BOSS-Linux/C2/General-Purpose-Utilities/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search

Title of script: General Purpose Utilities in Linux

Author: Manali Ranade

Keywords: Linux

Time Narration
00:00 लिनक्सच्या General Purpose Utilities वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
00:06 आपण ह्या ट्युटोरियलमध्ये लिनक्समधील काही बेसिक आणि मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणा-या कमांडस बद्दल माहिती करून घेणार आहोत.
00:14 लिनक्स सिस्टीमवर काम करण्यास तुम्हाला सुरुवात करता यावी हा ह्या ट्युटोरियलचा उद्देश आहे.
00:21 आपण प्रथम echo कमांड बघणार आहोत. लक्षात ठेवा लिनक्स कमांडस् केस सेन्सेटिव्ह आहेत.
00:29 वेगळे सांगितले नसल्यास सर्व कमांडस आणि त्यांतील पर्याय लोअर केस मध्ये असतील.
00:36 ह्या कमांडचा उपयोग स्क्रीनवर काही संदेश दाखविण्यासाठी केला जातो. आता टर्मिनलवर जाऊया.
00:44 दुस-या ट्युटोरियलमध्ये टर्मिनल उघडण्याची सर्वसाधारण पध्दत समजावून सांगितली आहे.
00:50 command prompt वरecho space Hello World टाईप करून एंटर दाबा.
01:02 Hello World हा संदेश स्क्रीनवर दिसेल.
01:06 आपल्याला echo command च्या सहाय्याने एखाद्या variable ची किंमत देखील दर्शवता येते.
01:11 command prompt वरecho space dollar कॅपिटलमध्ये SHELL टाईप करून एंटर दाबा.
01:22 आपल्याला आऊटपुट मध्ये वापरत असलेली SHELL दर्शवेल.
01:28 आपण echo कमांड सोबत escape sequences देखील वापरू शकतो.
01:35 त्यासाठी लिनक्स मध्ये आपल्याला hyphen e हा पर्याय वापरणे आवश्यक आहे.
01:39 escape sequences मधील blackslash t ने टॅब व blackslash n ने नव्या ओळीवर येता येते. तसेच blackslash c ने त्याच ओळीवर आपल्याला prompt आणता येतो.
01:55 काही टाईप करण्यापूर्वी जेव्हा आपल्याला एखादा संदेश दाखवायचा असेल तर ह्याचा उपयोग होतो. prompt वर टाईप करा. echo space minus e within single quote Enter a command back slash c आणि एंटर दाबा.
02:25 आपल्याला enter a command हे प्रिंट झाल्यावर त्याच ओळीवर prompt दिसेल.
02:31 समजा आपल्याला चालू Linux kernelचे version जाणून घ्यायचे आहे.
02:35 त्याबद्दल आणि आपल्या संगणकाची इतर अनेक वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी आपल्याकडे uname ही कमांड आहे. command prompt वर uname space hyphen r टाईप करून एंटर दाबा.
02:51 तुमचे username काय आहे हे जाणून घेण्यासाठी command prompt वर who space am space I टाइप करून एंटर दाबा.
03:03 हे प्रत्यक्षात आपल्याला who ह्या कमांडद्वारे दिसते. जी त्या क्षणी multi-user system वर logged-in असलेल्या सर्व users ची यादी देते.
03:14 कधी काही कारणांनी तुमचा पासवर्ड तुम्हाला बदलण्याची गरज भासते.
03:20 यासाठी आपल्याकडे passwdही कमांड आहे. command promptवर p-a-s-s-w-dटाईप करून एंटर दाबा.
03:30 आपण ही कमांड टाईप केल्यावर आपल्याला सध्याच्या पासवर्डची विचारणा केली जाते.
03:35 येथे आपण आपल्या सिस्टीमचा चालू पासवर्ड टाईप करू.
03:41 आपण योग्य पासवर्ड दिल्यास आपल्याला नवीन पासवर्ड देऊन त्याची खात्री करण्यासाठी तो पुन्हा टाईप करणे आवश्यक आहे.
03:55 पण आपण आपला चालू पासवर्ड विसरलो तर काय?
03:59 चालू पासवर्ड माहित नसताना देखील पासवर्ड बदलता येऊ शकतो. परंतु हे केवळ root userच करू शकतो.
04:06 आता root user कोण असतो?
04:10 ही एक विशेष यूजर असते जिच्याकडे काही विशेष अधिकार असतात.
04:15 विंडोजशी तुलना करायची झाल्यास root user म्हणजे system चे Administrative rightsअसणारी व्यक्ती
04:23 समजा आपल्याला सिस्टीमची वेळ आणि तारीख जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी आपल्याकडे पुढील कमांड आहे.
04:28 टर्मिनलवर date टाईप करून एंटर दाबा.
04:34 हे आपल्याला सिस्टीमची चालू वेळ आणि तारीख दर्शवेल.
04:38 ही कमांड वेळ व तारीख दोन्ही देते व यात खूपच उपयुक्त पर्याय उपलब्ध आहेत.
04:47 command promptवर date space plus percentage sign capital Tटाईप करून एंटर दाबा.
04:59 हे आपल्याला केवळ वेळ; तास, मिनिटे आणि सेकंद या फॉरमॅटमध्ये दर्शवेल.
05:05 command promptवर date space plus percentage sign hटाईप करून एंटर दाबा.
05:15 हे आपल्याला महिन्याचे नाव दाखवेल.
05:18 command promptवर date space plus percentage sign mटाईप करून एंटर दाबा.
05:31 हे आपल्याला वर्षातील महिन्याचा अंक दाखवेल. येथे February महिन्यासाठी 02 दर्शवत आहे. तुम्हाला मिळणा-या आऊटपुटशी हे जुळवून बघा.
05:42 command promptवर date space plus percentage sign yटाईप करून एंटर दाबा.
05:53 हे आपल्याला चालू वर्षातील शेवटचे दोन अंक दर्शवेल.
05:58 आपण हे पर्याय एकत्र देखील करू शकतो. उदाहरणार्थ command promptवर date space plus within double quotes percentage small h percentage small yटाईप करून एंटर दाबा.
06:27 येथे हे आपल्याला February 11 असे दर्शवत आहे.
06:31 ह्या संबंधीत आणखी एक कमांड म्हणजे cal. ह्या कमांडने आपल्याला कुठल्याही वर्षाच्या कुठल्याही महिन्याचे कॅलेंडर बघता येते.
06:41 चालू महिन्याचे कॅलेंडर बघण्यासाठी command prompt वर cal टाईप करून एंटर दाबा.
06:48 कुठल्याही एका महिन्याचे जसे की December 2070 चे कॅलेंडर बघण्यासाठी command promptवर cal space 12 space 2070 टाईप करून एंटर दाबा.
07:05 ही कमांड आपल्याला December 2070 चे कॅलेंडर दर्शवेल.
07:11 पुढे जाण्यापूर्वी आपण फाईल्स आणि डिरेक्टरीज बद्दल थोडी चर्चा करू.
07:19 लिनक्स मध्ये जवळजवळ प्रत्येक गोष्ट फाईल स्वरूपात साठवलेली असते. मग फाईल म्हणजे काय?
07:26 आपण आपली कागदपत्रे ज्यात ठेवतो त्याला फाईल म्हणतात. लिनक्समध्ये फाईल ही माहिती संग्रहित करण्याची एक जागा असते.
07:40 आता डिरेक्टरी म्हणजे काय?
07:44 डिरेक्टरी म्हणजे जिथे अनेक फाईल्स आणि सब डिरेक्टरीज संग्रहित केलेल्या असतात ती जागा.
07:50 डिरेक्टरी आपल्याला आपल्या फाईल्सची मांडणी योग्य पध्दतीने करण्यास मदत करते.
07:56 विंडोज मध्ये डिरेक्टरीला आपण फोल्डर म्हणतो.
08:01 लिनक्स सिस्टीम वर login केल्यावर आपणdefault रूपात home ह्या डिरेक्टरी मध्ये जातो. home डिरेक्टरी बघण्यासाठी command prompt वर echo space dollar कॅपिटलमधे HOME टाईप करा आणि एंटर दाबा.
08:20 पुढील pwd कमांडमुळे आपल्याला आपण सध्या काम करत असलेली डिरेक्टरी बघता येते. pwd म्हणजे present working directory. command prompt वर pwd टाईप करून एंटर दाबा.
08:35 एकदा डिरेक्टरीबद्दल जाणून घेतल्यावर आपल्याला त्या डिरेक्टरीमध्ये असलेल्या फाईल्स आणि सबडिरेक्टरीज मध्ये काय आहे हे जाणून घ्यायचे असल्यास Unix आणि Linux मध्ये सर्वात अधिक वापरली जाणारी ls ही कमांड आपल्याकडे आहे.
08:49 ls ही कमांड टाईप करून एंटर दाबा.
08:54 आता आलेले आऊटपुट बघा.
08:56 साधारणपणे फाईल्स आणि सबडिरेक्टरीज ह्या वेगवेगळ्या रंगांनी दर्शविल्या जातात.
09:00 ls ही अतिशय बहुउपयोगी अशी कमांड असून तिचे अनेक पर्याय आहेत. त्यापैकी काही बघण्यासाठी command prompt वर ls space minus minus all टाईप करून एंटर दाबा.
09:17 ही आपल्याला सर्व फाईल्सची यादी, hidden files सोबत दर्शवते. ज्यांच्या नावची सुरूवात dot ने केलेली आहे.
09:25 जर आपल्याला केवळ फाईल्सच्या नावांशिवाय अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण minus l हा पर्याय वापरू शकतो.
09:33 केवळ ls space minus small l ही कमांड टाईप करा आणि एंटर दाबा.
09:43 हे आपल्याला फाईल परमिशन, फाईलच्या ओनरचे नाव, शेवटचा बदल केलेली वेळ आणि फाईलचा byte मधील आकार इत्यादी दर्शवेल. ह्या ट्युटोरियलमध्ये आपण ह्या प्रत्येक फिल्डची माहिती करून घेणार नाही.
09:58 ls कमांडचे अनेक पर्याय आहेत जे आपण नंतर बघणार आहोत.
10:03 समजा आपल्याला ही सर्व माहिती केवळ स्क्रीनवर दाखविण्याऐवजी एखाद्या फाईलमध्ये ठेवायची आहे. प्रत्यक्षात आपण कुठल्याही कमांड नंतर मिळालेले आऊटपुट फाईलमध्ये समाविष्ट करू शकता.
10:15 त्यासाठी केवळ कमांडपुढे greater than sign आणि फाईलचे नाव टाईप करा. जसे की ls space minus small l space greater than sign space fileinfo असे टाईप करून एंटर दाबा.
10:39 आता सर्व फाईल्स आणि डिरेक्टरीजची माहिती fileinfo नामक फाईलमध्ये लिहिली जाईल.
10:46 परंतु ह्या फाईलमधील घटक कसे बघायचे? त्यासाठी आपल्याकडे cat ही कमांड आहे cat space फाईलचे नाव म्हणजेच इथे fileinfo ही कमांड टाईप करून एंटर दाबा.
11:04 आता आपण त्यातील घटक बघू शकतो. cat ह्या कमांडचा दुसरा महत्त्वाचा उपयोग नवी फाईल बनवण्यासाठी होतो त्यासाठी command prompt वर cat space greater than sign space filename (उदाहरणार्थfile1) टाईप करा आणि एंटर दाबा.
11:28 आता एंटर दाबल्यावर command prompt user कडून येणा-या input ची वाट बघेल.
11:34 आपण जे काही टाईप करू ते आपल्या फाईलमध्ये लिहिले जाईल. मग काही मजकूर टाईप करा.
11:43 आता आपले input देऊन झाले असल्याचे सांगण्यासाठी एंटर दाबा.
11:49 आता CTRL आणि D ही बटणे एकत्रितपणे दाबा.
11:58 जर file1 ही फाईल आधीपासून उपलब्ध असेल तरuserने दिलेला मजकूर त्या फाईलमध्ये overwrite होईल.
12:06 आता जर आपल्याला नवे input आधीच उपलब्ध असलेल्या file1च्या शेवटी जोडायचे असेल तर command prompt वर cat space double greater than sign space file1 टाईप करून एंटर दाबा.
12:28 अनेक कमांडसची माहिती आपण घेतलेली नाही आणि ज्या कमांडसची माहिती घेतली त्यांच्या अनेक पर्यायांचा विचार आपण केलेला नाही. पण आत्तापुरते आपण येथेच थांबू.
12:43 आपण ह्या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
12:55 *यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
13:02 *ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana