C-and-C++/C3/Arrays/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | C आणि C++ मधील Arrays वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:07 | या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू, |
00:09 | Array म्हणजे काय? |
00:11 | Array ची घोषणा. |
00:13 | Array चे आरंभीकरण. |
00:16 | Array वरील काही उदाहरणे. |
00:18 | आपण काही सामान्य एरर्स आणि त्याचे उपाय देखील पाहु. |
00:22 | हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी, |
00:25 | उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 11.04 |
00:30 | gcc आणि g++ Compiler version 4.6.1 वापरत आहे. |
00:36 | Array च्या परिचया सह प्रारंभ करूया. |
00:39 | Array म्हणजे डेटा किंवा समान डेटा-प्रकाराचा संग्रह. |
00:44 | Array इंडेक्स '0' पासून सुरू होतो. |
00:48 | पहिला घटक index 0 मध्ये संग्रहीत आहे. |
00:52 | Arrays चे तीन प्रकार आहेत: |
00:55 | Single dimensional Array. |
00:57 | Two dimensional Array आणि |
00:59 | Multi-dimensional Array. |
01:01 | या ट्यूटोरियल मध्ये आपण Single dimensional Array ची चर्चा करूया. |
01:06 | Single dimensional array कसा घोषित करायचा ते पाहु. |
01:09 | या साठी सिंटॅक्स आहे: |
01:11 | data-type, Array चे नाव आणि आकार. |
01:16 | उदाहरणार्थ, येथे आपण 5घटक असलेले इंटिजर Array star घोषित केला आहे. |
01:24 | Array इंडेक्स star 0 ते star 4 पासून सुरू होईल. |
01:29 | आपण एक Array ची घोषणा पहिली आहे. |
01:32 | आता आपण एका Array ची सुरवात पाहु. |
01:35 | या साठी सिंटॅक्स आहे: |
01:38 | data-type, Array चे नाव आणि घटकांच्या समान असलेला आकार. |
01:44 | उदाहरणार्थ, येथे आपण इंटिजर Array star, '3' आकारा सह घोषित केला आहे. '1', '2' आणि '3' Array चे घटक आहेत. |
01:54 | येथे इंडेक्स star 0 ते star 2 पासून सुरू होईल. |
01:59 | चला आता उदाहरणां कडे वळू. |
02:01 | मी आधीच एडिटर वर प्रोग्राम टाइप केला आहे. |
02:04 | मी तो उघडते. |
02:06 | कृपया आपल्या फाइल चे नाव array.c आहे याची नोंद घ्या. |
02:10 | या प्रोग्राम मध्ये, आपण एक Array मध्ये संग्रहित घटकांच्या बेरजेचे गणन करणार आहोत. |
02:16 | मी आता कोड समजावून सांगते. |
02:18 | ही हेडर फाइल आहे. |
02:20 | हे आपले main फंक्शन आहे. |
02:22 | येथे आपण एक Array star, '3' आकारा सह घोषित आणि सुरू केला आहे. |
02:28 | '4', '5' आणि '6' Array चे घटक आहेत, |
02:33 | नंतर आपण इंटिजर वेरिएबल sum घोषित केला आहे. |
02:36 | येथे आपण Array चे घटक जोडू आणि परिणाम sum मध्ये संग्रहित करू. |
02:41 | लक्ष द्या, '4' इंडेक्स '0' मध्ये, '5' इंडेक्स '1' मध्ये, आणि '6' इंडेक्स '2' मध्ये संग्रहीत होईल. |
02:50 | नंतर आपण बेरीज प्रिंट करू. |
02:52 | हे आपले return statement आहे. |
02:54 | आता Save वर क्लिक करा. |
02:57 | प्रोग्राम कार्यान्वीत करू. |
02:59 | कृपया कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि T कीज एकत्रित दाबून टर्मिनल विंडो उघडा. |
03:09 | संकलित करण्यासाठी टाइप करा, gcc space array dot c space hypen o array आणि Enter दाबा. |
03:19 | कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा, dot slash array . Enter दाबा. |
03:24 | येथे आउटपुट म्हणून असे दर्शविले जाईल, |
03:26 | The sum is 15. |
03:28 | आपल्या संबंधात येऊ शकणारे काही सामान्य एरर्स पाहु. |
03:32 | प्रोग्राम वर परत या. |
03:34 | समजा, ओळ क्रमांक '4' येथे आपण कर्ली ब्रॅकेट्स टाइप करायला विसरलो, |
03:39 | Save वर क्लिक करा. काय होते ते पाहु. |
03:42 | टर्मिनलवर परत या. |
03:44 | अगोदर प्रमाणे संकलित करू. |
03:47 | आपल्याला एक एरर दिसेल. |
03:49 | Invalid initializer आणि Expected identifier or bracket before numeric constant. |
03:56 | याचे कारण, Arrays कर्ली ब्रॅकेट्स च्या आतच सुरू केला पाहिजे. |
04:01 | प्रोग्राम वर परत या. एरर दुरुस्त करू. |
04:04 | ओळ क्रमांक '4' येथे कर्ली ब्रॅकेट्स टाइप करा. |
04:09 | आता Save वर क्लिक करा. |
04:12 | कार्यान्वीत करू. टर्मिनलवर परत या. |
04:15 | अगोदर प्रमाणे संकलित करू आणि अगोदर प्रमाणे कार्यान्वीत करू. |
04:19 | होय, हे कार्य करत आहे. |
04:21 | आता आपण C++ मध्ये समान प्रोग्राम कार्यान्वीत करू. |
04:25 | प्रोग्राम वर परत या. |
04:28 | मी येथे काही गोष्टी बदलते. |
04:30 | प्रथम, कीबोर्ड वरील Shift , Ctrl आणि S कीज एकत्रित दाबा. |
04:38 | आता dot cpp एक्सटेन्षन ने फाइल सेव करा आणि Save वर क्लिक करा. |
04:44 | हेडर फाइलला iostream म्हणून बदलू. |
04:49 | आता using statement समाविष्ट करू. |
04:55 | C++ मध्ये एक arrayची घोषणा आणि आरंभीकरण समान आहे. |
05:01 | म्हणून येथे काहीही बदलण्याची गरज नाही. |
05:04 | printf statement च्या जागी cout statement लिहा. |
05:09 | format specifier आणि back slash n ला डिलीट करा. आता comma डिलीट करा आणि दोन opening angle ब्रॅकेट्स टाइप करा. |
05:17 | येथे ब्रॅकेट डिलीट करा. पुन्हा दोन opening angle ब्रॅकेट्स टाइप करा. आणि डबल कोट्स च्या आत, टाइप करा, back slash n |
05:26 | आता Save वर क्लिक करा. |
05:29 | कार्यान्वीत करू. टर्मिनलवर परत या. |
05:32 | संकलित करण्यासाठी टाइप करा, g++ space array dot cpp space hypen o space array1. |
05:42 | येथे आपल्याकडे array1 आहे कारण, आपल्याला array dot c फाइल साठी आउटपुट पॅरमीटर array ओवरराइट करायचा नाही. |
05:51 | आता Enter दाबा. |
05:54 | कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा, dot slash array1 . Enter दाबा. |
05:59 | असे आउटपुट दर्शविले जाईल, The sum is 15 |
06:02 | आपण पाहु शकतो की हे आपल्या C code प्रमाणे आहे. |
06:07 | आता आपण दुसरी सामान्य एरर पाहू. |
06:10 | प्रोग्राम वर परत या. |
06:12 | समजा येथे ओळ क्रमांक 7वर, |
06:14 | मी, star[1], star[2] आणि star[3]; टाइप करेल. |
06:23 | Save वर क्लिक करा. कार्यान्वीत करू. टर्मिनलवर परत या. |
06:28 | मी prompt क्लियर करते. |
06:30 | अगोदर प्रमाणे संकलित करू. |
06:33 | अगोदर प्रमाणे कार्यान्वीत करू. |
06:36 | आपल्याला एक अनपेक्षित आउटपुट मिळेल. |
06:39 | याचे कारण Array इंडेक्स '0' पासून सुरू होतो. |
06:43 | प्रोग्राम वर परत या. आपण येथे पाहु शकतो, Array इंडेक्स एक पासून सुरू होतो. |
06:49 | महणून हे एरर देत आहे. चला एरर दुरुस्त करू. |
06:54 | येथे टाइप करा, '0' ... येथे, '1 ' आणि '2'. Save वर क्लिक करा. |
07:02 | कार्यान्वीत करू. टर्मिनलवर परत या. |
07:05 | अगोदर प्रमाणे संकलित करू.अगोदर प्रमाणे कार्यान्वीत करू. |
07:09 | होय, हे कार्य करत आहे. |
07:12 | आता, आपण स्लाईडस् वर परत जाऊ. |
07:14 | संक्षिप्त रूपात, |
07:16 | या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो. |
07:19 | Arrays. Single Dimensional Arrays घोषित करणे, |
07:23 | Single Dimensional Arrays सुरू करणे, |
07:26 | उदाहरणार्थ, int star[3]={4, 5, 6} |
07:31 | Array चे घटक जोडणे, उदाहरणार्थ, sum is equal to star 0 plus star 1 plus star 2 |
07:40 | असाइनमेंट. Array मध्ये संग्रहीत घटकांच्या भेदाचे गणन करणारा एक प्रोग्राम लिहा. |
07:47 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
07:50 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
07:53 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
07:57 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम |
08:00 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
08:03 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
08:06 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
08:13 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
08:17 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
08:25 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
08:30 | या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. |
08:33 | सहभागासाठी धन्यवाद. |