Drupal/C2/Taxonomy/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | स्पोकन ट्युटोरियलच्या Taxonomy वरील पाठात आपले स्वागत. |
00:05 | या पाठात आपण शिकणार आहोत: टॅक्सोनॉमी आणि टॅक्सोनॉमी समाविष्ट करणे. |
00:11 | या पाठासाठी आपण वापरणार आहोत, उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम, Drupal 8 आणि फायरफॉक्स वेब ब्राऊजर. तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता. |
00:23 | आधी तयार केलेली आपली वेबसाईट उघडू. |
00:27 | आता आपल्याकडे सर्व Content types आणि fields आहेत. आता वर्गीकरण समाविष्ट करणे गरजेचे आहे. येथे Taxonomy हा भाग येतो. |
00:37 | Taxonomy म्हणजेच वर्गीकरण. |
00:41 | आपले IMDB चे उदाहरण पाहू. IMDB साईटवर Movie Genre हे फिल्ड आहे. |
00:50 | ड्रुपलची taxonomy ही अशाप्रकारे काम करते. |
00:54 | Movie genre ही vocabulary असेल. ही मुख्य category साठीची Term आहे. |
01:00 | त्या vocabulary मधे आणखी काही Terms आहेत. |
01:04 | त्या आपण स्क्रीनवर पाहू शकतो. ACTION, ADVENTURE, COMEDY, DRAMA आणि ROMANCE. |
01:11 | आणि COMEDY खाली आपल्याकडे ROMANTIC, ACTION, SLAPSTICK आणि SCREWBALL ह्या Terms आहेत. |
01:18 | Drupal vocabulary किंवा taxonomy मधे अमर्यादित नेस्टेड categories किंवा terms असू शकतात. |
01:24 | आता येथे एक गोष्ट अतिशय महत्वाची आहे. |
01:28 | जेथे साईटस अपयशी होतात असा एक भाग म्हणजे - कंटेंटचे वर्गीकरण करण्यासाठी built-in tagging widget किंवा tag vocabulary वापरणे. |
01:37 | categories हव्या तशा वाढवता येणे चांगले असले तरी यात काही मूलभूत समस्या आहेत. |
01:44 | कोणी टायपिंगच्या चुका केल्यास काय होईल? |
01:47 | म्हणजे energy – e n e r g y आणि e n r e g y हे समान नाही आणि ड्रुपलला हा फरक माहित नाही. |
01:56 | त्यामुळे अचानक दोन कॅटॅगरीज तयार होतील आणि कंटेंट जोडलेले राहणार नाहीत. |
02:02 | म्हणूनच आम्ही स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे क्लोज्ड taxonomy चा सल्ला देतो. |
02:08 | ते सेटप करणे सोपे आहे. आपण ते ह्या मालिकेच्या पुढील पाठांत पाहू. |
02:12 | सध्या समजून घ्या की,Taxonomy अनेक प्रकारे वापरता येते. |
02:17 | कंटेंटची सूची तयार करण्यास आपण शिकलो. योग्य वापर केल्यास सर्व प्रकारचे व्ह्यूज फिल्टर आणि सॉर्ट करण्यास taxonomy चा देखील उपयोग होतो. |
02:28 | आता taxonomy बद्दल जाणून घेऊ. |
02:32 | Events Content type साठी टॅक्सोनॉमी सेट करू. |
02:35 | Structure वर क्लिक करा. खाली स्क्रॉल करून Taxonomy वर क्लिक करा. |
02:41 | तुमच्या लक्षात असेल की आपण ब-याच वेळा टॅग्ज सेट करत असतो. |
02:46 | पण आधी म्हटल्याप्रमाणे आपल्याला closed taxonomy हवी आहे- ज्यावर आपले नियंत्रण राहिल आणि लोक त्यांच्या terms सहज वाढवू शकणार नाहीत. |
02:56 | त्यासाठी Add vocabulary क्लिक करा. त्याला "Event Topics" नाव द्या. |
03:02 | Description मधे टाईप करा - "This is where we track the topics for Drupal events". |
03:09 | Save वर क्लिक करा. आता terms व्होकॅब्युलरीमधे समाविष्ट करू. Add a term वर क्लिक करा. |
03:16 | स्क्रीनवर terms ची सूची दिसेल ज्या आपण समाविष्ट करणार आहोत – Introduction to Drupal, Site Building, |
03:24 | Module Development, Theming, आणि Performance. |
03:28 | ते समाविष्ट करू. Introduction to Drupal टाईप करून Save वर क्लिक करा. |
03:34 | हे आपल्याला पुन्हा Add स्क्रीनवर घेऊन जाईल. |
03:39 | आता "Site Building" टाईप करून Save वर क्लिक करा. |
03:43 | Module Development टाईप करून Save क्लिक करा. तसेच Theming….... Enter दाबल्यावर हे आपोआप सेव्ह करत आहे. |
03:53 | आणि शेवटी Performance टाईप करून Save वर क्लिक करा. |
03:57 | येथे क्लिष्ट vocabulary समाविष्ट करता येत असली तरी सध्या आपण ती सोपीच ठेवू. |
04:03 | Taxonomy वर क्लिक करा. Event Topics मधील terms च्या सूचीत जा. |
04:09 | आपल्याकडे Introduction, Module Development, Performance, Site Building आणि Theming ह्या terms आहेत. |
04:16 | त्या अक्षरांनुसार आहेत. |
04:19 | परंतु मला ते त्यांच्या काठिण्य क्रमानुसार लावायचे आहेत. |
04:23 | म्हणून मी Module Development खाली, आणि Site Building वर घेत आहे. |
04:27 | आणि Site Building नंतर Theming ठेवणार आहे. सर्वात शेवटी Performance ठेवत आहे. |
04:34 | हे केवळ क्लिक करून ड्रॅग करा. केलेले बदल नेहमी सेव्ह करा. |
04:39 | अन्यथा या स्क्रीनमधून बाहेर पडल्यावर केलेले बदल ड्रुपल लक्षात ठेवत नाही. |
04:44 | Save क्लिक करा. येथे terms आपल्याला हव्या त्या क्रमानुसार आहेत. |
04:50 | आपण taxonomy समाविष्ट केली परंतु आपल्या कंटेंट टाईपला याबद्दल अजून माहित नाही. |
04:56 | म्हणून Structure मधे जाऊन Content types क्लिक करा. |
05:00 | Events Content type च्या Fields मधे जा. Add field क्लिक करा. |
05:06 | येथे field type निवडणे म्हणजे आत्ताच तयार केलेल्या vocabulary मधील Taxonomy term ला Reference करणे. |
05:14 | Taxonomy term पर्याय निवडा. ह्याला Event Topics नाव द्या. Save and continue क्लिक करा. |
05:23 | आता हे आपल्याला Type of item to reference असे विचारेल. |
05:28 | हे आधीच निवडल्यामुळे येथे काळजी घ्या. event मधे एकापेक्षा अधिक विषय असल्याने आपण हे बदलून Unlimited करू. |
05:37 | Save field settings वर क्लिक करा. |
05:40 | आणि येथे खाली, योग्य Reference type निवडल्याची खात्री करून घ्या. |
05:46 | Event Topics पर्याय निवडा. येथे हा पर्याय रेफरन्स एंटीटी उपलब्ध नसल्यास त्या बनवण्याची परवानगी देतो. |
05:56 | ह्यास Inline entity reference म्हणतात. याचा अर्थ आपल्या सूचीत नसलेला विषय आल्यास कुठलाही युजर तो समाविष्ट करू शकतो. |
06:07 | हे कोणीही करायला नको आहे म्हणून हा पर्याय आपण निवडणार नाही. |
06:11 | Save settings क्लिक करा. |
06:15 | येथे कंटेंट समाविष्ट करण्यापूर्वी आणखी एक पायरी आहे. |
06:18 | आपण आपले URL patterns सेट करणे गरजेचे आहे. सामान्यतः हे कंटेंट टाकण्यापूर्वी केले जाते. |
06:24 | हे आपली URL समाविष्ट कंटेंटला अनुकूल असल्याची खात्री करते. |
06:30 | हे पुढील पाठांत जाणून घेऊ. आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
06:36 | थोडक्यात, |
06:39 | आपण या पाठात जाणून घेतलेः टॅक्सोनॉमी, टॅक्सोनॉमी समाविष्ट करणे. |
06:48 | हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्यावर आधारित असून आय आय टी मुंबईच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे. |
06:57 | या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. |
07:03 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
07:11 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
07:23 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरिप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |