BOSS-Linux/C2/Synaptic-Package-Manager/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script:Synaptic Package Manager
Author: Shahid Farooqui
Keywords: Synaptic, Repository, Administrative
Time | Narration |
00:01 | सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर कसे वापरावे या स्पोकन ट्युटोरियलमधे आपले स्वागत. |
00:07 | या ट्युटोरियलमधे आपण, बॉस लिनक्स 3.4.2 मध्ये सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वापरून अप्लिकेशन्स इनस्टॉल करण्यास शिकणार आहोत. |
00:18 | मी येथे वापरात आहे. |
00:20 | बॉस लिनक्स 3.4.2 सह GNOME पर्यावरणाचा डेस्कटॉप . |
00:26 | सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वापरण्यासाठी तुम्हाला प्रशासनिक अधिकार असायला हवा. |
00:32 | तसेच यासाठी इंटरनेटची जोडणी असणे आवश्यक आहे. |
00:36 | प्रथम आपण सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर उघडूया. |
00:41 | विंडो मिनीमाइज़ करू. आपण येथे 'बॉस' डेस्कटॉप पाहू शकतो. |
00:48 | आता Application, System Tools नंतर Administration वर जा. |
00:56 | आणि नंतर सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वर क्लिक करा. |
01:00 | आता, एडमीन पासवर्ड विचारण्यासाठी 'Authentication' डायलॉग बॉक्स दिसेल. |
01:06 | एडमीन पासवर्ड टाईप करून एंटर दाबूया. |
01:11 | आपण सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर प्रथमच वापरत असाल तर त्याचा परिचय करून देणारी डायलॉग बॉक्स दिसेल. |
01:19 | ह्या डायलॉग बॉक्समध्ये सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजरचा उपयोग कसा करावा याची माहिती आहे. |
01:25 | जर आपण प्रॉक्सी नेटवर्कमध्ये काम करत आहात, तर अप्लिकेशन्स किंवा पॅकेज प्रतिष्ठापन करण्यासाठी 'सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर' मध्ये प्रॉक्सी कन्फिगर करा. |
01:36 | नाहीतर आपण हे प्रॉक्सी कॉन्फिगरेशन सेटिंग टाळू शकतो. |
01:41 | यासाठी सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर विंडोमधे जाऊया. |
01:47 | आता सेटींगमधे जाऊन प्रेफरन्सेस वर क्लिक करा. |
01:54 | प्रेफरन्स विंडोवर अनेक टॅब्ज आहेत. |
01:58 | प्रॉक्झी सेट्टिंग्स कॉंन्फिगर करण्यासाठी Network टॅब वर क्लिक करा. |
02:03 | प्रॉक्झी सर्व्हर अंतर्गत दोन पर्याय असतात जसे की - Direct Connection to the internet |
02:09 | आणि Manual Proxy Configuration |
02:12 | आपण पाहू शकता मी इथे ‘मॅन्युअल प्रॉक्झी कनेक्शन’ वापरत आहे. |
02:17 | आपण आपल्या आवडीनुसार पर्याय निवडून Authentication बटणावर क्लिक करा. |
02:23 | स्क्रीनवर 'HTTP' ऑथेंटिकेशन विंडो दिसेल. |
02:28 | आवश्यकता भासल्यास 'Username' आणि 'Password' टाईप करून OK बटण वर क्लिक करा. |
02:33 | आता बदल लागू होण्यासाठी Apply वर क्लिक करा. |
02:37 | नंतर, विंडो बंद करण्यासाठी OK बटण वर क्लिक करा. |
02:42 | हे टूल कसे वापरावे हे शिकण्यास उदाहरण म्हणून मी व्ही.एल.सी.प्लेअर इनस्टॉल करत आहे. |
02:49 | जर आपण सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर पहिल्यांदा वापरत असाल, तर आपल्याला पॅकेजेस रीलोड करावी लागतील. |
02:57 | हे करण्यासाठी टूलबार वरील Reload चे बटण दाबा. |
03:02 | यासाठी काही सेकंद लागतील. |
03:06 | येथे इंटरनेटवरून पॅकेजेस स्थलांतरीत आणि अपडेट होताना दिसतात. |
03:14 | रीलोडींगची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, टूलबारवर असणाऱ्या 'quick search' बॉक्समध्ये जाऊन vlc (व्ही.एल.सी) असे टाईप करा. |
03:23 | इथे आपल्याला सर्व पॅकेजेसची यादी मिळेल. |
03:28 | व्ही.एल.सी. पॅकेजेसच्या पुढील चेक बॉक्स वर क्लिक करा. |
03:33 | आता मेनूबारमधून Mark for installation हा पर्याय निवडा. |
03:39 | रीपॉझिटरी पॅकेजेसची यादी दाखवणारा एक डायलॉग बॉक्स दिसेल. |
03:45 | सर्व संबंधीत आवश्यक पॅकेजेस आपोआप निवडली जाण्यासाठी Mark बटण वर क्लिक करा. |
03:51 | टूलबारवर जाऊन Apply बटण वर क्लिक करा. |
03:56 | Install करायच्या सर्व पॅकेजेसचा तपशील दाखवणारी विंडो दिसेल. |
04:02 | इन्स्टलेशन सुरू करण्यासाठी Apply या बटणावर क्लिक करा. |
04:07 | पॅकेजेसची संख्या व आकार यानुसार इन्स्टलेशन प्रक्रियेस काही मिनिटांचा अवधी लागेल. |
04:16 | इन्स्टलेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ’डाऊनलोडिंग पॅकेज फाईल’ ची विंडो बंद होईल. |
04:25 | व्ही.एल.सी. स्थापित झालेले आपल्याला दिसेल. |
04:29 | ‘सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर’ विंडो बंद करा. |
04:33 | आता व्ही.एल.सी प्लेअर आपल्या मशीनवर यशस्वीपणे स्थापित झाला आहे का ते पाहू. |
04:40 | स्क्रीन मिनिमाइज़ करू, यासाठी Applications मधून Sound & Video मध्ये जाऊया. |
04:49 | इथल्या यादीत आपल्याला 'व्ही.एल.सी. मिडिया प्लेअर' दिसेल. |
04:54 | अर्थात, 'व्ही.एल.सी' यशस्वीपणे स्थापित झालेला आहे. |
04:59 | यापद्धतीने 'सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर' वापरून आपण इतर अप्लिकेशन इनस्टॉल करू शकतो. |
05:06 | थोडक्यात |
05:08 | आपण या पठात शिकलो- |
05:10 | 'सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर' मध्ये प्रॉक्सी कन्फिगर करणे. |
05:14 | 'सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर' वापरुन अप्लिकेशन किंवा पॅकेज इनस्टॉल करणे. |
05:20 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टची माहिती देणारा व्हिडिओ स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
05:24 | तो डाउनलोड करून पहा. |
05:28 | स्पोकन ट्युटोरियल टीम कार्यशाळा घेते आणि online परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते. |
05:36 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला NMEICT, MHRD, भारत सरकारकडून अर्थसहाय्य मिळाले आहे. |
05:44 | या ट्युटोरियलसाठी स्क्रिप्ट , स्पोकन ट्युटोरियल टीमने योगदान केले आहे. |
05:50 | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |