध आहे. हा फोल्डर कॉम्प्रेस किंवा झिप करू या. |
| 02:25 | आता हे मी माझ्या मशीनवर डाऊनलोडस फोल्डरमधे सेव्ह करणार आहे. |
| 02:30 | आता आपला कोड तयार आहे. |
| 02:32 | पुढे आपण आपला डेटाबेस तयार करणार आहोत. आपल्या वेबसाईटचा phpMyAdmin उघडू या. |
| 02:41 | bitnami_drupal8 या डेटाबेसवर क्लिक करा. |
| 02:46 | वरील पॅनेलमधील Export बटणावर क्लिक करा. |
| 02:50 | नंतर Custom ही Export method निवडा. |
| 02:54 | Object creation options या भागात खाली, Add DROP TABLE हा पर्याय चेकमार्क करून निवडा. |
| 03:01 | खाली स्क्रॉल करून Go बटणावर क्लिक करा. |
| 03:06 | फाईल सेव्ह करण्यासाठी OK बटणावर क्लिक करा. |
| 03:09 | डाऊनलोडस हा फोल्डर उघडा. एक्सपोर्ट केलेली sql आणि htdocs zip फाईल दिसेल. |
| 03:18 | cPanel सेटअप करण्याबद्दल जाणून घेऊ. Set Up बटणावर क्लिक करा. |
| 03:25 | येथे आपल्याला डोमेन नेम निवडायचे आहे. मी आधीच codingfordrupal.info हे डोमेन नेम विकत घेतले आहे. |
| 03:33 | येथे तुम्हाला तुमचे स्वतःचे डोमेन नेम वापरणे गरजेचे आहे. |
| 03:37 | डोमेन कसे विकत घ्यायचे याची माहिती या पाठाच्या ऍडिशनल मटेरियल या लिंकवर उपलब्ध आहे. |
| 03:43 | Next बटणावर क्लिक करा. |
| 03:46 | येथे आपल्याला डेटा सेंटर निवडणे गरजेचे आहे. मी Asia वर क्लिक करून Next बटणावर क्लिक करत आहे. |
| 03:53 | cPanel username मधे आपल्याला आपले युजरनेम देणे गरजेचे आहे. |
| 03:58 | पासवर्डसाठी, मी केवळ Generate a password बटणावर क्लिक करणार आहे. |
| 04:03 | तुम्ही तुमच्या पसंतीचे कुठलेही युजरनेम आणि पासवर्ड निवडू शकता. |
| 04:07 | भविष्यात वापरण्यासाठी ह्या लॉगिनच्या तपशीलाची नोंद करून ठेवा. |
| 04:11 | Next बटणावर क्लिक करा. |
| 04:14 | यानंतर हे आपली वेबसाईट बिल्ड करण्यासाठी wordpress वापरायचे का ते विचारेल. |
| 04:20 | आपण Drupal वेबसाईट होस्ट करणार आहोत. |
| 04:23 | त्यामुळे No, not now बटणावर क्लिक करा. नंतर Finish बटणावर क्लिक करा. |
| 04:28 | हे सेटअप पूर्ण करण्यासाठी बराच वेळ घेऊ शकते. |
| 04:32 | एकदा सेटअप पूर्ण झाला की आपल्याला, अशाप्रकारची विंडो दिसेल.
येथे Manage बटणावर क्लिक करा. |
| 04:40 | आपली cPanel मेन विंडो आता उघडली आहे. येथे आपण Website Name, IP Address इत्यादी बघू शकतो. |
| 04:48 | कृपया या पेजकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन दिलेले पर्याय तपासून पहा. |
| 04:53 | आता आपण cPanel वर डेटाबेस तयार करू. |
| 04:57 | File browser उघडा आणि आपण Bitnami Drupal Stack इन्स्टॉल केलेल्या फोल्डरमधे जा. |
| 05:04 | आता apps मधील drupal मधील htdocs मधील sites मधील default मधील settings.php वर जा. |
| 05:13 | settings.php ही फाईल एडिटरमधे उघडा. |
| 05:18 | फाईल शेवटपर्यंत स्क्रॉल डाऊन करा. येथे तुम्ही डेटाबेसचा तपशील पाहू शकता. |
| 05:24 | cPanel मधे डेटाबेस तयार करताना हा तपशील तुम्हाला वापरावा लागेल. |
| 05:30 | cPanel मेन विंडोवर जा. |
| 05:33 | डेटाबेसेस खालील MySQL Database Wizard वर क्लिक करा. |
| 05:37 | आता settings.php फाईलमधून डेटाबेसचे नाव कॉपी करा. |
| 05:42 | आणि ते MySQL Database Wizard मधे डेटाबेसचे नाव म्हणून पेस्ट करा. |
| 05:47 | Next Step बटणावर क्लिक करा. |
| 05:50 | युजरनेम आणि पासवर्ड कॉपी करून पेस्ट करा. |
| 05:55 | Create User बटणावर क्लिक करा. |
| 05:57 | ALL PRIVILEGES हा पर्याय चेकमार्क करून निवडा. |
| 06:01 | Next Step बटणावर क्लिक करा. |
| 06:04 | Return to MySQL Databases वर क्लिक करा. |
| 06:08 | येथे आपण बनवलेला डेटाबेस आणि युजर पाहू शकतो. |
| 06:13 | पुढे cPanel मधे Drupalइन्स्टॉल करण्याबद्दल जाणून घेऊ. वरच्या पॅनेलमधील Home बटणावर क्लिक करा. |
| 06:21 | Web Applications खालील Drupal वर क्लिक करा. |
| 06:24 | उजव्या बाजूला असलेल्या install this application बटणावर क्लिक करा. |
| 06:29 | Location खाली आपण डोमेन नेम बघू शकतो. |
| 06:33 | Version खाली तुम्ही तुमच्या मशीनवर इन्स्टॉल केलेले वर्जन निवडा. मी 8.2.6 निवडत आहे. |
| 06:41 | Settings खाली आपल्याला ऍडमिनिस्ट्रेटरसाठी आपल्या पसंतीचे युजरनेम आणि पासवर्ड देणे गरजेचे आहे. |
| 06:48 | भविष्यात वापरण्यासाठी ह्या लॉगिनच्या तपशीलाची नोंद करून ठेवा. |
| 06:52 | Advanced या विभागात आपण डेटाबेस, इमेल्स आणि बॅकअप यांचा सेटअप करू शकतो. |
| 06:58 | मी Let me manage these settings हा पर्याय निवडत आहे. |
| 07:02 | डेटाबेस मॅनेजमेंटमधे Let me choose an existing database हा पर्याय निवडा. |
| 07:07 | डेटाबेस नेममधे आपण बनवलेला डेटाबेस निवडा. |
| 07:12 | settings.php फाईलमधून तपशील घेऊन डेटाबेस युजरनेम आणि पासवर्डमधे भरा. |
| 07:19 | Table Prefix हे फिल्ड रिकामे ठेवा. |
| 07:23 | Install बटणावर क्लिक करा. |
| 07:26 | इन्स्टॉलेशन झाल्यावर आपल्या वेबसाईटचे नाव येथे दिसेल. त्यावर क्लिक करा. |
| 07:33 | आपली वेबसाईट यशस्वीरित्या होस्ट झाली आहे. |
| 07:36 | ती लोकल कंटेंट वापरून अपडेट करायची आहे. तेव्हा वेबसाईटवर लोकल कंटेट अपलोड कसे करायचे ते पाहू. |
| 07:45 | cPanel मधील मेन विंडोवर जा आणि वरच्या पॅनेलमधील Home बटणावर क्लिक करा. |
| 07:51 | आपण cPanel चा File Manager उघडणार आहोत. |
| 07:55 | Web Root पर्याय निवडल्याची खात्री करा. Go बटणावर क्लिक करा. |
| 08:01 | आता आपण public_html फोल्डरमधे आहोत. वरच्या पॅनेलमधील Upload बटणावर क्लिक करा. |
| 08:09 | Browse बटणावर क्लिक करा. आणि डाऊनलोडस फोल्डरमधून htdocs.zip फाईल सिलेक्ट करा. आता फाईल यशस्वीरित्या अपलोड झाली आहे. |
| 08:19 | तुमच्या फाईलचा आकार मोठा असल्यास फाईल अपलोड करण्यासाठी कृपया Filezilla किंवा SSH client चा उपयोग करा. |
| 08:27 | आता ही विंडो बंद करा. |
| 08:29 | File Manager विंडोमधे htdocs.zip फाईलवर जाऊन क्लिक करा. |
| 08:36 | आता ही फाईल एक्सट्रॅक्ट करण्यासाठी वरच्या पॅनेलमधील Extract बटणावर क्लिक करा. |
| 08:41 | उघडलेल्या पॉपअप विंडोमधे Extract File बटणावर क्लिक करा. |
| 08:47 | एकदा फाईल एक्सट्रॅक्ट झाली की htdocs फोल्डरवर डबल क्लिक करा. |
| 08:52 | आता Sites या फोल्डरवर जा. |
| 08:55 | येथे आपण डिफॉल्ट या फोल्डरची परमिशन बदलणार आहोत. |
| 08:59 | त्यासाठी Permissions कॉलम वर क्लिक करा. त्याची व्हॅल्यू बदलून 755 करा. हे युजरला राईट परमिशन देईल. |
| 09:08 | नंतर डिफॉल्ट या फोल्डरवर जा आणि settings.php फाईलच्या परमिशन्स बदला. |
| 09:16 | पुन्हा एकदा Permissions कॉलमवर क्लिक करून त्याची व्हॅल्यू बदलून 600 करा. |
| 09:22 | हे युजरला राईट परमिशन देईल ज्यामुळे आपण settings.php फाईल एडिट करू शकू. |
| 09:29 | settings.php फाईल उघडण्यासाठी वरच्या पॅनेलमधील Code Editor बटणावर क्लिक करा. |
| 09:35 | Edit बटणावर क्लिक करा. |
| 09:37 | स्क्रॉल करून फाईलच्या खालच्या भागात जा. येथे आपण डेटाबेसचा तपशील बघू शकतो. |
| 09:43 | unix_socket ही ओळ काढून टाका. |
| 09:46 | आता वरच्या पॅनेलमधील Save Changes बटणावर क्लिक करा. |
| 09:50 | वरच्या पॅनेलमधील Up One Level बटणावर क्लिक करा. |
| 09:54 | पुन्हा एकदा Up One Level बटणावर क्लिक करा. आता आपण हे घटक public_html फोल्डरमधे हलवणार आहोत. |
| 10:04 | फाईल्स आणि फोल्डर्स सिलेक्ट करण्यासाठी Select All बटणावर क्लिक करा. |
| 10:09 | वरच्या पॅनेलमधील Move बटणावर क्लिक करा. |
| 10:12 | फाईल पाथमधून htdocs काढून टाका. |
| 10:16 | Move Files बटणावर क्लिक करा. |
| 10:18 | बाजूच्या पॅनेलमधील public_html फोल्डरवर क्लिक करा. |
| 10:24 | आता public_html फोल्डरमधे आपल्या लोकल वेबसाईटचा कोड रिप्लेस झाला आहे. |
| 10:32 | आता आपल्या चालू वेबसाईटवर आपला लोकल डेटाबेस इंपोर्ट करू. त्यासाठी cPanel च्या मेन विंडोवर जा. |
| 10:41 | Databases खालील phpMyAdmin वर क्लिक करा. |
| 10:45 | साईड पॅनेलमधील आपण आधी बनवलेल्या डेटाबेस वर क्लिक करा. |
| 10:50 | वरच्या पॅनेलमधील Import बटणावर क्लिक करा. |
| 10:54 | नंतर Browse बटणावर क्लिक करा. |
| 10:56 | आता आपल्या लोकल Drupal मधून एक्सपोर्ट केलेली sql फाईल निवडा. |
| 11:02 | शेवटी Go बटणावर क्लिक करा. आपण बघू शकतो की sql फाईल यशस्वीरित्या इंपोर्ट झाली आहे. |
| 11:10 | आता ब्राउजरमधे नवीन टॅब उघडा आणि ऍड्रेसबारमधे तुमचे डोमेन नेम टाईप करा.
आपली Drupal वेबसाईट यशस्वीरित्या होस्ट केली गेली आहे. |
| 11:20 | अशाप्रकारे आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
| 11:24 | थोडक्यात, आपण या पाठात जाणून घेतले-
आपल्या वेबसाईटसाठी कोड आणि डेटाबेस तयार करणे, आपली Drupal वेबसाईट होस्ट करणे आणि या वेबसाईटवर आपले घटक अपलोड करणे. |
| 11:38 | या व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. |
| 11:46 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
| 11:57 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
| 12:09 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |