Drupal/C2/Modifying-the-Display-of-Content/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या Modifying the Display of Content वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात आपण शिकणार आहोत: Displays, Full content display मॅनेज करणे, Teaser डिस्प्ले मॅनेज करणे.
00:16 या पाठासाठी आपण वापरणार आहोत, उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम, Drupal 8 आणि Firefox वेब ब्राउजर.
00:26 तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता.
00:31 आधी तयार केलेली वेबसाईट उघडू.
00:35 आपल्याकडे आपला कंटेंट आहे. तो प्रत्यक्षात कसा दिसतो आणि ड्रुपल यास पेजवर कसा दाखवतो ते पाहू.
00:42 लक्षात घ्या Teaser mode मधे आपल्याला Read more बरोबरच Title आणि Body मिळते.
00:49 जसे आपण खाली स्क्रोल करतो, येथे सर्व नवे कंटेंट पाहू शकतो.
00:55 डिफॉल्ट रूपात ड्रुपल शेवटच्या '10' नोडसचे आउटपुट देतो. जे 'Homepage' वर प्रमोटेड आहेत.
01:03 लक्षात घ्या, येथे खाली काही पृष्ठसंख्या आहेत - पेज 1, 2, 3, Next आणि Last.
01:12 Last वर क्लिक केल्यास आपणास 'Title' नंतर, 'Read more' बरोबर 'Teaser mode' मधील नोड्सची सूची दिसेल.
01:20 हे चांगले दिसत नाही.
01:22 ड्रुपल आपल्याला 'View modes' सेट करण्याची सुविधा देतो.
01:27 Structure वर क्लिक करा आणि नंतर Content Types क्लिक करा.
01:31 आता आपल्या 'Events Content type' साठी लेआउट अपडेट करा.
01:36 ड्रॉपडाउन वर क्लिक करा, नंतर 'Manage display' क्लिक करा.
01:41 लक्षात घ्या, येथे वरती 'Manage display' टॅब मधे येथे एक 'Default' आणि एक 'Teaser' आहे.
01:48 Default डिफॉल्ट लेआउट आहे. आपण एक 'Full view' लेआउट समाविष्ट करू.
01:55 नंतर 'Teaser' लेआउट आहे. 'Teaser' वर क्लिक करा.
02:00 'Teaser mode' मधे एकमेव 'Event Description' दिसत आहे आणि 'Links', जी 'Read more' लिंक आहे.
02:09 येथे असे दिसत आहे. "Trimmed limit: 600 characters".
02:14 आपल्या 'Event Content type' चा 'Teaser mode' चांगला दिसण्यासाठी या काही गोष्टी अपडेट करू.
02:21 पुढे जाण्यापूर्वी हे लक्षात घेऊ की ड्रुपल आपल्याला लेआऊटस देतो.
02:28 Structure आणि नंतर Display modes वर क्लिक करा.
02:32 नंतर View modes क्लिक करा. पहा, येथे Form modes सुध्दा आहे.
02:38 हा 'Form modes' डेटा समाविष्ट करण्यासाठी लेआऊट आहे.
02:43 हा 'View modes' डेटा पाहण्यासाठी लेआऊट आहे.
02:48 View modes क्लिक करा.
02:51 'Content View mode' मधे आपण Full content, RSS, Search index, Search results, Teaser बघू शकतो.
03:02 आपण नवीन Content View mode सुध्दा समाविष्ट करू शकतो.
03:06 महत्वाची गोष्ट म्हणजे- आपण फक्त ड्रुपलने दिलेल्या गोष्टींच्या मर्यादेत राहण्याची गरज नाही.
03:12 आपल्याकडे Blocks, Comments, Taxonomy terms आणि Users सुध्दा आहेत.
03:18 आपण यापैकी कशाबाबतही 'View modes' तयार करू शकतो.
03:22 ही सदैव लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे.
03:27 हे यापैकी एक आहे जे उपलब्ध आहे. परंतु हे प्रत्येक कंटेंट टाईपसाठी योग्य नसेल.
03:34 परत जाऊ आणि ते करू.
03:36 Structure वर जा Content types वर क्लिक करा.
03:42 Events Content type वर आणि नंतर Manage display क्लिक करा.
03:46 पुन्हा आपण या पेजवर आहोत जिथे आपल्याकडे Default आणि Teaser आहेत.
03:52 खाली स्क्रोल करा आणि CUSTOM DISPLAY SETTINGS वर क्लिक करा.
03:57 Full content ला चेक-मार्क करा.
04:00 आपण एक नोड बघत असताना हे आपल्याला फिल्ड्सची स्क्रीनवर रचना करायची अनुमति देते.
04:07 Save क्लिक करा.
04:09 आता येथे वरती, आपल्याकडे पूर्ण कंटेंट आणि 'Teaser' आहेत.
04:14 दोन्ही व्ह्यू मोडस कसे अपडेट करायचे हे आता पाहू.
04:19 प्रथम, Full Content View अपडेट करू.
04:23 आपल्या 'Full Content' लेआउट मधे ही फिल्ड्स आहेत. त्यांचा क्रम आणि 'LABEL' असे दिसत आहे.
04:30 मागे जाऊ आणि इवेंट वर नजर टाकू. 'DrupalCamp Cincinnati' वर क्लिक करा.
04:37 'Body' वर आहे.
04:39 Event website, Date, Topics आणि आपण दिला असल्यास logo.
04:45 आता आपला कंटेंट चांगला बनवण्यासाठी हे क्लीन करा.
04:50 Structure - Content types - Manage display Events आणि नंतर Full Content वर क्लिक करा.
04:58 येथे Event Description फुल मोडमधे आहे.
05:02 त्याला 'Logo' च्या खाली ड्रॅग करू.
05:05 आता 'Logo' चे 'LABEL' झाकू.
05:09 आणि यास 'Original image' वरून 'Medium' साईज मधे बदलू.
05:14 ही एक Image style आहे.
05:17 जेव्हा आपण 'Views' मधे जाऊ त्यावेळी 'Image styles' बद्दल सविस्तर शिकू.
05:22 लक्षात घ्या, आपण कुठल्याही 'Image style' मधे हव्या असलेल्या साईजची इमेज बनवू शकतो.
05:29 नंतर आपण तिचा वापर कुठेही करू शकतो. 'Update' वर क्लिक करा.
05:35 आता आपला 'Event Logo' डावीकडे असेल कारण 'Theme', इमेजला डावीकडे फ्लोट करेल.
05:43 'Body' याच्या आसपास असेल.
05:45 'Event Date' ला 'LABEL Inline' करा.
05:49 आता फॉरमॅट बदलू.
05:52 उजवीकडील गियर वर क्लिक करा. आपण गियर चा उपयोग काही गोष्टी कॉनफिगर करण्यासाठी करतो.
05:59 आपण यास 'Default long date' मधे बदलू.
06:03 Update क्लिक करा. हे छान दिसत आहे.
06:07 'Event Sponsors' ला इनलाईन करा.
06:10 आपल्याला दिसेल की आउटपुट 'referenced entity' ला लिंक केला गेला आहे.
06:15 म्हणजेच, 'Cincinnati User Group' ने 'DrupalCamp Cincinnati' प्रायोजित केल्यास, तो 'User Group page' ला लिंक होईल.
06:24 हे आपल्याला हवे तसे झाले आहे.
06:27 'Event Topics' एका कॉलममधे दाखवला असल्याने आपण 'Above' निवडू.
06:33 परत, हे 'Referenced entity' ला लिंक केलेले आहे.
06:37 आता पाठ पॉझ करून माझ्याप्रमाणेच तुमचा स्क्रीन दिसत आहे का ते तपासा.
06:43 Save क्लिक करा.
06:45 आपल्या नोडसपैकी एक फुल व्ह्यू मोडमधे पाहू.
06:49 'Content' क्लिक करा. येथील कुठल्याही इवेंटवर क्लिक करा.
06:54 माझ्या इवेंटसची नावे व त्यांचे संबंधित टेक्स्ट तुमच्यापेक्षा खूपच वेगळे आहेत.
06:59 याचे कारण 'devel' द्वारे 'Lorem Ipsum' वापरले जाते.
07:03 येथे कुठल्याही इवेंटवर क्लिक करा.
07:06 आपल्याला अशाप्रकारचा लेआऊट दिसला पाहिजे.
07:10 हे छान दिसत आहे.
07:12 Event Website, Event Date, Event Sponsors.
07:18 येथे 'Event Topics' मधे एक छोटी समस्या आहे. परंतु त्यासाठी केवळ काही 'CSS' वापरू.
07:26 त्यांच्या लिंकस योग्य ठिकाणाकडे निर्देश करत आहेत.
07:29 आपल्या 'User Group Content type' चा संपूर्ण डिस्प्ले अपडेट करू.
07:34 'Structure' मधील 'Content types' क्लिक करा. नंतर 'User Groups' मधील 'Manage display' क्लिक करा.
07:42 पुन्हा एकदा, व्ह्यूज अपडेट करणे गरजेचे आहे.
07:46 खाली स्क्रोल करा, 'CUSTOM DISPLAY SETTINGS' क्लिक करून 'Full content' पर्याय निवडा.
07:52 आपण आपल्या गरजेनुसार याप्रकारे कोणताही डिस्प्ले अपडेट करू शकतो. 'Save' क्लिक करा.
07:59 नंतर 'Full content' निवडा. हे आपण इवेंटसाठी केले होते त्याचप्रमाणे आहे.
08:06 'Group Website' ही 'Description' च्या वर ठेवा आणि लेबल 'Inline' करा.
08:12 'Group Contact' आणि 'Email' एकत्रित ठेवा, त्यासाठी पुन्हा त्यांची लेबल्स 'Inline' करा.
08:19 मी 'Email' साठी 'Email' लिंक पर्याय न निवडता 'Plain text' पर्याय तसाच ठेवत आहे.
08:24 कारण मी माझा डिफॉल्ट ईमेल प्रोग्रॅम इतर कोणाला 'email' पाठवण्यासाठी वापरत नाही.
08:30 मी हे 'Plain text' ठेवणे पसंत करीन.
08:33 'Group Experience Level' साठी 'Above' हा पर्याय ठेवा. कारण ही सर्व अनुभवांची सूची आहे.
08:40 शेवटी 'Events sponsored' साठी देखील 'Above' हा पर्याय ठेवा.
08:45 त्याचा 'FORMAT' लेबलच ठेवा.
08:47 आपण 'Entity ID' किंवा 'Rendered entity' देखील निवडू शकतो.
08:52 पण, असे केल्याने, येथे 'Event pages' चा पूर्ण समूह एकत्र होईल.
08:58 मी हे लेबलच ठेवत आहे.
09:01 येथे Link to the referenced entity पर्याय आहे.
09:04 याच्या सहाय्याने 'Cincinnati User Group' मधील 'DrupalCamp Cincinnati' वर जाण्यासाठी लिंक क्लिक करू शकतो.
09:12 'Save' क्लिक करून आपण काय केले हे तपासू.
09:16 'Content' क्लिक करून सूचीतील 'User Group' क्लिक करा.
09:22 येथे आपल्याकडे 'Group website', 'description' आणि 'Contact information' आहे. हे 'devel' द्वारे बनवले गेले आहे.
09:31 Contact Email- हा खोटा आईडी आहे जो 'devel' द्वारा बनवला गेला आहे.
09:38 मह्त्वाची गोष्ट म्हणजे हा काम करत आहे.
09:41 येथे 'Group Experience Level' आहे. लक्षात घ्या की 'devel' ने काही डबल सिलेक्ट केले आहे.
09:48 सध्या हे आपण असेच ठेवू.
09:51 शेवटी DrupalCamp Cincinnati हा Event sponsored आहे.
09:56 हा लेआउट छान आहे. हा कुठल्याही 'Display' किंवा 'Layout modules' समाविष्ट केल्याशिवाय मिळवू शकतो.
10:03 आपण 'Full content' यशस्वीरित्या केले आहे.
10:07 आता 'Teaser modes' अपडेट करायला शिकू. हे दोन्ही पाहिल्यास ते वाईट नाहीत हे तुम्हाला दिसेल.
10:16 परंतु जसे आपण खाली स्क्रोल करत जाऊ, 'Teaser modes' चांगले रहात नाहीत.
10:21 आपण ते सहज नीट करू शकतो.
10:24 Structure आणि Content types क्लिक करा.
10:28 Events मधे Manage display क्लिक करा. नंतर Teaser क्लिक करा.
10:33 ड्रुपल आपल्याला 'links' आणि 'Event Description' देते जी 'body' फिल्डस आहेत.
10:39 यासाठी आपण 'Teaser mode' अपडेट करू.
10:43 'Event Website' वरच्या दिशेला ड्रॅग करून 'Inline' निवडा.
10:49 नंतर 'Event Date' वरच्या दिशेला ड्रॅग करा. कारण हे महत्वाचे आहे.
10:55 नंतर, 'Event Logo' ड्रॅग करून तो वरती ठेवा.
11:00 आपण 'LABEL' हाइड करू आणि 'FORMAT' ला 'Thumbnail' मधे बदलू.
11:05 आपण साईटवरील कोणत्याही इमेज साठी 'Image styles' बनवू शकतो.
11:10 परंतु, आपण हे नंतर शिकणार आहोत.
11:13 'Link image' ला 'Content' मधे बदला.
11:17 हे लोगोला लिंकच्या रूपात सरळ कंटेंट आयटम मधे लिहिल. 'Update' क्लिक करा.
11:23 आपल्याकडे logo, website आणि date आहे.
11:28 'Links' ला खाली ड्रॅग करा.
11:31 आता 'Event Description' छोटे करू.
11:35 गियर आयकॉन क्लिक करा आणि त्यास '400 characters' करा.
11:40 'Update' क्लिक करा. परत ड्रॉप-डाउन वर क्लिक करून Trimmed पर्याय निवडा.
11:47 आता आपला 'Teaser mode' असा असेल: डाव्या बाजूला Logo, Website, Date आणि उजव्या बाजूस 'Links' सह 'Description'.
11:58 बघू या आता हे कसे दिसते. 'Save' क्लिक करा.
12:03 साइट वर परत जाऊ.
12:05 आपल्याला दिसेल की 'DrupalCamp Cincinnati' अपडेट झाले आहे.
12:09 आपण 'Date field' ला नंतर अपडेट करू.
12:12 आपल्याला दिसेल की 'Body' छोटी झाली आहे.
12:16 Structure क्लिक करा. 'Content types, Events, Manage display' आणि 'Teaser' क्लिक करा.
12:24 'Event Date' सोडून बाकी बहुतेक ठीक आहे. 'Time ago' च्या ऐवजी 'Custom' निवडू.
12:32 लक्षात घ्या, येथे 'Date Formats' साठी 'PHP documentation' लिंक आहे.
12:38 आता 'Date-Time format' अपडेट करू.
12:41 प्रथम ते डिलीट करू.
12:44 'Lowercase l comma capital F jS comma' आणि 'capital Y'.
12:51 म्हणजेच 'day of the week, day of the month',
12:55 आणि नंतर योग्य सफिक्स- 'st nd rd th' आणि चार अंकी वर्ष.
13:04 Update क्लिक करा.
13:06 आता येथे डेटचा preview बघू शकतो.
13:09 Save क्लिक करा.
13:11 आत्तासाठी 'Event Description' हाइड करू.
13:14 Save क्लिक करा.
13:16 आपल्या साइट वर एक नजर टाका.
13:19 आता आपल्या इवेंटचा 'Teaser' येथे पाहता येईल- Title, logo, website आणि Event Date.
13:28 आता आपल्या 'User Groups' चा 'Teaser mode' अपडेट करू.
13:32 'Structure, Content types' वर क्लिक करा आणि परत 'User Groups मधे Manage display' वर क्लिक करा.
13:39 नंतर Teaser क्लिक करा.
13:42 हे थोडे वेगळे आहे कारण आपल्याकडे कोणतेही इमेज नाही.
13:47 आपल्याकडे 'User Group logo' असू शकतो.
13:50 'User Group Website' ला वर ठेवा.
13:53 आपण 'User Group Description' दाखवणार नाही.
13:57 आता Group Contact email ठेवूया.
14:00 तसेच 'Group Website' आणि 'Contact Email' ला लेबल इनलाईन करू.
14:06 येथे परत 'FORMAT' ला मी 'Plain text' ठेवत आहे कारण मी डिफॉल्ट 'email' वापरू इच्छित नाही.
14:13 हा अगदी साधा Teaser mode आहे.
14:16 Save क्लिक करा.
14:18 आपल्या साईटवर परत जाऊ.
14:20 'Cincinnati User Group' मधे 'Read more' बरोबर 'Group Website' आणि 'Contact Email' आहे.
14:27 'Full content' आणि 'Teaser mode' दोघांचे 'View modes' असे अपडेट करतात.
14:33 नंतरच्या पाठांत आपण लँडिंग पेजेस वर जाऊ आणि आपले कंटेंट उपयोगी रूपात मिळवू.
14:41 आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. थोडक्यात,
14:46 या पाठात शिकलो, Displays, Full content display मॅनेज करणे आणि Teaser डिस्प्ले मॅनेज करणे.
15:11 हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्यावर आधारित असून आय आय टी मुंबईच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.
15:21 या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
15:28 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
15:36 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
15:47 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana