Biogas-Plant/C2/Benefits-of-Biogas/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | नमस्कार मित्रांनो “बायोगॅस आणि त्याचे फायदे” ह्या वरील स्पोकन ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:06 | तुमच्या घरातील हे सामान्य चूल आहे का? |
00:09 | तुमच्या घरात प्रत्येक दिवशी अश्याच प्रकारे अन्न शिजवले जाते का? |
00:13 | स्वयपाँकासाठी तुम्ही जी मेहनत घेऊन जळण आणता ती कमी करण्याची इच्छा आहे का? |
00:18 | तुम्ही तुमच्या पारंपरिक पद्धतीत जळण सरपणाचा व्यापार करू शकता का......? |
00:23 | आता ह्या पुढे अश्या प्रकारे तुमच्या घरात स्वंपकघराची व्यवस्था होऊ शकते. |
00:28 | कसे करायचे हे जाणून घेऊ? हा व्हिडिओ पहा. |
00:31 | “बायोगॅस आणि त्याचे फायदे” ह्या वरील स्पोकन ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:36 | ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकुया- बायोगॅस बद्दल, कसे उत्पादन केली जाते आणि त्याचे उपयोग. |
00:44 | आपण बायोगॅस संयंत्र बद्दल देखील थोडक्यात जाणून घेणार आहोत. |
00:48 | बायोगॅस म्हणजे काय? |
00:50 | बायोगॅस एक वायुरूप इंधन आहे. |
00:53 | जैविक कचरा टाकल्या मुळे आंबलिय वायूरूप पदार्थ तयार होतो. |
00:59 | बायोगॅसचे मुख्य घटक मिथेन आहे. |
01:03 | बायोगॅस संयंत्राच्या वापरामुळे, बायोगॅस सहजपणे व मोफत तयार केले जाऊ शकते. |
01:09 | हे कुटुंबासाठी तयार केलेले बायोगॅस संयंत्र अश्या प्रकारे दिसते. |
01:14 | बायोगॅस संयंत्र वापरून काही फायदे पुढीलप्रमाणे आहेत. |
01:18 | गावांमध्ये कौटुंबिक प्रकारे बायोगॅस संयंत्राची स्थापना, नैसर्गिक संसाधने संरक्षण करण्यास मदत करते. |
01:25 | तसेच गावातल्या लोकांची मुलभूत सुविधा उपलब्ध करून देते. |
01:30 | लांब अंतरापासून लाकूड गोळा करण्यात, महिलांचे कष्ट कमी करण्यात बायोगॅस संयंत्र मदत करते. |
01:36 | धुरकटलेल्या स्वंपाकघरामध्ये स्वयंपाकाच्या दरम्यान आरोग्य वाढण्यास मदत करते. |
01:42 | एकदा बांधल्यानंतर, बायोगॅस संयंत्राचे आयुष्य कमीत कमी २५ वर्ष टिकते. |
01:48 | बायोगॅस संयंत्राचे वापर आणि त्याचे देखरेख खूप सोपे आहे. |
01:53 | बायोगॅस निर्माणासाठी वापरला जाणारा कच्चा माल आहे- |
01:57 | स्वंपाकघरात निघणारा कचरा जसे पालेभाज्या व फळाची टरफले, उरलेले अन्न, अंड्यांची टरफले, हाडे, इ ..., |
02:06 | घरगुती ओला कचरा जसे घर स्वच्छ करण्यास वापरलेले पाणी, नासलेले दूध किंवा चहा, इत्याची. |
02:13 | संयंत्राचे साहित्य जसे गळलेली पाने, फुले, फांद्या, इ ... |
02:19 | आपण- शेतात निर्माण केलेला कचरा, गुरांची घाण, गुरांचे मल मुत्र आणि शौचाल्याचे घाण पाणी आणि मल मुत्र यांचा देखील वापर करू शकतो. |
02:30 | थोडक्यात आपण जाणून घेऊ बायोगॅस कसा निर्माण केला जातो. |
02:35 | ही घरघुती प्रकारची बायोगॅस संयंत्राची आकृती आहे. |
02:39 | आपण काय पाहतो की येथे मिश्रण टॅंक आहे जेथे आपण कच्चा माल टाकतो. |
02:44 | आतल्या पाईपातून बायोगॅस संयंत्राच्या आत हा कच्चा माल जातो. |
02:49 | आणि हा डायजेस्टर टॅंक आहे जेथे कच्च्या मालच्या आंबटामुळे बायोगॅस तयार होतो. |
02:55 | ह्याला कंपोस्ट टॅंक देखील म्हटले जाते. |
02:59 | हा बाहेरचा कॉक आहे जिथून संयंत्राच्या बाहेर बायोगॅस सोडला जातो. |
03:05 | खतासाठी बाहेरचा पाईप देखील आहे. |
03:08 | मळी टॅंकमध्ये खत गोळा करून खत म्हणून वपरण्यास शेतात घेऊन जाऊ शकतो. |
03:15 | एक घरघुती प्रकारे बायोगॅस संयंत्र बांधण्यास, किती जागा लागेल. |
03:20 | थोडक्यात, एक घरघुती प्रकारे बायोगॅस संयंत्र बांधण्यास, आपल्याला १२ फूट बाय ८ फूट जमिनीची जागा लागेल. |
03:28 | बायोगॅस संयंत्र बांधण्यास किती खर्च लागेल ह्याबद्दल चर्चा करणार आहोत. |
03:33 | बायोगॅस संयंत्र बंधण्याकरिता कमीत कमी खर्च २०,००० रु ते २३,००० रु आहे. |
03:39 | वरील रक्कम प्रत्येक ठिकाणी वेग वेगळे असु शकते. |
03:43 | काही बँका बायोगॅस संयंत्र बांधण्यास कृषी कर्ज उपलब्ध करून देतात. |
03:48 | बायोगॅस संयंत्र बांधून झाल्यानंतर सरकारकडून देखील सबसिडी दिली जाते. |
03:54 | जिल्हा परिषद आणि ग्राम पंचायत द्वारे सरकार आदिवासी भागात अतिरिक्त सब्सिडीस देतात. |
04:00 | बायोगॅस संयंत्र, शौचल्य म्हणजे टॉयलेटला जोडले तर अतिरिक्त १२०० रुपये सबसिडी दिली जाते. |
04:08 | तपशील - बायोगॅस संयंत्र बंधण्याकरिता लागणारा खर्च, बँकेत कर्जासाठी अर्ज कसे करणे, आणि सब्सिडी याच श्रेणीतील ट्युटोरियलमध्ये शिकवले जातील. |
04:20 | आता बायोगॅसचे फायदे पाहू. |
04:24 | बायोगॅस व बायोगॅस संयंत्राचा वापर अतिशय उपयुक्त आहेत. |
04:28 | बायोगॅस हे एक पर्यावरणपूरक, गैर-प्रदूषण, ऊर्जाचे पुनर्वापरयोग्य स्रोत आहे. |
04:34 | LPG, रॉकेल आणि जळण हे सगळे वापरण्यापेक्षा बायोगॅस हे अतिशय चांगले आहे. |
04:39 | एकदा बायोगॅस संयंत्र बांधल्यानंतर हे मोफत मिळू शकते. |
04:44 | बायोगॅस संयंत्र मानवी व गुरेढोरे मल मुत्राचे, त्याच बरोबर कृषि कचरा, स्वंपाकघरातला कचरा उरलेले अन्न या सर्वांच्या व्यवस्थापनासाठी मदत करते. |
04:54 | तसेच माती आणि पाणीचे प्रदूषण कमी करते आणि प्रतिबंधात्मक आरोग्यामध्ये एक महत्वपूर्ण भूमिका बजावते. |
05:02 | आता आपण वेळ वाचवण्याचे काही फायदे पाहू. |
05:05 | बायोगॅसच्या वापरामूळे, जो वेळ आपण जळण गोळा करण्यात घालवत होतो तो वेळ खूप वाचू शकतो. |
05:11 | बायोगॅसचा उपयोग आरोग्यासाठी सुधा खूप म्हात्वाचा आहे कारण त्यामुळे धूर होत नाही. |
05:17 | स्वयंपाक घरात भिंतीवर कोळशाचे काळे जाळे जमा होत नाही तसेच तो फार आरोग्यदायी आहे. |
05:23 | लाकडी जळण वापरल्यामुळे जळमाठ खूप खूप प्रमाणात वाढतो. |
05:27 | पुढे, आपण पाहू बायोगॅस संयंत्राचे इतर उत्पादने काय आहेत? |
05:32 | आपल्याला बायोगॅस संयंत्राद्वारे तयार झालेल्या खताकडून प्राकृतिक खत मिळू शकते. |
05:38 | खताचा ओला कचरा थेट शेतात खत म्हणून वापरले जाऊ शकते. |
05:44 | हे खत सुखवून पाउडर बनवून नंतर शेतात वापरण्यासाठी साठवून ठेवू शकतो. |
05:50 | तयार झालेली शेतातील पावडर मोठ्या शहरांतील शेतकरी, फळांच्या बागेचे मालक आणि वृक्ष रोपवाटिकामध्ये नैसर्गिक खत म्हणून विकले जाऊ शकते. |
06:00 | हे खत गांडुळांच्या मदतीने सेंद्रीय खते तयार करण्यास देखील वापरले जाऊ शकते. |
06:05 | हे एका सोप्या पद्धतीने केले जाते ज्याला गांडूळखत म्हणतात. |
06:10 | शेतामध्ये हे सेंद्रीय खत वापरल्यामुळे, शेतकऱ्याचे खूप पैसे वाचतील. |
06:16 | आणि पुन्हा एकदा हे सेंद्रीय खत विकल्यामुळे कुटुंबात आर्थिक मदत होते. |
06:22 | सहसा, कौटुंबिक प्रकारे बायोगॅस संयंत्राद्वारे जो बायोगॅस निर्माण होतो तो स्वंपाक बनवण्यासाठी वापरला जातो. |
06:29 | तसेच आंघोळीसाठी आणि इतर कारणांसाठी पाणी मोठ्या प्रमाणात गरम करण्यासाठी देखील वापरले जाऊ शकते. |
06:36 | काही ग्रामीण लघुउद्योजक विविध प्रक्रियांमध्ये उर्जा पुरवण्यासाठी बायोगॅसचा वापर करतात. |
06:42 | आता बायोगॅस वापरकर्ता कुटुंबाचे प्रशंसापत्र पाहू. |
06:47 | नमस्कार, माझे नाव सुभाष बालचंद्र मडगावकर ही माझी पत्नी शुबधा. |
06:52 | माझ्या कुटुंबात ४ सदस्य आहेत आणि आमच्याकडे ३ गुरेढोरे देखील आहे. |
06:57 | पुर्वी आम्हाला लाकूड गोळा करण्यास खूप लांब जंगलात जावे लागत होते. कधी कधी तर आम्हाला विकतही घ्यावे लागत होते. |
07:04 | आता आम्ही गेल्या १० वर्षा पासून बायोगॅस संयंत्र वापरत आहोत. |
07:09 | बायोगॅस वापरल्यामुळे आता आम्हाला लाकूड गोळा करण्यास लांब जंगलात जावे लागत नाही आणि विकतही घ्यावे लागत नाही. |
07:16 | आम्हाला आता स्वंपक करतांना धुराचा वास घ्यावा लागत नाही आणि स्वंपक घर स्वछ आणि नीट असते. |
07:23 | बायोगॅस वापरण्यास सोपे आहे आणि माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी स्वंपक बनवण्यास पुरेसे आहे. |
07:30 | थोडक्यात. ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो बायोगॅस बद्दल, कसे उत्पादन केले जाते आणि त्याचे उपयोग. |
07:38 | आपण हे देखील शिकलो बायोगॅस संयंत्राबद्दल, बायोगॅस संयंत्र बंधण्याकरिता लागणारा खर्च आणि बायोगॅस वापरण्याचे फायदे |
07:47 | हा व्हिडिओ IIT बॉम्बे, मधील Rural-ICT संघ व स्पोकन ट्युटोरियल संघाच्या सूक्ताने तयार केले आहे. |
07:56 | या प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी या लिंकवर जाऊ शकता. |
08:02 | मी रंजना भांबळे स्पोकन ट्युटोरियल संघाची सदस्य आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |