Drupal/C3/Adding-Functionalities-using-Modules/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | स्पोकन ट्युटोरियलच्या 'Adding Functionalities using Modules' वरील पाठात आपले स्वागत. |
00:08 | या पाठात 'Modules' विषयी शिकणार आहोत. 'Book Module' आणि 'Forum Module' बद्दल जाणून घेऊ. |
00:19 | या पाठासाठी वापरणार आहोत, उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम, Drupal 8 आणि Firefox वेब ब्राउजर. आपण आपल्या पसंतीचा वेब ब्राउजर वापरू शकता. |
00:35 | ड्रुपल वेबसाइटचा विस्तार किंवा फीचर समाविष्ट करण्यासाठी 'Modules' आणि 'themes' या प्राथमिक पध्दती आहेत. |
00:42 | ड्रुपल एक संपूर्ण कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम प्रदान करते. परंतु काही वेळा आपल्याला आणखी काही हवे असते तेव्हा 'modules' चा उपयोग सुरू होतो. |
00:53 | 'Modules' वेबसाइट मधे फीचर्स समाविष्ट करतात. येथे ड्रुपलमधे तीन प्रकारची 'modules' आहेत. |
00:59 | येथे 'Core Modules' आहेत. ही 'modules' डिफॉल्ट रूपात ड्रुपल सोबत येतात. |
01:06 | ती बंद करता येतात. परंतु ftp च्या सहाय्याने वेबसाइटच्या मुख्य भागात कधीही, म्हणजेच ही 'modules' काढण्यासाठी जाऊ नका. |
01:15 | जेव्हा आपण ड्रुपल अपडेट करू तेव्हा ते परत इन्स्टॉल केले जातील. |
01:22 | ह्या 'Core Modules' ची संरचना ड्रुपलच्या प्राथमिक फंक्शनॅलिटीजसाठी करण्यात आलेली आहे. |
01:28 | नंतर येथे 'Contributed Modules' आहेत. आपण आधीच एक म्हणजेच 'Devel' इन्स्टॉल केले आहे. |
01:38 | 'Contributed Module' हे असे मॉड्युल आहे जे कम्युनिटीतील एखाद्या सदस्याने बनवलेले असते. हे 'drupal.org' वर उपलब्ध आहे. |
01:49 | 'Custom Module' हे शेवटच्या प्रकारचे मॉड्युल आहे. |
01:52 | येथे आपल्याला काही विशिष्ट फंक्शनॅलिटीज हव्या आहेत ज्यांची आपल्या प्रोजेक्टमधे आवश्यकता आहे. ह्यासाठी module उपलब्ध नाही आणि इतर कोणी त्याचा अजून विचार केलेला नाही. |
02:07 | अर्थातच आपल्याला हे स्वतः बनवावे लागेल किंवा पैसे देऊन बनवून घ्यावे लागेल. |
02:15 | येथे ड्रुपलची अनेक वेगवेगळी 'modules' उपलब्ध आहेत. |
02:20 | 'drupal.org' वर आधीच 32, 458 modules दिसत आहेत. |
02:30 | 'Modules' अनेक कामे करतात. |
02:33 | एक 'module', 'Content type' मधे 'field' समाविष्ट करू शकते. दुसरे 'module' आपल्या संपूर्ण वेबसाइटसाठी एक पूर्ण 'Voting System' समाविष्ट करू शकते. |
02:45 | परंतु आपण फक्त आपल्या ड्रुपल वर्जनसाठी अनुकूल 'module' चाच उपयोग करू शकतो. |
02:51 | त्यामुळे आपल्याला 'drupal.org/project/modules' वर आपली 'modules' फिल्टर करणे आवश्यक आहे. |
03:03 | फिल्टर केल्यावर हे नेहमी 'popularity' च्या क्रमानुसार सूची दर्शवते. |
03:09 | पहिल्या तीन किंवा चार पानांवर सर्वात लोकप्रिय 'modules' आहेत. म्हणजेच ती सर्वाधिक आणि वारंवार वापरली जाणारी तसेच अतिशय उपयोगी आहेत. |
03:21 | थोडक्यात, 'Modules' फीचर्स समाविष्ट करतात. drupal.org वर अनेक 'modules' विनामूल्य उपलब्ध आहेत. |
03:30 | आपण बनवलेली वेबसाइट उघडा. 'Extend' वर क्लिक करून खाली स्क्रोल करा. |
03:38 | आपल्याजवळ काही 'modules' आहेत जी ड्रुपल सोबत डिफॉल्ट रूपात आली आहेत. परंतु ती अजून सुरू केलेली नाहीत. |
03:48 | 'Book module' सुरू करा. |
03:53 | थोडे खाली स्क्रोल केल्यावर आपल्याला 'Forum module' मिळेल. ते सुरू करा. |
04:01 | एकाच वेळी दोन वेगवेगळी 'modules' सुरू करू शकतो. |
04:07 | खाली स्क्रोल करून 'Install' वर क्लिक करा. |
04:12 | 'Book module' आणि 'Forum module' ही दोन्ही वेगवेगळ्या प्रकारची मॉड्युल्स आहेत. |
04:19 | परंतु ती दोन्हीही संपूर्ण नवीन 'Content types' बनवत आहेत. आणि ती ड्रुपलचा विस्तार करून त्यामधे अतिरिक्त 'functionality' आणतात. |
04:29 | 'Drupal modules' ही सर्वच मॉड्युल्स असूनही ती खूप वेगवेगळ्या प्रकारची कामे करतात. |
04:35 | जेव्हा आपल्याला आपल्या साईटमधे फीचर्स समाविष्ट करायची असतात, मग ती संपूर्ण 'functionality' असू दे किंवा केवळ नवे 'Field type'. |
04:45 | तुम्ही 'Drupal core' चा विस्तार करण्यासाठी 'module' समाविष्ट करत असता. |
04:50 | आता 'Structure' खालील 'Content types' वर क्लिक करा. आपण येथे 'Book page' आणि 'Forum topic' हे नवे कोरे 'Content Types' बघू शकतो. |
05:03 | 'Book page' चे 'Content type' बघण्यासाठी 'Content' वर क्लिक करून नंतर 'Add content' क्लिक करा. |
05:11 | 'Book page' आपल्या साईटवर 'chapters', 'navigations' सह एक पूर्ण पुस्तक तयार करते. आणि आपण हवा तिथे 'block' ही ठेवू शकतो. |
05:24 | 'Book page' वर क्लिक करून 'Title' मधे 'Our Drupal Manual' टाईप करा. |
05:30 | 'Body' मधे 'This is the beginning of our Drupal manual' टाईप करा. |
05:36 | 'Publication settings' वर आपल्याकडे नवीन सेटींग आहेत. |
05:41 | 'BOOK OUTLINE' वर क्लिक करून 'None' पर्याय बदलून तो 'Create a new book' करा. नंतर 'Save and publish' वर क्लिक करा. |
05:55 | येथे 'Add child page' नावाच्या लिंककडे लक्ष द्या. drupal.org मधे 'Documentation' वर क्लिक करा. |
06:06 | 'Understanding Drupal' वर क्लिक केल्यावर आपण 'Book module' पाहू शकतो. |
06:12 | उजव्या बाजूला 'navigation' आहे. पेजच्या शेवटी आणखी काही 'navigation' आहेत जी आपोआप तयार झाली आहेत. |
06:24 | डाव्या बाजूला 'links' आहेत. |
06:29 | 'Drupal concept' वर क्लिक करा. आपल्याजवळ नेविगेशन आहे. |
06:34 | पुढे काय येणार आहे हे दाखवण्यासाठी उजव्या बाजूला असलेले नेविगेशन देखील विस्तारले गेले आहे. |
06:42 | 'Book module' च्या सहाय्याने आपण पूर्ण आणि गुंतागुंतीचे युजर गाइड किंवा कोणत्याही प्रकारचे पुस्तक बनवू शकतो. |
06:51 | आपल्या वेबसाईटवर परत जाऊन 'Add child page' वर क्लिक करा. |
06:57 | 'Title' मधे 'Installing Drupal' टाईप करून 'Body' मधे "This is where we explain how to install Drupal" टाईप करा. |
07:08 | आपण बनवत असलेल्या 'Drupal manual' मधे हे आपोआप आलेले दिसेल. असे होण्याचे कारण 'Create Book page' वर आपण क्लिक केले होते. |
07:20 | 'Save and publish' वर क्लिक करा. |
07:23 | आपण बघू शकतो की नेविगेशन आपोआप तयार झालेले आहे. |
07:29 | 'Up' वर क्लिक करा. हे मुख्य 'level' वर घेऊन जाईल. यासोबत 'block' उपलब्ध असल्याचा मागे मी उल्लेख केला होता. |
07:41 | 'Structure' खालील 'Block layout' वर क्लिक करा. |
07:45 | आणि, 'Sidebar first' मधे block ठेवू या. 'Place block' वर क्लिक करा. आपल्याकडे 'Book navigation' मेनू आहे. |
07:56 | 'Place block' वर क्लिक करून 'Save block' वर क्लिक करा. |
08:01 | 'Save blocks' वर क्लिक करून साईट वर जा. येथे 'Book navigation', 'Our Drupal Manual' आणि 'Installing Drupal' आहे. |
08:14 | आपण नवीन 'child pages' समाविष्ट करताना हे गरजेनुसार छोटे होईल किंवा विस्तारेल. |
08:21 | लक्षात घ्या, 'drupal.org' वर जाऊन 'user manual' किंवा 'documentation' च्या माध्यमातून ब्राउज करा. ह्यासाठी हे 'Book module' चा उपयोग करत आहे. |
08:35 | अशा प्रकारचे कंटेंट आपल्या साईटसाठी आवश्यक असल्यास हे अतिशय प्रभावशाली आहे. येथे तुम्ही 'title' आणि 'body' पर्यंतच सीमित नाहीत. |
08:47 | आपण 'Content type' मधे 'fields' समाविष्ट करू शकतो जी 'Book module' सोबत येतात. |
08:53 | 'forum' मुळे आपल्या वेबसाइटला खरोखर फायदा होणार असल्यास 'Forum module' अतिशय उपयुक्त आहे. |
09:01 | 'Content' वर क्लिक करून 'Add content' वर क्लिक करा. |
09:07 | 'Forum module' प्रत्यक्षात 'Forum topic' नावाचा नवा 'Content type' तयार करेल. |
09:13 | हा 'field able' आहे, म्हणजेच आपण फक्त 'title' आणि 'body' पुरतेच सीमित नाही. |
09:21 | 'Forum topic' वर क्लिक करा. 'forum topic' ला 'Learning Drupal' असे नाव द्या. 'Forums' च्या ड्रॉपडाऊनमधे 'General discussion' पर्याय निवडा. |
09:35 | नंतर 'body' मधे "Hi, I’m just learning Drupal. Can someone help me?" टाईप करा. |
09:42 | 'Save and publish' वर क्लिक करा. |
09:45 | आता हे 'Forum Content type' मधे असल्यामुळे 'comments' समाविष्ट करून प्रतिक्रिया द्या. |
09:53 | येथे Sure I can help. You should just read everything at Drupalville! ही कॉमेंट समाविष्ट करून 'Save' वर क्लिक करा. |
10:07 | आपण सुपर युजर म्हणून लॉगिन केले असल्यामुळे त्याला आपोआप मंजूरी दिली गेली आहे. |
10:14 | 'General discussion' वर क्लिक केल्यावर आपल्याला एक जनरल डिस्कशन दिसेल. |
10:21 | 'Learning Drupal' नावाचा 'Forum topic' एका कॉमेंट सहित दाखवत आहे. |
10:25 | कॉमेंटवर क्लिक करून आपण कॉमेंटस समाविष्ट करू शकतो. अशाप्रकारे आपण सर्व प्रकारचे 'forums' बनवू शकतो. |
10:37 | 'Forums' वर क्लिक करा. |
10:41 | नवा 'forum topic' समाविष्ट करण्यासाठी येथे क्लिक करा, जे 'general discussion' असेल. परंतु 'administrator' म्हणून तुम्हाला यापेक्षा आणखी वेगळे 'forums' समाविष्ट करायला लागू शकतात. |
10:55 | आता हे करून बघू. 'Structure' वर क्लिक करून नंतर 'Forums' वर क्लिक करा. येथे नवे 'forums' आणि 'containers' समाविष्ट करू शकतो. |
11:07 | 'forum' समाविष्ट करायचा असल्यास तो करू शकतो. आणि मी त्याचा हवा तसा क्रम लावू शकते. |
11:18 | 'Content' वर जा आणि नंतर 'Add content' वर जाऊन 'Forum topic' वर जा. आता हे इतर 'forums' मधे ठेवण्याचा पर्याय आपल्याकडे आहे. |
11:31 | अशा प्रकारे आपण ड्रुपल वेबसाइट वर 'forum' चे व्यवस्थापन करू शकतो. |
11:38 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. थोडक्यात,या पाठात 'Modules' ची ओळख, 'Book Module' आणि 'Forum Module' बद्दल शिकलो. |
12:05 | हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्यावर आधारित असून आय आय टी बॉमबेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे |
12:16 | या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. |
12:25 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
12:35 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
12:49 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |