Digital-Divide/D0/Newborn-Child-Care/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:02 | नवजात बाल संगोपना वरील स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत . |
00:06 | या ट्युटोरियलमध्ये आपण शिकाल: |
00:09 | एका नवजात बाळाची काळजी घेणे. |
00:12 | नवीन आईच्या समोर येणार्या सामान्य समस्या आणि, |
00:15 | त्या समस्यांना कसे हाताळायचे. |
00:18 | डॉ. अंजली अनिता च्या घरी प्रवेश करते, आणि तिच्या नवजात बालका वरील तिचा आनंद व्यक्त करते. |
00:25 | अनिता ने बाळाला चुकीच्या पद्धतीने घेतले आहे असे डॉ. अंजली च्या लक्षात येते . |
00:30 | बाळाला घेतांना काळजी बाळगावी हे देखील अनिता ला सांगते. |
00:35 | डॉक्टर अंजली, बाळाला सरळ धरतांना किंवा, |
00:41 | खाली ठेवतांना, |
00:43 | बाळाच्या डोक्याला आधार देऊन कसे झुलवीतात हे अनितला दाखविते. |
00:45 | ओबडधोबडपणे बाळाला कधीही हाताळायचे नाही, अशी सल्ला डॉक्टर अनिता ला देतात. |
00:51 | अनिता डॉक्टरांना सांगते की, हे सर्व तिच्या साठी नवीन आहे. |
00:55 | आणि ती तिच्या नवजात बाळा ची उत्तम काळजी घेण्याबाबत डॉक्टरांना सल्ला विचारते. |
01:02 | डॉक्टर अंजली आनंदाने राजी होते. |
01:04 | ती पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट सुचविते की, |
01:09 | नवजात बाळांना हाताळण्यापूर्वी, |
01:13 | साबणाने किंवा कोळशाच्या-राखेने आपले हात धुवावेत, |
01:15 | लहान बाळांची अद्याप मजबूत रोगप्रतिकार प्रणाली तयार झाली नसते. |
01:19 | त्यामुळे त्यांना संक्रमणाचा प्रभाव्य होतो. |
01:24 | " मी माझ्या बाळाला किती वेळा भरविले पाहिजे?" असे अनिता डॉक्टरांना विचारते? |
01:28 | डॉक्टर अनिता ला सांगतात की, प्रत्येक 2 ते 3 तासांत नवजात बाळाला भरविणे आवश्यक आहे. |
01:37 | स्तनपान बाळाच्या आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे असे ती स्पष्ट करते. |
01:43 | बाळाच्या रोगप्रतिकार प्रणालीच्या विकासासाठी, |
01:46 | तसेच, तुम्ही स्तनपान करत असल्यास, , आपल्या बाळाला प्रत्येक स्तनातून सुमारे 10-15 मिनिटे स्तनपान करू द्या. |
01:56 | नंतर अनिता डॉक्टरांना बाळाला स्तनपान करण्या बद्दलचे सूत्र विचारते. |
02:00 | महिला डॉक्टर असे सूचविते की, |
02:02 | जर तुम्ही तुमच्या बाळाला आहार-सूत्र म्हणून उदाहरणार्थ दुधा चे पर्याय देत आसाल तर, |
02:08 | तेव्हा ते बहुधा प्रत्येक आहार मध्ये सुमारे 60-90 ग्रॅम असणे आवश्यक आहे. |
02:14 | त्यानंतर अनिता डॉक्टरांना विचारते की, केव्हा आणि कसे ती बाळाला आंघोळ घालू शकते. |
02:21 | पहिल्या काही आठवड्यांच्या दरम्यान, बाळ फार नाजूक असते असे डॉक्टर स्पष्ट करतात. |
02:28 | त्या म्हणतात की, आपल्याला केवळ बाळाला पाण्याने स्वच्छ पुसून काढले पाहिजे, जोपर्यंत, |
02:33 | (a) नाळ पडत नाही, |
02:37 | (b) सुंता बरी होत नाही, |
02:39 | (c) नाभी पूर्णपणे बरी होत नाही, तोपर्यंत. |
02:43 | डॉक्टर प्रारंभिक काळानंतर दर आठवड्यात 2-3 वेळा, सौम्य साबणाने, अंघोळ घालणे, बाळा साठी पुरेसे असते, असे स्पष्ट करतात. |
02:53 | हे बाळाच्या पहिल्या वर्षात सुरू ठेवू शकता. |
02:56 | वारंवार आंघोळ केल्याने त्वचा कोरडी होऊ शकते. |
03:01 | त्यानंतर बाळाला काही पुरळ असल्याचे डॉक्टर अंजली च्या लक्षात येते. |
03:06 | अनिता घाबरते. |
03:08 | अशा पुरळाची काळजी कशी घ्यावी हे ती डॉक्टरांना विचारते. |
03:13 | ओल्या लंगोटी (डाइपर )मुळे पुरळ आल्याचे डॉक्टर स्पष्ट करतात. |
03:19 | त्या पुढे असे सांगतात की, आपल्या बाळाची लंगोटी वारंवार बदलवी, आतड्यांच्या हालचाली नंतर शक्य होईल तितक्या लवकर. |
03:29 | सौम्य साबणाने आणि पाण्याने भाग स्वच्छ केल्यानंतर, त्यास कोरडे करण्यास पुसने. |
03:34 | नंतर ओलावा मुक्त ठेवण्यासाठी त्यावर काही बाळ पावडर लावा. |
03:39 | पुढे डॉक्टर स्पष्ट करतात की, जर तुम्ही कापडी लंगोटी वापर्ट असाल तर त्यांना गरम पाण्यात डेटोल सारख्या जंतुनाशक सह धुवा. |
03:49 | बाळाला काही काळ लंगोटी न घालणे ही देखील चांगली कल्पना आहे. |
03:55 | अनिता डॉक्टरांना त्यांच्या सल्ल्या बदद्ल धण्यवाद देते आणि त्यास ती लक्षात ठेवेन असे सांगते. |
04:02 | हे ट्यूटोरियल येथे संपत आहे. |
04:05 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
04:09 | ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल. |
04:12 | जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर व्हिडीओ डाउनलोड करूनही पाहू शकता. |
04:18 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम. स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
04:25 | परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. |
04:29 | अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
04:39 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'टॉक टू टीचर ' चा भाग आहे. |
04:44 | यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून मिळाले आहे. |
04:53 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro. |
05:09 | याट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून, |
05:16 | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. |
05:19 | सहभागासाठी धन्यवाद. |